Railway Recruitment 2024 : ॲप्रेंटाइस ॲक्ट १९६१ अंतर्गत पश्चिम मध्य रेल्वे ने २०२४-२५ या वर्षा साठी प्रशिक्षणार्थी या पदासाठी ३००० पेक्षा जास्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भारतीय रेल्वेत काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ही मोठी संधी असणार आहे.
Railway Recruitment 2024 Overview
दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या सोबतच आवश्यक आयटीआय कोर्स उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून भारतीय रेल्वेत काम करण्यासाठी रेल्वे भरती मंडळाने रिक्त असलेल्या ३३१७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहे.
जाहिरात प्रसिद्ध : | भारतीय रेल्वे भरती मंडळ |
पदाचे नाव : | प्रशिक्षणार्थी |
पद संख्या : | ३३१७ पदे |
अधिकृत संकेतस्थळ : | अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
Railway Recruitment 2024 Important Dates
रेल्वे भरती मंडळाने सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रणालीचा अवलंब केल्याने उमेदवारांनी आयोगाने निहित केलेल्या कालावधी मध्येच अर्ज भरायचा आहे. बघूया अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख काय आहे. यानुसार
अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख : | ५ ऑगस्ट २०२४ |
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : | ४ सप्टेंबर २०२४ |
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवाराने वरील कालावधी संपायच्या अगोदर आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
Mahatransco Bharti 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मध्ये आयटीआय उमेदवारांना नोकरीची संधी
Railway Recruitment 2024 Vacancies
प्रशिक्षणार्थी म्हणून ज्या ३३१७ रिक्त जागा रेल्वे भरती मंडळाकडून भरल्या जाणार आहेत त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत असणाऱ्या विविध युनिट > डिविजन > वर्कशॉप्स > ट्रेड नुसार या रिक्त जागा भरल्या जातील.
युनिट | रिक्त जागा |
JBP Divison : | १२६२ |
BPL Division : | ८२४ |
KOTA Division : | ८३२ |
CRWS BPL : | १७५ |
WRS KOTA : | १९६ |
HQ/JBP | २८ |
एकूण जागा | ३३१७ |
राखीव वर्ग म्हणजेच खुला प्रवर्ग सहित अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग प्रवर्ग अपंग घटक आर्थिक दुर्बल घटक यासाठी असेलल्या जागांचे वितरण पाहण्यासाठी उमेदवाराने जाहिरात बघावी.
Railway Recruitment 2024 Eligibility Criteria
उमेदवाराने रेल्वे भरती मंडळाने जाहीर केलेल्या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून आपण सर्व पात्रतेचे निकष पूर्ण करत आहोत का याची छाननी करून अर्ज भरायचा आहे.
पात्रतेचे निकषानुसार वयाची मर्यादा , शैक्षणिक पात्रता या बाबी असतील.
१) वयोमर्यादा : | उमेदवाराचे वय ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत कमीत कमी १५ ते कमाल २४ वर्ष पूर्ण केलेले असावे. आयोगाने राखीव प्रवर्गानुसार वय शिथिलता देखील दिली आहे. |
२) शैक्षणिक पात्रता : | उमेदवार हा मान्यता प्राप्त इन्स्टिट्युट / संस्था मधून दहावी किमान ५० % किंवा बारावी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी घेऊन उत्तीर्ण असावा. सोबतच उमेदवाराकडे NCVT/ SCVT कडून आयटीआय कोर्स उत्तीर्ण असल्याचे राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे |
Railway Recruitment 2024 How to Apply
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराने रेल्वे भरती मंडळाच्या पश्चिम मध्य रेल्वे संकेतस्थळावर जावून अर्ज भरायचा आहे.अर्ज भरताना विचारलेल्या सर्व बाबीं काळजीपूर्वक भराव्यात.यासाठी आयोगाने पुढील लिंक देखील दिली आहे : www.wcr.indianrailways.gov.in (Path – About us->Recruitment->Railway Recruitment Cell->Engagement of Act Apprentices->Engagement of Act Apprentices for 2024-25)
अर्ज सबमिट करायच्या अगोदर उमेदवारांना अर्ज शुल्क / परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य असणार आहे. यानुसार
१) अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अपंग घटक आणि महिला : | रूपये ४१ |
२) वरील घटक सोडून इतर वर्ग : | रुपये १४१ |
Railway Recruitment 2024 Mode of Selection
उमेदवाराची अंतिम निवड ही दहावी बारावी आणि आयटीआय मध्ये मिळालेल्या सरासरी गुणांच्या आधारे केली जाईल.
प्रत्येक ट्रेड / युनिट / डिविंजन नुसार मेरिट लिस्ट लागून निवड यादी जाहीर केली जाईल.
निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होता येईल या दरम्यान काही ठराविक रक्कम ही स्टायपेंड म्हणून दिली जाईल.
Railway Recruitment 2024 Documents
ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांना काही कागदपत्रे अपलोड करायचे आहे. यानुसार पुढील यादी आयोगाने जाहीर केलेली आहे. यात प्रामुख्याने ,
१) फोटो आणि सही | ४) आयटीआय ट्रेड उत्तीर्ण प्रमाणपत्र- गुणपत्रक |
२) दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र- गुणपत्रक | ५) आरक्षणाचा लाभ घेतल्यास जात प्रमाणपत्र |
३) बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र- गुणपत्रक | ६) अपंग घटक असल्यास तसे अपंग प्रमाणपत्र |
Frequently Asked Questions
१) What is the Last date to Apply for Railway Recruitment 2024 ?
उत्तर : पश्चिम मध्य रेल्वे भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ सप्टेंबर २०२४ आहे.
२) what are the eligibility criteria for Railway Recruitment 2024 ?.
उत्तर : वय वर्ष १५ ते २४ , दहावी – बारावी – आयटीआय उत्तीर्ण उमेदवार सदर भरतीसाठी अर्ज दाखल करू शकतात.
३) What is the Mode of Selection for Railway Recruitment 2024 ?
उत्तर : उमेदवाराची निवड ही दहावी – बारावी – आयटीआय यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या सरासरी गुणांच्या आधारे केली जाईल.