तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत Union Bank of India Apprentice Bharti 2024 संबंधी भरतीचा धावता आढावा. नुकतेच युनियन बँक ऑफ इंडियाने एक जाहिरात प्रसिद्ध केली असून बँकेमार्फत अप्रेंटीस म्हणजेच Apprentice या पदासाठी मोठी भरती सुरू करण्यात आली आहे.जगाचा विचार करता एकूण ५०० जागांसाठी प्रसिध्द पत्रक जाहीर झाले असून यामध्ये केवळ अप्रेंटीस हेच पद भरले जाणार आहेत.
ज्या उमेदवारांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे किंवा बँकेत अनुभव मिळवण्याची ही भरती मोठी संधी असणार आहे.सदर भरती साठी अर्ज करणारा उमेदवार हा ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवी परीक्षा उत्तीर्ण/पास असणे आवश्यक असून केवळ हेच उमेदवार अर्ज करू शकणार आहेत, अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती How to Apply या भागात दिली आहे.
Union Bank of India Apprentice Bharti 2024 Overview
जाहिरात प्रसिद्ध : | युनियन बँक ऑफ इंडिया ( Union Bank of India) |
पदाचे नाव : | प्रशिक्षणार्थी ( Apprentice ) |
रिक्त जागा : | ५०० जागा |
अर्ज पद्धत : | ऑनलाइन अर्ज प्रणाली ( Online Mode ) |
नोकरीचे ठिकाण : | संपूर्ण भारत |
Union Bank of India Apprentice Bharti 2024 Important Dates
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आयोगाने काही ठराविक कालावधी दिला आहे केवळ याच कलावधी मध्ये उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील. यानुसार,
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख : | जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून |
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : | १७ सप्टेंबर २०२४ |
Union Bank of India Apprentice Bharti 2024 Vacancy Details
यामध्ये आपण प्रामुख्याने पदाचे नाव अन् पदसंख्या सोबतच सदर पदासाठी काय वेतनश्रेणी लागू असेल ह्यावर ही नजर टाकूया.
पदाचे नाव | पद संख्या | वेतन श्रेणी |
प्रशिक्षणार्थी ( Apprentice ) | ५०० जागा | ₹ १५,००० प्रती महिना |
Union Bank of India Apprentice Bharti 2024 Eligibility Criteria
उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोगाने जाहीर केलेल्या पात्रतेच्या निकषांनुसार पूर्तता करणे आवश्यक राहील. यानुसार वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता हा निकषांचा समावेश असेल.
१) वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय वर्ष हे २० ते अधिकतम वय वर्ष हे २८ असेल. केवळ याच गटातील उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.
वयाची अट : २० ते २८ वर्ष.
SSC Combined Hindi Translator Recruitment हिंदी अनुवादक भरती २०२४
२) शैक्षणिक पात्रता :
युनियन बँक ऑफ इंडियाने सदर भरती केवळ ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवी पास वर होणार आहे, जर उमेदवार Undergraduate असेल तर त्याला फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थांमधून/ विद्यापीठ कडून पदवी प्राप्त झालेले असावा.
Union bank of India Apprentice Bharti 2024 How to Apply
आयोगाने उमेदवारांसाठी अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रणालीचा अवलंब केल्याने उमेदवारांनी सरकारच्या nats.education.gov.in या पोर्टलवर जायचे आहे. सर्वात प्रथम पोर्टल वर नोंदणी करून लॉगिन करा. तेथे Apprentice भरतीचा फॉर्म ओपन करा आणि फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती अचूक टाका. सोबतच आयोगाने जे आवश्यक कागदपत्रे मागितले आहेत ते देखील अपलोड करा.
अर्ज भरून झाल्यावर उमेदवारांना अर्ज शुल्क अथवा परीक्षा शुल्क भरायचे आहे. कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोड मार्फत फी भरा.
अर्ज शुल्क :
खुला प्रवर्ग : | ₹ ८०० |
अनुसूचीत जाती अनुसूचित जमाती: | ₹ ६०० |
अपंग घटक : | ₹४०० |
अर्ज शुल्क भरून झाल्यावर अर्जामध्ये टाकलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करा. शेवटी अर्ज तपासून फॉर्म खाली दिलेल्या Submit बटणावर क्लिक करा.
Union Bank of India Apprentice Bharti 2024 Selection Process
ज्या उमेदवारांनी सदर भरतीसाठी अर्ज केला आहे त्यांना सुरुवातीला ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे, टेस्ट मध्ये पास झाल्यानंतर स्थानिक भाषा ची टेस्ट असणार आहे, त्यानंतर पास झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. या यादी मधुन योग्य अन् पात्र उमेदवार निवडले जातील, निवडलेल्या उमेदवारांची मेडिकल तपासणी केली जाईल, त्यानंतर उमेदवाराची अंतिम निवड केली जाईल.
Union Bank of India Apprentice Bharti 2024 FAQ
१) Who is eligible for Union Bank of India Apprentice Bharti?
उत्तर : अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे.
२) How to apply for Union Bank of India Apprentice Bharti?
उत्तर : सदर भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज कसा करावा ह्या भागात दिलेली माहिती वाचून घ्यावी.
३) What is the last date of Union Bank of India Apprentice Bharti?
उत्तर : सदर भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १७ सप्टेंबर २०२४ असणार आहे.