UPSC CAPF AC Recruitment 2024 अंतर्गत असिस्टंट कमांडंट साठी मोठी भरती

UPSC CAPF AC Recruitment म्हणजेच युनियन पब्लिक सर्विस कमिशन अंतर्गत असिस्टंट कमांडंट या पदासाठी नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.सब इन्स्पेक्टर व इन्स्पेक्टर या पदावर सेवा दिलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी असून एकूण ८९ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

Table of Contents

UPSC CAPF AC Recruitment 2024 Overview

UPSC CAPF AC Recruitment म्हणजेच युनियन पब्लिक सर्विस कमिशन अंतर्गत असिस्टंट कमांडंट या पदासाठी नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यूपीएससीने जाहीर केलेली भरती ही खात्यांतर्गत भरती आहे. यामध्ये अर्ज करणारा उमेदवार हा सध्या कार्यरत असलेले सब इन्स्पेक्टर किंवा इन्स्पेक्टर असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मे २०२४ असून या तारखेनंतर आलेले कोणतेही अर्ज पुढील निवडीसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.

जाहिरात प्रसिद्ध : केंद्रीय लोकसेवा आयोग.
( Union Public Service Commission )
पदाचे नाव :असिस्टंट कमांडंट ( Assistant Commandant )
पदांची संख्या : ८९ पदे
अर्ज पद्धत :ऑफलाइन पद्धत ( Offline Mode)

UPSC CAPF AC Recruitment 2024 Important Dates

UPSC CAPF AC Recruitment 2024 पात्र असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आयोगाने दिलेल्या कालावधी मध्येच केवळ अर्ज भरणे आवश्यक आहे. त्यामुळे फॉर्म भरण्याची अर्ज भरण्याची शेवटची आणि सुरुवातीची तारीख माहिती असणे आवश्यक आहे.

चला तर बघूया कोणत्या आहेत महत्त्वाच्या तारखा :

अर्ज सुरुवात होण्याची तारीख : १ मे २०२४
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : २१ मे २०२४
लेखी परीक्षेची तारीख : ६ जून २०२४
शारीरिक चाचणी किंवा शारीरिक कार्यक्षमता चाचणी :२२ जुलै ते २ ऑगस्ट २०२४

इतर सर्व महत्त्वाच्या तारखांसाठी उमेदवारांनी आयोगाने जाहीर केलेली जाहिरात बघावी.

upsc capf ac

UPSC CAPF AC Recruitment 2024 Vacancies

आयोगाने आपल्या UPSC CAPF AC Recruitment 2024 जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहे की , ही भरती अंतर्गत असून जे सब इन्स्पेक्टर किंवा इन्स्पेक्टर या पदावर हे केंद्रीय राखीव पोलीस फोर्स , बॉर्डर सिक्युरिटी फोर्स , इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स , सशस्त्र सीमा बल यामध्ये कार्यरत असेल यांच्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

याच आधारावर आयोगाने हे रिक्त जागांचा तपशील आपल्या जाहिरातीमध्ये नमूद केला आहे.

चला तर बघूया नेमक्या किती रिक्त जागा या भरती प्रक्रिये द्वारा भरल्या जाणार आहेत.

फोर्सरिक्त जागा
केंद्रीय राखीव पोलीस फोर्स१९
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स२९
इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स२९
सशस्त्र सीमा बल१२

केंद्रीय लोकसेवा आयोगाची मोठी जाहिरात , ५००+ जागांची भरती,अर्ज सुरू UPSC CAPF Recruitment 2024

आयोगाने जाहीर केलेल्या जागा या तात्पुरत्या स्वरूपात त्या असून यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केले जाऊ शकते अशा प्रकारचे बदल हे आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जातील.

UPSC CAPF AC Recruitment 2024 Eligibility Criteria

सदर भरती ही मर्यादित विभाग स्पर्धा परीक्षा असली तरी आयोगाने या भरतीसाठी काही पात्रतेचे निकष घालून दिलेले आहेत. चला तर बघूया कोणते पात्रतेचे निकष पूर्ण असणारे उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील.

