PCMC Recruitment म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे जाहीर करण्यात आलेली भरती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे या जाहिरातीनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी आस्थापनाणे ” गट क” या सवर्गातील ” सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक ” एकत्रित पदभरती पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
PCMC Recruitment Overview
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जाहीर केलेल्या जाहिरात क्रमांक : ०१/२०२४ नुसार सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण ३२७ जागांसाठी ही भरती होणार आहे जे सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक या जाहिरातीमधून निवडलेले जाणार आहे ते विविध माध्यम मधील शिक्षक पदाच्या निवडीसाठी होणार आहे. यामध्ये मराठी माध्यम , उर्दू माध्यम आणि हिंदी माध्यम या माध्यमांसाठी सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक यांची भरती केली जाणार आहे.
PCMC Recruitment Vacancies
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एकुण ३२७ जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार “सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक ” यांचे तात्पुरत्या स्वरूपातील पदे ही भरली जाणार आहेत. पिंपरी चिंचवड मधील असणाऱ्या विविध शाळांमधील जे माध्यम शिकवले जात आहेत त्यातील मराठी माध्यम , उर्दू माध्यम आणि हिंदी माध्यम या माध्यमांसाठी ही सर्व एकूण ३२७ पदे भरली जाणार आहेत.
मराठी माध्यमामध्ये एकूण भरावयाची पदे आहे २४५.
उर्दू माध्यमांमध्ये एकूण भरावयाची पदे आहेत ६६ आणि
हिंदी माध्यमांमध्ये भरावयाची पदे आहेत १६.
चला तर बघूया मराठी , हिंदी , उर्दू माध्यमांमधून सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षकांसाठी किती पदसंख्या आहेत ते एका टेबलच्या स्वरूपात.
पदांचा तपशील | मराठी माध्यम | उर्दू माध्यम | हिंदी माध्यम |
सहाय्यक शिक्षक | १५२ | ३३ | ११ |
पदवीधर शिक्षक | ९३ | ३३ | ५ |
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जाहीर केलेल्या जाहिरातीमध्ये अर्ज भरण्याची सुरुवातीची तारीख व अर्ज भरण्याची शेवटची तारीख नमूद करण्यात आलेली आहे. जे उमेदवार पात्र असतील त्यांच्याकडून दिनांक एक १ एप्रिल २०२४ ते दिनांक १६ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहिरात प्रसिद्ध : पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पदाचे नाव : सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक
पदसंख्या : एकूण ३२७
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : १ एप्रिल २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ एप्रिल २०२४
अर्ज भरण्यासाठी असणारा कालावधी : १ एप्रिल २०२४ ते दिनांक १६ एप्रिल २०२४.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जाहीर केलेल्या जाहिरातीमधील पदांकरिता भरावयाच्या पदांची आरक्षण संख्या यामध्ये सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षण यांचा समाविष्ट असून तसेच शैक्षणिक पात्रता , मानधन वेतन , अर्जाचा नमुना , अर्ज करायची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती तसेच सर्वसाधारण सूचना या महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक १४ मार्च २०२४ पासून पाहण्यास उपलब्ध होतील.
Table of Contents
PCMC Recruitment Apply
जे उमेदवार सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक या पदासाठी पात्र असेल त्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. सदर अर्ज हा माननीय अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने करावा तसेच हा अर्ज दिलेला कालावधीत म्हणजेच दिनांक १ एप्रिल २०२४ ते दिनांक १६ एप्रिल २०२४ पर्यंत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत अर्ज समक्ष जुना डविभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरी गाव येथे वेळच सादर करणे आवश्यक आहे.
जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या मुदत काळात प्राप्त न झालेल्या अर्जाचा विचार कोणत्याही परिस्थितीत करण्यात येणार नाही. अर्जदाराने आपले अर्ज हे महानगरपालिकेच्या जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अर्ज प्रमाणे करणे बंधनकारक राहील अन्यथा अर्ज बाद केले जातील. अपूर्ण माहिती किंवा त्यांची पूर्तता न करणाऱ्या उमेदवारांचे हे अर्ज बाद करून ते उमेदवार अपात्र ठरवले जातील.
PCMC Recruitment Eligibility
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जाहीर केलेल्या जाहिरातीमध्ये मराठी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकरिता काही शैक्षणिक अहर्ता दिलेली आहे , ही शैक्षणिक अहर्ता पूर्ण करणे आवश्यक आहे. बघूया मराठी माध्यम , उर्दू माध्यम आणि हिंदीमध्ये शिक्षण झालेले उमेदवारांकरता शैक्षणिक अहर्ता काय आहे ते.
