Mumbai Port Trust अंतर्गत मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग खात्यात मोठी भरती

Mumbai Port Trust ने नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे, त्यानुसार मुंबई पोर्ट ट्रस्टच्या Mechanical And Electrical Engineering Department मध्ये एकूण ६६ जागांची भरती निघाली आहे. यासाठी जाहिरातीनुसार पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहे.

Table of Contents

Mumbai Port Trust Recruitment Overview

Mumbai Port Trust ने आपल्या खात्यातील रिक्त पदांच्या भरती साठी नुकतेच दोन जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. दोन्ही जाहिराती या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या Mechanical And Electrical Engineering Department अंतर्गत असणाऱ्या Apprentice Training Centre कडून असून यानुसार Recruitment Notice For Graduate/ Technician Apprentice for the Year 2024-25 आणि Recruitment Notice for COPA Trade Apprentice for the Year 2024-25 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

उमेदवारांची प्रशिक्षणार्थी निवड ही Apprentices Act 1961 नुसार होणार आहे.

जाहिरात प्रसिद्ध :मुंबई पोर्ट ट्रस्ट ( Mumbai Port Trust )
पदाचे नाव :पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Trainee )
आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी ( Technician Apprentice ) ,
COPA ( Computer Operator and Programming Assistant)
पदांची संख्या :६१ पदे
अर्ज पद्धत :ऑफलाईन पद्धत ( Offline Mode )
अधिकृत संकेतस्थळ : Mumbai Port Trust Official Website

Help Desk :

अर्ज भरताना जाहिरात प्रसिद्ध माहिती , अटी आणि नियम, अर्ज स्वीकारणे इत्यादी कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास सदर उमेदवारांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट ने मदत क्रमांक दिला आहे. यानुसार सकाळी १० ते संध्याकाळी ५ या कालावधी मध्ये ( शनिवार / रविवार / सुट्टी ) वगळता आपले मत , अडचण कळवू शकता.

हेल्पलाईन नंबर : ०२२ ६६५६ ६६३७ / ६६२५

Table of Contents

Mumbai Port Trust Recruitment Vacancies

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या Mechanical And Electrical Engineering Department जाहीर केलेल्या जाहिरातीमध्ये दोन्ही मिळून एकूण ६१ जागांसाठी ही भरती होणार आहे. प्रत्येक इंजिनीअरिंग ब्रांचनुसार रिक्त जागांचा तपशील जाहिराती मध्ये दिला आहे. या सर्व जागा या पदवीधर प्रशिक्षणार्थी म्हणजेच Graduate Trainee आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी म्हणजेच Technician Apprentice या पदासाठी असणार आहेt. सोबतच COPA ( Computer Operator and Programming Assistant) Trade साठी असलेल्या जागांचा समावेश आपल्या जाहिराती मध्ये केला आहे.

चला तर पाहूया जागांचा संपूर्ण तपशील एका तक्त्याच्या माध्यमातून.

ट्रेडपदाची संख्या
Graduate Apprentice Mechanical Engineering
Graduate Apprentice Electrical Engineering
Technician Apprentice Mechanical Engineering
Technician Apprentice Electrical Engineering
COPA ( Computer Operator and Programming Assistant)५०
एकूण६१
Mumbai Port Trust

Mumbai Port Trust Recruitment Important Dates

उमेदवारांनी अर्ज भरताना एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे , की सदर अर्ज हा ऑफलाईन पद्धतीनें करायचा आहे. त्यामुळे ऑफलाईन पद्धतीनें केलेला अर्ज हा Mumbai Port Trust ने आपल्या जाहिराती मध्ये नमूद केलेल्या कालावधी मध्येच अर्ज आणि अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. तसेच ऑफलाईन पद्धतीनें भरलेला अर्ज हा ह्या विहित केलेल्या कालावधी मध्येच सदर पत्त्यावर पोहचणे आवश्यक आहे.

चला तर बघूया अर्ज करण्याची सुरवात केव्हा होणार आहे आणि अर्ज करण्यासाठी शेवटची संधी केव्हा असणार आहे.

अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख:१५ मार्च २०२४
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख:१५ एप्रिल २०२४

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

Apprentice Training Centre (ATC), 3rd floor, Bhandar Bhavan, N. V. Nakhwa Marg, Mazgaon (East), Mumbai – 400010

Mumbai Port Trust Recruitment Eligibility

मुंबई पोर्ट ट्रस्टने आपल्या जाहिरातीमध्ये पात्रतेचे निकष दिलेले आहेत. यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतचे निकष दिले आहेत. पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ही अनुक्रमे पदवी आणि पदविका परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच COPA या ट्रेड साठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता ही इयत्ता दहावी उत्तीर्ण तसेच COPA या संबंधित असणारे ट्रेड प्रमाणपत्र आवश्यक आहे.

१) शैक्षणीक पात्रता Educational Qualification :

एका टेबलच्या माध्यमातून पाहूया शैक्षणिक पात्रतेचे निकष काय आहेत.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
COPA ( Computer Operator and Programming Assistant) इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि COPA ट्रेड चे प्रमाणपत्र जे की मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूट मधून प्राप्त झालेले असेल.
Graduate Apprentice Mechanical Engineeringमान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट मधून मेकॅनिकल इंजीनियरिंगची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
Graduate Apprentice Electrical Engineeringमान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट मधून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
Technician Apprentice Mechanical Engineering मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदविका परीक्षा उत्तीर्ण.
Technician Apprentice Electrical Engineering मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट मधून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगची पदविका परीक्षा उत्तीर्ण.
Mumbai Port Trust

२) Age Limit वयोमर्यादा :

वयोमर्यादा बाबत मुंबई पोर्ट ट्रस्टने आपल्या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवाराचे वय कमीत कमी 14 वर्षे असणे आवश्यक आहे. कमाल बयाबाबत कोणतीही वयोमर्यादा नमूद करण्यात आली नाही आहे.