एक ) वयोमर्यादा ( Age Limit) :

UPSC CAPF AC Recruitment 2024 मर्यादित विभाग स्पर्धा परीक्षा मध्ये आयोगाने अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी कमाल वयाचे बंधन घालण्यात आले असून अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे. तसेच आयोगाने कोणत्याही प्रकारचे किमान वयाबाबतचे मर्यादा घालून दिलेली नाही.

दोन ) शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) :

अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ इन्स्टिट्यूट किंवा बोर्ड यामधून उत्तीर्ण असावा.

तीन) वय शिथिलता ( Age Relaxation ) :

आयोगाने आपल्या जाहिरातीमध्ये वयाबाबत शिथिलता जाहीर केली असून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी पाच वर्ष वय शिथिल करण्यात आले आहेत. यानुसार अनुसूचित जाती व जमाती मध्ये अर्ज करण्याऱ्या उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.

चार ) सेवा ( Service) :

ज्या उमेदवारांची सेवा ही दिनांक १ जानेवारी २०२३ पर्यंत चार वर्षे पूर्ण झालेली असेल. असे उमेदवार किंवा भरती प्रक्रियेसाठी पात्र असतील. तसेच उमेदवाराने हे चारही वर्ष इन्स्पेक्टर किंवा सब इन्स्पेक्टर या पदावर काढलेली असावीत. यामध्ये त्यांच्या प्रशिक्षण कालावधीचा देखील समावेश असेल. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा सेवा रेकॉर्ड हा स्वच्छ असावा.

पाच) शारीरिक पात्रता ( Physical Standard) :

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही शारीरिक निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. यामध्ये कमीत कमी उंची तसेच छाती तसेच वजन याबद्दलचे निकष देण्यात आले आहेत. चला तर बघूया पुरुष आणि महिलांसाठी कोणते शारीरिक चाचणीचे नियम घालून देण्यात आले आहेत.

UPSC CAPF AC Recruitment 2024 Selection Process

आयोगाने आपल्या UPSC CAPF AC Recruitment 2024 जाहिरातीमध्ये यूपीएससी असिस्टंट कमांडट या पदासाठी असणारी निवड प्रक्रिया सविस्तरपणे नमूद केलेली आहे.

चला तर बघूया यामध्ये कोण कोणते महत्त्वाचे टप्पे आहेत.

upsc capf ac

साधारणपणे विचार केला तर यामध्ये निवड प्रक्रियेचे साधारण चार टप्पे आहेत.पहिला टप्पा लेखी परीक्षा , दुसऱ्या टप्प्यांमध्ये शारीरिक चाचणी , तिसऱ्या टप्प्यामध्ये वैद्यकीय चाचणी आणि चौथ्या टप्प्यांमध्ये मुलाखत असेही उमेदवाराच्या निवडीची रूपरेषा असेल.

आता आपण एक एक टप्पा थोडा सविस्तर बघूया.

एक ) लेखी परीक्षा ( Written Examination ) :

लेखी परीक्षेचा विचार केला तर यामध्ये तीन लेखी पेपर होतील. जे उमेदवार या लेखी परीक्षेसाठी पात्र होतील , त्यांचे प्रवेश पत्र हे नूडल फोर्स किंवा फोर्स आयडेंटी कार्ड द्वारा उमेदवारांना दिले जातील. लेखी परीक्षेसाठी उमेदवारांनी एक प्रॉपर युनिफॉर्म मध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे.

चला तर बघूया कोणते आहेत तीन महत्त्वाचे लेखी पेपर.

पहिला पेपर : बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान ( Intelligence Test And General Awareness ) :

पहिला पेपर साठी परीक्षा कालावधी हा दोन तास असून यामध्ये १०० प्रश्न हे १०० गुणांसाठी विचारले जाणार आहेत. पेपर एक साठी अभ्यासक्रमाचा विचार केला तर यामध्ये सामान्य जागरुकता , सामान्य बुद्धिमत्ता तर्क संख्यात्मक क्षमता , वर्तमान घडामोडी , रोजच्या निरीक्षण आणि अनुभवाचे महत्त्व असा असेल. पेपर एक हा बहुपर्यायी असून पेपरची भाषा हिंदी किंवा इंग्लिश अशी असेल.

