केंद्रीय लोकसेवा आयोगाची मोठी जाहिरात , ५००+ जागांची भरती,अर्ज सुरू UPSC CAPF Recruitment 2024

UPSC CAPF Recruitment अंतर्गत एकूण ५०६ जागांची जाहिरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच Union Public Service Commission च्या परीक्षा जाहिरात क्रमांक ०९/२०२४ नुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.

आयोगाने जाहीर केलेली जाहिरात आहे केंद्रीय सशस्त्र पोलीस फोर्स मधील “असिस्टंट कमांडंट ( Assistant Commandant )” या पदाची. चला तर बघुया नेमक्या किती जागा आहेत अन् कोण या पदासाठी अर्ज करू शकतात.

UPSC CAPF Recruitment 2024 Overview

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर https://upsc.gov.in/ वर असिस्टंट कमांडंट या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रिया द्वारे तब्बल ५०६ पदे ही भरली जाणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही १४ मे २०२४ आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर ,

जाहिरात प्रसिद्ध : केंद्रीय लोकसेवा आयोग
(Union Public Service Commission )
पदाचे नाव :केंद्रीय सशस्त्र पोलीस फोर्स मधील “असिस्टंट कमांडंट ( Assistant Commandant )”
पदांची संख्या : ५०६ पदे
अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने ( Online Mode )
अधिकृत संकेतस्थळ : https://upsc.gov.in/
UPSC Recruitment द्वारा वैद्यकीय अधिकारी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध , तब्बल ८५९ रिक्त पदे
UPSC Recruitment द्वारा वैद्यकीय अधिकारी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध , तब्बल ८५९ रिक्त पदे

UPSC CAPF Recruitment 2024 Important Dates

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये नमूद केलेल्या विहित कालावधी मध्येच अर्ज सादर करायचा आहे. केवळ याच कालावधी मध्ये आयोगाच्या संकेतस्थळावर अर्जाची लिंक चालू असल्याने इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज त्वरित भरावे. अपूर्ण अर्ज हा पुढील निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.

चला तर बघुया केंद्रीय सशस्त्र पोलीस फोर्स मधील “असिस्टंट कमांडंट ( Assistant Commandant )” पदासाठी अर्ज प्रक्रिया केव्हा सुरू होणार आहे आणि उमेदवार शेवटच्या कोणत्या तारखे पर्यंत अर्ज करू शकतो.

अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख : २४ एप्रिल २०२४
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : १४ मे २०२४
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख : १४ मे २०२४
अर्जात बदल करायचा असल्यास तारीख : १५ मे ते २१ मे २०२४
लेखी परीक्षा तारीख : ४ ऑगस्ट २०२४

UPSC CAPF Recruitment 2024 Vacancies

केंद्रीय सशस्त्र पोलीस फोर्स मधील “असिस्टंट कमांडंट ( Assistant Commandant )” या पदासाठी आयोगाने विविध पोलीस फोर्स मधील एकूण ५०६ रिक्त जागा या भरती प्रक्रिया दरम्यान भरली जाणार आहेत.

केंद्रीय सशस्त्र पोलीस फोर्स मधील बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (Border Security Force ), केंद्रीय राखीव पोलीस दल ( Central Reserve Police Force), केंद्रिय आद्योगिक सुरक्षा दल ( Central Industrial Security Force ), इंडो तिबेट बॉर्डर पोलीस ( Indo Tibetan Border Force ), सशस्त्र सीमा बल ( Sashstra Seema Bal ) या विविध फोर्स मधील रिक्त पदे ही भरली जाणार आहेत.

बघुया कोणत्या फोर्स साठी किती पदे भरली जाणार आहेत .

सशस्त्र दल पदांची संख्या
१) बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (Border Security Force ) : १८६ पदे
२) केंद्रीय राखीव पोलीस दल ( Central Reserve Police Force) :१२० पदे
३) केंद्रिय आद्योगिक सुरक्षा दल ( Central Industrial Security Force ) :१०० पदे
४) इंडो तिबेट बॉर्डर पोलीस ( Indo Tibetan Border Force ) : ५८ पदे
५) सशस्त्र सीमा बल ( Sashstra Seema Bal ) : ४२ पदे
एकुण पदांची संख्या५०६ पदे

UPSC CAPF Recruitment 2024 Eligibility Criteria

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाने दिलेल्या सर्व पात्रतेचे निकष मध्ये आपण बसत आहोत की नाही हे बघणे आवश्यक आहे. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती मध्ये पात्रतेचे निकष स्पष्टपणे नमूद केले आहेत. बघुया नेमके कोणते उमेदवार हे अर्ज करण्यासाठी पात्र असतील.

