Mahavitaran Recruitment ( महावितरण भरती ) नुकतीच जाहीर झाली असून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित ने आपल्या जाहिरात क्रमांक ०६/२०२३ अंतर्गत ५३४७ रिक्त पदे ही भरली जाणार आहेत. विद्युत सहाय्यक या पदासाठी सदर जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने जाहीर केली आहे. जे उमेदवार पात्र असतील त्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची मोठी संधी या जाहिराती मधून असणार आहे.
चला तर पाहूया सविस्तर जाहिरात काय आहे ती.
अशाच केंद्र , राज्य आणि जिल्हा पातळीवर असेलल्या सरकारी - निमसरकारी नोकऱ्यांचा धावता आढावा वाचण्यासाठी आपल्या वेबसाईटला आजच भेट द्या
.
भेट द्या : http://www.Jobschemewala.com
Mahavitaran Recruitment 2024 Overview
महाराष्ट्रा राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये आपल्या स्थानिक कार्यालयातील विद्युत सहाय्यक पदाची विभागस्तरिय सेवाजेष्टातेतील पदे ही सरळसेवा भरती प्रक्रिया द्वारे भरली जाणार आहे. वेतनश्रेणी ४ मध्ये असलेल्या विद्युत सहाय्यक या पदासाठी शैक्षणिक सह इतर आवश्यक पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर भरती ही सुरवातीला ३ वर्ष कंत्राटी पद्धतीसाठी भरली जातील. या ३ वर्षाचा कालावधी समाधानरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्युत सहाय्यक यांना कंपनी नियमाच्या अधीन राहून सदर उमेदवारांना विद्युत सहाय्यक पदावरून तंत्रज्ञ या पदावर सामावून घेतले जाईल.
जाहिरात प्रसिद्ध : | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी Maharashtra State Electricity Distribution Company |
जाहिरात प्रसिद्ध तारीख : | २९ डिसेंबर २०२३ |
पदाचे नाव : | विद्युत सहाय्यक |
पद संख्या : | ५३४७ रिक्त जागा |
अधिकृत संकेतस्थळ : | http://www.mahadiscom.in |
Table of Contents
Mahavitaran Recruitment Vacancies ( रिक्त पदे )
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने जाहीर केलेल्या आपल्या जाहिरातीमध्ये रिक्त जागांचा तपशील दिला आहे.विभागस्तरिय असणाऱ्या स्थानिक कार्यालयात एकूण ५३४७ रिक्त जागा या भरती प्रक्रिया द्वारे भरली जाणार आहेत. ही पदे एससी ,एसटी , ओबिक , एन टी अ ब क ड , खुला प्रवर्ग , सह माजी सैनिक खेळाडू , प्रकल्पग्रस्त , भुंकपग्रस्त , शिकाऊ उमेदवार आणि दिव्यांग उमेदवार यांची साठी असणाऱ्या रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात दिला आहे.दिलेल्या तक्त्यात देण्यात आलेल्या प्रवर्गातील पदसंख्या कमी जास्त अथवा रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच आरक्षण धोरणानुसार जागांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
प्रवर्ग | पदसंख्या |
एससी ( Scheduled Caste ) | ६७३ |
एसटी ( Scheduled Tribe ) | ४९१ |
ओबिक ( Other Backward Class ) | ८९५ |
एन टी अ ( Nomadic Tribes A ) | १५० |
एन टी ब ( Nomadic Tribes B ) | १४५ |
एन टी क ( Nomadic Tribes C ) | १९६ |
एन टी ड ( Nomadic Tribes D ) | १०८ |
खुला प्रवर्ग ( Unreserved ) | २०८१ |
आर्थिक दृष्ट्या दुर्बल ( Economically Backward Class ) | ५०० |
विशेष मागास प्रवर्ग ( Special Backward Class ) | १०८ |
एकूण पदे | ५३४७ |
Mahavitaran Recruitment Eligibility ( पात्रता निकष )
विद्युत सहाय्यक म्हणून निवड होण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने आपल्या जाहिराती मध्ये काही पात्रता निकष दिले आहेत. त्या पात्रतांची पूर्तता करणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
१) शैक्षणिक अर्हता :
जाहिरात प्रसिद्ध झाली २९ डिसेंबर २०२३ , या तारखे पर्यंत उमेदवाराने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारे १० + २ अर्थात बारावी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र प्राप्त किंवा तत्सम परीक्षा पास होने असणे आवश्यक आहे. यासोबतच आयटीआय ( ITI ) म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधून व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी विजतंत्री/ तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सेलान्स इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेले व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण मंडळ द्वारे दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे.
