Naval Dockyard ( नेवल डॉकयार्ड ) मध्ये ३०१ जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आयटीआय झालेल्या उमेदवारांना महिला आणि पुरुष दोन्ही साठी ही सुवर्ण संधी असणार आहे. ने डॉकयार्ड ने Apprentice Act १९६१ अंतर्गत आयटीआय मधील विविध ट्रेड मधील उमेदवारांसाठी Apprenticeship Training ची ३०१ जागांची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे. नुकतेच आयटीआय करून बाहेर पडलेल्या उमेदवारांना तसेच जे उमेदवार नेवल डॉकयार्ड मध्ये काम करू इच्छिता त्यांच्यासाठी ही Apprenticeship एक सुवर्ण संधी असणार आहे.
केंद्र अथवा राज्य सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यांचा धावता आढावा घेण्यासाठी
आजच आमच्या वेबसाइटला भेट द्या लिंक : http://www.jobschemewala.com/
Naval Dockyard Mumbai Apprenticeship Overview
नेवल डॉकयार्ड ने आपल्या जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे ३०१ प्रशिक्षणार्थी भरती केले जाणार असून यात शैक्षणिक अर्हता ही आयटीआय पास असून प्रमाणपत्र प्राप्त झालेले उमेदवार Apprenticeship साठी अर्ज करू शकतात. यात एकूण आयटीआय मधील २२ ट्रेड चा समावेश आहे. पात्र असलेल्या उमेदवारांना जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
पदाचे नाव : | नेवल डॉकयार्ड प्रशिक्षणार्थी ( Naval Dockyard ) Mumbai |
पद संख्या : | ३०१ |
अर्ज स्विकारण्याची सुरवात तारीख : | १८ मार्च २०२४ |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : | ०७ एप्रिल २०२४ |
अधिकृत संकेतस्थळ : | https://indiannavy.nic.in/ |
Naval Dockyard Mumbai Apprenticeship Trade
ITI ( Industrial Training Institute ) म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था. शासनाची किंवा शासन मान्यता असलेली संस्था. या संस्थेचे उद्दिष्ट दोन उद्दिष्ट आहे.
१) कुशल कारागीर तयार करणे.
२) कुशल असलेल्या कारागिरांना स्वावलंबी बनवणे.
महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर एकूण ४१७ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे तर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत ३८१. या सर्व संस्थांमध्ये एकूण १३४ प्रकारचे ट्रेड अथवा व्यवसायांचे प्रशिक्षण हे दिले जाते.
नेवल डॉकयार्ड ने आपल्या गरजेनुसार याच ट्रेड मधील काही ट्रेड चा समावेश आपल्या Apprenticeship साठीच्या जाहिराती मध्ये केला आहे. यात प्रामुख्याने पुढील २२ ट्रेडचा समावेश होतो.
१) इलेक्ट्रिशियन | २) इलेक्ट्रोप्लेटर | ३) फिटर | ४) फौंड्री मन | ५) मेकॅनिक |
६) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक | ७) मशिनिस्ट | ८) पेंटर | ९) पॅटर्न मेकर | १०) पाइप फीटर |
११) इलेक्ट्रोनिक मेकॅनिक | १२) रेफ आणि एसी मेकॅनिक | १३) शीट मेटल वर्केर | १४) शिपराईट वूड | १५) टेलर |
१६) वेल्डर | १७) मेसन | १८) शिप राईट मेटल | १९) रिगर | २०) फोर्जर व हिट ट्रीटर |
२१) आय ऍण्ड सी टी एस एम | २२) मशीन मेकॅनिक |
अर्ज करणारा उमेदवार आठवी किंवा दहावी पास असल्यास ते देखील Apprenticeship साठी अर्ज करू शकतात. पण या उमेदवारांसाठी असणारे ट्रेड आहेत : १) रीगर २) फॉर्जेर आणि हिट ट्रीटर. केवळ अनुक्रमे याच ट्रेड साठी आठवी आणि दहावी पास असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.या ट्रेड मधून आपले आयटीआय पूर्ण केलेले उमेदवार हा अर्ज भरू शकतात.
Naval Dockyard Mumbai Apprenticeship Vacancies
डॉकयार्ड ने प्रसिद्ध केलेल्या आपल्या जाहिरातीमध्ये Apprenticeship साठी पात्र ट्रेड कोणता आहे , कोणत्या प्रकारच्या ट्रेड साठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. आणि कोणत्या वर्ग वारी साठी कोणत्या ट्रेडच्या किती जागा आहेत हे सविस्तर नमूद केले आहे. यात प्रामुख्याने वर्गवारी ही एससी ( Scheduled Caste ) , एसटी ( Scheduled Tribe ) , ओबीसी ( Other Backward class ) ओपन ( Open Category ) , विकलांग ( Person With Disability ) आणि एक्स सर्विसमन ( Armed Forces) अशी आहे.