१) राष्ट्रीयत्व ( Nationality ) : भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

२) लिंग ( Sex ) : पुरुष आणि महिला दोघे ही या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र असतील.

३) वयोमर्यादा ( Age Limit ) : आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये अर्ज करण्याऱ्या उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय हे २५ वर्ष दिले आहे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म हा २ ऑगस्ट १९९९ च्या अगोदर आणि १ ऑगस्ट २००४ च्या नंतर झालेला नसावा.

आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये सरकारी नियमानुसार वयाबाबत शिथिलता Age Relaxation देखील घालवून दिली आहे. त्यानुसार पुढील प्रवर्गासाठी काही वय वर्षाची शिथिलता दिली आहे.

प्रवर्ग शिथिल वर्ष
अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती ( Scheduled Caste and Scheduled Tribes ) : ५ वर्ष.
इतर मागासवर्गीय घटक ( Other Backward Classes ) :३ वर्ष.

४) शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) : केंद्रीय सशस्त्र पोलीस फोर्स मधील “असिस्टंट कमांडंट ( Assistant Commandant )” या पदासाठी इच्छुक असणारा उमेदवार हा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार कोणतीही पदवी परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उत्तीर्ण असलेली पदवी ही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट अथवा बोर्ड कडून प्राप्त झालेली असावी.

५) निवडी नंतर अर्ज ( Re appearances ) : ज्या उमेदवारांची निवड आयोगाने या अगोदर घेतलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस फोर्स मधील “असिस्टंट कमांडंट ( Assistant Commandant )” या पदासाठी झालेल्या भरती प्रक्रियेत निवड झालेली असेल अशा उमेदवारांना पुन्हा अर्ज करता येणार नाही आहे.

६) शारीरिक मानके ( Physical Standard ) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या जाहिराती मध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस फोर्स मधील “असिस्टंट कमांडंट ( Assistant Commandant )” या पदासाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक / मेडिकल पात्रता नमूद केल्या आहेत. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी या गोष्टी कडे लक्ष देणे गरजेचे आहे.

UPSC CAPF Recruitment 2024 Selection Process

केंद्रीय सशस्त्र पोलीस फोर्स मधील असिस्टंट कमांडंट म्हणून निवड होण्यासाठी उमेदवारांना निवडीचे ३ टप्पे पार पाडायचे असून हे तीन ही टप्पे एकाच वेळी आणि सलग उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. बघुया कोणते आहेत निवडीचे टप्पे.

१) लेखी परीक्षा Written Examination : लेखी परीक्षा ही दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी होईल असे जाहीर केली असून यात बदल झाल्यास तसे बदल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील.

२) शारीरिक चाचणी / मानके , मेडिकल मानके /चाचणी ( Physical and Medical Test ) : लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नावे मेरिट लिस्ट नुसार जाहीर केले जातील. केवळ निवड झालेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणी / मानके , मेडिकल मानके /चाचणी साठी बोलावले जाईल.

३) मुलाखत ( Interview ) : उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून मुलाखती साठी बोलावले जाईल. त्यापूर्वी उमेदवारांना DAF अर्ज भरायचा आहे. DAF मध्ये उमेदवारांना केंद्रीय सशस्त्र पोलीस फोर्स मधील विविध फोर्स चा क्रम द्यायचा आहे. मुलाखती पूर्वी DAF भरणे आवश्यक आहे.

हे तीन ही टप्पे उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

अंतिम निवड यादी जाहीर करताना केवळ लेखी परीक्षा आणि मुलाखत यामध्ये मिळालेले गुण ग्राह्य धरले जातील.

upsc capf recruitment

UPSC CAPF Recruitment 2024 Exam Pattern

निवड प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले महत्वाचे तीन टप्पे आपण बघितले पण नेमकी कोणत्या टप्प्यासाठी किती गुण आहेत दे बघणे देखील आवश्यक आहे. आधी सांगितल्या प्रमाणे असिस्टंट कमांडंट म्हणून निवड होण्यासाठी लेखी परीक्षा, शारीरिक / मेडिकल चाचणी , मुलाखत हे टप्पे आहेत.

लेखी परीक्षा ( Written Examination ) : लेखी परीक्षेसाठी दोन पेपर होतील.

यामध्ये पेपर १ मध्ये General Ability and Intelligence विषय असून परीक्षा २५० गुणाची होईल.

पेपर २ मध्ये २०० गुणासाठी General Studies , Essay , Comprehension हे विषय असतील.

शारीरिक / मेडिकल चाचणी ( Physical and Medical Test ) : सदर चाचणी ही पुरुष आणि महिला दोघांसाठी असेल. यामध्ये १००,८०० मीटर धावणे , लाँग जंप, शॉट पूट याच समावेश असेल.

