Kotak Kanya Scholarship 2024 : तर मंडळी Jobschemewala मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत स्कॉलरशिप संबधित माहिती यानुसार कोटक बँकेने देखील एचडी एफ सी प्रमाणेच विद्यार्थिना शैक्षणिक मदत म्हणून रूपये दीड लाख एवढी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून दिली जाणार आहे.
सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा विद्यार्थी बारावी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक असून निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी म्हणजेच पदवी पर्यंतचे शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.
स्कॉलरशिप साठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून कोटक बँकेने आपल्या जाहिरातीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३० सप्टेंबर २०२४ दिली आहे.
Kotak Kanya Scholarship 2024 Overview
यानुसार ,
स्कॉलरशिप नाव : | Kotak Kanya Scholarship 2024 |
स्कॉलरशिप स्पॉन्सर : | Kotak Mahindra Bank |
स्कॉलरशिप रक्कम : | ₹ १,५०,००० |
अर्ज पद्धत : | ऑनलाईन अर्ज |
अधिकृत संकेतस्थळ : | अर्ज करण्याची येथे क्लिक करा |
Kotak Kanya Scholarship 2024 Important Dates
कोटक महिंद्र बँक प्रस्तुत कोटक कन्या स्कॉलरशिप साठी अर्ज करण्यासाठी बँकेने काही ठराविक कालावधी दिला आहे. ज्या विद्यार्थिनींना अर्ज करायचा आहे त्यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखे अगोदर आपला अर्ज सबमिट करायचा आहे. यानुसार
अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख : | जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून |
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : | ३० सप्टेंबर २०२४ |
Kotak Kanya Scholarship 2024 Eligibility Criteria
सदर स्कॉलरशिपसाठी कोण कोणते विद्यार्थी पात्र असतील , कोणते पात्रतेचे निकष बँकेने दिले आहेत हे बघूया. यानुसार
१) अर्ज करणारा विद्यार्थी हा भारताची नागरिक असावा.
२) शिष्यवृत्ती योजनेचा लाभ केवळ मुलींना भेटणार आहे.तसेच बारावी मध्ये किमान ७५ टक्के गुण मिळवलेले असावे.कुटुंबाची आर्थिक उत्पन्न ६ लाख पेक्षा कमी असावे तसेच यासाठी उमेदवाराने उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे.
३) मुलीने बारावी उत्तीर्ण झाल्यावर पुढील पैकी म्हणजेच इंजिनीयरिंग, MBBS, BDS, LLB, B.SC Nursing, B. Pharmacy अशा कोर्स साठी ऍडमिशन घेतलेले असावे.
Kotak Kanya Scholarship 2024 How to Apply
आपण बघितले की कोण कोणते उमेदवार कोटक बँके प्रस्तुत कोटक कन्या स्कॉलरशिप साठी पात्र असतील. याच पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा आणि कोठे करायचा आहे ते बघूया यानुसार , पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना Buddy4Study या अधिकृत संकेतस्थळावर जावून अर्ज भरायचा आहे. लिंक ओपन झाल्यावर उमेदवारांना सर्वात आधी नाव नोंदणी करायची आहे आणि लॉगिन आयडी- पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे.
HDFC Bank Parivartan Scholarship 2024 आता बँकेकडून मिळणार तब्बल ₹ ७५००० ची स्कॉलरशिप !
सदर स्कॉलरशिप अर्ज समोर Apply Link येईल त्यावर क्लिक करा. यानंतर अर्जाची सुरवात होईल विद्यार्थ्यांना आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, संपर्क माहिती आणि सोबत जोडायचे आवश्यक डॉक्युमेंट्स इत्यादी बाबी समाविष्ट करून अर्जाची पडताळणी करून अर्ज सबमिट करायचा आहे.सदर स्कॉलरशिप साठी कोटक महिंद्रा तर्फे काही अटी आणि शर्ती नमूद केल्या असून या अटी आणि शर्ती मध्ये राहूनच विद्यार्थांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
Kotak Kanya Scholarship 2024 Selection Process
कोटक कन्या स्कॉलरशिप साठी पात्र मुलींची निवड प्रक्रिया तेवढीच महत्त्वाची अन् अवघड असणार आहे. कारण स्कॉलरशिप साठी निवड होताना जेवढे अर्ज आले असतील त्यातील ज्या विद्यार्थिनींना बारावी मध्ये सर्वाधिक गुण / टक्के असतील अशांचीच निवड केली जाणार आहे. पण अर्ज मात्र किमान ७५ % गुण असलेल्या उमेदवारांनाच करता येणार आहे.
