SSC Combined Hindi Translator Recruitment हिंदी अनुवादक भरती २०२४

SSC Combined Hindi Translator Recruitment 2024 : कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे संयुक्त हिंदी अनुवादक परीक्षा (Combined Hindi Translator Examination ) २०२४ अंतर्गत कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक या पदांच्या भरतीसाठी जाहिरात नुकतीच जारी केली आहे.

चला तर बघूया नेमकी किती अन् जागा या रिक्त आहेत , अर्ज केव्हा अन् कुठे करायचा आहे या सर्व बाबीचा विस्तृत आढावा.

जाहिरात प्रसिद्ध :स्टाफ सेलेक्शन कमिशन ( SSC)
पदाचे नाव :संयुक्त हिंदी अनुवादक
अर्ज पद्धत :ऑनलाइन प्रणाली
पद संख्या :३१२ पदे
अधीकृत संकेतस्थळ :अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

SSC Combined Hindi Translator Recruitment 2024 Important Dates

अर्ज केव्हा पर्यंत करायचा आहे ?

आयोगाने सदर भरतीसाठी काही महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत यानुसार ,

१) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख : २ ऑगस्ट २०२४
२) ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ ऑगस्ट २०२४
३) ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख : २६ ऑगस्ट २०२४
४) अर्ज फॉर्म दुरुस्तीची विंडो आणि दुरुस्ती शुल्क ऑनलाइन भरण्याची तारीख :४ व ५ सप्टेंबर २०२४
५) संगणक आधारित परीक्षा (पेपर-I) चे वेळापत्रक :ऑक्टोबर-नोव्हेंबर, २०२४

SSC Combined Hindi Translator Recruitment 2024 Eligibility Criteria

कोण कोण अर्ज करू शकतो?

आयोगाने वरील सर्व पदासाठी आवश्यक असणारे पात्रतेचे निकष आपल्या जाहिरातीमध्ये नमूद केले आहे. उमेदवाराने अर्ज भरण्यापूर्वी हे सर्व वाचणे आवश्यक आहे यामध्ये प्रामुख्याने वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता हे निकष असतील यानुसार ,

१) वयोमर्यादा :

उमेदवाराचे वय हे १ ऑगस्ट २०२४ रोजी पुढील वय पूर्ण असावे. किमान वयोमर्यादा : १८ वर्षे , कमाल वयोमर्यादा : ३० वर्षे. याचा अर्थ असा की २ ऑगस्ट १९९४ पूर्वी आणि १ ऑगस्ट २००६ नंतर जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

सोबतच आयोगाने काही राखीव घटकांसाठी वयोमर्यादामध्ये शिथिलता देखील दिली आहे यानुसार अनुसुचित जाती ( Scheduled Caste ) , अनुसूचित जमाती ( Scheduled Tribes) , इतर मागासवर्गीय ( Other Backward Class ) तसेच अपंग घटक आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट नियमांनुसार लागू आहे.

२) शैक्षणिक पात्रता :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इन्स्टिट्यूट मधून डिप्लोमा/ पदविका आणि मास्टर पदवी असणे आवश्यक आहे.

SSC Combined Hindi Translator Recruitment 2024 Vacancies

नेमकी पदे आहेत तरी कोणती ?

एस एस सी द्वारे जाहीर केलेल्या एकूण ३१२ जागा या विविध केंद्रीय शासन मंत्रालय विभाग संघटना मधील पुढील रिक्त पदांसाठी भरली जातील.यात प्रामुख्याने वरिष्ठ /कनिष्ठ पदे आहे.

१) केंद्रीय सचिवालय अधिकृत भाषा सेवा (CSOLS) मध्ये कनिष्ठ अनुवाद अधिकारी

२) सशस्त्र दल मुख्यालय (AFHQ) मध्ये कनिष्ठ अनुवाद अधिकारी

३) विविध केंद्रीय शासन मंत्रालये/विभागे/संघटनांमध्ये कनिष्ठ हिंदी अनुवादक /कनिष्ठ अनुवाद अधिकारी /कनिष्ठ अनुवादक

४) विविध केंद्रीय शासन मंत्रालये/ विभागे/संघटनांमध्ये वरिष्ठ हिंदी अनुवादक /वरिष्ठ अनुवादक.

SSC Combined Hindi Translator Recruitment 2024 How to Apply

अर्ज कसा अन् कुठे करावा?

पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. जर उमेदवार प्रथमच अर्ज करत असल्यास उमेदवाराने अगोदर नवीन नाव नोंदणी करायची आहे. यानंतर सदर जाहिरातीच्या लिंक वर करून अर्ज निवड करून आयोगाने अर्जात विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती संपर्क माहिती इत्यादी बाबी भरून अर्ज सबमिट करायचा आहे.

HDFC Bank Parivartan Scholarship 2024 आता बँकेकडून मिळणार तब्बल ₹ ७५००० ची स्कॉलरशिप !

SSC Combined Hindi Translator Recruitment 2024 Application Fee

परीक्षा/ अर्ज शुल्क किती आहे ?

ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरुन झाल्यावर उमेदवारांना अर्जाची पूर्तता करण्यासाठी परीक्षा अथवा अर्ज शुल्क भरणे आवश्यक असणार आहे. यानुसार ,

अर्ज शुल्क : रुपये १००

१) महिला, अनुसूचीत जाती, अनुसूचित जमाती , अपंग घटक आणि माजी सैनिक (ESM) उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आहे.

तसेच उमेदवारांना ऑनलाईन पेमेंट पद्धती मध्ये ऑनलाइन BHIM UPI, नेट बँकिंग, किंवा Visa, MasterCard, Maestro, किंवा RuPay डेबिट कार्ड वापरून अर्ज शुल्क भरता येणार आहे.

Frequently Asked Questions

१) What is the Last date to Apply for SSC Combined Hindi Translator Recruitment 2024 ?

उत्तर : सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२४ आहे.

२) Which are the Post of SSC Combined Hindi Translator Recruitment 2024 ?

उत्तर : सदर भरती ही एकूण ३१२ रिक्त असलेल्या जागांसाठी होत असून यात प्रामुख्याने वरिष्ठ अनुवाद अधिकारी / कनिष्ठ अनुवाद अधिकारी