TCIL Recruitment 2024 अंतर्गत भारत सरकारच्या अधीन असलेल्या टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये एकूण ३५० पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. चला तर बघुया की टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये नेमक्या कोणत्या पदासाठी ही भरती होणार आहे , निवड प्रक्रिया कशी असेल , उमेदवारांची निवड कशी केली जाईल यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या ह्यातून मिळनार आहे. वेळ न दवडता बघुया TCIL Recruitment 2024 अगदी थोडक्यात.
TCIL Recruitment 2024 Overview
TCIL म्हणजेच टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड ही भारत सरकारमधील दूरसंचार मंत्रालयच्या अधीन असलेल्या काही महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक असून हा ISO 9001: 2015 प्रमाणित बहुदेशीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आहे.
TCIL हे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून सिव्हिल , आयटी आणि टेलिकॉम क्षेत्रा आपले योगदान देत आहे. याच बहुचर्चित TCIL मध्ये ICT Instructor या पदासाठी नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती ही तब्बल ३५० जागांची असून आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
मागील काही वर्षापूर्वी याच TCIL ला ICT Lab आणि स्मार्ट स्कूल क्लासरूम मॉडेल बनवले या योगदानासाठी गौरविण्यात आले असून या मॉडेल चे ३५० + शाळा मध्ये बसविण्यात आले असून या मॉडेलसाठी लागणारे स्थापना आणि देखभाल ( Installation and Maintenance ) साठी ICT Instructor ची आवश्यकता लागणार असून हे पदे या भरती द्वारे भरली जाणार आहेत.
TCIL Recruitment 2024 Important Dates
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी आयोगाने कोणतीही शेवटची तारीख दिली नसून जो पर्यंत ही ३५० पूर्ण पदे भरली जाणार नाहीत तो पर्यंत अर्ज करता येणार आहे. अशाप्रकारचे ओपन एंडेड परिपत्रक आयोगाने प्रसिद्ध केले आहे.
TCIL Recruitment 2024 Vacancies
टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये भरती अंतर्गत एकूण ३५० पदे भरली जाणार आहेत. ही सर्वच्या सर्व पदे फक्त ICT Instructor ह्या एकाच पदासाठी होणार आहे. सदर भरती मध्ये भरली जाणारे पदे ही झारखंड मधील सर्व तालुकेमधील विविध गावे आणि ग्रामपंचायत मधील असणाऱ्या शाळा मध्ये ICT Instructor भरले जाणार आहे.
TCIL Recruitment 2024 Eligibility Criteria
ICT Instructor पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने पात्रतेचे निकष वाचून घेणे आवश्यक आहे. यासाठी आयोगाने आपल्या जाहिरातीमध्ये वय , शिक्षण सारख्या महत्वाच्या बाबी नमूद केल्या आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने या निकष पूर्ण आल्यावरच अर्ज करायचा आहे. अपूर्ण पात्रता आणि अर्ज हे निवड प्रक्रियासाठी ग्राह्य धरले जाणार नाही आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
चला तर बघुया किती वयोमर्यादा आणि कमीत कमी शैक्षणिक पात्रता ICT Instructor पदासाठी आवश्यक असणार आहे .
१) वयोमर्यादा ( Age Limit ) :
वयोमर्यादाबाबत आयोगाने अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी काही किमान आणि कमाल वयाचे बंधन अथवा मर्यादा घालून दिलेले आहे. केवळ याच वयोगटातील उमेदवार अर्ज आणि पुढील प्रक्रिये करीता बोलावले जातील. TCIL Recruitment 2024 नुसार कमीत कमी १८ वर्ष आणि जास्तीत जास्त ५५ वर्ष वय असलेले उमेदवार हे पात्र असतील.
२) शैक्षणिक अर्हता ( Educational Qualification ) :
ICT Instructor या पदासाठी अर्ज करण्यासाठी आयोगाने विविध शैक्षणिक पात्रतेचे निकष दिले आहे जेणेकरून अनेक इच्छूक उमेदवारांना या संधीचा फायदा होईल. यामध्ये प्रामुख्याने पदवी , पदविका , वेगवेगळे कोर्स इत्यादीचा समावेश आहे. चला तर नजर टाकुया की कोणते उमेदवार TCIL Recruitment 2024 साठी अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रता पैकी कोणतीही एक पात्रता उमेदवाराने पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.
१) मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट अथवा बोर्ड कडून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा सोबत PGDCA पदवीत्तर पदविका.
२) पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणामध्ये कॉम्प्युटर सायन्स/ ॲप्लिकेशन/ माहिती तंत्रज्ञान वरील एक अनिवार्य विषय असावा.
३) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अमधून लेव्हल O , लेव्हल A , लेव्हल B कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक.
४) पॉलिटेक्निक डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स
५) मास्टर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (MCA) / बॅचलर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन ( BCA ) / बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग BE / मास्टर ऑफ इंजिनिअरिंग ME / मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी M.TECH पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे सर्व कागदपत्र ही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट अथवा बोर्ड कडून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
३) प्राधान्य पात्रता ( Preferable Qualification ) :
उमेदवाराची निवड करताना आयोगाने काही अधिकच्या पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी काही प्राधान्य पत्रता देण्यात आले आहे. सदर उमेदवारांना इतर उमेदवारांपेक्षा प्राधान्य दिले जाईल. चल रे बघुया की नेमके कोणत्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
१) बीएड किंवा झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
२) उमेदवाराला बेसिक कम्प्युटर ऑपरेशन येणे आवश्यक आहे.
३) तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टेक्निकल कन्सल्टन्सी या संबंधित विषयावर शिकविण्याचा अनुभव असल्यास अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
TCIL Recruitment 2024 Selection Mode
सदर भरतीसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी आयोगाने काही टप्पे आपल्या जाहिरातीमध्ये नमूद केले आहेत यामध्ये प्रामुख्याने संगणक आधारित टेस्ट आणि मुलाखत या गोष्टींचा समावेश असेल तसेच जे उमेदवार या दोन्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील केवळ त्या उमेदवारांची निवड यादी जाहीर केली जाईल.
थोडक्यात एक नजर टाकूया निवड प्रक्रियेच्या टप्प्यावर
पहिला टप्पा : ऑफलाईन परीक्षा किंवा संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा आणि स्किल टेस्ट ( Computer Based Test / Skill Test ) :
ह्या टप्प्यासाठी ४०% वेटेज आहे म्हणजेच दोन्ही टप्पे एकूण १०० गुणाचे असल्यास ऑनलाईन टेस्ट/ स्किल टेस्ट यासाठी ४० गुण असतील. सदर टप्प्यासाठी परीक्षा कालावधी हा एक तास देण्यात आला आहे.
दुसरा टप्पा : वैयक्तिक मुलाखत ( Personal Interview )
या मध्ये उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल या टप्प्यासाठी ६०% वेटेज आहे म्हणजेच मुलाखत ही ६० गुणा साठी होईल. सदर टप्प्यासाठी मुलाखत कालावधी १० -१५ मिनिटे देण्यात आला आहे.
दोन्ही टप्पे मिळून एकूण १०० गुणाची परीक्षा असेल.यामध्ये आयोगाने किमान गुणाची किंवा टक्केवारी घालून दिली आहे त्यानुसार ऑनलाईन टेस्ट/ स्किल टेस्ट साठी किमान ५०% गुण म्हणजेच एकूण ४० गुणा पैकी २० गुण मिळवणे आवश्यक आहे. तसेच वैयक्तिक मुलाखत साठी देखील किमान ५०% गुण म्हणजेच एकूण ६० गुणा पैकी ३० गुण प्राप्त करणे आवश्यक असणार आहे.
MRVC Recruitment मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये सिव्हिल इंजिनिअरसाठी मॅनेजर पदाची भरती
संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा आणि स्क्रीन टेस्ट तसेच मुलाखतीसाठी लागणारे प्रवेश पत्र हे उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना नमूद केलेल्या ई-मेल आयडीवर पाठविले जातील. यासाठी उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना आपला योग्य ई-मेल आयडी नमूद करणे गरजेचे आहे कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराला प्रवेश पत्र उपलब्ध न झाल्यास आयोग याबद्दल जबाबदार असणार नाही.
संगणक आधारित परीक्षेचा कालावधी हा आयोगाला आलेल्या सर्व अर्जाची छाननी केल्यानंतर आयोगाच्या https://www.tcil.net.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. तसेच सदर भरतीसंबंधीचे सर्व बाबी या संकेतस्थळावर तसेच उमेदवाराच्या ईमेल आयडी वर पाठवले जातील. त्यामुळे उमेदवाराने आयोगाचे संकेतस्थळ आणि आपला मेल बॉक्स चेक करणे आवश्यक आहे.
