SSC JE स्टाफ सिलेक्शन अंतर्गत “कनिष्ठ अभियंता” या पदासाठी भरती , तब्बल ९६८ पदे भरली जाणार

SSC JE ( Staff Selection Commission Junior Engineer ) भरती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत एकूण ९६८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे.

ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ही १८ एप्रिल आहे.

SSC JE 2024 Overview

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या विविध क्षेत्रातील इंजिनिअरिंग पूर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी असणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होणाऱ्या कनिष्ठ अभियंता या भरती साठी अर्ज करताना उमेदवारांनी आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

चला तर बघुया कोणत्या इंजिनिरिंग ब्रांचसाठी किती जागा आहेत. परीक्षा पद्धत कशी असणार आहे , अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आणि निवडीची प्रक्रिया कशी असणार आहे.

जाहिरात प्रसिद्ध : स्टाफ सिलेक्शन कमिशन ( Staff Selection Commission )
पदाचे नाव :कनिष्ठ अभियंता
पदाची संख्या : ९६८ पदे
अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन अर्ज
अधिकृत संकेतस्थळ : http://www.ssc.gov.in

SSC JE 2024 Important Dates

स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे जाहीर करण्यात आलेल्या जाहिराती मध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवश्यक तो कालावधी नमूद केला आहे. या कालावधी मध्येच उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. सोबतच आयोगाने कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षेचा पहिला टप्पा केव्हा पार पाडला जाईल हे देखील सांगितले आहे.

चला तर बघुया अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय असणार आहे आणि परीक्षा केव्हा पार पाडली जाईल.

अर्ज स्विकारण्याची सुरवात तारीख : २८ मार्च २०२४
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख:१८ एप्रिल २०२४
अर्ज शुल्क भरायची शेवटची तारीख : १९ एप्रिल २०२४
अर्जात बदल करण्यासाठी कालावधी :२२ आणि २३ एप्रिल २०२४
परीक्षा पहिला टप्पा ( Tier 1 ) : ४ जून ते ६ जून २०२४
परीक्षा दुसरा टप्पा ( Tier 2 ) :लवकरच जाहीर

यासोबतच आयोगाने अर्ज भरताना उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास मदत क्रमांक देखील दिला आहे. हेल्पलाईन नंबर : १८००३०९३०६३

SSC je

SSC JE 2024 Vacancies

स्टाफ सिलेक्शन कमिशनने कनिष्ठ अभियंता पदाची ९६८ जागांची जी जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये सिव्हिल इंजिनिअर ( Civil Engineer) , मेकॅनिकल इंजिनीअर ( Mechanical Engineer ) आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर ( Electrical Engineer) या ग्रूप ब पदाची लेव्हल ६ पे मॅट्रिक्स नुसार भरती होणार आहे.

एकूण ९६८ जागांचा तपशील जाहिराती मध्ये नमूद केला आहे. एकूण ९ संस्थामध्ये असणारी रिक्त पदे ही आवश्यकता नुसार भरली जाणार आहेत. आयोगाने सर्व प्रवर्गातील रिक्त जागांचा तपशील जाहिराती मध्ये ९ संस्थेतील जागासह दिला आहे. या सर्व जागांचा तपशील हा तात्पुरता असून यात कोणत्याही प्रकारचे बदल झाल्यास आयोगाच्या संकेस्थळावर जाहीर केले जाईल.

बघुया कोणत्या संस्थेमध्ये किती जागा रिक्त आहेत.

संस्थापदांची संख्या
Border Roads Organization४७५
Brahmaputra Board, Ministry of Jal Shakti
Central Water Commission१३२
Central Public Works Department (CPWD)३३८
Central Water and Power Research Station
DGQA-NAVAL, Ministry of Defence
Farakka Barrage Project, Ministry of Jal Shakti
Military Engineer Services (MES)जाहीर बाकी
National Technical Research Organization (NTRO)

SSC JE 2024 Eligibility

स्टाफ सिलेक्शन कमिशन ने उमेदवारांच्या पात्रातेसाठी काही निकष आपल्या जाहिराती मध्ये दिले आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता, अनुभव तसेच वयोमर्यादा बाबतचे सर्व निकष दिले आहे. कनिष्ठ अभियंता या भरती प्रक्रियेत अर्ज भरताना उमेदवाराने आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलेल्या जाहिरातीमध्ये सविस्तरपणे दिलेले सर्व पात्रतेचे निकष पूर्ण करणे बंधनकारक आहे.

१) शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) :

अर्ज करणारा उमेदवार हा आयोगाने दिलेल्या शाखेत आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने सिव्हिल इंजिनिअर ( Civil Engineer) , मेकॅनिकल इंजिनिअर ( Mechanical Engineer) आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर ( Electrical Engineer) म्हणून पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवारच अर्ज करू शकतात.

२) वयोमर्यादा ( Age Limit ) :

आयोगाने आपल्या पदभरती मध्ये विविध क्षेत्रातील रिक्त जागांच्या शैक्षणिक पात्रता सोबत वयोमर्यादा देखील सांगितले आहे . या मध्ये सर्वसाधारपणे काही पदासाठी वयाची जास्तीत जास्त वयमर्यादा ही ३० वर्ष ज्यामध्ये उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट १९९४ पासून १ ऑगस्ट २००६ दरम्यान असावा.

तर काही पदासाठी जास्तीत जास्त वयमर्यादा ही ३२ वर्ष आहे ज्या मध्ये उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट १९९२ पासून १ ऑगस्ट २००६ दरम्यान झालेला असावा. या सोबतच आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये तरतुदी प्रमाणे प्रवर्ग नुसार वय शिथिलता घालवून दिले आहे.

बघुया कोणत्या वर्गासाठी किती वर्ष शिथिल ( Age Relaxation ) करण्यात आले आहे.

अनुसूचीत जाती / अनुसूचित जमाती : ५ वर्ष
इतर मागासवर्गीय :३ वर्ष
अपंग घटक खुला वर्ग : १० वर्ष
अपंग घटक इतर मागासवर्गीय :१३ वर्ष
अपंग घटक अनुसुचित जाती – जमाती : १५ वर्ष

SSC JE 2024 How to Apply

इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर आपले वन टाईम नोंदणी ( One Time Registration ) करणे आवश्यक आहे. उमेदवाराने जुन्या संकेतस्थळावर नोंदणी केली असल्यास म्हणजेच www.ssc.nic.in यावर असल्यास ती नवीन संकेतस्थळावर http://www.ssc.gov.in वापरता येणार नाही आहे. उमेदवारांनी www.ssc.gov.in या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ http://www.ssc.gov.in यावर जावून लॉगिन करायचे आहे.आणि कनिष्ठ अभियंता या पदाची निवड करून पुढील अर्ज भरायचा आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख लक्षात घेऊन अर्ज वेळेत भरणे आवश्यक असून दिलेल्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज न केल्यास सदर अपूर्ण अर्ज पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही.

SSC JE 2024 Application Fee

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी अर्ज शुल्क किंवा परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक असणार आहे. महिला उमेदवार , अनुसूचीत जाती अनुसूचित जमाती घटक उमेदवार , अपंग घटक उमेदवार तसेच एक्स सर्विसमन हे आरक्षणास पात्र असतील त्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज शुल्क भरायची रक्कम : ₹ १००

सदर रक्कम ही फक्त ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. यासाठी भीम ॲप , नीट बँकिंग , तसेच डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करू शकतात.

उमेदवारांना अर्जात कोणत्याही प्रकारची सुधारणा करायची असल्यास आयोगाने २२ एप्रिल आणि २३ एप्रिल २०२४ अशा दोन दिवसाचा कालावधी दिला आहे. उमेदवाराने आवश्यक ते शुल्क भरून अर्जात कोणत्याही प्रकारचे सुधारणा करू शकतो.

SSC je

SSC JE 2024 Exam Pattern

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होणाऱ्या कनिष्ठ अभियंता पदाची भरती करिता परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. सदर परीक्षा ही संगणक आधारित ( Computer Based ) असेल. यामध्ये पेपर १ आणि पेपर २ असे दोन पेपर वेगवेगळ्या टप्प्यात होणार आहे.

पहिल्या टप्प्यात निवड झालेले उमेदवार दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरतील. पेपर १ हा २०० गुणाचा असून परीक्षा कालावधी हा २ तास असेल तर पेपर २ हा ३०० गुणाचा असून परीक्षा कालावधी २ तास असेल.

थोडक्यात बघुया परीक्षेचा पॅटर्न कसा असेल.

