रेल्वे मध्ये लोको पायलट आणि गुड्स गार्ड म्हणून होणार नियुक्ती,Railway Recruitment 2024

Railway Recruitment नुसार दक्षिण पूर्व रेल्वे भरती बोर्डाकडून सहाय्यक लोको पायलट पदाच्या ८२७ जागा आणि गुड्स गार्ड या पदाच्या ३७५ जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे.

SE Railway Recruitment 2024 Overview

दक्षिण पूर्व रेल्वेच्या साधारण विभागीय स्पर्धात्मक परीक्षा अंतर्गत सहाय्यक लोको पायलट आणि गुड्स गार्ड या पदाची भरती प्रक्रिया करण्यात आले असून तब्बल १२०० पेक्षा रिक्त पदे भरली जाणार आहेत. या साठी पात्र उमेदवारांकडून जे सद्या दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये काम करत असणाऱ्या सर्व रेल्वे कर्मचारी, आर पी एफ / एस आर पी एफ/ कायदे सहायक आणि कॅटरिंग पर्यवेक्षक यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

चला तर बघुया अर्ज भरण्याची प्रक्रिया कशी असेल , अर्जाची सुरवात केव्हा होईल , अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे , निवड प्रक्रिया कशी असेल अशा सर्व बाबींचा विस्तृत आढावा आपण या लेखात घेणार आहोत.

SE Railway Recruitment 2024 Important Dates

ऑनलाईन अर्ज प्रणाली मध्ये रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या कालावधीमध्येच उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यासाठी उमेदवारांनी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख व अर्ज करण्याची अंतिम तारीख माहिती असणे आवश्यक आहे. बोर्डाने जाहीर केलेल्या कालावधी मध्येच सदर अर्जाची लिंक चालू असेल याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.


चला तर पाहूया अर्ज करण्याची सुरुवातीची व अंतिम तारीख एका टेबलच्या माध्यमातून.

अर्ज स्विकारण्याची सुरवात तारीख :१३ मे २०२४
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : १२ जून २०२४
Railway Recruitment

SE Railway Recruitment 2024 Vacancies

सहाय्यक लोको पायलट आणि गुड्स गार्ड पदासाठी दक्षिण पूर्व रेल्वे बोर्डाने भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. लोको पायलट आणि गुड्स गार्ड या पदासाठी असणाऱ्या जागा आणि त्याचे प्रवर्ग नुसार विवरण आपण एका टेबलच्या माध्यमातून बघणार आहोत.

पदाचे नावखुला प्रवर्गअनुसूचित जातीअनुसूचित जमातीइतर मागासवर्गीय घटकएकूण
सहाय्यक लोको पायलट४२०१२९७४२०४८२७
गुड्स गार्ड१८८५९२७१०१३७५

SE Railway Recruitment 2024 Eligibility Criteria

दक्षिण पूर्व रेल्वे बोर्डाने सहाय्यक लोको पायलट आणि गुड्स गार्ड पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहे. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी रेल्वे बोर्डाने प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. आयोगाने पात्र उमेदवारांसाठी काही पात्रतेचे निकष घालून दिले आहे. केवळ त्याच निकषात बसणारे किंवा सदर निकषांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

चला तर पाहूया नेमके कोणते पात्रतेचे निकष दिले आहेत. साधारणपणे यामध्ये वयोमर्यादा , शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता या बाबी असतील.

१) वयोमर्यादा ( Age Limit ) :


रेल्वे बोर्डाने उमेदवारांसाठी वयोमर्यादा बाबत किमान वय आणि कमाल वय याबाबत स्पष्ट पणे नमूद केले आहे की अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय हे १८ वर्ष असेल किंवा उमेदवाराचा जन्म १ जुलै २००६ च्या नंतर झालेला नसावा. तर कमाल वय लक्षात घेता उमेदवाराचे वय हे खुल्या प्रवर्गासाठी ४२ वर्ष , इतर मागासवर्गीय घटक साठी ४५ वर्ष आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यासाठी ४७ वर्ष असेल.

रेल्वे बोर्डाने वयाचा पुरावा म्हणून उमेदवाराने पुढील कागदपत्रे सादर करू शकतात यामध्ये प्रामुख्याने दहावी / बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक , शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी एक.

