Integral Coach factory चेन्नई स्थित असलेल्या इंटिग्रल कोच फॅक्टरी मध्ये प्रशिक्षणार्थी या पदासाठी एकूण १०१० जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. चला तर बघूया कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत , निवड प्रक्रिया असणार आहे आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज कोणत्या प्रकारे करता येणार आहे या सर्व बाबींचा समावेश या लेखांमध्ये करण्यात आला आहे. चला तर बघूया इंटिग्रल कोच फॅक्टरी भरती २०२४
Integral Coach factory Recruitment 2024 Overview
नुकतेच इंटिग्रल कोच फॅक्टरी ने आपल्या जाहिरात क्रमांक यानुसार प्रशिक्षणार्थी या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रेल्वेचे इंटिग्रल कोच फॅक्टरी हे तमिळनाडूमधील चेन्नई या ठिकाणी आहे.
ज्या उमेदवारांनी आपले आयटीआय परीक्षा उत्तीर्ण केली असेल अशा उमेदवारांसाठी तब्बल १०१० जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून रेल्वे मध्ये काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अशाप्रकारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२४ असणार आहे.
जाहिरात प्रसिद्ध : | इंटिग्रल कोच फॅक्टरी ( Integral Coach factory ) |
पदाचे नाव : | प्रशिक्षणार्थी ( Apprenticeship ) |
पदांची संख्या : | १०१० जागा |
अर्जाची पद्धत : | ऑनलाइन अर्ज पद्धत. ( Online Mode ) |
अधिकृत संकेतस्थळ : | https://pb.icf.gov.in. |
Integral Coach factory Recruitment 2024 Important Dates
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाने प्रसिद्ध केलेली जाहिरात संपूर्ण वाचणे आवश्यक आहे. सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रियासाठी इंडियन कोच फॅक्टरीने ऑनलाईन अर्ज प्रणालीचा अवलंब केला आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे , अशा उमेदवारांनी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख व अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवणे गरजेचे आहे .
चला तर बघूया नेमक्या कोणत्या तारखेदरम्यान उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : | २२ मे २०२४ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख : | २१ जून २०२४ |
Table of Contents
Integral Coach factory Recruitment 2024 Vacancies
जागांचा विचार करता इंटेग्रल कोच फॅक्टरी ने तब्बल १०१० जागांसाठी अर्ज मागविले आहेत. या जागांची विभागणी नुकतेच पास झालेले आयटीआय उमेदवार म्हणजेच फ्रेश उमेदवार तसेच अनुभवी आयटीआय उमेदवार या दोन गटात केलेली आहे. दोन्ही गटांसाठी आवश्यक असलेले आयटीआय कोर्स हे समान आहेत. जे नवीन आयटीआय उमेदवार असतील त्यांच्यासाठी ३३० जागा तर अनुभवी आयटीआय उमेदवारांसाठी ६८० जागा असणार आहेत.
चला तर बघूया कोण कोणते आयटीआय कोर्सचा समावेश या भरती प्रक्रियेमध्ये करण्यात आला आहे तसेच कोणत्या आयटीआय कोर्स साठी किती जागा राखीव असणार आहेत.
फ्रेशर आयटीआय उमेदवार | अनुभवी आयटीआय उमेदवार | |
कारपेंटर ( Carpenter ) | ४० | ५० |
इलेक्ट्रिशियन ( Electrician ) | ४० | १६० |
फिटर ( Fitter ) | ८० | १८० |
मशिनिस्ट ( Machinist ) | ४० | ५० |
पेंटर ( Painter ) | ४० | ५० |
वेल्डर ( Welder ) | ८० | १८० |
मेडिकल लॅब टेक्निशियन रेडिओलॉजी ( MLT – Radiology ) | ५ | ० |
मेडिकल लॅब टेक्निशियन पॅथॉलॉजी ( MLT – Pathology ) | ५ | ० |
प्रोग्रामिंग अँड सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन असिस्टंट ( PASAA ) | ० | १० |
पदांची संख्या | ३३० | ६८० |
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी भरती UPSC NDA 2 2024
राखीव असलेल्या प्रवर्गानुसार म्हणजेच खुला प्रवर्ग इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व अपंग घटक या प्रवर्गासाठी केलेली जागांची विभागणी बघण्यासाठी उमेदवारांनी इंटिग्रल रेल्वे कोच फॅक्टरी द्वारा प्रसिद्ध केलेली जाहिरात बघणे आवश्यक आहे.
Integral Coach factory Recruitment 2024 Eligibility Criteria
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराने पात्रतेतील सर्व निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराने सदर भरती प्रक्रियेसाठी जाहीर केलेली जाहिरात बघणे आणि काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. यामध्ये रेल्वेने पात्र्याचे पात्रतेचे जे निकषक घालून दिले आहेत ते आपण थोडक्यात बघणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने नागरिकत्व , वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता या गोष्टी दिलेल्या आहेत.
