Tata Memorial Hospital Recruitment मुंबईमधील नामांकित हॉस्पिटलमध्ये नोकरीची सुवर्ण संधी

Tata Memorial Hospital Recruitment द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, निम्न विभागीय लिपिक स्टेनोग्राफर, नर्स, तंत्रज्ञ यासारख्या विविध पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

इच्छूक उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ७ मे २०२४ असणार आहे.

Tata Memorial Hospital Recruitment Overview

भारत सरकारच्या अणू ऊर्जा विभागाच्या अख्यातरित असणाऱ्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल च्या मुंबई मधील परेल शाखेत असणाऱ्या रिक्त पदांच्या भरतीसाठी सदर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर उपचार , संशोधन , प्रतिबंध करण्यासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटल आपल्या ट्रस्ट अंतर्गत उच्च प्रतीचे काम करत आहे. याच नामांकित हॉस्पिटल मध्ये आणि आपले करियर कॅन्सर वर काम करण्यासाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना ही एक मोठी संधी असणार आहे.

चला तर बघुया नेमकी भरती प्रक्रिया कशी असणार आहे.

जाहिरात प्रसिद्ध : टाटा मेमोरियल हॉस्पिटल
( Tata Memorial Hospital )
पदाचे नाव : वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ( Medical Physicist ) ,
निम्न विभागीय लिपिक ( Lower Divisional Clerk) ,
स्टेनोग्राफर ( Stenographer) ,
नर्स ( Nurse ) ,
तंत्रज्ञ ( Technician )
पदांची संख्या : २८ पदे
अर्ज पद्धत :ऑनलाईन पद्धतीने अर्ज ( Online Mode )
अधिकृत संकेतस्थळ : https://tmc.gov.in/

Mumbai Port Trust अंतर्गत मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग खात्यात मोठी भरती

Tata Memorial Hospital Recruitment Important Dates

टाटा मेमोरियल हॉस्पिटल ने आपल्या जाहिरात क्रमांक TMC/AD/52/2024 नुसार जाहीर केलेल्या जाहिराती मध्ये पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार असून अर्ज स्विकारण्याच्या सुरवातीची आणि अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख यासारख्या आवश्यक नोंदी दिलेल्या असून उमेदवारांनी विहित कालावधी मध्येच अर्ज करायचे आहे.

चला तर बघुया किती दिवस ही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असणार आहे.

अर्ज करण्याची सुरवातीची तारीख : १६ एप्रिल २०२४
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख :७ मे २०२४
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख : ७ मे २०२४
Tata Memorial Hospital

Tata Memorial Hospital Recruitment Vacancies

टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये असणाऱ्या रिक्त जागांच्या आधारे टाटा मेमोरियल सेंटर ने ही पदभरती जाहीर केली असून यामध्ये असणाऱ्या विविध जागांचा तपशील आपल्या जाहिराती मध्ये नमूद केलेला आहे.

चला तर बघुया की कोणत्या पदे ही भरली जाणार आहेत आणि पदांसाठी किती जागा या रिक्त आहेत.

पदाचे नाव पदसंख्या
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ( Medical Physicist ) : ०१
निम्न विभागीय लिपिक ( Lower Divisional Clerk) :०३
स्टेनोग्राफर ( Stenographer) :०१
नर्स ( Nurse ) :२२
तंत्रज्ञ ( Technician ) : ०१

Tata Memorial Hospital Recruitment Eligibility Criteria

उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी जाहिराती मध्ये नमूद केकेले पात्रतेचे निकष आपण पूर्ण करत आहोत का याची खात्री करणे आवश्यक आहे. पात्रतेचे निकष अपूर्ण असल्यास सदर उमेदवारांचा अर्ज रद्द केला जावून उमेदवाराला पुढील निवड प्रक्रियेसाठी वगळले जाईल याची नोंद घ्यावी.आयोगाने आपल्या रिक्त पदानुसार आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, अनुभव , वयोमर्यादा , वय शिथिलता तपशीलपणे दिलेला आहे.

