Palghar Shikshak Bharti 2024 पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १८९१ पदांसाठी शिक्षक भरती

Palghar Shikshak Bharti 2024 : पालघर जिल्हा परिषदेने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली असून यानुसार पालघर जिल्ह्यातील पैसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची १८९१ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२४ आहे.

Palghar Shikshak Bharti 2024 Overview

अनुसूचित जमाती प्रवर्ग व इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीनुसार पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये असणाऱ्या १८९१ पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर रिक्त पदांमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते.

चला तर बघूया शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा कोणत्या, पात्रतेचे निकष कोणते , शिक्षक पदासाठी निवड कशी होणार या सर्व बाबीचा आढावा.

जाहिरात प्रसिद्ध :पालघर जिल्हा परिषद
पदाचे नाव :जिल्हा परिषद शिक्षक
पद संख्या :१८९१ पदे
अर्ज पद्धत :ऑफलाईन अर्ज प्रणाली

Palghar Shikshak Bharti 2024 Important Dates

सदर भरती साठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी जिल्हा परिषदेने अर्ज सुरू होण्याची व अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आपल्या जाहिरातीमध्ये नमूद केली आहे यानुसार ,

अर्ज सुरू होण्याची सुरुवातीची तारीख:१६ ऑगस्ट २०२४
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख :२३ ऑगस्ट २०२४

HDFC Bank Parivartan Scholarship 2024 आता बँकेकडून मिळणार तब्बल ₹ ७५००० ची स्कॉलरशिप !

Palghar Shikshak Bharti 2024 Vacancies

ज्या १८९१ शिक्षक पदासाठी जिल्हा परिषदेने जाहिरात प्रसिद्ध केले आहे त्या जागांचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत.यानुसार तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यासाठी पैसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये सद्या स्थितीत ९३६ रिक्त व संभाव्य रिक्त होणाऱ्या जागा ९५५ अशा एकूण १८९१ पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहे.

विस्तृत जाहिरात , अर्जाचे नमुने व इतर प्रारूप www.zppalghar.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Palghar Shikshak Bharti 2024 Eligibility Criteria

सदर भरतीसाठी पालघर जिल्हा परिषदने वयोमर्यादा बाबत कोणतीही अट ठेवली नसून शैक्षणिक पात्रतेचे निकष दिले आहेत. यानुसार शिक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालीलपैकी कोणतीही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक असणार आहे.

१) उमेदवार TAIT परीक्षा उत्तीर्ण असावा.

२) शिक्षणशास्त्र पदविका D.Ed / D.T.Ed

३) शिक्षणशास्त्र पदवी B.A B.Ed / B.Sc B.Ed

४) संगणक ज्ञान प्रमाणपत्र.

५) TET अथवा CTET उत्तीर्ण

सदर भरती ही तात्पुरता स्वरूपाची असून सदर जागेसाठी कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध झाल्यास सदर जागा रिक्त केली जाईल. शिक्षक पदासाठी रूपये २०,००० महिना मानधन म्हणून दिले जाईल.

Palghar Shikshak Bharti 2024 How to Apply

जिल्हा परिषदेने शिक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी ऑफलाईन अर्ज भरण्याचा अवलंब केल्याने उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या अर्जाची प्रिंट काढून अर्ज जिल्हा परिषद मध्ये जमा करायचा आहे.

यानुसार पात्र उमेदवारांनी आपले आवेदन पत्र शिक्षणाधिकारी (प्राथमिक) , जिल्हा परिषद (दालन क्रमांक १७) या कार्यालयात दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी पर्यंत सादर करावे. यानंतर आलेले आवेदन पत्र स्वीकारले जाणार नाही याची नोंद अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी घ्यावी.

जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण अधिकारी ( प्राथमिक) यांच्याशी अर्जदारास करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील.

Palghar Shikshak Bharti 2024 Documents

अर्ज भरून झाल्यावर उमेदवारांना अर्जा सोबत काही महत्वाची कागदपत्रे जोडायची आहे. यासंबंधी जिल्हा परिषदेने आपल्या जाहिराती मध्ये आवश्यक कागदपत्रे यांची यादी दिली आहे यानुसार ,

१) दहावी उत्तीर्ण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.८) जात प्रमाणपत्र सोबत जात वैधता प्रमाणपत्र.
२) बारावी उत्तीर्ण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. ९) आधारकार्ड.
३) पदवी परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.१०) नॉन क्रिमी लियर.
४) पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.११) शाळा सोडल्याचा दाखला.
५) शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. १२) चारित्र्य प्रमाणपत्र.
६) शिक्षणशास्त्र पदवी परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.१३) एम एस सी आय टी प्रमाणपत्र.
७) TET अथवा CTET उत्तीर्ण परीक्षा गुणपत्रक.

Conclusion

पालघर जिल्हा परिषदेने अनुसूचित जमाती प्रवर्ग व इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी कंत्राटी पद्धतीने एकूण १८९१ जागांची भरती प्रक्रिया सुरू केली असून सदर भरतीसाठी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे पाठवण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२४ असणार आहे.

Frequently Asked Questions

१) Which is the Last date to apply for Palghar Shikshak Bharti 2024 ?

उत्तर : पालघर जिल्हा परिषद भरती साठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२४ आहे.

२) Documents required for Palghar Shikshak Bharti 2024 ?

उत्तर : सदर भरती साठी आवश्यक कागदपत्रे वर नमूद केली आहेत.