मराठी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकरिता शैक्षणिक अहर्ता
सहाय्यक शिक्षक किंवा उपशिक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे , एच.एस.सी.डी.एड. आणि पदवीधर शिक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे एच .एस .सी .डी .एड बी.एससी बी.एड ( विज्ञान विषय ) एच .एस .सी .डी. एड ( भाषा विषय)
मराठी माध्यमातून तून भरावयाची एकूण पदे आहेत २४५. यातील सहाय्यक शिक्षक किंवा उपशिक्षक या पदासाठी आवश्यक भरावयाची पदे आहेत १५२ . आणि पदवीधर शिक्षक या पदासाठी भरावयाची पदे आहेत ९३. अशा एकूण २४५ जागांसाठी मराठी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदे | शैक्षणिक पात्रता | पदांचा तपशील |
सहाय्यक शिक्षक किंवा उपशिक्षक | एच एस सी डी एड | १५२ |
पदवीधर शिक्षक | एच एस सी डी एड बीएससी बीएड ( विज्ञान विषय ) एच एस सी डी एड ( भाषा विषय / .) | ९३ |
आरक्षण निहाय पदांचा तपशील अनुसूचित जाती ( Scheduled Caste ) , अनुसूचित जमाती ( Scheduled Tribe ) , विमुक्त जाती अ ,विमुक्त जाती ब , भटक्या जमाती क , भटक्या जमाती ड ( Nomadic Tribes ) , विशेष मागास प्रवर्ग ( Special Backward Classes ) , इतर मागासवर्गीय प्रवर्ग ( Other Backward Class ) , आर्थिक दुर्बल घटक ( Economically Weaker Sections ), सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्ग ( Socially and Economically Backward Classes ) आणि खुला प्रवर्ग ( Unreserved Class ) यांना त्यांच्या प्रवर्गानुसार जागा आरक्षित केलेल्या आहेत. खालील तक्त्याच्या मदतीने बघूया की कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आरक्षित केलेले आहेत.
पदांचा तपशील | सहाय्यक शिक्षक | पदवीधर शिक्षक |
अनुसूचित जाती ( Scheduled Caste ) , | २० | १२ |
अनुसूचित जमाती ( Scheduled Tribe ) | ११ | ७ |
विमुक्त जाती अ ( Nomadic Tribes ) | ५ | ३ |
विमुक्त जाती ब ( Nomadic Tribes ) | ४ | २ |
भटक्या जमाती क ( Nomadic Tribes ) | ५ | ३ |
भटक्या जमाती ड ( Nomadic Tribes ) | ३ | २ |
विशेष मागास प्रवर्ग ( Special Backward Classes ) | ३ | २ |
इतर मागासवर्गीय प्रवर्ग ( Other Backward Class ) | २९ | १८ |
आर्थिक दुर्बल घटक ( Economically Weaker Sections ) | १५ | ९ |
सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्ग ( Socially and Economically Backward Classes ) | १५ | ९ |
खुला प्रवर्ग ( Unreserved Class ) | ४२ | २६ |
एकूण | १५२ | ९३ |
सहाय्यक शिक्षक व उपशिक्षक आणि पदवीधर शिक्षक या दोघांसाठीही आरक्षणनिहाय या पदांचा तपशील खाली देण्यात आलेला आहे.
उर्दू माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकरिता शैक्षणिक अहर्ता
सहाय्यक शिक्षक किंवा उपशिक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे , एच एस सी डी एड. आणि पदवीधर शिक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे , एच एस सी डी एड बीएससी बीएड ( विज्ञान विषय ) , एच एस सी डी एड ( भाषा विषय/ समाजशास्त्र विषय.)
उर्दू माध्यमातून तून भरावयाची एकूण पदे ६६ आहेत. यामध्ये दोन्ही पदांसाठी समान पदे भरली जाणार आहेत. यातील सहाय्यक शिक्षक किंवा उपशिक्षक या पदासाठी आवश्यक भरावयाची पदे आहेत ३३ आणि पदवीधर शिक्षक या पदासाठी भरावयाची पदे आहेत ३३ अशा एकूण ६६ जागांसाठी उर्दू माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदे | शैक्षणिक पात्रता | पदांचा तपशील |
सहाय्यक शिक्षक किंवा उपशिक्षक | एच एस सी डी एड | ३३ |
पदवीधर शिक्षक | एच एस सी डी एड बीएससी बीएड ( विज्ञान विषय ) एच एस सी डी एड ( भाषा विषय / समाजशास्त्र विषय.) | ३३ |
आरक्षण निहाय पदांचा तपशीलअनुसूचित जाती ( Scheduled Caste ) , अनुसूचित जमाती ( Scheduled Tribe ) , विमुक्त जाती अ, विमुक्त जाती ब , भटक्या जमाती क , भटक्या जमाती ड ( Nomadic Tribes ) , विशेष मागास प्रवर्ग ( Special Backward Classes ) , इतर मागासवर्गीय प्रवर्ग ( Other Backward Class ) , आर्थिक दुर्बल घटक ( Economically Weaker Sections ), सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्ग ( Socially and Economically Backward Classes ) आणि खुला प्रवर्ग ( Unreserved Class ) यांना त्यांच्या प्रवर्गानुसार जागा आरक्षित केलेल्या आहेत. खालील तक्त्याच्या मदतीने बघूया की कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आरक्षित केलेले आहेत.