२) वयोमर्यादा :
अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे किमान १८ वर्ष आणि कमाल २७ वर्ष पुर्ण असणे आवश्यक आहे. वयाबाबत जाहिराती मध्ये २९ डिसेंबर २०२३ अखेर ची मर्यादा दिली आहे . तसेच कंपनी कडून विविध प्रकारच्या प्रवर्गासाठी शिथिलता देण्यात आली आहे.
यात प्रामुख्याने मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ( EWS) , खेळाडू, अनाथ यांचा समावेश आहे. बघुया कोणत्या वर्गासाठी किती वर्ष शिथिल करण्यात आली आहेत.महावितरण कंपनीमधील पात्र उमेदवारांना कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा बाबत अट लागू राहणार नाही. तसेच वयोमर्यादा करिता एस एस सी प्रमाणपत्रावर दर्शवलेली जन्म तारीख ग्राह्य धरली जाणार आहे.
Mahavitaran Recruitment Important Dates
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने २९ डिसेंबर २०२३ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली. विद्युत सहाय्यक पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना अर्ज सुरू झाल्याची अन् अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात घेऊन अर्ज करायचं आहे. अर्ज स्विकारण्याचा कालावधीमध्येच इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.नुकतेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंपनी ने एक परिपत्रक काढून जाहीर केले आहे की अर्ज करायची अंतिम तारखेत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख : ०१ मार्च २०२४.
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : मुदतवाढ नंतर १९ एप्रिल २०२४.
Mahavitaran Recruitment Selection Procedure
ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत त्या उमेदवारांची ऑनलाईन तांत्रिक क्षणता चाचणी घेतली जाईल. सदर चाचणी ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असून विद्युत सहाय्यक या पदासाठी आवश्यक असलेले किमान पात्रता , सामान्य ज्ञान यावर आधारित असेल. ऑनलाईन परीक्षेसाठी असणारे परीक्षा माध्यम ही दोन्ही भाषा म्हणजेच मराठी / इंग्रजी असणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना दिलेल्या माहितीचे योग्य ते दस्ताऐवज जमा करणे ही पुर्णपणे उमेदवाराची जबाबदारी असेल अन्यथा उमेदवाराची निवड रद्द केली जाईल.
ऑनलाईन परीक्षा चाचणी साठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) व सामन्य अभियोग्याता चाचणी ( General Aptitude ) यावर आधारित राहील. ऑनलाईन परीक्षा चाचणी ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असून परीक्षेचा कालावधी हा १२० मिनिटे आहे. या वेळेत १३० प्रश्न सोडवायचे असून परीक्षा एकूण १५० गुणाची असेल. चला तर पाहूया की कोणत्या विषयानुसार किती मार्क आहे.
विषय | प्रश्न | गुण | परीक्षा कालावधी |
१. तांत्रिक व्यवसाय ज्ञान ( Professional Knowledge ) | ५० | ११० | |
२) सामान्य अभियोग्यता ( General Aptitude ) | |||
क) तर्कशक्ती ( Reasoning ) | ४० | २० | १२० मिनिटे |
ब ) संख्यात्मक अभियोग्यता ( Quantitative Aptitude) | २० | १० | |
ड) मराठी भाषा ( Marathi Language ) | २० | १० | |
१३० प्रश्न | १५० गुण | १२० मिनिटे |
ऑनलाईन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. या नुसार १/४ इतके गुण मिळालेल्या मार्क्स मधून वजा करण्यात येईल. म्हणजेच चुकलेल्या चार प्रश्नाच्या उत्तरासाठी एक प्रश्नाच्या उत्तराचे गुण वजा केले जातील.
Mahavitaran Recruitment Salary.
पात्रता फेरी पूर्ण झाल्यावर निवड झालेल्या उमेदवर हे तीन वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने विद्युत साहाय्यक म्हणून रुजू केले जातील. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ द्वारे जाहीर केलेल्या जाहिरातीमध्ये या तीन वर्षाच्या कंत्राटी पद्धतीत उमेदवारांना प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम ही मानधन म्हणून दिली जाईल. तीन वर्षाच्या कंत्राटी पद्धतीनंतर जेव्हा तंत्रज्ञ म्हणून निवड होईल तेव्हा मानधनात वाढ/ बदल केले जातील निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे प्रतीमहा मानधन म्हणून दिले जाणार आहे.