चला तर या सर्व बाबीचा आढावा थोडक्यात बघूया.
१) राष्ट्रीयत्व ( Nationality ) :
अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
२) वयोमर्यादा ( Age Limit ) :
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी आयोगाने कमाल आणि किमान वयोमर्यादाची अट घालून दिली आहे. यानुसार आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असणारा उमेदवाराने किमान वय वर्ष १५ आणि कमाल वय वर्ष २४ असणे आवश्यक आहे.
आयोगाने वय शिथीलताबाबत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा साठी वय शिथीलता घालून दिली आहे. तसेच अपंग घटक या घटकासाठी देखील वय शिथीलता घालून दिली आहे.
चला तर बघूया कोणत्या प्रवर्गासाठी किती वर्षे वयशिथीलता ( Age Relaxation ) आयोगाने घालून दिलेली आहे.
अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती : | ५ वर्ष |
इतर मागासवर्गीय घटक : | ३ वर्ष |
अपंग घटक : | १० वर्ष |
जेव्हा उमेदवारांनी वय शिथिलतेचा फायदा घेणार आहे अशा उमेदवारांनी संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कागदपत्रे तपासणी व पडताळणी वेळेस सादर करणे आवश्यक आहे.
३) शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) :
शैक्षणिक पात्रतेचा विचार करता अर्ज करणारा उमेदवार हा दहावी मध्ये कमीत कमी ५० टक्क्यांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या संबंधित ट्रेड मधील आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभवी आयटीआय उमेदवार Ex ITI :
१) अर्ज करणारा उमेदवार हा १०+२ या पॅटर्ननुसार दहावी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराकडे राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र जे नॅशनल कौन्सिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग किंवा राज्य परिषद द्वारा १ वर्ष वोकेशनल ट्रेनिंग यांच्याकडून जारी केलेले असावे.
फ्रेश आयटीआय उमेदवार Fresher ITI :
२) अर्ज करणारा उमेदवार हा १०+२ या पॅटर्ननुसार दहावी ,बारावी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Integral Coach factory Recruitment 2024 Selection Process
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर जे अर्ज ग्राह्य धरले जातील किंवा असतील तेच अर्ज पुढील प्रक्रियेसाठी निवडले जातील. उमेदवारांच्या निवड प्रक्रियेचा विचार करता मिरीट लिस्ट ही उमेदवारांना दहावी मध्ये मिळालेल्या गुणांवर अवलंबून असेल.
जर उमेदवारांना समान गुण असतील तर जो उमेदवार वयाने जास्त असेल अशा उमेदवाराला निवडले जाईल.
तसेच उमेदवाराची निवड ही ट्रेड नुसार तसेच राखीव असलेल्या प्रवर्गा नुसार केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने नवे आयटीआय उमेदवार तसेच अनुभवी आयटीआय उमेदवार यांच्यासाठी असलेल्या राखीव जागेनुसार ही निवड होईल.
संबंधित निवडीच्या सूचना तसेच इतर आवश्यक सूचना या उमेदवारांना इंटिग्रल कोच फॅक्टरी च्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच किंवा उमेदवारांना एसएमएस द्वारा कळविले जाईल.
मेरिट लिस्ट मेरिट लिस्ट नुसार निवड झालेल्या उमेदवारांची शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी ही घेतली जाईल. यासाठी उमेदवारांना मेडिकल सर्टिफिकेट हे कागदपत्रे तपासणी वेळेस सादर करणे आवश्यक आहे.
Rate of Stipend :
ज्या उमेदवारांची निवड होईल अशा उमेदवारांना दरमहा काही रक्कम ही आयोगाकडून मानधन म्हणून दिली जाईल.चला तर बघूया नवखे आयटीआय उमेदवार तसेच अनुभवी आयटीआय उमेदवारांना दरमहा किती वेतन मिळणार आहे.
मानधन | |
फ्रेश आयटीआय उमेदवार Fresher ITI दहावी उत्तीर्ण : | दरमहा ₹ ६००० |
फ्रेश आयटीआय उमेदवार Fresher ITI बारावी उत्तीर्ण : | दरमहा ₹ ७००० |
अनुभवी आयटीआय उमेदवार Ex ITI : | दरमहा ₹ ७००० |
Period of Training :
निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून आपला प्रशिक्षण कालावधी पूर्ण करायचा आहे. आयोगाने आपल्या जाहिरातीमध्ये आयटीआय ट्रेड नुसार प्रशिक्षण कालावधी दिला आहे.
चला तर नजर टाकूया कोणत्या आयटीआय ट्रेड साठी किती वर्षाचा प्रशिक्षण कालावधी देण्यात आलेला आहे.
