UPSC Recruitment द्वारा वैद्यकीय अधिकारी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध , तब्बल ८५९ रिक्त पदे

UPSC Recruitment द्वारा नुकतेच एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार वैद्यकीय अधिकारी पदासाठी एकूण ८५९ रिक्त पदे ही भरली जाणार आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी वैद्यकिय अधिकारी होण्यासाठीची ही सुवर्ण संधी असणार आहे.

Table of Contents

UPSC Recruitment Medical Officer 2024 Overview

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार तब्बल ८५९ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने विभागीय वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी, जनरल ड्युटी मेडिकल अधिकारी यासारखे अधिकारी दर्जाचे पदे भरली जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी सुरवातीची तारीख १० एप्रिल २०२४ पासून सुरू झाली आहे.

जाहीरात प्रसिध्द :संघ लोकसेवा आयोग
Union Public Service Commission
पदाचे नाव :रेल्वे सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी
सामान्य वैद्यकीय अधिकारी श्रेणी
जनरल ड्युटी मेडिकल अधिकारी
पदसंख्या :८५९ पदे
अर्ज पद्धत :ऑनलाईन अर्ज ( Online Mode )
अधिकृत संकेतस्थळ :Union Public Service Commission

SSC JE स्टाफ सिलेक्शन अंतर्गत “कनिष्ठ अभियंता” या पदासाठी भरती , तब्बल ९६८ पदे भरली जाणार

UPSC Recruitment Medical Officer 2024 Important Dates

जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्जाची सुरवातीची आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय आहे याचा आढावा उमेदवारांनी घेणे आवश्यक आहे. आणि या दिलेल्या कालावधीमध्येच उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. बघुया कोणत्या महत्वाच्या तारखा आयोगाने उमेदवारासाठी दिलेल्या आहेत.

अर्ज महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी सुरवातीची तारीख : १० एप्रिल २०२४
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : ३० एप्रिल २०२४
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख :३० एप्रिल २०२४
upsc recruitment

UPSC Recruitment Medical Officer 2024 Vacancy

आयोगाकडून नुकतीच तब्बल ८५९ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलेल्या जाहिरातीमध्ये सविस्तरपणे नमूद केले आहे. यामध्ये असणाऱ्या विविध पदांचा समावेश आहे. आयोगाने या जागा कॅटेगरी १ आणि कॅटेगरी २ अशी विभागणी केली आहे.

चला तर बघुया कोणत्या पदासाठी किती जागा या रिक्त आहेत.

कॅटेगरी १

पदपदसंख्या
केंद्रीय आरोग्य सेवाचे उपसंवर्गातील सामान्य वैद्यकीय अधिकारी श्रेणी :१६३

कॅटेगरी २

पदपदसंख्या
१) रेल्वे सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी :४५०
२) जनरल ड्युटी मेडिकल अधिकारी नवी दिल्ली नगर परिषद :१४
३) सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी ग्रेड २ दिल्ली महानगरपालिका : २००

यासोबतच अपंग घटकासाठी देखील काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्या जागांचा आढावा घेऊया.

पदाचे नावपदसंख्या
१) केंद्रीय आरोग्य सेवाचे उपसंवर्गातील सामान्य वैद्यकीय अधिकारी श्रेणी :
२) रेल्वे सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी : १८
३) जनरल ड्युटी मेडिकल अधिकारी नवी दिल्ली नगर परिषद : ००
४ ) सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी ग्रेड २ दिल्ली महानगरपालिका :

आयोगाने जाहिराती मध्ये हे देखील नमूद केले आहे की जाहीर केलेल्या जागांची संख्येत बदल होऊ शकतात.

UPSC Recruitment Medical Officer 2024 Eligibility Criteria

१) नगिरकत्व ( Nationality ) :

ऑनलाईन अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

२) वयोमर्यादा ( Age Limit) :

पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असले तरी उमेदवाराचे कमाल वय हे ३२ वर्ष दिले आहे. यासाठी उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट १९९२ पूर्वी नसावा. सोबतच आयोगाने वय शिथिलता ( Age Relaxation ) देखील जाहीर केली आहे त्यानुसार अनुसुचीत जाती अनुसूचित जमाती यासाठी ५ वर्ष , इतर मागासवर्गीय उमेदवारंसाठी ३ वर्ष वय शिथिलता घालवून दिले आहे.

३) शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification) :

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणारा उमेदवार हा एम बी बी एस ( MBBS) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यामध्ये लेखी आणि प्रॅक्टिकल दोन्ही घटक पास होणे आवश्यक आहे.

४) शारीरिक आणि वैद्यकीय मानके ( Physical and Medical Standard) :

आयोगाच्या एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षेच्या नियमानुसार आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती मध्ये नमूद केले प्रमाणे शारीरिक आणि वैद्यकीय मानके पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.

