Mahatransco Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली असून यानुसार आयटीआय उमेदवारांना एकूण ६४ जागांसाठी शिकाऊ म्हणजेच Trainee साठी पदावर रुजू होता येणार आहे.
Mahatransco Bharti 2024 Overview
Mahatransco ने आपल्या कळवा येथील विद्युत पारेषण मंडळ मध्ये रिक्त असलेल्या शिकाऊ पदे भरण्यासाठी जाहिरात काढली आहे. सदर भरतीसाठी काय पात्रता आवश्यक आहे ,कोणते उमेदवार अर्ज करू शकतात, एकूण जागा किती असणार आहेत या सर्व बाबींचा विचार Mahatransco Bharti 2024 लेखात करण्यात आला आहे.
जाहिरात प्रसिद्ध : | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित |
पदाचे नाव : | शिकाऊ ( Trainee ) |
पद संख्या : | ६४ पदे |
अर्ज प्रणालीचा अवलंब : | ऑनलाइन अर्ज ( Online Mode ) |
अधिकृत संकेतस्थळ : | https://www.mahatransco.in/ |
Mahatransco Bharti 2024 Important Dates
आयोगाने उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रणाली पद्धत वापरली असल्याने पात्र उमेदवारांना आयोगाने दिलेल्या कालावधी मध्येच अर्ज दाखल करायचा आहे.
अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख : | १२ ऑगस्ट २०२४ |
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : | २३ ऑगस्ट २०२४ |
Mahatransco Bharti 2024 Vacancies
शिकाऊ पदासाठी एकूण ६४ रिक्त जागा असून उमेदवारांना वरील कालवधी मध्ये अर्ज भरायचा आहे. सदर पदे ही वीजतंत्री असणाऱ्या उमेदवारांना शिकाऊ म्हणून काम करता येणार आहे.
NABARD Group A Recruitment 2024 नाबर्डमध्ये मॅनेजर पदासाठी सरळसेवा नुसार होणार निवड,महिना १ लाख पगार
Mahatransco Bharti 2024 Eligibility Criteria
टिकाऊ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आयोगाने काही पात्रतेचे निकष घालून दिले आहे यामध्ये प्रामुख्याने वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता या गोष्टींचा समावेश आहे.
१) वयोमर्यादा :
सदर पदासाठी आयोगाने उमेदवारांसाठी किमान आणि कमाल वयाचे बंधन घालून दिले असून कमीत कमी १८ वर्ष तर जास्तीत जास्त ३८ वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
२) शैक्षणिक पात्रता :
शैक्षणिक पात्रतेचा विचार करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा सोबतच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
Mahatransco Bharti 2024 How to Apply
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी व अर्ज भरायचा आहे अर्जासोबत लागणारे आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी स्कॅन करून अर्ज भरताना अपलोड करावे.आयोगाने घालून दिलेल्या कालावधीमध्ये अर्ज दाखल न झाल्यास पूर्ण अर्जांचा विचार , तसेच अपूर्ण अर्ज – कागदपत्रे अर्ज निवड प्रक्रियेसाठी केला जाणार नाही.
उमेदवाराची निवड दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण झालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. गुणांच्या टक्केवारीनुसार अटी आणि शर्ती लक्षात घेऊन सामाजिक आरक्षणाच्या अधीन राहून उमेदवारांची निवड यादी जाहीर केली जाईल.
Mahatransco Bharti 2024 Documents
ऑनलाइन अर्ज भरताना जे आवश्यक कागदपत्रे लागणाऱ्या आहेत याची यादी आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केलेली आहे यानुसार उमेदवारांनी खालील कागदपत्रे अर्ज भरताना अपलोड करणे आवश्यक आहे.
दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि गुणपत्रक ( SSC Marksheet ) | उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र ( Non Creme Layer ) |
आयटीआय वीजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मूळ प्रत | महाराष्ट्र राज्याचे अधीवास असल्याचे प्रमाणपत्र ( Domecile Certificate ) |
आधार कार्ड ( Aadhar Card ) | मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र ( Caste Certificate ) |
६) इतर अनुषंगिक कागदपत्रे
Conclusion
माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण सोबतच आयटीआय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित कडून ६४ पदासाठी अर्ज मागविण्यात येत असून असे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२४ असणार आहे.
Frequently Asked Questions
1) Who can Apply for Mahatransco Bharti 2024 ?
उत्तर : आयोगाने जाहीर केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या वय वर्ष १८-३८ गटातील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
2) What are the eligibility criteria for Mahatransco Bharti 2024 ?
उत्तर : अर्ज करणारा उमेदवार हा दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण असे पात्रतेचे निकष घालून दिले आहेत.
3) Last date of Mahatransco Bharti 2024 ?
उत्तर : सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२४ असणार आहे.