पेपर दुसरा : व्यावसायिक कौशल्य ( Professional Skill) :

पेपर दोन साठी परीक्षा कालावधी हा दोन तास असून हा पेपर १०० गुणांसाठी होईल व यामध्ये १०० प्रश्न विचारले जातील. अभ्यासक्रमाचा विचार केला तर यामध्ये उमेदवाराचे व्यावसायिक कौशल्य तपासले जाईल. पेपर दोन हा बहुपर्यायी असून पेपरची भाषा इंग्लिश व हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये असेल.

पेपर तीन : निबंध , संक्षेप लेखन आणि आकलन ( Essay Precise Writing and Comprehension ) :

पेपर तीन साठी परीक्षा कालावधी हा दोन तास असून हा पेपर १०० गुणांसाठी होईल. यामध्ये निबंधाचे माध्यम हे हिंदी किंवा इंग्लिश यापैकी एक असेल पण संक्षेप लेखन आणि आकलन हे मात्र इंग्रजी भाषेमध्ये असतील.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या UPSC CAPF AC Recruitment 2024 जाहिरातीमध्ये निवड प्रक्रियेसाठी काही पात्रता गुण जाहीर केले असून यामध्ये प्रत्येक पेपरमध्ये ४५% आणि सर्व पेपरमध्ये मिळून सरासरी ५०% गुण मिळणे आवश्यक आहे.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील उमेदवारांसाठी पात्रतेचे गुण हे प्रत्येक पेपरमध्ये ४०% आणि सर्व पेपर मध्ये मिळून सरासरी ४५% गुण मिळणे आवश्यक आहे.

दोन ) शारीरिक मानक चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी ( Physical Standard Test and Physical Efficiency Test ) :

जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्याचं उमेदवारांना शारीरिक मानक चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी यासाठी बोलवले जाईन. ही निवड पात्रता प्रकारची असून यात अनुत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराची निवड पुढील प्रक्रियेसाठी रद्द केली जाईल.

चला तर बघूया कोणते शारीरिक मानक चाचणी व शारीरिक कार्यक्षमता चाचणी घेतली जाणार आहे.

पुरुष उमेदवार :

१) सोळा सेकंदामध्ये १०० मीटर धावणे पूर्ण करणे.

२) ८०० मीटर धाव हे ३ मिनिटे व ४५ सेकंदाच्या आत पूर्ण करणे.

३) ३.५ मीटर वर उंच उडी ; यासाठी तीन संधी दिल्या जातील.

४) शॉट पुट ( ७.२६ किलो ) ४.५ मीटर ; यामध्ये देखील तीन संधी उमेदवाराला दिल्या जातील.

महिला उमेदवार :

१) १०० मीटर धावणे १८ सेकंदात पूर्ण करणे.

२) ८०० मीटर धावणे ४ मिनिटे ४५ सेकंदामध्ये पूर्ण करणे.

तीन) वैद्यकीय तपासणी ( Medical Test) :

जे उमेदवार शारीरिक मानक चाचणी व शारीरिक कार्यक्षमता चाचणी उत्तीर्ण होतील त्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणी साठी बोलवले जातील.

चार ) मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणी ( Interview and Personality Test ) :

जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील आणि लेखी परीक्षेमध्ये आवश्यक असणारे सरासरी गुण मिळतील म्हणजेच पेपर एक पेपर दोन आणि पेपर तीन यामध्ये उत्तीर्ण असतील. अशा उमेदवारांची शारीरिक मानक चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी तसेच वैद्यकीय तपासणी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोडल फोर्समार्फत मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

निवड प्रक्रियेचा शेवटचा टप्पा मुलाखत आणि व्यक्तिमत्त्व चाचणी १०० गुणांची होईल.

मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचे कमीत कमी पात्रता मार्क आयोगाने जाहीर केले नाही आहे. तसेच मुलाखती दरम्यान किंवा व्यक्तिमत्व चाचणीमध्ये मिळालेले गुण हे अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरले जातील.

