‘RITES’ या नवरत्न मध्ये मॅनेजर पदासाठी भरती,सरकारी कंपनीमध्ये ‘इंजिनिअरसाठी’ नोकरीची संधी

RITES ही एक भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून ही एक नवरत्न कंपनी आहे. नुकतेच RITES द्वारा एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे यानुसार एकूण ७२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. आपले इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळण्याची एक सुवर्ण संधी असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख २२ एप्रिल २०२४ असणार आहे.

RITES Recruitment Overview

भारत सरकारने खाजगी क्षेत्रातील संस्थांची मक्तेदारी कमी करण्यासाठी , अत्यावश्यक सेवा आणि सुविधा उत्पादने बाजारात योग्य दरात उपलब्ध व्हावे यासाठी सार्वजनिक क्षेत्रात काही उपक्रम चालू केले असून यामध्ये ४ कॅटेगरीच्या कंपनीचा समावेश होतो. या ४ कॅटेगोरीज म्हणजेच महारत्न , नवरत्न , मिनी रत्न श्रेणी १ आणि मिनी रत्न श्रेणी २.

RITES ही सार्वजनिक क्षेत्रात असणारे उपक्रम रेल्वे मंत्रालयाच्या खाली काम करते. ह्याच नवरत्न कंपनी मध्ये मॅनेजर पदाच्या ७२ जागा भरल्या जाणार आहेत. ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता इंजिीअरिंग असून इतर काही आवश्यक पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ची अंतिम तारीख असणार आहे २२ एप्रिल. चला तर मग वाट कसली बघताय ? आजच अर्ज भरा अन् लागा तयारीला.

RITES Recruitment Important Dates

ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने जाहिरातीमध्ये सविस्तरपणे नमूद करण्यात आलेल्या तारखा लक्षात ठेवून अर्ज करणे आवश्यक आहे. कारण अर्ज सबमिट करायची पद्धत ऑनलाईन असल्याने नमुद केलेल्या कालावधी मध्येच सदर लिंक ही चालू असणार आहे.

चला एक नजर टाकुया की अर्ज ,अर्ज शुल्क कोणत्या तारखे पर्यंत भरायचे आहे , परीक्षा केव्हा होणार आहे थोडक्यात.

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवातीची तारीख: ७ एप्रिल २०२४
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ एप्रिल २०२४ , १२.०० पर्यंत
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख: २२ एप्रिल २०२४ ,१२.०० पर्यंत
प्रवेश पत्र जाहीर होणार तारीख :२२ एप्रिल २०२४ , ५.००. वाजता
लेखी परीक्षा तारीख : २८ एप्रिल २०२४
प्रोविजनल उत्तर पत्रिका जाहीर तारीख : २९ एप्रिल २०२४
प्रश्न हरकत मांडणे कालवधी : २९ व ३० एप्रिल २०२४
अंतिम उत्तर पत्रिका जाहीर :३ मे २०२४
मेरिट लिस्ट जाहीर होणार :३ मे २०२४
मुलाखत तारीख : ९ मे २०२४

आयोगाने जाहीर केलेल्या कालावधी मध्ये अर्ज सादर न झाल्यास उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.

rites recruitment

RITES Recruitment Vacancies

RITES ने आपल्या जाहिराती मध्ये ज्या ७२ जागा भरल्या जाणार आहेत याचा संपूर्ण तपशील दिला आहे. यानुसार ही सर्वच्या सर्व पदे मॅनेजर लेवलची आहेत सोबतच कोणत्या प्रवार्गासाठी कोणती किती पदे राखीव असणार आहे हे देखील जाहिराती मध्ये नमूद केले आहे.

बघुया पदे आणि पदानुसार पदसंख्या

पदेपदसंख्या
असिस्टंट मॅनेजर यांत्रिकी / धातुशास्त्र
( Assistant Manager Mechanical/ Metallurgy ) :
३४
असिस्टंट मॅनेजर ईल्क्ट्रिकल / इलेक्ट्रोनिक
( Assistant Manager ( Electrical / Electronics ) :
२८
असिस्टंट मॅनेजर स्थापत्य
( Assistant Manager ( Civil ) :
असिस्टंट मॅनेजर माहिती तंत्रज्ञान
( Assistant Manager ( Information Technology/ Computer Science) :

खुला प्रवर्ग आणि राखीव प्रवर्ग यांच्यासाठी राखीव जागांचा तपशील RITES ने जाहीर केलेल्या जाहिराती मध्ये पाहायला मिळेल.

UPSC Recruitment द्वारा वैद्यकीय अधिकारी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध , तब्बल ८५९ रिक्त पदे

RITES Recruitment Eligibility Criteria

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने जाहिराती मध्ये दिलेल्या निकषांची पूर्तता करणे गरजेचे आहे. बघुया आयोगाने कोण कोणते पात्रतेचे निकष आपल्या जाहिराती मध्ये दिले आहेत.