चला तर नजर टाकुया खाली दिलेल्या टेबलवर अन् बघुया कोणत्या ट्रेड साठी किती जागा भरल्या जाणार आहेत.
ट्रेड (ITI Trade ) | जागा ( Vacancies ) |
१) इलेक्ट्रिशियन | ४० |
२) इलेक्ट्रोप्लेटर | १ |
३) फिटर | ५० |
४) फौंड्री मन | १ |
५) मेकॅनिक | ३५ |
६) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक | ७ |
७) मशिनिस्ट | १३ |
८) पेंटर | ९ |
९) पॅटर्न मेकर | २ |
१०) पाइप फीटर | १३ |
११) इलेक्ट्रोनिक मेकॅनिक | २६ |
१२) रेफ आणि एसी मेकॅनिक | ७ |
१३) शीट मेटल वर्केर | ३ |
१४) शिपराईट वूड | १८ |
१५) टेलर | ३ |
१६) वेल्डर | २० |
१७) मेसन | ८ |
१८) शिप राईट मेटल | १६ |
१९) रिगर | १२ |
२०) फोर्जर व हिट ट्रीटर | १ |
२१) आय ऍण्ड सी टी एस एम | ३ |
२२) मशीन मेकॅनिक | १३ |
एकूण | ३०१ |
Naval Dockyard Mumbai Apprenticeship Eligibility
प्रशिक्षणार्थी म्हणून निवड होण्यासाठी कोणते उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पात्र असतील ते बघुया. नेवल डॉकयार्ड मुंबईने आपल्या जाहिरातीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकतात यासाठी काही गोष्टी नमूद केलेल्या आहे.
१) शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification )
२) वयोमर्यादा ( Age Limit )
३) प्रमाण शारीरिक मानके ( Physical Standard)
बघुया यासाठी काय पात्रता देण्यात आली आहे.
१) शैक्षणिक अर्हता ( Educational Qualification ) :
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता ही दोन भागात विभागले आहे. एक आहे आयटीआय ट्रेड ; मान्यता प्राप्त असलेल्या संस्था मधून आयटीआय ट्रेड पूर्ण केलेले आवश्यक आहे. आणि जो. आय टी आय ट्रेड जाहिरातीमध्ये नमूद केले आहे फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात. पात्रता पूर्ण न केल्यास कोणताही अर्ज स्विकारले जाणार नाही. तसे आढळल्यास उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेला अर्ज हा रद्द केला जाईल आणि दुसरे म्हणजे नॉन आयटीआय ट्रेड ; ज्या उमेदवारांनी आठवी आणि दहावी पास झाली आहे. यामध्ये दोन ट्रेड आहेत , अनुक्रमे रिगेर आणि फोर्जेर व हिट ट्रीटर याच ट्रेड साठी ते उमेदवार अर्ज करू शकतात.
2. वयोमर्यादा ( Age Limit )
कौशल्य विकास मंत्रालयाने आपल्या निवेदन क्रमांक MSDE 14(03) 2021 AP (PMU) दिनांक २० डिसेंबर २०२१ रोजी जाहीर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की Apprenticeship साठी कोणत्याही प्रकारची जास्तीचे वय मर्यादा ही नसेल. Apprentice Act १९६१ नुसार, कमीत कमी १४ वय वर्ष असणारा प्रशिक्षणार्थी हा जोखीम कमी असलेल्या क्षेत्रात काम करू शकतो तर कमीत कमी १८ वय वर्ष असणारा प्रशिक्षणार्थी जोखीम असलेल्या क्षेत्रात काम करू शकतो.म्हणजेच ज्या उमेदवारांचा जन्म हा जून २०१० पूर्वी झालेला असेल असे प्रशिक्षणार्थी जोखीम नसलेल्या क्षेत्रात काम करू शकतात आणि ज्या उमेदवारांचा जन्म हा जून २००६ पूर्वी झालेला असल्यास असे प्रशिक्षणार्थी जोखीम असलेल्या क्षेत्रात काम करू शकतात.
3) शारीरिक मानके ( Physical Standard ) :
Physical Standard साठी जाहिरातीमध्ये उंची , वजन , छाती आणि डोळे यासाठी काही निकष दिले आहे. उमेदवारांना विनंती आहे की जर दिलेल्या स्टँडर्ड मध्ये आपण बसत नसू तर अर्ज करू नये. अर्ज भरताना उमेदवाराने अर्जात नमूद केलेली माहिती ही निवड झाल्या नंतर तपासणी – पडताळणी वेळेस सादर करणे बंधनकारक असणारं आहे. तसे नसल्यास तो उमेदवार रद्द केला जाईल.
