Navi Mumbai Mahanagar Palika Bharti १२वी,आयटीआय,पदविका,पदवी उत्तीर्ण उमेदवारांना संधी

Navi Mumbai Mahanagar Palika Bharti : नवी मुंबई महानगरपालिकेने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली असून त्यानुसार ३० संवर्गातील १९४ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२४.

Navi Mumbai Mahanagar Palika Bharti Overview

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने मंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शासन निर्णय कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग संकीर्ण २०२४/ दिनांक ९ जुलै २०२४ अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत सहा महिन्यांच्या कालावधी करीत अशी का उमेदवार म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी १९४ पदासाठी शैक्षणिक अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Navi Mumbai Mahanagar Palika Bharti Important Dates

सदर भरतीसाठी अर्ज भरण्याची सुरुवात १४ ऑगस्ट २०२४ पासून झाली असून पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२४ आहे.

Pune Mahanagar Palika Bharti 2024 पुणे महानगरपालिकेत मोटार वाहन विभाग, मुख्य अभियंता कार्यालयात मोठी भरती

Navi Mumbai Mahanagar Palika Bharti Eligibility Criteria

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवार म्हणून कार्य करण्यासाठी अर्ज करणारा उमेदवार बारावी उत्तीर्ण / आयटीआय उत्तीर्ण / पदविका उत्तीर्ण किंवा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.पदसंख्या व शैक्षणिक अहर्ता राज्य शासनाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.

Navi Mumbai Mahanagar Palika Bharti How to Apply

सदर जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांसाठी २० ऑगस्ट ,२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता शिबिराचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय भूखंड १, सेक्टर 15A सीबीडी बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी करण्यात येत आहे.

Navi Mumbai Mahanagar Palika Bharti Documents

भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपले नाव आपला उमेदवारी अर्ज, पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता , मोबाईल नंबर , मेल आयडी , शैक्षणिक पात्रता , जन्मतारीख ,बँक तपशील व इतर आवश्यक कागदपत्रांसहित आयोगाने दिलेल्या स्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

Navi Mumbai Mahanagar Palika Bharti Stipend

उमेदवारांची निवड शिका उमेदवार म्हणून केली जाईल त्यांना या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये काही रक्कम ही विद्या वेतन म्हणून दिली जाईल यानुसार ,

१२ वी उत्तीर्ण उमेदवार :प्रतिमहिना ₹ ६०००
आयटीआय/ पदविका उत्तीर्ण उमेदवार :प्रतिमहिना ₹ ८०००
पदवी उत्तीर्ण उमेदवार :प्रतिमहिना ₹१००००

सदर नियुक्तीच्या अनुषंगाने शासनाकडे दिनांक ९ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयामधील सर्व अटी व शर्ती उमेदवारांना बंधनकारक असतील.

Frequently Asked Questions

१) What is the last date to apply for Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2024 ?

उत्तर : सदर भरती प्रक्रिया साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२४ आहे.

२) Who can apply for Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2024 ?

उत्तर : सदर भरती प्रक्रियेसाठी बारावी उत्तीर्ण / आयटीआय उत्तीर्ण / पदविका उत्तीर्ण / पदवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतो.