RRB Technician Recruitment 2024 रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा (आरआरबी) रेल्वेकडून ९१४४ जागांची बंपर भरती

RRB technician ची जाहिरात नुकतीच Railway Recruitment Board म्हणजेच RRB ने जाहीर केली. विविध पदांच्या एकूण ९१४४ जागांची भरती प्रक्रिया या द्वारे राबवण्यात येणार आहे. Railway Recruitment Board ( RRB) ने आपल्या Official Website वर ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तसेच जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे. वर्षानुवर्षे स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि रेल्वे मध्ये काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना ही सुवर्ण संधी असणार आहे.

RRB ने जाहिर केलेल्या जाहिराती मध्ये कोणत्या पदांची भरती होणार आहे , किती आणि कोणती पदे रिक्त आहेत जी या जाहिराती मधून भरली जाणार आहे. कोणते पात्र उमदेवार यासाठी अर्ज करणार आहेत, सेलेक्शन प्रोसेस काय असेल, अभ्यासक्रम काय आहे आणि कोणत्या RRB कडून किती जागा भरल्या जाणार आहेत यासर्व महत्वाच्या बाबी यांचा आढावा आपण थोडक्यात या लेखात घेणार आहोत.

चला तर बघुया RRB technician Recruitment Notification 2024 ते ही आपल्या भाषेत अन् आपल्या वेबाईटवर http://www.Jobschemewala.com.

Table of Contents

RRB Technician Recruitment 2024 Overview

Railway Recruitment Board ने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार ९१४४ जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे. तसेच अर्ज भरण्याची सुरवात ९ मार्च २०२४ पासून होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०२४ आहे. ग्रेड १ सिग्नल आणि ग्रेड ३ मधील पदासाठी ९१४४ जागांची जाहिरात काढण्यात आली आहे. आणि RRB ने आपल्या ऑफिशियाल वेबसाईटवर RRB Technician Recruitment ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. चला तर एक शॉर्ट मध्ये नजर टाकूया एका तक्त्याच्या माध्यमातून..

जाहिरात मध्यम संस्थाRRB आर आर बी मार्फत
पदाचे नावटेक्निशियन पदे :
ग्रेड १ सिग्नल आणि ग्रेड ३
पदांची संख्या एकूण ९१४४
सरकार आधिक्यकेंद्र सरकार
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नोंदणी प्रक्रिया ९ मार्च पासून १८ एप्रिल २०२४ पर्यंत
निवड प्रक्रिया३ टप्प्यात
पहिला: CBT
दुसरा: कागदपत्रे तपासणी
तिसरा : वैद्यकीय तपासणी
परीक्षा पद्धतसंपूर्णतः कॉम्प्युटर आधारित
ऑफिशियल वेबसाईट https://Indianrailways.gov.in
rrb technician

RRB Technician Recruitment Important Dates

RRB ने आपल्या जाहिराती मध्ये काही महत्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. उमेदवाराकडून खाली दिलेल्या तारखेच्या आत अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज भरून झाल्यावर योग्य पडताळणी करून दिलेल्या तारखे पर्यंतच आवश्यक असणारी परीक्षा फी भरावयाची आहे. नजर टाकुया अती महत्वाच्या तारखाकडे.

अर्ज स्विकारण्याची सुरवात ९ मार्च २०२४ पासून
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १८ एप्रिल २०२४ पर्यंत
अर्ज शुल्क भरायची शेवटची तारीख१८ एप्रिल २०२४ पर्यंत रात्री ११.००
परिक्षा अंदाजित महिना ऑक्टबर २०२४ पर्यंत

RRB Technician Vacancy 2024

ज्या ९१४४ पदांची भरती RRB ने जाहीर केली आहे त्यात असणाऱ्या पदांची पद संख्या काय आहे , कोणती पदे आणि त्या पदांनुसार असणारी पद संख्या किती असणारे ते बघुया.

पदाचे नावपद संख्या
ग्रेड १ सिग्नल टेक्निशियन१०९२
ग्रेड ३ टेक्निशियन८०५१
एकूण पदे९१४४

RRB Technician Eligibility Criteria

RRB ने आपल्या जाहिराती मध्ये असलेल्या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी काही पात्रतेचे निकष ठरवले आहेत. त्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक असणारी आहे. यात असणारे शैक्षणीक आणि वयोमर्यादा यांचे टेक्निशियन पदासाठी आवश्यक असणारे मानदंड बघुया.