चला तर बघुया काय आहे पात्रतेचे निकष

१) राष्ट्रीयत्व ( Nationality ) :

जाहिराती मध्ये दिलेल्या कोणत्याही पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

२) वयोमर्यादा ( Age Limit ) :

टाटा मेमोरियल ट्रस्ट ने भरती प्रक्रियेत जाहीर केलेल्या पदाची वयोमर्यादा दिली आहे. यात पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी असून उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी आपली वयोमर्यादा मध्ये बसणाऱ्या पदासाठीच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

चला बघुया की कोणत्या पदासाठी काय कमाल वयोमर्यादा आहे ते एका टेबलच्या माध्यमातून.

पदाचे नावकमाल वयोमर्यादा.
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ( Medical Physicist ) : ३५ वर्ष
निम्न विभागीय लिपिक ( Lower Divisional Clerk) : २७ वर्ष
स्टेनोग्राफर ( Stenographer) : २७ वर्ष
नर्स ( Nurse ) : ३० वर्ष
तंत्रज्ञ ( Technician ) : ३० वर्ष

केंद्रीय लोकसेवा आयोगाची मोठी जाहिरात , ५००+ जागांची भरती,अर्ज सुरू UPSC CAPF Recruitment 2024

३) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ( Educational Qualification And Experience ) :

बघुया कोणत्या पदासाठी कोणते शैक्षणिक पात्रता आणि किती अनुभव आवश्यक आहे.

१) वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ( Medical Physicist ) :

Master of Science in Physics ,

Diploma in Radiological Physics ,

Certification of Radiological Safety.

अनुभव : अत्याधुनिक तंत्रज्ञानासह वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ म्हणून एक वर्षाचा क्लिनिकल अनुभव आवश्यक.C++ , MATLAB , Python यासारख्या कॉम्प्युटर प्रोग्रामिंग स्किल अवगत असावे.

२) निम्न विभागीय लिपिक ( Lower Divisional Clerk) :

उमेदवार कोणतेही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट अथवा बोर्ड कडून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच मायक्रोसॉफ्ट ऑफिस चे माहिती असावी.

अनुभव : एक वर्ष लिपिक कामांचा अनुभव असावा.

३) स्टेनोग्राफर ( Stenographer) :

मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा बोर्ड कडून पदवी परीक्षा उत्तीर्ण. शॉर्ट टाईप राईटींग कोर्स ४० शब्द पर मिनिट तसेच कॉम्प्युटर प्रमाणपत्र मध्ये ३ महिन्याचा मायक्रोसॉफ्ट ऑफिस कोर्स किंवा माहिती तंत्रज्ञानमध्ये पदविका परीक्षा उत्तीर्ण.

अनुभव : सेक्रेटरीअल कोर्स असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

४) नर्स ( Nurse ) :

जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी प्लस डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग किंवा बी.एस सी नंतर बेसिक नर्सिंग.तसेच उमेदवार हा भारतीय नर्सिंग परिषदे किंवा राज्य नर्सिंग परिषद मध्ये नोंदणीकृत असावा.

अनुभव : ५० पेक्षा अधिक बेड असणाऱ्या हॉस्पिटल मध्ये एक वर्षाचा अनुभव.

५) तंत्रज्ञ ( Technician ) :

बारावी विज्ञान शाखा घेऊन उत्तीर्ण आणि सहा / एक वर्ष आयसीयू/ ओ टी/ इलेक्ट्रोनिक्स / डायलिसिस टेक्निशियन पदविका उत्तीर्ण.

अनुभव : सदर क्षेत्रात तीन वर्षाचां अनुभव.

४ ) वय शिथिलता ( Age Relaxation) :

आयोगाने कमाल वयाबाबत काही प्रवर्गासाठी सरकारी नियमानुसार वय शिथिलता देण्यात आली असून यात प्रामुख्याने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय घटक अपंग घटक यांचा समावेश आहे.

चला तर बघुया नेमकी किती वर्ष शिथिलता प्रधान करण्यात आली आहे.

