LIC HFL एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये विविध पदाच्या २०० जागांची जाहिरात

LIC HFL 2024 एलआयसी म्हणजेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अंतर्गत असणाऱ्या हाऊसिंग फायनान्स मध्ये तब्बल २०० जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून सदर भरती ही ज्युनिअर असिस्टंट या पदासाठी होणार आहे .

LIC HFL 2024 Recruitment Overview

LIC एलआयसी म्हणजेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अंतर्गत असणाऱ्या हाऊसिंग फायनान्स मध्ये तब्बल २०० जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर भरती ही ज्युनिअर असिस्टंट या पदासाठी होणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२४ आहे. चला तर बघूया अर्जाची सुरुवात केव्हा होणार आहे , भरती प्रक्रिया कशी असणार आहे ,अर्ज कसा अन् कोठे करता येणार आहे यासारख्या अनेक गोष्टींचा आढावा.

जाहिरात प्रसिद्ध :एल आय सी
{ Life Insurance Corporation
Housing Finance Limited }
पदाचे नाव :ज्युनिअर असिस्टंट
पदसंख्या :२०० पदे
अर्ज पद्धत :ऑनलाईन ( Online Mode )
अधिकृत संकेतस्थळ :www.lichousing.com
LIC HFL 2024

LIC HFL 2024 Important Dates.

एलआयसी मार्फत ज्युनिअर असिस्टंट या पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रणालीचा अवलंब केला असल्याने अर्ज करण्याऱ्या उमेदवाराने अर्जाची सुरुवातीची तारीख व अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवणे आवश्यक आहे. चला तर बघूया भरती संबंधित काही महत्त्वाच्या तारखा :

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : २७ जुलै २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख :१४ ऑगस्ट २०२४
प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याचा कालावधी :परीक्षेच्या ७ ते १४ दिवस अगोदर
परीक्षेची तारीख :सप्टेंबर २०२४

अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या वेळी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवाराने आयोगाने निहीत केलेल्या कालावधी संपायच्या अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे

रेल्वेच्या मुंबई,पुणे,नागपूर विभागात तब्बल २४०० पेक्षा जास्त जागांसाठी भरती Central Railway Recruitment 2024

LIC HFL 2024 Vacancy

ज्युनिअर असिस्टंट या पदासाठी असणाऱ्या २०० जागांचा आढावा आपण राज्यानुसार घेणार आहोत. चला तर बघूया आपल्या महाराष्ट्र प्रदेशासाठी किती जागा रिक्त आहेत.नजर टाकूया पुढील तक्त्यावर :

राज्यजागांची संख्या
आंध्र प्रदेश१२
आसाम
छत्तीसगड
गुजरात
हिमाचल प्रदेश
जम्मू आणि काश्मीर
कर्नाटक३८
मध्य प्रदेश१२
महाराष्ट्र५३
पुदुचेरी
सिक्कीम
तमिळनाडू१०
तेलंगणा३१
उत्तर प्रदेश१७
पश्चिम बंगाल

मुलाखतीसाठी असणाऱ्या पात्र उमेदवारांची संख्या आणि अंतिम निवड होईपर्यंत जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या जागेमध्ये वाढ किंवा घट केली जाऊ शकते. उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देणे आवश्यक आहे.

LIC HFL 2024 Eligibility Criteria

एलआयसी ने आपल्या जाहिरातीमध्ये पात्रतेचे काही निकष घालून गेले आहेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी आपण सर्व पात्रतेचे निकष पूर्ण करत आहोत की नाही त्याची खात्री करणे आवश्यक आहे चला तर बघूया कोण कोणते पात्रतील असे निकष आयोगाने घालून दिले आहेत.


१) राष्ट्रीयत्व :

उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे


२) वयोमर्यादा :

ज्युनिअरअसिस्टंट या पदासाठी आयोगाने किमान आणि कमाल वयोमर्यादा घालून दिली असून अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान व हे २१ वर्ष आणि कमाल वय हे २८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.


३) शैक्षणिक पात्रता :

उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट मधून पदवी परीक्षा कमीत कमी ६० टक्के मिळवून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्धवेळ किंवा डिस्टन्स किंवा करेस्पोंडन्स ने मिळवलेली पदवी सदर भरतीसाठी पात्र नसेल.


४) संगणक अहर्ता :

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असून उमेदवाराकडे संगणकाचे पदवी पदविका किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

LIC HFL 2024 Selection Process

ज्युनिअर असिस्टंट या पदासाठी निवड प्रक्रिया ही दोन टप्प्यांमध्ये पार पाडली जाणार असून

पहिला टप्पा ऑनलाईन परीक्षा आणि दुसरा टप्पा मुलाखत.


ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड यादी जाहीर केली जाईल. जे उमेदवार निवडले जातील केवळ त्याच उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल.ज्युनिअर असिस्टंट या पदासाठी उमेदवाराची निवड ही ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत या दोन्हींमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी ठेवण्यात आला आहे.

LIC HFL 2024 Exam Pattern

परीक्षा पद्धतीचा विचार करता सदर परीक्षा संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा असून बहुपर्यायी म्हणजेच मल्टिपल चॉईस (MCQ) प्रकारची परीक्षा असून सदर परीक्षा ही २०० गुणांची होईल यासाठी २ तास हा कालावधी देण्यात आला आहे. ऑनलाइन परीक्षा ही फक्त इंग्रजी या भाषेतूनच घेतली जाईल. तसेच निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नुसार चार चुकीच्या उत्तरासाठी एका उत्तराचे गुण वजा केले जाईल.

LIC HFL 2024 How to Apply

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराने एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक असून Recruitment of Junior Assistant वर क्लिक करून Apply Online करायचे आहे.अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांना नाव नोंदणी करायचे असून यामध्ये उमेदवारांना आपले नाव संपर्क क्रमांक , ईमेल आयडी नमूद करायचा आहे.तसेच अर्ज भरताना उमेदवारांना शैक्षणिक माहिती, वैयक्तिक माहिती संपर्क माहिती फोटो आणि सही अपलोड भरून अर्ज सबमिट करायचा आहे.

LIC HFL 2024 Application Fee

ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून झाल्यानंतर उमेदवारांना परीक्षा शुल्क किंवा अर्ज शुल्क भरणे आवश्यक असून सदर रक्कम भरून झाल्यानंतर अर्ज स्वीकारला जाईल.

अर्ज शुल्क : रुपये ८००

उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीचा वापर करून सदर परीक्षा शुल्क दिनांक २५ जुलै २०२४ ते १४ ऑगस्ट २०२४ या दरम्यान भरायचे आहेत. अर्ज शुल्क न भरल्यास सदर अर्ज पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

Conclusion

एलआयसी अंतर्गत असणाऱ्या हाऊसिंग फायनान्स मध्ये ज्युनिअर असिस्टंट या पदासाठी २०० जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली असून सदर परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून सदर अर्ज प्रक्रिया ही २७ जुलै २०२४ पासून ते १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत राबवली जाणार आहे पात्र उमेदवारांचा विचार करता पदवी परीक्षा किमान ६० टक्के गुणांनी उमेद उत्तीर्ण असणाऱ्या वय वर्ष २१ ते २८ यादरम्यान उमेदवारांना अर्ज करता येणार आहे उमेदवाराची निवड ही ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही मध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.