Jilhadhikari Karyalay Bharti 2024 जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या जागांसाठी भरती सुरू,

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : वाशीम जिल्हामधील जिल्हा सेतू समिती कार्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभागात रिक्त असणाऱ्या “डाटा एन्ट्री ऑपरेटर” पदासाठी नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे.

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 Overview

जिल्हाधिकारी कार्यालयातील डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी जाहीर झालेल्या भरतीसाठी कोणते उमेदवार अर्ज करू शकतात,नेमकी काय शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे , अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे , अर्ज करण्याचा कालावधी काय असणार आहे या सर्व बाबीचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत.

जाहिरात प्रसिद्ध :जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम
पदाचे नाव :डाटा एन्ट्री ऑपरेटर
पद संख्या :एक पद
अर्ज पद्धत :ऑफलाईन

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 Important Dates

जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांना पुढील कालावधी मध्ये अर्ज दाखल करता येणार आहे.

अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख :जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून.
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख :२३ ऑगस्ट २०२४.

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 Vacancies

पदाचा विचार करता सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभागात ” डाटा एन्ट्री ऑपरेटर” पदासाठी केवळ एक जागा उपलब्ध आहे.

HDFC Bank Parivartan Scholarship 2024 आता बँकेकडून मिळणार तब्बल ₹ ७५००० ची स्कॉलरशिप !

Jilhadhikari Karyalay Bharti 2024

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 Eligibility

कार्यालयाने सदर पदासाठी पात्रतेचे निकष दिले असून अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. यानुसार वयोमर्यादा , शैक्षणिक/ व्यावसायिक पात्रता , आवश्यक अनुभव या बाबी समाविष्ट आहेत.

१) वयोमर्यादा :

अर्ज करणाऱ्या उमेदवारचे किमान वय १८ वर्ष पूर्ण तर कमाल वय ३५ वर्ष पूर्ण असावे.

२) शैक्षणिक/ व्यावसायिक पात्रता :

अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावं. तसेच उमेदवारांकडे मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट मधून पदवी प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र असावे.सोबतच उमेदवाराकडे पुढील कौशल्य/ ज्ञान असणे आवश्यक आहे यानुसार

१) संगणक ज्ञान/ MSCIT उत्तीर्ण. २) टायपिंग : मराठी ३०/४० आणि इंग्रजी ३०/४०

३) आवश्यक अनुभव :

उमेदवारांकडे शासकीय विभागात माहिती गोळा करणे / संकलन करणे / नोंदणी करणे इत्यादी कामाचा अनुभव असावा.

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 How to Apply

पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यानुसार उमेदवाराने अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे जाहिराती मध्ये प्रसिद्ध केलेल्या पत्त्यावर पाठवावेत. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज तसेच अंतिम तारखेच्या नंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सेतू समिती विभाग , वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम.

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 Salary

उमेदवाराची निवड झाल्यावर उमेदवारांना मासिक वेतन म्हणून काही रक्कम दिली जाणार आहे यानुसार डाटा एंट्री ऑपरेटर पदासाठी प्रतीमहिना १६००० रूपये वेतन दिले जाईल.

Frequently Asked Questions

१) What is the Last date to Apply for Jilhadhikari Karyalay Bharti 2024 ?

उत्तर : जिल्हाधिकारी कार्यालयातील डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२४ आहे.

२) Who can Apply for Jilhadhikari Karyalay Bharti 2024 ?

उत्तर : सदर भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार सोबतच MSCIT कौशल्य असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.