Rail Coach Factory ही भारतीय रेल्वेच्या अधीन असलेले मनुफॅक्चरींग युनिट आहे.भारतात असे कित्येक मनुफॅक्चरिंग युनिट्स आहे जिथे भारतीय रेल्वेला लागणाऱ्या वेगवेगळ्या पार्ट्स चे मागणीनुसार प्रोडक्शन केले जाते. यात इंजिन पासून रेल्वेचे ए सी डब्बे ,नॉन ए सी डब्बे, रेल्वेचे चाक सहित डिझेल लोकोमोटिव , इलेक्ट्रिक लोकोमोटीव चे प्रोडक्शन केले जाते.
नुकतेच भारतीय रेल्वेकडून एक नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. तर ही जाहिरात आहे भारतीय रेल्वे कोच फॅक्टरी चे. या नोटिफिकेशन मार्फत भारतीय रेल कोच मध्ये रिक्त असलेल्या एकूण ५५० जागा या भरल्या जाणार आहेत.रेल्वे मंत्रालय – भारतीय रेल कोच ने आपल्या Notice No A-1/2024 Dated 11.03.2024 द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
Engagement of Act Apprentice for training under the Apprenticeship Act 1961 अंतर्गत ५५० जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे. हे सर्व अर्ज मागविण्यात आले आहे ती भारतीय रेल कोच फॅक्टरी आहे पंजाब मधील कापूरथळा ( Indian Rail Coach Factory Kapurthala ) येथील. Technical Training Centre भारतीय रेल कोच फॅक्टरी कापूरथळा येथे प्रशिक्षणार्थी म्हणजेच Apprenticeship साठी अर्ज मागिण्यात आले आहे.
Indian Rail Coach Factory Apprenticeship Overview
पंजाब मधील कापूरथळा येथे असणाऱ्या भारतीय रेल कोच फॅक्टरी मध्ये ५५० जागांसाठी पात्र असेलल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. पात्र उेदवारांकडून अर्ज मागविताना अर्जदाराला काही निकषांची पूर्तता करणे आवश्यक असणार आहे. उमेदवारांना ११ मार्च २०२४ पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. खालील तक्त्यामधून थोडक्यात आढावा घेऊया.
जाहिरात प्रसिद्ध : | भारतीय रेल्वे रेल कोच : कापूरथळा – पंजाब ( Indian Rail Coach Factory Kapurthala ) |
पदाचे नाव : | प्रशिक्षणार्थी ( Apprenticeship ) |
पदांची संख्या : | ५५० |
अर्ज पद्धत : | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ: | https://rcf.indianrailways.gov.in/ |
Indian Rail Coach Factory Apprenticeship Important Dates
उमेदवारांनी अर्ज करायचा असल्यास भारतीय रेल्वे ने जाहीर केलेल्या मुदतीच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी अर्ज शुल्क देखील जाहिरातीमध्ये दिलेल्या शेवटच्या तारखे पर्यंत आणि वेळेत भरावा. चला तर बघुया अर्ज स्विकारण्याची सुरवात केव्हा होते अन् अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख काय काय ते एका टेबलच्या मार्फत
अर्ज स्विकरण्याची सुरवात तारीख : ११ मार्च २०२४
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : ०९ एप्रिल २०२४
Indian Rail Coach Factory Apprenticeship Eligibility
1. Education Eligibility :
अर्ज करणारा उमेदवार हा दहावी (एसएससी ) उत्तीर्ण असावा किंवा त्याच्या समान परीक्षा मान्यता प्राप्त बोर्ड कडून कमीत कमी ५०% गुणांसह पास असणे आवश्यक आहे आणि जाहिरातीमध्ये दिलेल्या ट्रेड चा ITI अर्थात नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट हे NCVT ( National Council for Vocational Training ) कडून प्राप्त झालेले असणे गरजेचे आहे.
एसएससी + आयटीआय ट्रेड सर्टिफिकेट दोन्ही शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेले असावे. दोन्ही पैकी एक असा कोणताही पर्याय जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले नाही.ज्यांना CGPA सिस्टम असेल त्यांच्यासाठी आयोगाने मार्कांचे % (Percentage) काढायचा असल्यास जाहिरातीमध्ये फॉर्म्युला दिला आहे. त्याचा वापर करून उमेदवार CGPA>Percentage मध्ये करू शकतात.
Apprenticeship साठी दोन्ही म्हणजेच दहावी % आणि ट्रेड % आवश्यक असून या दोन्हींचा वापर करून प्रमाण सरासरी % काढले जानार आहे. उदा. दहावी मध्ये जास्तीत जास्त मार्क आहे १००० आणि मिळालेले मार्क आहेत ७०० तर उमेदवाराला दहावी मध्ये ७०% मिळाले आहेत. आणि NCVT कडून पूर्ण केलेल्या ट्रेड मध्ये ८०% आहेत. तर या दोन्ही परीक्षेची सरासरी टक्केवारी काढले जातील. ७०% + ८०% याचा सरासरी टक्केवारी झाली ७५%
2. Age limit :
अर्ज करणारा उमेदवार हा कमीत कमी वयाची १५ वर्ष आणि जास्तीत जास्त २४ वर्ष दिनांक ३१ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण केलेला असावा. जास्तीत जास्त वयाबाबत जाहिरातीमध्ये काही वर्गांसाठी सूट / शिथिलता देण्यात आली आहे. यात अनुसूचित जाती व जमाती, राखीव खुला वर्ग , अपंग आणि सेवा निवृत झालेले अशांचा समावेश आहे. चला तर नजर टाकुया की कोणाला किती वर्ष वयोमर्यादा बाबत शिथिलता देण्यात आली आहे.
वर्ग | शिथिल वर्ष |
Scheduled Caste and Scheduled Tribe ST उमेदवार : | ५ वर्ष |
Other Backward Class (OBC ) उमेदवार : | ३ वर्ष |
Person with Disability उमेदवार : | १० वर्ष |
Ex Servicemen उमेदवार : | १० वर्ष |
ज्या उमेवारांना एससी एसटी आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा आहे. त्यांच्या जवळ एससी किँवा एसटी आरक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच सदर प्रमाणपत्र कागदपत्रे तपासणी – पडताळणी वेळेस सादर करणे आवश्यक आहे.
खुला मागास प्रवर्ग ( Other Backward Class) OBC उमेदवारांना ओबीसी प्रवर्गात आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांना त्यांच्या जातीचे म्हणजेच ओबीसी आरक्षण प्रमाणपत्र कागदपत्र तपासणी – पडताळणी वेळी सादर करणे बंधनकारक आहे.
तसेच ओबीसी उमेदवारांनी जात प्रमाणपत्रासोबत नॉन क्रिमी लियर प्रमाणपत्र देखील सादर करणे आवश्यक आहे.
Ex Servicemen उमेदवार ज्यांना त्यांना राखीव केलेल्या कोटा मध्ये असलेल्या जागेचा लाभ घ्यावयाचा असेल तर त्यांना सर्व्हिंग सर्टिफिकेट ( Serving Certificate) आणि डिस्चार्ज प्रमाणपत्र ( Discharge Certificate ) कागदपत्रे तपासणी – पडताळणी वेळेस सादर करणे बंधनकारक आहे.Physically handicapped Persons : यांच्या सोबत Ex Serviceman यांना एकूण जागांच्या ३ % जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
PWD ( Person With Disability) उमेदवारांना त्याच्या प्रवर्ग आरक्षण लाभ घेण्यासाठी ४ % आणि त्यापेक्षा जास्त Disability असलेले प्रमाणपत्र कोणत्याही मान्यता प्राप्त प्राधिकरणाकडून मग ते केंद्र असो वा राज्य यांच्या द्वारे प्राप्त झालेले असणे आवश्यक आहे. तसेच कागदपत्रे तपासणी – पडताळणी वेळेस सादर करणे बंधनकारक असणारं आहे.