वर्ष | मानधन |
१. प्रथम वर्ष : | ₹ १५,००० प्रतिमहा मानधन |
२. द्वितीय वर्ष : | ₹ १६,००० प्रतिमहा मानधन |
३. तृतीय वर्ष : | ₹ १७,००० प्रतिमहा मानधन |
कंपनीने जाहीर केलेल्या मानधनातून व्यवसाय कर , आयकर, भविष्य निर्वाह निधी या गोष्टी वजा करण्यात येतील. पी एफ म्हणून कट केलेली रक्कम ही पी एफ खात्यात जमा केली जाईल.
जे उमेदवार विद्युत सहाय्यक म्हणून तीन वर्षाचा कंत्राटी पद्धतीने असलेला कालावधी समाधानकारक पूर्ण करेल त्या उमेदवारांना कंपनीच्या नियमानुसार पुढील नियमित पदावर म्हणजेच तंत्रज्ञ म्हणून रुजू करून घेतले जाईल. कंपनीने आपल्या जाहिराती मध्ये तंत्रज्ञ या पदासाठी ठराविक वेतनश्रेणी जाहीर केली आहे त्यानुसार तंत्रज्ञ या नियमित पदावर रुपये २५५८८०-५०५-२८४०५-६१०-३४५०५-७१०-५०८३५ या वेतनश्रेणी मध्ये घेण्यात येईल.
Mahavitaran Recruitment Apply
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज आणि नमुना http://www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी संकेत स्थळावर दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक असून भरती प्रक्रिया साठी नेहमीचा वापरत असेलल्या मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी चा वापर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराने आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती , संपर्क माहिती तपशील अचूक नोंद करणे आवश्यक आहे.
अर्ज भरताना उमेदवाराने अर्जात नमूद केल्याप्रमाणे सर्व गोष्टी साठी / माहितीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुरावे सादर करणे आवश्यक आहे. पाहूया कोणते कागदपत्र पडताळणी करिता लागणार आहेत ,
१) शैक्षणिक पात्रता | २) जात वैधता प्रमाणपत्र |
३) जातीचा दाखला | ४) नॉन क्रिमी लियर प्रमाणपत्र |
५) अपंग प्रमाणपत्र | ६) खेळ प्रमाणपत्र |
७) भूकंपग्रस्त पूरग्रस्त | ८) ऑनलाईन अर्ज प्रत |
वरील पुरावे अर्ज तपासणी पडताळणी वेळेस सादर करणे बंधनकारक असणारं आहे. नमूद केलेल्या माहिती मध्ये आणि कागदपत्र माहितीत कोणतीही तफावत आढळल्यास माहिती खोटी समजण्यात येईल व उमेदवारी रद्द केली जाईल .
ऑनलाईन पद्धतीने असलेल्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा चाचणी साठी असणारे प्रवेशपत्र ( Admit Card ) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळवर उपलब्ध करून देण्यात येईल.
Mahavitaran Recruitment Application Fee
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी परीक्षा रक्कम ही देखील ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरणे बंधनकारक असणार आहे. जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे दीव्यांग आणि माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क माफ असणार आहे.
प्रवर्ग | अर्ज शुल्क |
खुला प्रवर्ग उमेदवार : | ₹ २५० + जी एस टी |
मागासवर्गीय उमेदवार : | ₹१२५ + जी एस टी |
आर्थिक दृष्ट्या दुर्बल उमेदवार : | ₹१२५ + जी एस टी |
अनाथ घटकातील उमेदवार : | ₹१२५ + जी एस टी |
माजी सैनिक : | परीक्षा शुल्क माफ |
पात्र दिव्यागं उमेदवार : | परीक्षा शुल्क माफ |
परीक्षा शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग द्वारे भरायचे आहे.
Frequently Asked Questions
१) महावितरण कंपनीने किती जागांची जाहिरात प्रसिद्ध केली होती ?
उत्तर : महावितरण कंपनीने एकूण ५३४७ जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
२) महावितरण कंपनी मध्ये कोणत्या पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे ?
उत्तर : महावितरण कंपनी मध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठी थेट भरती प्रक्रिया सुरू आहे.
३) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?
उत्तर : मुदतवाढ झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना १९ एप्रिल २०२४ ही शेवटची तारीख आहे.
४) ३ वर्षाचे कंत्राट संपल्यानंतर पुन्हा रुजू केले जाणार आहे का ?
उत्तर: ३ वर्षाचा कालावधी समाधानरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्युत सहाय्यक यांना कंपनी नियमाच्या अधीन राहून सदर उमेदवारांना विद्युत सहाय्यक पदावरून तंत्रज्ञ या पदावर सामावून घेतले जाईल.