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेडमध्ये ३९३ जागांसाठी भरती BECIL Recruitment 2024

२) शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) :

रेल्वे बोर्डाने लोको पायलट आणि गुड्स गार्ड यापदासाठी काही ठराविक शैक्षणिक पात्रता दिली असून जर उमेदवार दोन्ही पदासाठी पात्रता निकष पूर्ण करत असल्यास उमेदवार दोन्ही पदासाठी अर्ज करू शकतात.

चला तर बघुया लोको पायलट होण्यासाठी काय शैक्षणिक पात्रता लागते आणि गुड्स गार्ड साठी कमीत कमी किती शिक्षण आवश्यक आहे.


१) सहाय्यक लोको पायलट : सदर पदासाठी उमेदवाराने मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटमोबाईल मध्ये पदविका परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तसेच वरील शाखेत पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार देखील अर्ज दाखल करू शकतात.
तसेच दहावी सोबत रेल्वे बोर्डाने आपल्या जाहिराती मध्ये नमूद केलेल्या आयटीआय कोर्स उत्तीर्ण असावा.

२) गुड्स गार्ड : सदर पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट अथवा बोर्ड कडून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

SE Railway Recruitment 2024 How to Apply

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने आयोगाने प्रसिद्ध केलेल्या लिंक वर जावून नोंदणी करायची आहे. यासाठी उमेदवाराने आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. GDCE 2024 Online/ E Application वर क्लिक करायचे आहे. नवी नोंदणी वर क्लिक करून आवश्यक ती सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक असणार आहे. यानंतर उमेदवाराला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल तो वापरून लॉगिन करायचे आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरणे गरजेचे आहे यामध्ये प्रामुख्याने वयक्तिक माहिती , शैक्षणिक / तांत्रिक शिक्षण , पोस्ट निवड आणि क्रम इत्यादी सामाविष्ट असेल. यानंतर अर्जात ज्या कागदपत्राची विचारणा करण्यात आली आहेत ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.

संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर अर्ज एकदा चेक करून सबमिट करायचा आहे. त्यानंतर अर्जाची एक प्रिंट जतन करून त्याची एक प्रत काढून ठेवावी.

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ही १२ जून २०२४ असणार आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.

Railway Recruitment

भरती प्रक्रिया संबधित सर्व माहिती उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरताना नोंद केलेल्या मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी वर पाठवले जातील यासाठी उमेदवाराने अचूक मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी नमूद करायचा आहे.

रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या पोस्ट ची पात्रता पूर्ण करत असल्यास उमेदवारला एका पेक्षा जास्त पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. फक्त एकाच पदासाठी उमेदवाराला अनेक अर्ज करता येणार नाहीये.


अपूर्ण अर्ज किंवा अपूर्ण माहिती , चुकीच्या भाषेत , अर्धवट कागदपत्रे अपलोड केलेली असल्यास तसेच फोटो आणि सही स्पष्ट नसल्यास सहित भरलेले अर्ज हे पुढील प्रक्रियेसाठी रद्द केले जातील.

SE Railway Recruitment 2024 Selection Process

सहाय्यक लोको पायलट आणि गुड्स गार्ड पदासाठी निवड होणासाठी रेल्वे बोर्डाने निवडीचे काही ठराविक टप्पे दिले असून उमेदवारांना सर्व टप्पे पार पाडायचे आहे. यामध्ये प्रामुख्याने चार टप्पे असतील. पहिला संगणक आधारित चाचणी, दुसरी पोस्ट आवश्यकतेनुसार योग्यता चाचणी , तिसऱ्या टप्प्यामध्ये कागदपत्रे तपासणी पडताळणी होईल आणि शेवटचा टप्पा हा वैद्यकीय चाचणी असेल.

दोन्ही पदासाठी ३ टप्पे समान असून त्यापैकी योग्यता चाचणी ही केवळ लोको पायलट या पदासाठी घेतली जाईल.

संगणक आधारित चाचणी मध्ये General Intelligence and Reasoning, Arithmetic , General Awareness हे विषय असतील. एका गुणासाठी एक प्रश्न असे १०० प्रश्न विचारले जातील.यासाठी परीक्षा कालावधी हा ९० मिनिटे असेल. संगणक आधारित चाचणी करिता १:३ निगेटिव्ह मार्किंग पद्धत असणार आहे.