Indian Rail Coach Factory Apprenticeship Selection Process
ज्या उमेदवारांनी प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज केला आहे , त्या सर्व उमेदारांची होणारी निवड ही संपूर्णतः मेरिट आधारित आहे. मेरिट लिस्ट ही दहावीचे टक्केवारी ( कमीत कमी ५०% ) आणि ITI ट्रेड मधील टक्केवारी यांच्यावर आधारित असेल. या दोन्ही परीक्षेचा टक्केवारीची मिळून एक सरासरी काढली जाईल व आलेल्या सरासरी वर मेरिट लावण्यात येईल. तसेच टक्केवारी मोजताना संबधित शैक्षणीक वर्षात असणारे सर्व विषय आणि विषयानुसार मिळालेले गुण यांची टक्केवारी काढले जाईल. यात कोणत्याही प्रकारचे विषय कोणत्याही पॅटर्न नुसार वैगरे वगळले जाणार नाही. म्हणजेच बेस्ट ऑफ फाईव असे काही ही चालणार नाही.
जर कोणत्याही दोन उमेदवारांना समान गुण असल्यास ज्या उमेदवाराचे वय जास्त असेल तो उमेदवार ग्राह्य धरले जाईल. तसेच जर जन्मतारीख सुद्धा समान आल्यास ज्या उमेदवारांनी अगोदर दहावी पास झाली असेल तो उमेदवार पुढील टप्प्यात जाण्यास पात्र ठरतील. पात्रता फेरी पास करणाऱ्या उमेदवारांना कागद पत्रे तपासणी आणि मग मेडिकल तपासणी साठी बोलावले जाईल.
नोट :
जर दिलेल्या जागांसाठी उमेदवार न मिळाल्यास सदर जागा ही राखीव उमेदवाराला दिली जाईल. बघुया याचा आरक्षण जागांवर कसा परिणाम होणार आहे.
१) जर दिलेल्या जागा या अनुसूचित जाती ( Scheduled Caste ) साठी आरक्षित ठेवण्यात आल्या असतील आणि जर त्या जागेसाठी कोणताही उमेदवार मिळाला नाही तर सदर जागा ही अनुसूचित जमाती ( Scheduled Tribe) मधील उमेदवाराला दिली जाईल.
२) जर दिलेल्या जागा या अनुसूचित जमाती ( Scheduled Tribe ) साठी आरक्षित ठेवण्यात आल्या असतील आणि जर त्या जागेसाठी कोणताही उमेदवार मिळाला नाही तर सदर जागा ही अनुसूचित जाती ( Scheduled Caste ) मधील उमेदवाराला दिली जाईल.
३) जर दिलेल्या जागा या इतर मागासवर्गीय ( Other Backward Class ) साठी आरक्षित ठेवण्यात आल्या असतील आणि जर त्या जागेसाठी कोणताही उमेदवार मिळाला नाही तर सदर जागा ही खुल्या प्रवर्ग ( open ) मधील उमेदवाराला दिली जाईल.
Indian Rail Coach Factory Apprenticeship Qualified Trade
जाहिराती मध्ये दिलेल्या पात्रता नुसार अर्ज करणारा उमेदवार हा दहावी आणि आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे. चला तर बघुया की कोणत्या आयटीआय ट्रेड चे उमेदवार ह्या प्रशिक्षणार्थी साठी पात्र असतील. रेल कोच फॅक्टरी द्वारा जाहीर केलेल्या नोटिफिकेशन् मध्ये एकूण ७ ट्रेड चा समावेश आहे. केवळ ह्याच आयटीआय ट्रेड चे उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच प्रत्येक ट्रेड साठी किती जागा राखीव आहे हे देखील या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
ट्रेड | जागा राखीव |
फिटर | २०० |
वेल्डर | २३० |
मशीनिस्ट | ०५ |
पेंटर | २० |
कारपेंटर | ०५ |
इलेक्ट्रिशियन | ७५ |
एसी / रिफ्रिजरेटर मेकॅनिक | १५ |
एकूण | ५५० |
Indian Rail Coach Factory Apprenticeship Apply
Apprenticeship साठी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांसाठी https://rcf.indianrailways.gov.in/ या संकेस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर जावून आपल्या वैयक्तिक माहिती अर्ज भरायचा आहे. अर्ज भरून झाल्यावर उमेदवारांनी अर्ज शुल्क देखील भरायचे आहे. अर्ज स्विकार केल्यावर ऑनलाईन अर्जाची एक प्रिंट पुढील प्रक्रियेसाठीआपल्या सोबत जतन करून ठेवावी.