जे उमेदवार अप्रेंटिस ॲक्ट 1961 नुसार या अगोदर कोणत्याही संस्थेमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून जर कार्य करत असतील तर अशा उमेदवारांना पुन्हा या संस्थे मध्ये निवडीसाठी पात्र धरले जाणार नाही.तसेच मुंबई पोट ट्रस्टने आपल्या जाहिराती मध्ये नमूद केलेल्या कमीत कमी शैक्षणिक पात्रते नुसार जर उमेदवाराने आपले आवश्यक असलेले कमीत कमी शैक्षणिक पात्रतेनंतर तीन वर्ष पूर्ण केलेली असतील तर अशा उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार नाही.

Mumbai Port Trust Recruitment Training Period & Stipend

मुंबई पोर्ट ट्रस्ट ने आपल्या जाहिरातीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून असणारा कालावधी आणि या दरम्यान मिळणारी रक्कम म्हणजेच स्टायपेंड नमूद केला आहे. कंप्यूटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट COPA ( Computer Operator and Programming Assistant) , ग्रॅज्युएट अप्रेंटिस ( Graduate Apprentice ), टेक्निशियन अप्रेंटिस ( Technician Apprentice ) या सर्वांसाठी प्रशिक्षण कालावधी हा बारा महिन्याचा आहे परंतु त्यांना दर महिना मिळणारे मूळ वेतन हे वेगळे आहेत.

चला तर पाहूया प्रशिक्षणाचा कालावधी आणि मिळणारे मूळ वेतन किती आहे.

पदाचे नाव प्रशिक्षणाचा कालावधीमूळ वेतन
Graduate Apprentice Mechanical Engineering१२ महिने₹ ९०००
Graduate Apprentice Electrical Engineering१२ महिने₹ ९०००
Technician Apprentice Mechanical Engineering१२ महिने₹ ८०००
Technician Apprentice Electrical Engineering१२ महिने₹ ८०००
COPA ( Computer Operator and Programming Assistant)१२ महिने₹ ७७००

Mumbai Port Trust Recruitment How to Apply

उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी अर्जाची प्रिंट अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराने https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंक वर जाऊन आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना Apprentice Enrollment Number किंवा नोंदणी क्रमांक मिळेल. हा नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर उमेदवारांनी मुंबई फोर ट्रस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज डाऊनलोड करायचा आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती भरणे उमेदवारांनी आवश्यक आहे. यामध्ये उमेदवाराची वैयक्तिक माहिती , संपर्क माहिती तसेच उमेदवारांचे शैक्षणिकसोबतच आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

Application Fee :

उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने आपल्या जाहिरातीमध्ये बँकेचा तपशील दिलेला आहे.NEFT च्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज शुल्क भरायचे आहे.

अर्ज शुल्क : रुपये १००

अपंग घटकातील उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

मुंबई शहर पोलीस भरती | जागा ४०११ पोलीस भरती २०२४ | Maharashtra Police Bharti |१७,४७१ जागा 

Mumbai Port Trust Recruitment Selection Criteria

Graduate Apprentice आणि Technician Apprentice यासाठी होणारे उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्ट लावून केली जाईल मेरिट लिस्ट लावताना उमेदवारांना पदवी अथवा पदविका परीक्षेच्या सर्व सत्रांमधील मिळालेले मार्क आणि त्यांची टक्केवारी यानुसार लावली जाईल.

COPA Trade यामध्ये होणाऱ्या उमेदवारांची निवड ही या आयटीआय कोर्समध्ये प्राप्त झालेल्या गुण टक्केवारीनुसार केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी ही मुंबई ट्रस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.

जर दोन उमेदवारांचे गुण टक्केवारी समान असेल तर ज्या उमेदवाराने अगोदर पदवी अथवा पदविका पूर्ण केली असेल अशा उमेदवाराला ग्राह्य धरले जाईल.मेरिट लिस्ट नुसार निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी व पडताळणी केली जाईल. यासंबंधी उमेदवारांच्या कागदपत्रांच्या तपासणी पडताळणीची तारीख मुंबई ट्रस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. तसेच उमेदवारांनी नमूद केलेल्या तारखेस उपस्थित असणे आवश्यक आहे. असे नसल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल व पॅनल लिस्ट मध्ये असणाऱ्या पुढील उमेदवाराला ही संधी दिली जाईल.

निवड झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी ही पोर्टच्या अधिकृत हॉस्पिटल मधून केली जाईल. तसेच उमेदवार स्वीट असल्याचे प्रमाणपत्र देखील दिले जाईल.

Frequently Asked Questions

१) Mumbai Port Trust अंतर्गत किती जागांची भरती जाहीर केली आहे ?

उत्तर : Mumbai Port Trust अंतर्गत एकूण ६१ जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

२) Mumbai Port Trust अंतर्गत कोणत्या पदासाठी भरती करण्यात येणार आहे ?

उत्तर : Graduate Apprentice , Technician Apprentice , COPA पदासाठी अर्ज मागविण्यात येणार आहे.

३) Mumbai Port Trust अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे का ?

उत्तर : Mumbai Port Trust अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.

४) Mumbai Port Trust अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?

उत्तर : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १५ एप्रिल २०२४ आहे.

५) Mumbai Port Trust अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी ऑफलाईन किंवा ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे का ?

उत्तर : कोणत्याही प्रकारची ऑनलाईन परीक्षा किंवा ऑफलाईन परीक्षा घेतली जाणार नाही आहे. उमेदवाराची निवड ही शैक्षणिक टक्केवारी नुसार होईल.