तसेच बोर्डाने कमीत कमी टक्केवारी पात्रता देखील दिली असून यामध्ये खुला प्रवर्ग : ४०% , इतर मागासवर्गीय घटक: ३०% , अनुसूचित जाती : ३०% , अनुसूचित जमाती : २५ % या प्रमाणे असेल.

उमेदवाराची अंतिम निवड ही प्रामुख्याने संगणक आधारित चाचणी मध्ये मिळालेल्या गुणावर केली जाणार आहे.

संगणक आधारित चाचणी करिता प्रवेश पत्र हे आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. उमेदवाराने याकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर दिलेल्या लिंक वर जावून लॉग इन करायचे आहे व आपले प्रवेश पत्र विहित कालावधी मध्येच डाऊनलोड करायचे आहे.


CBT उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना निवडीच्या पुढील टप्प्यासाठी बोलवले जाईल.

SE Railway Recruitment 2024 Documents

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना शेवटच्या टप्प्यात महत्वाचे कागदपत्रे अपलोड करायचे आहे. उमेदवाराने भरलेली माहिती अचूक असणे आवश्यक असून सदर माहितीची तपासणी पडताळणी करिता आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे रेल्वे बोर्डाने भरतीच्या कोणत्याही टप्प्यात सादर करा सांगितल्यास तसे उमेदवारांना दाखविणे आवश्यक आहे.

चला तर बघुया नेमके कोणते कागदपत्र उमेदवाराने अपलोड करायचे आहे आणि सोबत देखील बाळगायचे आहे.


१) फोटोग्राफ.
२) सही.
३) वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला किंवा दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
४) शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
५) अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय घटकांना नॉन क्रेमेलियेर सादर करायचे आहे
६) डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा
७) जात प्रमाणपत्र
७) सद्या काम करत असल्याचा कर्मचारी पुरावा

Conclusion

दक्षिण पूर्व रेल्वे भरती बोर्डाकडून सहाय्यक लोको पायलट पदाच्या ८२७ जागा आणि गुड्स गार्ड या पदाच्या ३७५ जागांची भरती प्रक्रिया दक्षिण पूर्व रेल्वेच्या साधारण विभागीय स्पर्धात्मक परीक्षा अंतर्गत राबविण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ही १२ जून २०२४ असणार आहे.उमेदवाराची अंतिम निवड ही प्रामुख्याने संगणक आधारित चाचणी मध्ये मिळालेल्या गुणावर केली जाणार आहे.

Frequently Asked Questions

१) SE Railway Recruitment 2024 साठी कोणत्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे ?

उत्तर : सदर भरतीसाठी सहाय्यक लोको पायलट आणि गुड्स गार्ड या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

२) SE Railway Recruitment 2024 नुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय काय आहे?

उत्तर : रेल्वे बोर्डाने जाहीर केल्यानुसार सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ जून २०२४ असून रात्री ११.५९ पर्यंत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

३) SE Railway Recruitment 2024 साठी किती रिक्त जागांची पूर्तता केली जाणार आहे ?

उत्तर : सहाय्यक लोको पायलट आणि गुड्स गार्ड या पदासाठी अनुक्रमे ८२७ आणि ३७५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

४) SE Railway Recruitment 2024 साठी कोण कोणते कागदपत्रे सादर करायचे असेल ?

उत्तर : अर्जात नमूद केलेल्या माहितीची तपासणी पडताळणी साठी वयाचा पुरावा , शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण प्रमाणपत्र ,जातीचा दाखला, नॉन क्रिमी लियर इत्यादी कागदपत्रे ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करायचे आहे.

५) SE Railway Recruitment 2024 मध्ये लोको पायलट आणि गुड्स गार्ड यासाठी किती पगार दिला जाणार आहे ?

उत्तर : सदर भरती विभागीय स्पर्धात्मक परीक्षा असून सहाय्यक लोको पायलट साठी ५२००-२०२०० सहित १९०० चा ग्रेड पे आणि गुड्स गार्ड साठी ५२००-२०२०० सहित २८०० चा ग्रेड पे देण्यात आला आहे.