UPSC Recruitment Medical Officer 2024 Selection Process / Exam Pattern

आयोगाने एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी निवड पद्धत काय असणार आणि परीक्षा पद्धत काय असणार आहे हे आपल्या जाहिराती मध्ये नमूद केले आहे. यानुसार उमेदवारांची निवड ही आधी लेखी परीक्षा आणि नंतर मुलाखत या दोन्ही मधून होणार आहे. या निवड पद्धतीनुसार परिक्षा घेतली जाईल.

लेखी परीक्षेसाठी २ पेपर होतील. प्रत्येक पेपर हा एकूण २५० गुणाचा असेल म्हणजेच एकूण ५०० गुणाची लेखी परीक्षा होईल.प्रत्येक पेपर साठी २ तासाचा परीक्षा कालावधी देण्यात आला आहे.यात उत्तीर्ण झालेले उमेदवार दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरतील. दुसऱ्या टप्प्यात १०० गुणाची मुलाखत घेतली जाईल.

SSC CHSL 2024 स्टाफ सिलेक्शन मार्फत ३७१२ जागांची भरती जाहीर,मासिक वेतन ₹८१,०००

UPSC Recruitment Medical Officer 2024 How to Apply

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराने आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर एक वेळ नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. ऑनलाईन नोंदणी झाल्यावर परीक्षा जाहिरात निवडून उमेदवाराने पुढील अर्ज भरायचा आहे. आयोगाने ऑनलाईन अर्ज मागवताना आवश्यक ती सर्व माहिती भरणे गरजेचे आहे. तसचे उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की यात भरलेली माहितीच्या आधारेच पुढील निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही ३० एप्रिल २०२४ आहे. परीक्षेसाठी लागणारे ऍडमिट कार्ड हे परीक्षेच्या एक आठवडा पूर्वी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल.

आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये अर्ज भरताना काही अडचण आल्यास मदत क्रमांक दिला आहे. यानुसार कामाच्या वेळा नुसार सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत पुढील क्रमांक वर संपर्क करू शकतात.

टेलिफोन क्रमांक : ०११-२३३८५२७१ / ०११-२३३८११२५ / ०११-२३०९८५४३.

UPSC Recruitment Medical Officer 2024 Application Fee

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी अर्ज शुल्क देखील भरायचे आहे. यानुसार

परीक्षा शुल्क / अर्ज शुल्क म्हणून रुपये २०० भरायचे आहे.

अर्ज शुल्कचा भरणा करण्यासाठी विसा मास्टर कार्ड , डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग सेवा यासारख्या ऑनलाईन प्रणालीचा वापर करू शकतात.

तसेच ज्या उमेदवारांनी Pay by Cash पर्याय निवडला असेल अशा उमेदवाराने ही रक्कम जवळच्या स्टेट बँकेत जमा करावी. ऑफलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख २९ एप्रिल असणार आहे.

UPSC Recruitment Medical Officer 2024 Conclusion

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार एकूण ८५९ वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल असून रुपये २०० परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. यातून पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा आणि त्यात उत्तीर्ण झाल्यास मुलाखती साठी बोलावले जाईल.

Frequently Asked Questions

१) UPSC द्वारा जाहीर केलेल्या जाहिराती नुसार किती जागा भरल्या जाणार आहे ?

उत्तर : UPSC Recruitment द्वारा जाहीर केलेल्या जाहिराती नुसार एकूण ८५९ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

२) UPSC Recruitment द्वारा कोणती पदे भरली जाणार आहेत ?

उत्तर : UPSC Recruitment द्वारा केंद्रीय आरोग्य सेवाचे उपसंवर्गातील सामान्य वैद्यकीय अधिकारी श्रेणी , रेल्वे सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी , जनरल ड्युटी मेडिकल अधिकारी नवी दिल्ली नगर परिषद , सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी ग्रेड २ दिली महानगरपालिका पदे भरली जाणार आहेत.

३) UPSC Recruitment द्वारा वैद्यकीय अधिकारी पदासाठी कोण अर्ज करू शकतो ?

उत्तर : UPSC Recruitment द्वारा वैद्यकीय अधिकारी पदासाठी कमाल वय ३२ वर्ष असणारा भारतीय नागरिक सोबतच एम बी बी एस उत्तीर्ण असणारा उमेदवार अर्ज करू शकतो.

४) UPSC Recruitment द्वारा मेडिकल अधिकारी पदासाठी निवड प्रक्रिया कशी असेल ?

उत्तर : UPSC Recruitment द्वारा मेडिकल अधिकारी पदासाठी निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि मुलाखत असणार आहे.

५) UPSC चा फुल फॉर्म काय आहे ?

उत्तर : UPSC चा फुल्ल फॉर्म आहे Union Public Service Commission