पदांचा तपशील | सहाय्यक शिक्षक | पदवीधर शिक्षक |
अनुसूचित जाती ( Scheduled Caste ) , | ४ | ४ |
अनुसूचित जमाती ( Scheduled Tribe ) | २ | २ |
विमुक्त जाती अ ( Nomadic Tribes ) | १ | १ |
विमुक्त जाती ब ( Nomadic Tribes ) | १ | १ |
भटक्या जमाती क ( Nomadic Tribes ) | १ | १ |
भटक्या जमाती ड ( Nomadic Tribes ) | १ | १ |
विशेष मागास प्रवर्ग ( Special Backward Classes ) | १ | १ |
इतर मागासवर्गीय प्रवर्ग ( Other Backward Class ) | ६ | ६ |
आर्थिक दुर्बल घटक ( Economically Weaker Sections ) | ३ | ३ |
सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्ग ( Socially and Economically Backward Classes ) | ३ | ३ |
खुला प्रवर्ग ( Unreserved Class ) | १० | १० |
एकूण | ३३ | ३३ |
सहाय्यक शिक्षक व उपशिक्षक आणि पदवीधर शिक्षक या दोघांसाठीही आरक्षणनिहाय या पदांचा तपशील खाली देण्यात आलेला आहे
हिंदी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकरिता शैक्षणिक अहर्ता
सहाय्यक शिक्षक किंवा उपशिक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे, एच एस सी डी एड . आणि पदवीधर शिक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे , एच एस सी डी एड बीएससी , बीएड ( विज्ञान विषय ) एच एस सी डी एड ( भाषा विषय / समाजशास्त्र विषय.)
पदे | शैक्षणिक पात्रता | पदांचा तपशील |
सहाय्यक शिक्षक किंवा उपशिक्षक | एच एस सी डी एड | ११ |
पदवीधर शिक्षक | एच एस सी डी एड बीएससी बीएड ( विज्ञान विषय ) एच एस सी डी एड ( भाषा विषय / समाजशास्त्र विषय.) | ५ |
हिंदी माध्यमातून तून भरावयाची एकूण पदे १६ आहेत. यातील सहाय्यक शिक्षक किंवा उपशिक्षक या पदासाठी आवश्यक भरावयाची पदे आहेत ११ आणि पदवीधर शिक्षक या पदासाठी भरावयाची पदे आहेत ५ अशा एकूण १६ जागांसाठी हिंदी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आरक्षण निहाय पदांचा तपशीलअनुसूचित जाती ( Scheduled Caste ) , अनुसूचित जमाती ( Scheduled Tribe ) , विमुक्त जाती अ ,विमुक्त जाती ब , भटक्या जमाती क , भटक्या जमाती ड ( Nomadic Tribes ) , विशेष मागास प्रवर्ग ( Special Backward Classes ) , इतर मागासवर्गीय प्रवर्ग ( Other Backward Class ) , आर्थिक दुर्बल घटक ( Economically Weaker Sections ), सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्ग ( Socially and Economically Backward Classes ) आणि खुला प्रवर्ग ( Unreserved Class ) यांना त्यांच्या प्रवर्गानुसार जागा आरक्षित केलेल्या आहेत. खालील तक्त्याच्या मदतीने बघूया की कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आरक्षित केलेले आहेत.
पदांचा तपशील | सहाय्यक शिक्षक | पदवीधर शिक्षक |
अनुसूचित जाती ( Scheduled Caste ) , | १ | १ |
अनुसूचित जमाती ( Scheduled Tribe ) | १ | 0 |
विमुक्त जाती अ ( Nomadic Tribes ) | १ | १ |
विमुक्त जाती ब ( Nomadic Tribes ) | १ | 0 |
भटक्या जमाती क ( Nomadic Tribes ) | 0 | 0 |
भटक्या जमाती ड ( Nomadic Tribes ) | 0 | 0 |
विशेष मागास प्रवर्ग ( Special Backward Classes ) | 0 | 0 |
इतर मागासवर्गीय प्रवर्ग ( Other Backward Class ) | २ | १ |
आर्थिक दुर्बल घटक ( Economically Weaker Sections ) | १ | 0 |
सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्ग ( Socially and Economically Backward Classes ) | १ | १ |
खुला प्रवर्ग ( Unreserved Class ) | ३ | १ |
एकूण | ११ | ५ |
सहाय्यक शिक्षक व उपशिक्षक आणि पदवीधर शिक्षक या दोघांसाठीही आरक्षणनिहाय या पदांचा तपशील खाली देण्यात आलेला आहे
PCMC Recruitment Contract
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ केवळ या एका वर्षासाठी मराठी माध्यम , उर्दू माध्यम आणि हिंदी माध्यमांच्या शाळांमध्ये जे पात्र असतील ते उपशिक्षक / पदवीधर यांची एकत्रित मानधन तत्वावर अकरा महिन्यांच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यासाठी दिनांक १ एप्रिल २०२४ ते दिनांक १६ एप्रिल २०२४ पर्यंत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
PCMC Recruitment Documents
जे उमेदवार सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक या पदासाठी पात्र असतील , त्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.उमेदवारांनी आपल्या अर्ज सोबत काही कागदपत्रे प्रमाणपत्र व त्याच्या सत्यप्रती कागदपत्रे तपासणी व पडताळणी वेळेस सादर करणे बंधनकारक आहे.