प्रवर्गवर्ष शिथिल
अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती :५ वर्ष
इतर मागासवर्गीय घटक:३ वर्ष
अपंग घटक :१० वर्ष
टाटा मेमोरियल हॉस्पिटल मधील कर्मचारी :५ वर्ष

Tata Memorial Hospital Recruitment Selection Procedure

ऑनलाईन माहिती पूर्ण भरून अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांना पात्रतेनुसार अर्ज शुल्क भरायचे आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतर जे उमेदवार छाननी दरम्यान पात्र ठरतील त्याच उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी बोलवले जाईल. निवड करताना आयोगाने स्क्रिनिंग टेस्ट नुसार मुलाखत / लेखी परीक्षा / स्किल टेस्ट हे पदांच्या आवश्यकतानुसार घेतली जाईल. यातून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची निवड यादी टाटा मेमोरियल च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल.

ज्या उमेदवारांची निवड ही मुलाखत / लेखी परीक्षा / स्किल टेस्ट हे पदांच्या निवडी नुसार होणार असेल अशा उमेदवारांनी सदर प्रक्रिये वेळीस ऑनलाईन अर्ज भरताना भेरलेली माहिती पडताळणी तसेच कागदपत्रांची तपासणी करीता सोबत बाळगणे आवश्यक आहेतं.

आवश्यक कागदपत्रांचा विचार केल्यास यात पुढील गोष्टी आवश्यक असतील.

१) जन्म प्रमाणपत्र.

२) शैक्षणिक माहिती प्रमाणपत्र आणि गुणपत्रक.

३) अनुभव प्रमाणपत्र ; पे स्लीप , निवडीचे पत्र इत्यादी.

४) अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र.

उमेदवाराला निवड प्रक्रियेच्या कोणताही टप्प्यात बोलाविण्याचे , नाकारण्याचे आधिकार टाटा मेमोरियल हॉस्पिटल कडे राखीव असतील.

Tata Memorial Hospital Recruitment Application Fee

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी आवश्यक असलेली परीक्षा शुल्क अथवा अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.

आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती महिला उमेदवार अपंग घटक आणि एक्स सर्विसमॅन यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. यांना अर्ज शुल्क भरण्यातून वगळले आहे.

Tata Memorial Hospital Recruitment Level of Pay

टाटा मेमोरियल हॉस्पिटल ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलेल्या जाहिराती मध्ये विविध पदासाठी देण्यात येणारे मूळ वेतन दिलेले आहे.

पुढे दिलेल्या टेबलवर नजर टाकुया अन् समजून घेऊया की कोणत्या पदासाठी किती वेतन हे निवडी नंतर मिळणार आहे.

पदाचे नाववेतन
१) वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ( Medical Physicist ) : रुपये ५६,१०० प्रतीमहीना + भत्ता.
२) निम्न विभागीय लिपिक ( Lower Divisional Clerk) : रुपये १९,९०० प्रतीमहिना + भत्ता.
३) स्टेनोग्राफर ( Stenographer) : रुपये २५,५०० प्रतिमहिना + भत्ता.
४) नर्स ( Nurse ) : रुपये ४४,९०० प्रतिमहीना + भत्ता.
५) तंत्रज्ञ ( Technician ) :रुपये २५,५०० प्रतीमहिना + भत्ता.

Frequently Asked Questions

१) Tata Memorial Hospital Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

उत्तर : Tata Memorial Hospital Recruitment साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मे २०२४ आहे.

२) Tata Memorial Hospital Recruitment साठी कोण अर्ज करू शकते ?

उत्तर : टाटा मेमोरियल हॉस्पिटल द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विविध पदांसाठी आवश्यक पात्रता वर देण्यात आली आहे

३) Tata Memorial Hospital Recruitment साठी निवड प्रक्रिया कशी असेल ?

उत्तर : उमेदवारांची निवड ही मुलाखत / लेखी परीक्षा / स्किल टेस्ट हे पदांच्या निवडी नुसार होणार आहे.

४) Tata Memorial Hospital Recruitment द्वारा किती जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे ?

उत्तर : Tata Memorial Hospital Recruitment द्वारा एकूण २८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

५) Tata Memorial Hospital Recruitment द्वारे कोणती पदे भरली जाणार आहेत ?

उत्तर : Tata Memorial Hospital Recruitment द्वारे वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ( Medical Physicist ) ,निम्न विभागीय लिपिक ( Lower Divisional Clerk) ,स्टेनोग्राफर ( Stenographer) ,नर्स ( Nurse ) ,तंत्रज्ञ ( Technician ) या सारखी पदे भरली जाणार आहेत.