Navodaya Vidyalaya Samiti नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांच्या १३७७ जागांची भरती.

Navodaya Vidyalaya Samiti ( नवोदय विद्यालय समिती ) द्वारा नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे. एकूण १३७७ रिक्त पदे सरळसेवा पद्धतीनें या भरती प्रक्रिया द्वारे भरली जाणार आहे.

नवोदय विद्यालय समिती ही एक भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातील सामजिक शिक्षण आणि साक्षरता या विभागांतर्गत स्वायत्त संस्था आहे. नवोदय विद्यालय समितीचे मुख्य ऑफिस हे नोएडा स्तिथ असून ८ विभागीय कार्यालय आणि ६५० पेक्षा जास्त जवाहार नवोदय विद्यालय तमिळनाडू वगळता सर्व भारतभर पसरलेल्या आहे. जवाहार नवोदय विद्यालय हे रहिवासी शैक्षणीक शाळा असून यामध्ये वरिष्ठ माध्यमिक शाळा पर्यंतचे शिक्षण दिले जाते. प्रामुख्याने जवाहर नवोदय विद्यालय या भारतातल्या ग्रामीण भागात आढळून येतात.

नवोदय विद्यालय समितीने नॉन टीचींग स्टाफ ( Non Teaching Staff ) ग्रुप क ( Group C and Group D ) आणि ग्रुप ड च्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी १३७७ रिक्त पदे ही भरली जाणार आहेत. भारत सरकारच्या अधीन असेलल्या संस्थेत नोकरी करणे ही एक प्रकारची संधी असणारे आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे दिलेल्या कालावधी मध्येच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

नवोदय विद्यालय समितीने आपल्या जाहिराती मध्ये १३७७ जागा भरल्या जाणार आहेत त्याचे पदानुसार विवरण दिले आहे. तसचे प्रत्येक पदासाठी कोणते शैक्षणिक पात्रतेचे निकष आहे हे देखील पदे आणि पद संख्या याबरोबर देण्यात आले आहे. यात प्रामुख्याने गट क आणि गट मधील पदे आहेत. खाली दिलेल्या टेबलवर नजर टाकुया अन् बघूया की कोणत्या पदासाठी किती जागा या रिक्त आहेत.

उमेदवाराने आपल्या प्रवर्गासाठी कोणती पदे आणि असणारी पद संख्या बघण्यासाठी नवोदय विद्यालय समितने जाहीर केलेल्या जाहिरातीमध्ये सविस्तरपणे दिलेले आहे. सोबत नवोदय विद्यालय समितीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीचे फाईल देत आहोत.

पदे पद संख्या
Female Nurse Staff ( महिला परिचारिका कर्मचारी )१२१
Assistant Section Officer ( सहायक विभाग अधिकारी )
Audit Assistant (लेखापरीक्षण सहाय्यक)१२
Junior Translation Officer (कनिष्ठ अनुवाद अधिकारी )
Legal Assistant ( कायदेशीर सहाय्यक )
Stenographer ( स्टेनोग्राफर )२३
Computer Operator ( संगणक चालक )
Junior Secretariat Assistant ( कनिष्ठ सचिवालय सहाय्यक )२१
Catering Supervisor ( केटरिंग पर्यवेक्षक )७८
Junior Secretariat Assistant ( कनिष्ठ सचिवालय सहाय्यक )३६०
Electrician Cum Plumber ( इलेक्ट्रिशियन कम प्लंबर )१२८
Lab Attendant (लॅब अटेंडंट )१६१
Mess Helper ( मेस हेल्पर )४४२
Multi Tasking Staff ( मल्टी टास्किंग स्टाफ )१९
navodaya vidyalaya samiti

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पात्र असतील त्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहे. नवोदय विद्यालय समितीने आपल्या जाहिराती मध्ये पात्रतेसाठी काही निकष दिले आहे यात प्रामुख्याने शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा बाबत माहिती दिली आहे. गट क आणि गट ड यासमध्ये असणारी पदे ही वेगवेगळी असून त्या पदासाठी असलेले वय आणि शैक्षणिक पात्रता ही देखील वेगवेगळी आहेत. नवोदय विद्यालय समितीने आपल्या जाहिराती मध्ये या सर्व बाबी सविस्तर दिल्या आहेत. सोबत नवोदय विद्यालय समितीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीचे फाईल देत आहोत.