बघूया ( PCMC Recruitment) साठी कोणकोणते कागदपत्रे व प्रमाणपत्र उमेदवारांकडे असणे व ते सादर करणे आवश्यक तसेच बंधनकारक आहे.
शाळा सोडल्याचा दाखला | पदविका |
धारण केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता विषयक प्रमाणपत्र | अनुभव प्रमाणपत्र. |
डीएड बीएड पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक |
PCMC Recruitment Terms and Conditions
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे अस्ताव्यवस्थापनेवर ज्या सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक यांची तात्पुरत्या स्वरूपात भरती होणार आहे , त्यासाठी महानगरपालिकेने जाहीर केलेल्या जाहिरातीमध्ये काही अटी व शर्ती नमूद करण्यात आलेल्या आहे उमेदवारांनी या अटी व शर्ती अर्ज भरण्यापूर्वी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
१) ११ महिन्यांच्या मानधनावर नेमलेल्या शिक्षकांची नेमणूक ही जेव्हा आदेश निघेल त्या दिनांक पासून ११ महिने या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची असलेली नियुक्ती असेल . यामध्ये उन्हाळी सुट्टीचा समावेश नसेल म्हणजेच म्हणजेच ११ महिन्यांचा कालावधी हा उन्हाळी सुट्टी वगळून असेल.
२) ज्या दिवशी प्राथमिक शिक्षण विभागास सदर सहाय्यक शिक्षकाची आवश्यकता नसेल , त्यावेळी कोणत्याही नोटीसी शिवाय सदर उमेदवाराची सेवा ही संपुष्टात आणण्यात येतील या सर्व संबंधीचे अधिकार हे अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे राखून ठेवलेले आहेत.
३) ज्या उमेदवारांची निवड सहाय्यक शिक्षक किंवा उपशिक्षक पदवीधर शिक्षक या पदावर झालेली असेल त्या उमेदवारांस एकत्रित मानधना व्यतिरिक्त महानगरपालिकेमार्फ देण्यात येणाऱ्या कोणत्याही सोयी सुविधा व इतर आर्थिक लाभ किंवा भत्ते मिळणार नाहीत.
४) नियुक्तीवेळेस उमेदवारांकडून एक हमीपत्र सादर करणे बंधनकारक आहे सदर आम्ही पत्र हे रुपये 500 स्कॅम पेपरवर मनपा सेवेत भविष्यात नोकरी बाबतचा कोणताही हक्क राहणार नाही तसेच न्यायालयात दाद मागणार नाही याबाबतचे हमीपत्र असणार आहे.
सरकारी निमसरकारी नोकऱ्याच्या अधिक माहिती साठी भेट द्या.
www.Jobschemewala.com
Frequently Asked Question
१) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ( PCMC Recruitment) एकूण किती पदांची भरती निघाली आहे ?
उत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एकूण ३२७ जागांची भरती निघाली आहे.
२) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कोणती पदे भरली जाणार आहेत ?
उत्तर : महानगरपालिकेमध्ये सहाय्यक शिक्षक किंवा उपशिक्षक आणि पदवीधर शिक्षक ही पदे भरली जाणार आहे.
३) सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल का ?
उत्तर : सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
४) सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक या पदासाठी भरण्याचा कालावधी कोणता आहे ?
उत्तर : अर्ज भरण्याची सुरुवातीची तारीख आहे १ एप्रिल व शेवटची तारीख आहे . १६ एप्रिल या दिलेल्या कालावधीमध्येच पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.
५) सदर पदांची निवड ही कायमस्वरूपी निवड असणार आहे का ?
उत्तर : सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक या पदांसाठी होणारी निवड ही तात्पुरत्या स्वरूपाची असून हा कालावधी ११ महिने असा आहे.