१) वयोमर्यादा Age Limit :

Assistant Manager या पदासाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे कमाल ४० वर्ष असणे आवश्यक आहे.

२) शैक्षणिक पात्रता Educational Qualification :

आयोगाने Assistant Manager Electrical पदासाठी जाहीर केलेल्या जाहिराती मध्ये शैक्षणिक पात्रता ही इंजिनीअरिंग उत्तीर्ण असणे आवश्यक असले तरी वेगवेगळ्या पदासाठी इंजिनीअरिंगच्या आवश्यक ब्रांच नमुद केल्या आहेत.

बघूया नेमक्या कोणत्या अभियांत्रिकी उमेदवार सहायक मॅनेजर पदासाठी पात्र असणार आहेत.

असिस्टंट मॅनेजर ( यांत्रिकी / धातुशास्त्र) Assistant Manager ( Mechanical/ Metallurgy ) :

उमेदवार हा पूर्ण वेळ अभियांत्रिकी मध्ये आपली पदवी उत्तीर्ण झालेला असावा. यात Mechanical Engineering/ Technology in Mechanical/ Production/ Industrial Manufacturing / Railways/ Mechatronics/ Automobile यापैकी एक शाखेत पास असणे आवश्यक आहे.

असिस्टंट मॅनेजर ( ईल्क्ट्रिकल / इलेक्ट्रोनिक ) Assistant Manager ( Electrical / Electronics ) :

उमेदवार हा पूर्ण वेळ अभियांत्रिकी मध्ये आपली पदवी उत्तीर्ण झालेला असावा. यात Electrical / Electronics / Power Supply/Instrumentation and Control/ Industrial Electronics / Electronics and Instrumentation/ Applied Electronics/ Power Electronics Engineering किंवा Electronics and Telecommunication, Computer Engineering / Computer Science/ IT यापैकी एका शाखेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

असिस्टंट मॅनेजर ( स्थापत्य ) Assistant Manager ( Civil ) :

उमेदवार हा पूर्ण वेळ अभियांत्रिकी मध्ये आपली पदवी उत्तीर्ण झालेला असावा. यात Civil Engineering पास होणे आवश्यक आहे.असिस्टंट मॅनेजर ( माहिती तंत्रज्ञान ) Assistant Manager ( Information Technology/ Computer Science) : उमेदवार हा पूर्ण वेळ अभियांत्रिकी मध्ये आपली पदवी उत्तीर्ण झालेला असावा.यात Computer Engineering / Technology / Computer Science/ Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation / Information Technology/ Computer Application यांपैकी एक पदवीउत्तर अथवा पदवी पास असणे आवश्यक आहे.

३) अनुभव Experience :

क ) असिस्टंट मॅनेजर ( यांत्रिकी / धातुशास्त्र)Assistant Manager ( Mechanical/ Metallurgy ) आणि असिस्टंट मॅनेजर ( ईल्क्ट्रिकल / इलेक्ट्रोनिक ) Assistant Manager ( Electrical / Electronics ) :

पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कमीत कमी २ वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. यात वरील पदांसाठी लागणारा अनुभव हा QA/ QC / TPI / Vendor Assessment / Materials Testing / Production Maintenances / Consultancy / Tool Making / Tool Room / Tools Inspection / Civil Constructions / Electronics Equipment Testing & Inspection यमधल्या कोणत्याही एका क्षेत्रात असणे आवश्यक आहे.

ब ) असिस्टंट मॅनेजर ( स्थापत्य )Assistant Manager ( Civil ) आणि असिस्टंट मॅनेजर ( माहिती तंत्रज्ञान ) Assistant Manager ( Information Technology/ Computer Science) :

पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कमीत कमी २ वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. यात वरील पदांसाठी लागणारा अनुभव हा IT/CS Software Development, API , Mobile App त्यापैकी कोणतेही एक क्षेत्रात असणे आवश्यक आहे.

RITES Recruitment Relaxation/ Concession

आयोगाने नमूद केल्याप्रमाणे अनुसुचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक अपंग घटक एक्स सर्विसमन यांच्या साठी सरकारी नियमानुसार जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

तसेच वरील घटकांना वयोमर्यादा बाबत शिथिलता याचा देखील लाभ घेता येणार आहे.

ज्या उमेदवारांनी आरक्षण / वय शिथिलता यासारख्या सवलतींचा पर्याय निवडला आहे त्यांनी कागदपत्रे तपासणी पडताळणी वेळेस सदर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे.

RITES Recruitment Selection Process

Assistant Manager या पदासाठी सर्व पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षा आणि मुलाखत या निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाईल. लेखी परीक्षामध्ये मेरिट लिस्ट नुसार निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

लेखी परीक्षेसाठी ६०% आणि मुलाखती साठी ४०% नुसार वितरण असेल. लेखी परीक्षा आणि मुलाखत या निवड फेरीचा विचार करता दोन्ही परीक्षा साठी कमीत कमी टक्केवारी पात्रता ठेवण्यात आली आहे.