उंची : | कमीत कमी १५० सेंमी |
वजन : | कमीत कमी ४५ किलो |
छाती : | कमीत कमी ५ सेंमीची वाढ |
डोळे: | Eye Vision ६/६ ते ६/९ |
Naval Dockyard Mumbai Apprenticeship Selection Procedure
ज्या उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्रता पुर्ण करुन अर्ज भरला असल्यास त्याच उमेदवारांची प्रेलिमिनियारी मेरिट लिस्ट लावली जाईल. मेरिट लिस्टमध्ये पात्र असलेले उमेदवारच हे लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात येतील.
Preliminary Merit List :
पात्र उमेदवारांकडून आलेले अर्जामधून जे अर्ज पात्र ठरतील त्या उमेदवारांची वर्गवारी ट्रेड आणि ट्रेड साठी असणारी पदसंख्या यानुसार एक मेरिट लावले जाईल.मेरिट लिस्ट ठरविण्यासाठी काही निकष देण्यात आले आहेत.
१) आयटीआय पास झालेल्या उमेदवारांना मिळालेले टक्केवारी यासाठी ग्राह्य धरली जाणार आहे.
२) जर उमेदवारांना समान टक्के असल्यास ज्या उमेदवाराचे दहावीचे टक्केवारी जास्त असेल तो उमेदवार पुढील टप्प्यासाठी ग्राह्य धरले जाईल.
नोंद : जे उमेदवार सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात Apprenticeship करत असेल असे उमेदवार ह्या प्रशिक्षणार्थी साठी पात्र असणार नाही.
Naval Dockyard Mumbai Apprenticeship Reservation.
एस सी ( Scheduled Caste ) , एस टी ( Scheduled Tribe ) , ओबीसी ( Other Backward classes) , खुला प्रवर्ग ( Open Category ) , विकलांग ( Person with Disability आणि आर्मे फोर्सेस ( Armed Forces ) यांच्या साठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. डॉकयार्ड द्वारे प्रसिद्ध केलेल्या ३०१ जागांचे विवरण Vacancies टेबल मध्ये देण्यात आल्या आहे.
विकलांग ( Person with Disability आणि आर्मे फोर्सेस ( Armed Forces ) यांच्या साठी प्रत्येकी ३% चे आडवे आरक्षण दिले जाणार आहे.
नोट :
जर दिलेल्या जागांसाठी उमेदवार न मिळाल्यास सदर जागा ही राखीव उमेदवाराला दिली जाईल. बघुया याचा आरक्षण जागांवर कसा परिणाम होणार आहे.
१) जर दिलेल्या जागा या अनुसूचित जाती ( Scheduled Caste ) साठी आरक्षित ठेवण्यात आल्या असतील आणि जर त्या जागेसाठी कोणताही उमेदवार मिळाला नाही तर सदर जागा ही अनुसूचित जमाती ( Scheduled Tribe) मधील उमेदवाराला दिली जाईल.
२) जर दिलेल्या जागा या अनुसूचित जमाती ( Scheduled Tribe ) साठी आरक्षित ठेवण्यात आल्या असतील आणि जर त्या जागेसाठी कोणताही उमेदवार मिळाला नाही तर सदर जागा ही अनुसूचित जाती ( Scheduled Caste ) मधील उमेदवाराला दिली जाईल.
३) जर दिलेल्या जागा या इतर मागासवर्गीय ( Other Backward Class ) साठी आरक्षित ठेवण्यात आल्या असतील आणि जर त्या जागेसाठी कोणताही उमेदवार मिळाला नाही तर सदर जागा ही खुल्या प्रवर्ग ( open ) मधील उमेदवाराला दिली जाईल.
Summary
नेवल डॉकयार्ड ने आपल्या जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे ३०१ प्रशिक्षणार्थी भरती केले जाणार आहे कमीत कमी १४ वय वर्ष असलेले आणि जाहिराती मध्ये नमूद केलेल्या २२ ट्रेड पैकी कोणतेही आयटिआय ट्रेड पास झालेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
Frequently Asked Questions
१) Naval Dockyard ने किती जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे ?
उत्तर : Naval Dockyard ने एकूण ३०१ जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
२) Naval Dockyard ने Apprenticeship साठी जाहीर केलेल्या जाहिरातीमध्ये किमान कमाल वय किती ?
उत्तर : जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे कौशल्य विकास मंत्रालयाने आपल्या निवेदन क्रमांक MSDE 14(03) 2021 AP (PMU) दिनांक २० डिसेंबर २०२१ रोजी जाहीर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की Apprenticeship साठी कोणत्याही प्रकारची जास्तीचे वय मर्यादा ही नसेल.