आयटीआय ट्रेड | Fresher ITI प्रशिक्षण कालावधी | Ex ITI प्रशिक्षण कालावधी |
इलेक्ट्रिशियन ( Electrician ) फिटर ( Fitter ) मशिनिस्ट ( Machinist ) | २ वर्ष २ वर्ष २ वर्ष | १ वर्ष १ वर्ष १ वर्ष |
पेंटर ( Painter ) कारपेंटर ( Carpenter ) वेल्डर ( Welder | २ वर्ष २ वर्ष १ वर्ष ३ महिने | १ वर्ष १ वर्ष १ वर्ष |
मेडिकल लॅब टेक्निशियन रेडिओलॉजी ( MLT – Radiology ) मेडिकल लॅब टेक्निशियन पॅथॉलॉजी ( MLT – Pathology ) प्रोग्रामिंग अँड सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन असिस्टंट ( PASAA ) | १ वर्ष ३ महिने १ वर्ष ३ महिने * | * * १ वर्ष |
Integral Coach factory Recruitment 2024 How to Apply
अर्ज करण्यासाठी आयोगाने ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले असून सदर अर्ज दिनांक २२ मे २०२४ पासून २१ जून २०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने केलेला अर्ज हा पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरला जाईल.
ज्या पात्र उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी इंटिग्रल कोच फॅक्टरी च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करून अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाने प्रसिद्ध केलेली जाहिरात पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे.तसेच ऑनलाईन पद्धतीने भरलेला अर्ज हा अचूक असल्याची खात्री केल्या नंतरच सबमिट करणे आवश्यक आहे.
अर्ज एकदा समिट झाल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करता येणार नाही.अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट स्वतः सोबत ठेवणे आवश्यक आहे.
अर्ज भरून झाल्यानंतर उमेदवारांना अर्ज शुल्क किंवा परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे यासाठी आयोगाने ऑनलाइन पद्धतीचा अवलंब केला असून केवळ याच पद्धतीने केलेले किंवा भरलेले परीक्षा शुल्क हे ग्राह्य धरले जाईल.
परीक्षा शुल्क किंवा अर्ज शुल्क : १०० रुपये
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा अपंग घटक तसेच महिला घटक यांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क किंवा अर्ज शुल्क भरावे लागणार नाही
Integral Coach factory Recruitment 2024 Documents
अंतिम यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणी व पडताळणीसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे यामध्ये पुढील कागदपत्रांचा समावेश असेल.
१) दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
२)बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
३) आयटीआय परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
४) जात प्रमाणपत्र जन्मतारखेचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांना कोणतेही कागदपत्रे अपलोड करायचे नसून सदर प्रकारचे कोणतेही कागदपत्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने देखील पाठवायचे नाही आहे.
Conclusion
इंटिग्रल कोच फॅक्टरी नुकतेच एक जाहिरात प्रसिद्ध केली असून यानुसार तब्बल १०१० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून यामध्ये प्रामुख्याने दहावी आणि बारावी उत्तीर्ण तसेच आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या अनुभवी आणि नवख्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शुल्क १०० रुपये असेल. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला गटात यांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क भरायचे नाहीये. उमेदवारांची निवड ही दहावी , बारावी परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांकनुसार होईल. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आयटीआय ट्रेड नुसार प्रशिक्षण कालावधी दिला असून उमेदवारांना या प्रशिक्षण कालावधीमध्ये काही रक्कम हे मानधन म्हणून दरमहा दिली जाईल.
Frequently Asked Questions
१) Integral Coach factory Recruitment 2024 साठी कोण अर्ज करू शकते?
उत्तर : इंटिग्रल कोच फॅक्टरी भरती २०२४ साठी दहावी आणि बारावी तसेच आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असणारा उमेदवार अर्ज करू शकतो अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय हे १५ वर्षे व कमाल वय २४ वर्ष असणे आवश्यक आहे.
२) Integral Coach factory Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
उत्तर : इंटिग्रल कोच फॅक्टरी भरती २०२४ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२४ आहे.
३) Integral Coach factory Recruitment 2024 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
उत्तर : सदर भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावी , बारावी परीक्षा किमान ५० टक्के सहित तसेच आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
४) Integral Coach factory Recruitment 2024 साठी परीक्षा शुल्क किती आहे ?
उत्तर : सदर भरतीसाठी परीक्षा शुल्क किंवा अर्ज शुल्क रुपये शंभर असणार आहे. मात्र अनुसूचित जमाती अनुसूचित जाती महिला व अपंग घटक यांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क भरायचे नाहीये.
५) Integral Coach factory Recruitment 2024 मध्ये किती जागांसाठी भरती प्रक्रिया वाढवण्यात येणार ?
उत्तर : इंटिग्रल कोच फॅक्टरी भरती २०२४ साठी नवखेळ आयटीआय उमेदवार आणि अनुभवी आयटीआय उमेदवार असे दोन्ही मिळून १०१० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सदर जागा या अनुक्रमे ३३० व ६८० अशा असणार आहेत.