अर्ज भरताना उमेदवारांनी काही गोष्टी अर्ज सबमिट करायच्या अगोदर नीट तपासून घ्यायच्या आहेत. कारण अर्ज सबमिट केल्यावर त्यात कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही आहे. अर्ज भरताना आपले नाव , वडिलांचे नाव, आणि जन्मतारीख ही दहावीचे असलेल्या प्रमाणपत्रवरील असावे.
तसेच कागदपत्रे तपासणी – पडताळणी वेळेस सादर केलेल्या माहिती मध्ये काही तफावत आढळल्यास तो अर्ज बाद करण्यात येईल.उमेदवारांना एक पेक्षा अधिक अर्ज करता येणार नाही तसेच अर्जामध्ये एक किंवा अधिक बदल करूनदेखील एका पेक्षा जास्त अर्ज करता येणार नाही. तसे आढळल्यास उमेदवाराचे नाव व अर्ज रद्द केले जातील.
Indian Rail Coach Factory Apprenticeship Application Fee
अर्ज भरल्यानंतर अर्ज शुल्क देखील भरायचे आहे. रुपये १०० अशी रक्कम ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे. सदर रक्कम ही परत केली जाणार नाही आहे. तसेच जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे रेल कोच फॅक्टरी कापूरथळा कोणत्याही प्रकारचे रोख पैसे/ डिमांड ड्राफ्ट / चेक यासारख्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज आणि कोणतीही फी आकारत नाही. उमेवारांसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरता येईल.
अर्ज शुल्क ही अर्ज करण्याची शेवटची पायरी आहे. एकदा अर्ज शुल्क भरल्यास त्यांनतर उमेदवारांनी दिलेल्या माहिती मध्ये कोणतही सुधारणा किंवा कोणत्याही प्रकारचे बदल करता येणार नाही आहे. अर्ज केल्यानंतर दोन दिवसात उमेदवारांनी अर्ज शुल्क भरायचे आहे. अर्ज शुल्क न भरल्यास सदर अर्ज हा ग्राह्य धरला जाणार नाही आहे.त्यामुळे अर्ज भरणे आणि अर्ज शुल्क पूर्तता हा संपूर्ण उमेदवारांचा वैयक्तिक भाग असेल.
अनुसूचित जाती ( Schedule Caste ) , अनुसूचित जमाती ( Scheduled Tribe) आणि महिला यांच्या कडून अर्ज स्विकारण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही आहे.
Indian Rail Coach Factory Apprenticeship Documents
अर्ज भरताना उमेदवारांनी आपल्याकडे असेलल्या कागदपत्रा मधून बघून आवश्यक आणि अचूक माहिती ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना भरायची आहे. त्यासाठी उमेदवाराकडे खाली दिलेले कागदपत्र तपासणी – पडताळणी साठी सादर करणे बंधनकारक आहे.
