ITBP Constable Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो , आज Jobschemewala जॉब अपडेट मध्ये आपण आढावा घेणार आहोत ITBP ने नुकत्याच जाहीर केलेल्या Constable Bharti 2024 संदर्भात.इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दला (ITBP) ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर तब्बल ८०० पेक्षा जास्त कॉन्स्टेबल पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
सरकारी नोकरी आणि पोलीस दलात काम करण्याची एक मोठी संधी उमेदवारांना असणार आहे.कॉन्स्टेबल पदासाठी काय पात्रता आवश्यक आहे, अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे , निवड प्रक्रिया कशी असेल या सर्व बाबी विस्तृतपणे आजच्या ITBP Constable Bharti 2024 लेखात बघणार आहोत.
ITBP Constable Bharti 2024 Overview
यासाठी नजर टाकूया पुढील टेबलवर ,
जाहिरात प्रसिद्ध : | इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल ( Indo Tibetian Border Police Force ) |
पदाचे नाव : | कॉन्स्टेबल ( Constable ) |
रिक्त जागा : | ८१९ जागा |
नोकरीचे ठिकाण : | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ : | अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा |
ITBP Constable Bharti 2024 Important Dates
सदर भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यामुळे अर्ज स्विकारण्याची सुरवात केव्हा होणार आहे आणि शेवटच्या कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहेत ते बघूया. यानुसार
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख : | जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून |
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : | १ ऑक्टोबर २०२४ |
CISF Constable Bharti 2024: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात बारावी उत्तीर्ण उमेदवारांना संधी !
अर्ज भरण्यासाठी जरी ३० दिवसाची मुदत दिली गेली असली तरी शेवटच्या वेळी होणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता उमेदवारांनी आपले अर्ज लवकर भरायचे आहे.
ITBP Constable Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव अन् त्यासाठी असणाऱ्या रिक्त जागा लक्षात घेता ,
पदाचे नाव : | कॉन्स्टेबल (Kitchen Services) |
पद संख्या : | ८१९ जागा |
Supreme Court Bharti 2024: सुप्रीम कोर्टात दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी, आत्ताच अर्ज करा
ITBP Constable Bharti 2024 Eligibility Criteria
सदर भरतीसाठी कोणता उमेदवार पात्र असेल यासाठी आयोगाने पात्रतेचे निकष दिले आहेत. उमेदवाराने हे सर्व निकष वाचणे आवश्यक आहे यानुसार यात प्रामुख्याने वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता या दोन घटकांचा समावेश आहे.
१) वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय १८ वर्ष पूर्ण तर अधिकतम वय हे २५ वर्ष पूर्ण असावे.
२) शैक्षणिक पात्रता :
कॉन्स्टेबल पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे , उमेदवार मान्यता प्राप्त संस्थेमधून दहावी उत्तीर्ण असावा सोबतच अन्न उत्पादन अथवा स्वयंपाकघरातील NSQF लेव्हल १ हा कोर्स पूर्ण केलेला असावा.
ITBP Constable Bharti 2024 How to Apply
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी १ ऑक्टोबर २०२४ ही शेवटची तारीख दिली असली तरी उमेदवारांनी या साठी अर्ज कुठे करायचा आहे ते बघूया. यासाठी उमेदवाराने ITBP ने आपल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या recruitment.itbpolice.nic.in या संकेतस्थळावर जायचे आहे.
सर्वात आधी उमेदवारांना नाव नोंदणी करून स्वतःसाठी आयडी आणि पासवर्ड तयार करू घायचा आहे. यानंतर लॉगिन करून अर्जात विचारलेली वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती संपर्क माहिती आणि अपलोड करायचे आवश्यक कागदपत्रे यासर्व गोष्टी अचूक नमूद करून अर्ज सबमिट करायचा आहे.
ITBP Constable Bharti 2024 Application Fee
अर्ज संपूर्णतः भरून झाल्यावर उमेदवारांना अर्ज शुल्क भरायची आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उमेदवारांना अर्ज शुल्क भरता येणार आहे. अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख ही १ ऑक्टोबर २०२४ असणार आहे.
अर्ज शुल्क ( इतर घटकासाठी ) : | ₹ १०० |
अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती, अपंग घटक आणि महिला : | अर्ज शुल्क नाही |
ITBP Constable Bharti 2024 Selection Process
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात कॉन्स्टेबल पदासाठी निवड होण्यासाठी उमेदवारांना चाचण्यांना सामोरे जायचे आहे. प्रामुख्याने ही सर्व निवड प्रक्रिया तीन टप्प्यात होईल यानुसार
पहिला टप्पा : Physical Efficiency Test (PET)
दुसरा टप्पा : Physical Standard Test (PST)
तिसरा टप्पा : Writeen Test (MCQ)
यातून निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणी पडताळणी तसेच वैद्यकीय चाचणी साठी बोलावले जाईल. यानंतर उमेदवारांची अंतिम निवड यादी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.
ITBP Constable Bharti 2024 Physical Test
कॉन्स्टेबल पदासाठी असलेली भरतीसाठी पुरुष आणि महिला दोन्ही अर्ज करू शकतात. मात्र दोघांसाठी होणारी शारिरीक चाचणी ही वेगवेगळी असणार आहेत. दोन्ही मध्ये धावणे , उंच उडी यांचा समावेश आहे. यानुसार
१) पुरुषांसाठी : १.६ किमी धावणे , वेळ आहे ७.३० मिनिटे आणि उंच उडीसाठी ३ संधी असतील.
२) महिलांसाठी : ८०० मीटर धावणे , वेळ आहे ४.४५ मिनिटे आणि उंच उडीसाठी ३ संधी असतील.
ITBP Constable Bharti 2024 Exam Pattern
सदर भरतीसाठी होणारी लेखी परीक्षा पद्धत काय असणार आहे बघूया. लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची म्हणजेच MCQ प्रकारची असेल. यामध्ये ५० प्रश्न आणि त्यासाठी ५० गुण साठी परीक्षा होईल यानुसार ,
विषय | प्रश्न संख्या | गुण |
जनरल नॉलेज | १५ | १५ |
गणित | १० | १० |
बौद्धिक क्षमता चाचणी | १५ | १५ |
इंग्रजी / हिंदी भाषा ज्ञान | १० | १० |
एकूण | ५० | ५० |
ITBP Constable Bharti 2024 FAQ
१) Who is eligible for ITBP Constable Bharti 2024?
उत्तर : सदर भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे सोबतच स्वयंपाक गृह संबंधित NSQF कोर्स पूर्ण केलेला असावा.
२) How to apply for ITBP Constable Bharti 2024?
उत्तर : वरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवाराने वर दिलेल्या How to Apply या सेक्शन ला वाचून घ्यायचा आहे.
३) What is the last date of ITBP Constable Bharti Application Form?
उत्तर : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आयोगाने शेवटची तारीख ही १ ऑक्टोबर २०२४ दिली आहे.