Educational Qualification

RRB Grade 1 Signal साठी

क ) पदवी : मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट मधून इलेक्ट्रोनिक्स, भौतिशास्त्र , माहिती तंत्रज्ञान आणि इन्स्ट्रूमेंटेमेशन या विषयात बॅचलर ऑफ सायन्स किंवा त्याच्या कोणत्याही सब ब्रांचमधून अभ्यासक्रम पूर्ण केला असावा

पदविका : मान्यता प्राप्त असेलल्या विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट मधून तीन वर्षाचा अभियांत्रिकी डिप्लोमा , ब्रांच : एल्क्ट्रोनिक्स, कॉम्पुटर सायन्स , माहिती तंत्रज्ञान आणि इन्स्ट्रूमेंटेमेशन पूर्ण केलेले असावे.

अभियांत्रिकी पदवी कोणत्याही शाखेतून पूर्ण केलेली असावी

RRB Technician Grade 3 साठी

NCVT/SCVT सारख्या नामांकित मान्यता प्राप्त संस्थेमधून आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. यात असणारे ट्रेड आहेत फॉर्जर आणि हिट ट्रिटर, फौंड्रीमान, पॅटर्न मेकर , मोल्डर किंवा मॅट्रिक / एस एस एल सी अधिक अभ्यासक्रम पूर्ण केला असावा.

Age limit

आपल्या जाहिरातीमध्ये आर आर बी ने वयोमर्यादा बाबत कमीत कमी १८ वर्ष आणि जास्तीत जास्त वय पदनुसार दिलेले आहेत.

पदाचे नाववयाची मर्यादा
ग्रेड १ सिग्नलकमीत कमी १८ ते ३६ वर्ष
ग्रेड ३ टेक्निशियनकमीत कमी १८ ते ३३ वर्ष

तसेच काही घटकांना वयोमर्यादा बाबत शिथिलता (Age Relaxation) देण्यात आले आहेत. यामध्ये SC ST , PWD, OBC , जम्मू काश्मीर मधील उमेदवार आणि काही ग्रुप ड मध्ये काम करत असलेल्या उमेदवारांना वयाबाबत सूट देण्यात आली आहे.

एससी एसटी५ वर्ष
ओबीसी नॉन क्रीमलायेर३ वर्ष
अपंग विकलांग१० वर्ष
जम्मू काश्मीर उमेदवार १९८०-८८ दरम्यान५ वर्ष
एक्स सर्व्हिसमन ( ६ महिने पूर्ण )
ग्रुप ड कर्मचारी ३ वर्ष सेवा पूर्णओपन : ४० वर्ष , ओबीसी : ४३ वर्ष , एससी एसटी: ४५ वर्ष


RRB Technician Selection Process

टेक्निशियन पदासाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना या RRB Technician Recruitment द्वारा जाहीर केलेल्या निवडीच्या प्रोसेस बद्दल माहिती असणे आवश्यकच आहे. सदर परीक्षा ही तीन टप्प्यांत होणारं आहे. एक टप्पा पास होणारे उमेदवार हे पुढील टप्प्यात जाण्यास पात्र ठरतील. या तीन टप्प्यात सर्वात आधी कॉम्प्युटर आधारित टेस्ट होईल त्यात पास झालेले उमेदवार हे कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल तपासणी करिता बोलावले जाईल. टेक्निशियन पद मिळवायचे असल्यास हे तीन ही टप्पे पास होणे आवश्यक आहे.

rrb technician recruitment

RRB Technician Exam Pattern

परिक्षा पद्धतीचा विचार केल्यास आर आर बी ने ग्रेड १ सिग्नल आणि ग्रेड ३ टेक्निशियन पदासाठी वेगवेगळे पॅटर्न ठेवले आहेत. त्यामुळे दोन्ही पदासाठी किंवा कोणत्याही एका पदासाठी पात्र असेलल्या उमेदवारांना या परीक्षा पॅटर्न बद्दल माहिती असणे गरजेचे आहे. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असणार असून चुकलेल्या तीन प्रश्नासाठी एका प्रश्नाचे मार्क हे वजा केले जातील. दोन्ही पदासाठी काही विषय सामाईक असेल तरी त्या विषयावर विचारले जाणारे प्रश्न संख्या आणि त्यांना असणारे गुण हे वेगवेगळे आहेत.