लेखी परीक्षा , शारीरिक मानक चाचणी आणि शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखत या संबंधीच्या सर्व तारखा या उमेदवाराला त्याच्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील रिक्रुटमेंट ब्रांच कडून कळविल्या जातील.

मेरिट लिस्ट ( Merit List ) :

आयोगाने जाहीर केलेल्या भरतीसाठी आवश्यक असलेले निवडीचे सर्व टप्पे उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड यादी ही उमेदवाराच्या खात्यातील डायरेक्टर जनरल यांच्याकडे पाठवली जाईल.

प्रशिक्षण ( Training ) :

ज्या उमेदवारांशी निवड अंतिम यादीत होईल त्या उमेदवारांना दोन वर्षासाठी प्रशिक्षणासाठी बोलावले जाईल.

UPSC CAPF AC Recruitment 2024 How to Apply

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या UPSC CAPF AC Recruitment 2024 असिस्टंट कमांडंट या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. यासाठी आयोगाने जाहीर केलेली जाहिरात ही केंद्रीय राखीव पोलीस दलातील सर्व विभागाकडे पाठवली जाईल. या जाहिराती सोबत जोडलेला अर्ज उमेदवाराने भरायचा आहे.

दिनांक २१ मे २०२४ या तारखेनंतर आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप महानिरीक्षक महासंचालनालय , केंद्रीय राखीव पोलीस फोर्स पूर्व ब्लॉक VII, स्तर IV आर के पुरम , नवी दिल्ली ६६

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांना काही कागदपत्रे समिट करायची आहेत.

चला तर बघूया कोणते कागदपत्रे अर्ज भरताना आवश्यक आहेत.

१) ऍडमिट कार्ड व उमेदवाराची सही आणि फोटो

२) दोन पासपोर्ट साईज फोटो

३) पदवी शिक्षण उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र

४) अनुसूचित जाती व जमाती असल्याचे प्रमाणपत्र

५) मेडिकल प्रमाणपत्र

६) तसेच इतर जातीतील उमेदवारांचे जात प्रमाणपत्र

७) जन्मदाखलेचा पुरावा

८) चार वर्ष सेवा पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.

उमेदवाराने ऑफलाईन अर्ज करताना जे कागदपत्रे जोडली आहेत ते कागदपत्रे मुलाखती दरम्यान सादर करणे आवश्यक आहेत.

Conclusion

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातर्फे असिस्टंट या पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आयोजित केली असून यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये चार वर्ष सब इन्स्पेक्टर व इन्स्पेक्टर या पदावर सेवा दिलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी असून एकूण ८९ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

Frequently Asked Questions

१) UPSC CAPF AC Recruitment 2024 साठी कोण अर्ज करू शकते ?

उत्तर : सदर भरती प्रक्रिया ही मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा असल्याने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील सब इंस्पेक्टर किंवा इन्स्पेक्टर असलेल्या उमेदवारा हे अर्ज करू शकतात.

२) UPSC CAPF AC Recruitment 2024 साठी करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

उत्तर : यूपीएससी असिस्टंट कमांडंट या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मे २०२४ आहे.

३) UPSC CAPF AC Recruitment 2024 साठी निवड प्रक्रिया कशी असेल ?

उत्तर : यूपीएससी असिस्टंट कमांडंट साठी निवड प्रक्रियेमध्ये चार टप्पे असतील यामध्ये पहिला टप्पा लेखी परीक्षा दुसरा टप्पा शारीरिक चाचणी तिसरी तिसरा टप्पा वैद्यकीय चाचणी आणि शेवटचा टप्पा मुलाखत आणि व्यक्तिमत्त्व चाचणी असे असेल.

४) UPSC CAPF AC Recruitment 2024 साठी कमाल वयाची मर्यादा किती आहे ?

उत्तर : यूपीएससी असिस्टंट कमांडंट या पदासाठी असणारी वयाची कमाल मर्यादा ३५ वर्ष आहे.