TCIL Recruitment 2024 How to Apply
TCIL Recruitment 2024 साठी आयोगाने ऑनलाइन अर्ज हा पर्याय दिलेला असला तरी आयोगाकडून कोणत्याही प्रकारची लिंक दिलेली नाही ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी आपला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे recruiter.tcil@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवायचे आहेत.
ई-मेल आयडी वर मिळालेले अर्ज पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जातील. तसेच ऑफलाइन पद्धतीने किंवा इतर कोणत्याही मार्गाने केलेले अर्ज हे ग्राह्य दिले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सदर नोंदणी ही जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या एकूण ३५० जागा जो पर्यंत भरल्या जात नाही तो पर्यंत चालू असेल.तसेच सदर भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचे सर्व अधिकार हे टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड कडे असतील.
TCIL Recruitment 2024 Exam Pattern
टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये ICT Instructor पदासाठी जी ऑनलाईन संगणक आधारित चाचणी घेतली जाणार आहेत यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी भाषा विषय , चालू घडामोडी , बुद्धिमत्ता चाचणी आणि तंत्रज्ञान आधारित अभ्यास आहे. यामध्ये सुरवातीचे तीन घटकासाठी पदवी लेवलचा अभ्यासक्रम असेल तर उरलेल्या विषयासाठी आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये दिलेला अभ्यासक्रम असेल.
चला तर बघुया नेमकी परीक्षा कोणत्या विषयावर होणार आहे , कोणत्या विषयासाठी किती गुण आहेत, किती प्रश्न विचारले जाणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे एका टेबलच्या माध्यमातून ,
विषय | प्रश्न संख्या | गुण | परीक्षा कालावधी |
इंग्रजी भाषा | ५ | ५ | |
चालू घडामोडी | ५ | ५ | ४० गुणाचीऑनलाईन चाचणी |
बुद्धिमत्ता चाचणी | ५ | ५ | एक तास |
संगणक शिक्षक | १० | १० | |
तंत्रज्ञान आधारित अभ्यासक्रम | १५ | १५ | |
मुलाखत | ६० | ६० | १०-१५ मिनिटे |
ऑनलाईन संगणक आधारित चाचणी/ स्किल टेस्ट उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची निवड ही मुलाखत , कागदपत्र तपासणी या पुढील टप्प्यासाठी केली जाईल. एकुण जागांच्या तीन पट उमेदवार हे या साठी बोलावले जातील म्हणजेच असणऱ्या ३५० जागांची तीन पट १०५० उमेदवार निवडले जातील.
TCIL Recruitment 2024 Application Fee
टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड द्वारा आयोजित ICT Instructor या पदासाठी होणाऱ्या परीक्षा अथवा निवडी साठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क अथवा परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. अशा प्रकारचे कोणतेही शुल्क आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये नमूद केलेले नाही.
Conclusion
टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड ने आपल्या प्रोजेक्टच्या आवश्यकतानुसार एकूण ३५० जागांची जाहिरात प्रसिद्ध केली असून ही सर्व पदे ICT Instructor या एकाच पदभरती साठी असतील. कॉम्प्युटर सायन्स , ॲप्लिकेशन , माहिती तंत्रज्ञान यात विशेष प्राविण्य असलेल्या उमेदवारांना आयोगाने दिलेल्या ईमेल आयडी आपले अर्ज आणि आवश्यक कागदपत्र सोबत CV जोडायचा आहे. निवड प्रक्रिया लक्षात घेता अगोदर संगणक आधारित टेस्ट / स्किल टेस्ट आणि वैयक्तिक मुलाखत या दोन टप्प्यात होईल. ह्या तून निवड झालेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
Frequently Asked Questions
१) TCIL Recruitment 2024 साठी किती जागा भरल्या जाणार आहेत ?
उत्तर : TCIL Recruitment 2024 साठी तब्बल ३५० रिक्त जागा या भरल्या जाणार आहेत.
२) TCIL Recruitment 2024 साठी कोणत्या पदासाठी अर्ज मागविण्यात येणार आहे ?
उत्तर : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये ICT Instructor या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
३) TCIL Recruitment 2024 साठी अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे ?
उत्तर : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड भरती साठी उमेदवारांना आपले अर्ज , कागदपत्रे आयोगाने जाहीर केलेल्या ईमेल आयडी वर पाठवायचे आहे.
४) TCIL Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे ?
उत्तर : आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे TCIL Recruitment 2024 साठी कोणतीही शेवटची तारीख नाही आहे. रिक्त जागा भरे पर्यंत सदर भरती प्रक्रिया सुरू राहील.