पदे वयोमर्यादाशैक्षणिक अर्हता
Female Nurse Staff ( महिला परिचारिका कर्मचारी )३५ वर्ष पर्यंतB.Sc in Nursing
Assistant Section Officer ( सहायक विभाग अधिकारी )२३ ते ३३ वर्षBachelor Degree
Audit Assistant (लेखापरीक्षण सहाय्यक)१८ ते ३० वर्षB.Com
Junior Translation Officer (कनिष्ठ अनुवाद अधिकारी )३२ वर्ष पर्यंतMaster Degree in Hindi / English
Legal Assistant ( कायदेशीर सहाय्यक )२३ ते ३५ वर्षLaw Degree
Stenographer ( स्टेनोग्राफर )१८ ते २७ वर्ष12th + Skill
Computer Operator ( संगणक चालक )१८ ते ३० वर्षBCA / B.Sc ( Computer Science/ IT )
Junior Secretariat Assistant
( कनिष्ठ सचिवालय सहाय्यक ) At HQ/RO
१८ ते २७ वर्ष12th + Typing Hindi / English
Junior Secretariat Assistant
( कनिष्ठ सचिवालय सहाय्यक ) at JNV
१८ ते २७ वर्ष12th + Typing Hindi / English
Electrician Cum Plumber
( इलेक्ट्रिशियन कम प्लंबर )
१८ ते ४० वर्ष10th + ITI in Electrician / wireman
Catering Supervisor ( केटरिंग पर्यवेक्षक )३५ वर्ष पर्यंतBachelor Degree in Hotel Management
Lab Attendant (लॅब अटेंडंट )१८ ते ३० वर्ष12th / 10th + Diploma in Laboratory techniques
Mess Helper ( मेस हेल्पर )१८ ते ३० वर्ष10th + Skill
Multi Tasking Staff ( मल्टी टास्किंग स्टाफ )१८ ते ३० वर्ष10th

नवोदय विद्यालय समितीने आपल्या जाहिराती मध्ये उमेदवारांची निवड पद्धत स्पष्टपणे नमूद केली आहे. नवोदय विद्यालय समितीने NVS ने जाहीर केले आहे की निवडीबाबतचे तसेच मुलाखतीचे पात्रता निकष हे NVS ठरवेल तेच शेवटचे निर्णय म्हणून असतील आणि तो निर्णय बंधनकारक असेल. जे उमेदवार ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत फेरी एकत्रपणे पात्र करतील त्याच उमेदवारांची निवड ही Legal Assistant ( कायदेशीर सहाय्यक ) म्हणून केली जाणार आहे.तसेच इतर पदांसाठी मुलाखत घेतली जाणार नाही आहे.

या पदांसाठी उमेदवाराची निवड ही ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या परीक्षेच्या कट ऑफ नुसार असेल.

Female Nurse Staff
( महिला परिचारिका कर्मचारी )
Assistant Section Officer
( सहायक विभाग अधिकारी )
Audit Assistant
( लेखापरीक्षण सहाय्यक )
Junior Translation Officer
( कनिष्ठ अनुवाद अधिकारी )
Computer Operator
( संगणक चालक )
Catering Supervisor
( केटरिंग पर्यवेक्षक )
Lab Attendant ( लॅब अटेंडंट ) Multi Tasking Staff ( मल्टी टास्किंग स्टाफ )

या पदासाठी उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षा आणि ट्रेड स्किल टेस्ट / टायपिंग यामधून एकत्रितपणे होणार आहे.