१) दहावी पास प्रमाणपत्र ( कमीत कमी ५५ % )
२) आयटीआय पास प्रमाणपत्र
३) अर्जाची प्रत
४) ओळखपत्र
५ ) दोन फोटो
उमेदवारांनी अर्ज भरताना आवश्यतेनुसार कागदपत्रे ही स्कॅन करून ठेवावी व मागणीनुसार अपलोड करावी. फोटो आणि स्वाक्षरी यासाठी जाहिराती मध्ये वेगवेगळे मापदंड देण्यात आले आहे. अर्ज त्वरित भरायचा असल्यास या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
Indian Rail Coach Factory Apprenticeship Salary
जाहिराती मध्ये कोणत्याही प्रकारचे Stipend म्हणून किती रक्कम ही दिली जाणार आहे असे नमूद करण्यात आले नाही आहे. रेल्वे बोर्डाद्वारे जारी करण्यात आलेल्या नियम आणि अटी नुसार सदर रक्कम ही ठरवली जाईल व उमेदवारांना दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची राहण्याची सोय ही केली जाणार नाही आहे. तसेच Apprenticeship चालू करण्यापूर्वी रेल कोच फॅक्टरी द्वारा जे ट्रेनिंग दिले जाणार आहे त्यासाठी उमेदवारांना करार करायचा आहे. उमेदवार अल्पवयीन असल्यास सदर करार हा उमेदवारांच्या पालकांच्या नावे केला जाईल.
Indian Rail Coach Factory Apprenticeship Important Points
अर्ज भरताना उमेदवारांना काही अडचण आल्यास रेल कोच फॅक्टरी द्वारा एक हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. सकाळी १०.०० ते संध्याकाळी १७.००च्या दरम्यान संबधित अधिकारी मदतीसाठी उपलब्ध असतील.०१८२२-२२७७३४ , 227735 लागल्यावर एक्स्टेन्शन दाबून ९२७९३ दाबावे व पुढील सूचनांचे पालन करावे.
जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे जागा , पात्रता फेरी निकष तसेच अर्ज स्वीकार किंवा नकार करायचे सर्व अधिकार हे भारतीय रेल अडमिनिस्ट्रेशन वर अवलंबून आहे.
अर्ज प्रक्रिया दरम्यान कोणतेही प्रकारचे अपात्रता माहिती भेटल्यास सदर अर्ज हा ग्राह्य धरले जाणार नाही. व उमेदवारांना कोणत्याही सुचने शिवाय तो अर्ज रद्द केला जाईल.निवड फेरी पूर्ण झाल्यावर कागदपत्रे तपासणी – पडताळणी वेळेस आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
Summary
कमाल २४ वर्ष आणि किमान १८ वर्ष वरील उमेदवार , दहावी मध्ये कमीत कमी ५०% आणि आयटीआय पास असलेले उमेदवार भारतीय रेल कोच फॅक्टरी मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज करू शकतो. यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही आहे. निवड ही संपूर्णतः मेरिट आधारित असेल. उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज ₹१०० अर्ज शुल्क भरून अर्ज पुर्ण करायचा आहे.
Frequently Asked Questions
१) रेल कोच फॅक्टरी मध्ये Apprenticeship साठी किती जागा भरल्या जाणार आहे ?
उत्तर : एकूण ५५० जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
२) Rail Coach Factory साठी परिक्षा पद्धती कोणती आहे ?
उत्तर : या मध्ये कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही आहे. उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्ट आधारित असेल.
३) Rail Coach Factory साठी अर्ज भरायचा कलावधी कोणता आहे ?
उत्तर : उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या कालावधीत अर्ज भरायचा आहे. दिनांक ११ मार्च २०२४ पासून ९ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात.
४) Rail Coach Factory Apprenticeship साठी किती stipend मिळनार आहे ?
उत्तर : निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून किती रक्कम Stipend म्हणून दिले जाईल याबाबत कोणती ही माहिती रेल कोच फॅक्टरी द्वारा जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये दिली नाहीये.
५) Rail Coach Factory Eligibility काय आहे?
उत्तर : कमाल २४ वर्ष आणि किमान १८ वर्ष वरील उमेदवार , दहावी मध्ये कमीत कमी ५५% आणि आयटीआय पास असलेले उमेदवार भारतीय रेल कोच फॅक्टरी मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज करू शकतो.
सरकारी नोकरीबदल्ल अधिक माहिती साठी भेट द्या.
https://jobschemewala.com/