यानुसार उमेदवारास दोन्ही परीक्षेसाठी पुढील पात्रता असणार आहे.

खुला प्रवर्ग , आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकअनुचित जाती, अनुसूचित जमाती , इतर मागासवर्गीय , अपंग घटक
लेखी :कमीत कमी ५०%कमीत कमी ४५%
मुलाखत:कमीत कमी ६०%कमीत कमी ५५%

लेखी परीक्षा ही १२५ गुणाची असेल. परीक्षा कालावधी हा २ तास ३० मिनिटे देण्यात आला आहे.

यात कोणतेही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे.

मुलाखती साठी १:६ या प्रमाणात उमेदवार बोलावले जातील.

सदर भरतीसाठी असलेला अभ्यासक्रम आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलेल्या जाहिराती मध्ये नमूद केलेला आहे.

Notice Period

निवड झालेल्या उमेदवारांना सुरवातीला पहिले वर्ष हे करार पद्धती वर काम करायचे आहे. एक वर्षांनंतर प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी आणि वर्षभरातील कामगिरीवर अवलंबून असेल.

निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या जागेच्या मागणीनुसार भारतात कुठे ही पोस्टिंग दिली जाईल यादरम्यान उमेदवारांना मिळणारे मूळ वेतन हे बेसिक पे २३,३०० ₹ असून भत्तासहित निमशहरी भागात महिना रुपये ४२,४७८ ₹ म्हणजेच वार्षिक ५.०९ लाखाचे पॅकेज मिळणार आहे.

RITES Recruitment How to Apply

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने सर्व आवश्यक पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

१) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराने https://www.rites.com/ या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.

२) नोंदणी झाल्यानंतर उमेदवाराला मिळणारा नोंदणी क्रमांक पुढील प्रक्रियेसाठी नोंद करून ठेवणे आवश्यक आहे.

३) अर्ज भरताना मागविण्यात आलेली वैयक्तिक माहिती, संपर्क माहिती , शैक्षणिक आणि आरक्षण माहिती अचूक भरावी.

४) ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर अर्जाची एक प्रिंट काढून सोबत ठेवावी.

५) अर्जात विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे अपलोड करायचे नाही आहे.

RITES Recruitment Documents

उमेदवाराच्या निवडी नंतर होणाऱ्या कागदपत्र तपासणी पडताळणी करिता आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे वेळीच सादर करणे बंधनकारक आहे. यामध्ये पुढील कागदपत्रांचा समावेश आहे.

१) दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र२) पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
३) जात प्रमाणपत्र४) पॅनकार्ड
५) अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र६) ओळखपत्र
७) नमूद केलेल्या पत्तासाठी पुरावा८) २ पासपोर्ट कलर छायाचित्र

RITES Recruitment Application Fee

ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. निहित कालावधी मध्ये अर्ज शुल्क न भरल्यास सदर अर्जाचा पुढील टप्प्यासाठी अर्ज स्वीकारला जाणार नाही आहे.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर अर्ज शुल्क भरण्याची जी लिंक देण्यात येईल केवळ त्याच लिंकद्वारे केलेले पेमेंट ग्राह्य असेल.

बघुया कोणत्या वर्गासाठी किती अर्ज शुल्क आहे.

साधारण प्रवर्ग , इतर मागासवर्गीय उमेदवार : रुपये ६०० + इतर कर
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ,अनुसुचित जाती , अनुसूचित जमाती आणि
अपंग घटक उमेदवार :
रुपये ३०० + इतर कर

कंपनी ने उमेदवारांच्या सोयीसाठी Helpdesk दिला आहे. आपल्या अडचणी , प्रश्न यांच्यासाठी पुढील क्रमांक वर संपर्क करू शकतात.

Helpdesk क्रमांक : ०११-३३५५७०००

Helpdesk Email ID : pghelpdesk@hdfcbank.com

Frequently Asked Questions

१) RITES Recruitment अंतर्गत किती जागा भरल्या जाणार आहेत ?

उत्तर : RITES Recruitment अंतर्गत एकूण ७२ जागा भरल्या जाणार आहेत.

२) RITES Recruitment भरती कोणत्या पदासाठी होणार आहे ?

उत्तर : Assistant Manager सहायक मॅनेजर या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

३) RITES Recruitment निवड प्रकीया काय असणार आहे ?

उत्तर : यात लेखी परीक्षा आणि मुलाखत फेरी असणार आहे. दोन्ही फेरी पूर्ण करणारे उमेदवार हे निवडले जातील.


४) RITES Recruitment अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

उत्तर : RITES Recruitment अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०२४ आहे.


५) RITES Recruitment अंतर्गत होणारी परीक्षा भारतात कुठे घेतली जाणार आहे ?

उत्तर : लेखी परीक्षा ही २८ एप्रिल रोजी होणार असून परीक्षेचे केंद्र हे गुरगाव – दिल्ली हे असणार आहे.