Stenographer
( स्टेनोग्राफर )
Junior Secretariat Assistant
( कनिष्ठ सचिवालय सहाय्यक)
Electrician Cum Plumber
( इलेक्ट्रिशियन कम प्लंबर)
Mess Helper ( मेस हेल्पर ) Junior Secretariat Assistant
( कनिष्ठ सचिवालय सहाय्यक )

ट्रेड स्किल टेस्ट / टायपिंग यांना नियमानुसार कट ऑफ गुण मिळवणे आवश्यक असून ही टेस्ट पात्रता ( Qualify) पद्धतीची असणार आहे. म्हणजेच अंतिम गुणां मध्ये हे मोजले जाणार नाही. आवश्यतेनुसार गुण न मिळाल्यास उमेदवार नाकारले जातील.

navodaya vidyalaya samiti

नवोदय विद्यालय समितीने आपल्या जाहिराती मध्ये प्रत्येक पदासाठी असलेली परीक्षा पद्धत नमूद केली आहे. त्यानुसार प्रत्येक पद आणि त्यानुसार असणारी ऑनलाईन परीक्षा यामधील असणारे विषय अन् विषयानुसार गुण वेगवेगळा आहे. तसेच परिक्षचे कालावधी देखील वेगळे आहेत. परीक्षेचे प्रवेशपत्र ( Admit Card ) नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. प्रवेश पत्रावर परीक्षा दिनांक आणि वेळ , परीक्षा ठिकाण या बाबी सविस्तर नमूद केलेल्या असतील.

सोबत नवोदय विद्यालय समितीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीचे फाईल देत आहोत.

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी नवोदय विद्यालय समितीची अधिकृत संकेतस्थळ : http://www.navidaya.gov.in यावर जावून अर्ज भरायचा आहे. उमेदवार अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करू शकतात ऑफलाईन अर्ज अथवा इतर कोणत्याही मार्गाने अर्ज करता येणार नाही. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी आपली सर्व माहिती आवश्यतेप्रमाणे भरायची आहे.

संकेतस्थळ : https://nvs.ntaonline.in/

नवोदय विद्यालय समिती भरती प्रक्रिया बाबतचे सर्व ( Updates ) माहिती ही आपल्या संकेस्थळावर आणि उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज मध्ये नमूद केलेल्या ईमेल आयडी वर पाठवले जातील.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना अर्ज शुल्क देखील भरायचे आहे. यामध्ये अर्ज फी ( Application Fee ) आणि प्रक्रिया फी ( Processing Fee ) या दोन्ही फी एकत्रपणे भरायची आहे. एससी Schedule Caste, एसटी Scheduled Tribe, Person With Disability उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचे नाही आहे. पण यांना परीक्षेची Processing Fee मात्र भरावी लागणार आहे. पदानुसार अर्ज शुल्क वेगळे आहे.

बघुया कोणत्या पदासाठी किती फी आकारली जाणार आहे.

पदे खुला प्रवर्ग , ओबीसी आणि EWS एससी Schedule Caste, एसटी Scheduled Tribe, Person With Disability
Female Nurse Staff
( महिला परिचारिका कर्मचारी )
Rs.1500Rs.500
इतर पदेRs.1000Rs.500

नवोदय विद्यालय समितीने आपल्या जाहिराती मध्ये नमूद केलेल्या सर्व पदासाठी मिळणारे पे स्केल दिले आहेत. त्यासोबतच कोणते पद कोणत्या वेतनश्रेणी मध्ये येते हे देखील दिले आहे. पे स्केल बद्दल सविस्तर माहिती जाहिराती मध्ये दिली आहे.

आपण थोडक्यात बघुया की नेमके कोणत्या पदाला किती वेतन हे उमेदवारांना अंतिम फेरीत पास झाल्यावर मिळणार आहे.

पदे वेतनश्रेणी ( Pay Scale )
Female Nurse Staff ( महिला परिचारिका कर्मचारी )Rs. 44900-142400
Assistant Section Officer ( सहायक विभाग अधिकारी )Rs. 35400-112400
Audit Assistant (लेखापरीक्षण सहाय्यक)Rs. 35400-112400
Junior Translation Officer (कनिष्ठ अनुवाद अधिकारी )Rs. 35400-112400
Legal Assistant ( कायदेशीर सहाय्यक )Rs. 35400-112400
Stenographer ( स्टेनोग्राफर )Rs. 25500-81100
Computer Operator ( संगणक चालक )Rs. 25500-81100
Junior Secretariat Assistant ( कनिष्ठ सचिवालय सहाय्यक )Rs. 19900-63200
Junior Secretariat Assistant ( कनिष्ठ सचिवालय सहाय्यक )Rs. 19900-63200
Electrician Cum Plumber ( इलेक्ट्रिशियन कम प्लंबर )Rs. 19900-63200
Catering Supervisor ( केटरिंग पर्यवेक्षक )Rs. 25500-81100
Lab Attendant (लॅब अटेंडंट )Rs. 18000-56900
Mess Helper ( मेस हेल्पर )Rs. 18000-56900
Multi Tasking Staff ( मल्टी टास्किंग स्टाफ )Rs. 18000-56900