पेपर क्रमांकविषयगुणप्रश्न संख्यापरीक्षा कालावधी
पेपर १General Intelligence and Reasoning५०५०
General Awareness५०५०
अ ) General Engineering (Civil & Structural)
किंवा
ब ) General Engineering (Electrical)
किंवा
क ) General Engineering (Mechanical)
१००१००२ तास
२०० गुण२०० प्रश्न
पेपर २अ ) General Engineering (Civil & Structural)
किंवा
ब ) General Engineering (Electrical)
किंवा
क) General Engineering (Mechanical)
३०० गुण१०० प्रश्न२ तास

पेपर १ आणि पेपर २ अशा दोन्ही पेपर साठी परीक्षा संगणक आधारित असून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ( Multiple Choice Type Questions ) परीक्षा असेल.

दोन्ही पेपर साठी प्रश्न हे हिंदी आणि इंग्लीश मध्ये असतील.

पेपर १ आणि पेपर २ साठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत असणार आहे यानुसार पेपर १ मध्ये ०.२५ गुण हे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी वजा केले जातील आणि पेपर २ मध्ये १ गुण हा प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी वजा केले जाईल.

पेपर १ आणि पेपर २ मध्ये मिळालेले गुण आणि निवड यादी ही आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

SSC JE 2024 Syllabus

आयोगाने प्रत्येक अभियंता शाखेसाठी अभ्यासक्रम आपल्या जाहिराती मध्ये नमूद केला आहे. संपूर्ण अभ्यासक्रम साठी उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली जाहिरात बघायची आहे. http://www.ssc.gov.in

SSC JE 2024 Mode of Selection

आयोगाने पेपर एक आणि पेपर दोन साठी कमीत कमी मार्क्सची मर्यादा ठेवली आहे.

खुला प्रवर्ग: ३०% , इतर मागासवर्गीय आणि अर्थिक दुर्बल घटक: २५ % आणि इतर प्रवर्ग : २०%

पेपर १ मध्ये मिळालेल्या मार्क्सचे नोर्मलायझेशन करून उमेदवाराची मेरिट लिस्ट लावली जाईल. यात पात्र असलेले उमेदवारच पेपर २ साठी बोलावले जातील.

Post Preference

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना उमेदवाराने पदाचा क्रम देणे आवश्यक असणार आहे. पदाचा क्रम देताना उमेदवाराने पद, विभाग नुसार क्रम द्यावा. जे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना पदाचा क्रम भरणार नाहीत असे उमेदवार अंतिम निवडी नंतर कोणताही पदासाठी ग्राह्य धरले जाणार नाही आहे.

SSC JE 2024 Documents

जे उमेदवार पात्रता फेरी पूर्ण करतील त्यांना कागदपत्रे तपासणी व पडताळणी करिता बोलावले जाईल. आयोगाने दिलेल्या वेळेत उमेदवारांनी कागदपत्रांची छायांकित प्रत सहित उपस्थित रहावे. चला तर बघूया कोणते कागदपत्र तपासणी पडताळणी साठी आवश्यक आहे.

१) दहावी – बारावी पास प्रमाणपत्र

२) शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र

३) आवश्यक असल्यास अनुभव प्रमाणपत्र

४) जातीचे प्रमाणपत्र

५) अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र

६) नावात बदल असल्यास तसे प्रमाणपत्र

७) वय शिथिलतासाठी आवश्यक कागदपत्र

आयोगाने मागितलेल्या कागदपत्रात कोणत्याही प्रकारचे तफावत अथवा अपूर्ण कागदपत्रे असल्यास असे उमेदवार अंतिम निवडी मध्ये ग्राह्य धरले जाणार नाही.

Frequently Asked Questions

१) SSC JE मध्ये किती पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे ?

उत्तर : एसएससी कनिष्ठ अभियंता साठी एकूण ९६८ पदे भरली जाणार आहे

२) SSC JE साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?

उत्तर : SSC JE साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख १८ एप्रिल असणार आहे.

३) SSC JE मध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत असणार आहे का ?

उत्तर : पेपर १ आणि पेपर २ साठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत असणार आहे यानुसार पेपर १ मध्ये ०.२५ गुण हे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी वजा केले जातील आणि पेपर २ मध्ये १ गुण हा प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी वजा केले जाईल.

४) SSC JE साठी मुलाखत घेतली जाणार आहे का ?

उत्तर : SSC JE साठी कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जाणार नाही.

५) SSC JE साठी कोणते इंजिनिअर उमेदवार पात्र असतील ?

उत्तर : सिव्हिल इंजिनिअर , मेकॅनिकल इंजिनिअर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार पात्र असतील

अधिक माहितीसाठी भेट द्या आपल्या अधिकृत संकेत स्थळावर :

https://jobschemewala.com/