मुलाखत ( Interview ) : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल ही मुलाखत एकूण १५० गुणाची होईल.

UPSC CAPF Recruitment 2024 How to Apply

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आयोगाची अधिकृत संकेतस्थळ यावर जावून अर्ज करायचा आहे. आयोगाने नमूद केल्याप्रमाणे केवळ याच म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. ज्या उमेदवारांनी अगोदर नोंदणी केली असेल असे उमेदवार सरळ ऑनलाईन अर्ज करू शकतात. मात्र जे उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी पहिल्यांदा अर्ज करत आहे त्यांनी प्रथम एक वेळ नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर उमेदवार ऑनलाईन अर्ज भरू शकतात.

अर्ज भरताना उमेदवारांना ओळख पत्र म्हणून आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग परवाना, मतदान कार्ड यापैकी कोणतेही एक ओळख पत्राची माहिती भरणे आवश्यक असून हेच ओळखपत्र प्रवेश परीक्षा वेळी सादर करणे गरजेचे आहे.

अर्ज भरून सबमिट केल्यानंतर कोणत्याही प्रकारे अर्ज मागे घेता येणार नाही यांची नोंद उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी घ्यावी. आयोगाने फक्त अर्जात बदल करायचा असल्यास १५ मे ते २१ मे २०२४ हा कालावधी दिलेला आहे.

UPSC CAPF Recruitment 2024 Application Fee

ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी अर्ज शुल्क अथवा परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क भरल्यानंतर संपूर्ण अर्ज हा भरून पूर्ण होईल. यासाठी आयोगाने काही प्रवर्गासाठी अर्ज शुल्क माफ केले असून इतर प्रवर्गासाठी अर्ज शुल्क म्हणून रुपये २०० भरणे आवश्यक आहे.

बघुया कोणाला सूट आणि कोणाला अर्ज शुल्क भरायचे आहे. आयोगाने जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे

महिला वर्ग ( Women ) , अनुसूचीत जाती अनुसूचित जमाती
( Scheduled Caste and Scheduled Tribes )
यांना कोणत्याही प्रकारचे
अर्ज शुल्क अथवा परीक्षा शुल्क भरायचे नाही.
उरलेल्या सर्व प्रवर्ग म्हणजेच खुला प्रवर्ग, इतर मागासवर्गीय घटक, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यांना
अर्ज शुल्क म्हणून ₹ २०० भरायचे आहे.

आयोगाने अर्ज शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करताना क्रेडिट कार्ड , डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग सारख्या प्रणालीचा अवलंब करू शकतात सोबतच ऑफलाईन पेमेंट पद्धतीचा म्हणजेच Pay by Cash चा पर्याय उमेदवारांना दिलेला आहे. यासाठी स्टेट बँकेच्या अधिकृत शाखेत जावून अर्ज शुक्ल भरायची आहे.

Conclusion

केंद्रीय सशस्त्र पोलीस फोर्स मधील “असिस्टंट कमांडंट ( Assistant Commandant )” या पदासाठी एकूण ५०६ पदासाठी कोणतीही पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेला वय वर्ष २० ते २५ वयातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १४ मे २०२४ आहे.

Frequently Asked Questions.

१) UPSC CAPF Recruitment 2024 साठी कोण अर्ज करू शकते ?

उत्तर : UPSC CAPF Recruitment 2024 साठी कोणतीही पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेला वय वर्ष २० ते २५ वयातील उमेदवार अर्ज करू शकतात.

२) UPSC CAPF Recruitment मध्ये किती जागा साठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे ?

उत्तर : UPSC CAPF Recruitment मध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस फोर्स मधील “असिस्टंट कमांडंट ( Assistant Commandant )” या पदासाठी एकूण ५०६ पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

३) UPSC CAPF Recruitment अंतर्गत कोणत्या फोर्सचा समावेश होतो ?

उत्तर : केंद्रीय सशस्त्र पोलीस फोर्स मधील बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (Border Security Force ), केंद्रीय राखीव पोलीस दल ( Central Reserve Police Force), केंद्रिय आद्योगिक सुरक्षा दल ( Central Industrial Security Force ), इंडो तिबेट बॉर्डर पोलीस ( Indo Tibetan Border Force ), सशस्त्र सीमा बल ( Sashstra Seema Bal ) या विविध फोर्सचा समावेश होतो.

४) UPSC CAPF चा फुल्ल फॉर्म काय आहे ?

उत्तर : Union Public Service Commission Central Armed Police Forces असा अर्थ आहे.

५) UPSC CAPF साठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता किती लागते ?

उत्तर : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट अथवा बोर्ड कडून पदवी परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.