ऑनलाईन अर्ज भरताना ट्रेड नवोदय विद्यालय समितीने आपल्या अर्जात जी आवश्यक माहिती जसे की वैयक्तिक माहिती , शैक्षणिक माहिती , संपर्क माहिती , जाती बद्दल मागितली आहे ती भरायची आहे. ऑनलाईन अर्जमध्ये भरलेली माहिती आणि कागदपत्रे तपासणी पडताळणी वेळी साधर्म्य असणे आवश्यक आहे यात कोणतीही तफावत असू नये.

OBC इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपल्या जातीचे प्रमाणपत्र सोबतच नॉन क्रिमी लियर प्रमाणपत्र देखील सादर करणे बंधनकारक असणारं आहे.

Scheduled Caste ( एस सी ) and Scheduled Tribe ( एस टी ) प्रवर्गातील उमेदवारांनी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपल्या जातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणारं आहे.

( Economically Weaker Sections ) EWS म्हणजेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील उमेदवारांनी EWS आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपल्या EWS प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणारं आहे तसेच EWS साठी उत्पन्न प्रमाणपत्र देखील सोबत जोडणे अनिवार्य आहे

नवोदय विद्यालय समितीद्वारा भरती प्रक्रिया बद्दल काही महत्वाच्या गोष्टी ऑनलाईन अर्ज भरताना आणि भरून झाल्यावर उमेदवारांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

१) अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असावा.

२) जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलेल्या जागा वाढवणे कमी करणे अथवा रद्द करण्याबाबत सर्व अधिकार हे समितीला असतील.

३) ऑनलाईन परीक्षा मध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत असणार आहे यानुसार १/४ गुण हे वजा केले जातील. म्हणजेच चुकलेल्या ४ प्रश्नासाठी १ बरोबर असलेल्या प्रश्नाचे मार्क वजा केले जातील.

४) नवोदय विद्यालय समिती आपल्या अधिकृत संकेतस्थळावर भरती प्रक्रिया बाबत असलेले अपडेट्स जसे की ऑनलाईन परीक्षा मेरिट लिस्ट, मुलाखत यादी तसेच स्किल टेस्ट निवड यादी आणि अंतिम निकाल हे प्रकाशित केले जातील.

५) निवड झालेल्या उमेदवारांना कमीत कमी २ वर्ष समितीमध्ये काम करावे लागणार आहे. समितीने उमेदवारांकडून तशाप्रकरचा बाँड करून घेतला जाईल. अनामत रक्कम म्हणून उमेदवारांना रुपये ३ लाख भरायचे आहे. ही रक्कम बाँड संपल्यानतर उमेदवारांना परत केली जाईल. जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व पदासाठी ही रक्कम सारखी असणार आहे.

Frequently Asked Questions

१) नवोदय विद्यालय समितीने किती जागांची भरती काढली आहे ?

उत्तर : एकूण १३७७ रिक्त पदे ही या भरती प्रक्रियाद्वारे भरण्यात येणार आहे

२) ऑनलाईन परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे का ?

उत्तर: ऑनलाईन परीक्षा मध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत असणार आहे यानुसार १/४ गुण हे वजा केले जातील. म्हणजेच चुकलेल्या ४ प्रश्नासाठी १ बरोबर असलेल्या प्रश्नाचे मार्क वजा केले जातील.

३) नवोदय विद्यालय समितीची Selection Process काय असेल ?

उत्तर : वर जाहिरात प्रसिद्ध केली आहे ती संपूर्ण वाचा