सदर शिष्यवृत्तीची खासियत म्हणजेच अर्ज करणारी मुलगी जर अपंग असेल, आई किंवा वडील नसतील तर अशा परिस्थितीत सदर शिष्यवृत्ती मध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. बारावीच्या मार्क वरच मुलींची निवड केली जाणार आहे, स्कॉलरशिप साठी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी पडताळणी करून झाल्यावर जे विद्यार्थी पात्र ठरतील केवळ अशाच विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देण्यात येईल.
Kotak Kanya Scholarship 2024 Scholarship Amount
कोटक कन्या स्कॉलरशिप साठी निवड झालेल्या उमेदवारांना कोण कोणते फायदे मिळणार आहे आणि नेमकी किती रक्कम ही स्कॉलरशिप म्हणून मिळणार आहे बघूया.यानुसार पात्र मुलींना शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी रूपये दीड लाख म्हणजेच अंकी १,५०,००० ₹ एवढी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून दिली जाणार आहे.
सदर लाभ हा उमेदवार मुलीचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत मिळणार आहे. तसेच विद्यार्थिनींना अभ्यासक्रमाच्या काळात लागणारा शालेय खर्च, ट्युशन खर्च, हॉस्टेल फी, इंटरनेट, प्रवास खर्च, लॅपटॉप, पुस्तके स्टेशनरी इत्यादी साठी होणारा खर्चाचा समावेश या मध्ये करण्यात आला आहे.
Kotak Kanya Scholarship 2024 Documents
कोटक बँक प्रस्तुत कोटक कन्या स्कॉलरशिप साठी अर्ज सादर करताना उमेदवारांना कागदपत्रे तपासणी पडताळणी करिता काही आवश्यक कागदपत्र जमा करावी लागणार आहे. यानुसार पुढील कागदपत्रे ऑनलाइन अर्ज करताना अर्जासोबत अपलोड करायची आहे. यादी खालीलप्रमाणे ,
१) बारावी उत्तीर्ण गुणपत्रक.
२) कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न प्रमाणपत्र.
३) कॉलेज ऍडमिशनची पावती.
४) बोनाफाईट प्रमाणपत्र.
५) ओळखपत्र म्हणून आधार कार्ड.
६) बँक खाते आवश्यक सोबत पासबुक.
७) एक पासपोर्ट आकाराचा फोटो.
८) उमेदवार अपंग असल्यास प्रमाणपत्र.
९) उमेदवाराच्या वडिलांचे किंवा आईचे निधन झाल्यास, मृत्यू प्रमाणपत्र.
१०) कॉलेज सीट प्राप्त झाल्याची पावती म्हणजेच कॉलेज अलॉकेशन स्लीप
Kotak Kanya Scholarship 2024 Frequently Asked Questions
१) Who is eligible for Kotak Kanya Scholarship 2024?
उत्तर : सदर स्कॉलरशिप साठी ज्या मुलींनी बारावी ची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि त्यांना ७५ टक्के किमान मार्क मिळवले आहेत ते या ठिकाणी अर्ज करू शकतात.
२) How to apply for Kotak Kanya Scholarship 2024?
उत्तर : कोटक बँक प्रस्तुत कोटक कन्या स्कॉलरशिप साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध असणार आहे.
३) Which is the last date of Kotak Kanya Scholarship Form?
उत्तर : कोटक बँक प्रस्तुत कोटक कन्या स्कॉलरशिप साठी बँकेने आपल्या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे ३० सप्टेंबर २०२४ ही स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.