आधी बघुया ग्रेड १ सिग्नल साठी काय परीक्षा पॅटर्न आहे ते.हे. १०० मार्क साठी कॉम्पुटर आधारित परीक्षा होणार आहे यात ९० मिनिट कालावधी असून ९० मिनिटामध्ये उमेदवाराला १०० प्रश्न सोडवायचे आहे.

विषयप्रश्न संख्यागुण वेळ
General Awareness१०१०
General Intelligence And Reasoning१५१५एकुण ९० मिनिटे
Basic Computer and It’s Application२०२०
Mathematics२०२०
Basic Science and Engineering३५२०
एकूण १००१००९० मिनिटे

टेक्निशियन ग्रेड ३ साठी परीक्षा पॅटर्न खालील प्रमाणे आहे. १०० मार्क साठी कॉम्पुटर आधारित परीक्षा होणार आहे यात ९० मिनिट कालावधी असून ९० मिनिटामध्ये उमेदवाराला १०० प्रश्न सोडवायचे आहे.

विषयाचे नावप्रश्न संख्यागुण संख्या वेळ
General Awareness१०१०
Genaral Intelligence and Reasoning२५२५एकूण ९० मिनिटे
Mathematics२५२५
Genaral Science४०४०
एकूण१००१००९० मिनिटे

RRB Technician Application Form Apply

RRB च्या अधिकृत संकेतस्थळ वर आर आर बी टेक्निशियनसाठी असणाऱ्या अर्जाची लिंक देण्यात आली आहे. उमेदवार ९ मार्च पासून नोंदणी करून अर्ज भरू शकतात. तसेच १८ एप्रिल पर्यंत उमेदवार या भरती प्रक्रिया साठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरताना सर्व महत्वाचे कागदपत्र आपल्या सोबत ठेवून योग्य ती माहिती भरावी.

अर्ज कसा भरायचा आहे तर बघुया.

१) प्रथम अधिकृत संकेतस्थळ वर भेट द्या.

२) त्यानंतर Home page वर जा आणि Recruitment वर क्लिक करा.

३) त्यानंतर तेथे RRB TechnicianRecruitment 2024 वर क्लिक करा

४) किंवा https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing वर जावून Apply क्लिक करुन Account बनवा , नोंदणी साठी जी माहिती आवश्यक आहे ते भरून लॉगिन करा व पुढील अर्ज करा वर क्लिक करून सर्व माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.

५) नंतर आवश्याक कागदपत्रे , फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा

६) सबमिट केलेल्या अर्जाची एक प्रिंट काढून आपल्या जवळ ठेवा.

RRB Technician Application Fee

अर्ज भरून सबमिट केल्यावर उमेदवारांना श्रेणीनुसार आवश्यक रक्कम अर्ज फी म्हणून भरायची आहे. अर्ज शुल्क न भरल्यास उमेदवार परीक्षे साठी पात्र ठरणार नाही. पुढील तक्त्यात वर्गवारी नुसार कोणाला किती फी भरायची आहे हे दिले आहे. तसेच CBT मध्ये बसलेल्या उमेदवाराला त्यातील काही रक्कम ही त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

वर्गअर्जाची फीपरत मिळनारी रक्कम
एससी एसटी, महिला , एक्स सर्व्हिसमन , विकलांग , ई बी सी रुपये २५०२५० ₹
अन्य वर्गरुपये ५००४०० ₹
CBT मध्ये बसलेल्या उमेदवाराला

Frequently Asked Question

१) RRB Technician Recruitment किती जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे ?

उत्तर : RRB ने टेक्निशियन पदासाठी एकूण ९१४४ जागांची जाहिरात काढली आहे.

२) अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर : अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ही १८ एप्रिल २०२४ आहे.

३) RRB Technician ची कोणती पदे भरली जाणार आहे ?

उत्तर : RRB Technician ची ग्रेड १ सिग्नल आणि ग्रेड ३ ची पदे भरली जाणार आहेत.

४) RRB technician मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का ?

उत्तर : या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असणार असून चुकलेल्या तीन प्रश्नासाठी एका प्रश्नाचे मार्क हे वजा केले जातील.