Indian Army मध्ये इंजिनीअर्ससाठी मोठी भरती,लेफ्टनंट पदावर होणार निवड

Indian Army ने नुकतेच एक जाहिरात प्रसिद्ध केली असून यामध्ये इंजिनीअरिंग उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना भारतीय सैन्य दलात नोकरी करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज स्विकारण्याची सुरवात भारतीय सैन्य च्या अधिकृत संकेतस्थळावर झाली असून अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ही ९ मे २०२४ असणार आहे.

Indian Army TGC Recruitment Overview

भारतीय सैन्याने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलेल्या जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे एकूण ७२ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी वयोमर्यादा , शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ७ एप्रिल २०२४ पासून सुरू झाली आहे.

जाहिरातीनुसार सदर भरती ही ( TGC )Technical Graduation Course साठीची १४० वी बॅच म्हणून होणार आहे.म्हणूनच आपले इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण झालेला उमेदवार ह्या कोर्स मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज भरू शकतो.

जाहिरात प्रसिद्ध : भारतीय सैन्य ( Indian Army)
पदाचे नाव :टेक्निकल ग्रॅज्युएशन कोर्स
( Technical Graduation Course )
पदांची संख्या :७२ पदे
अर्ज पद्धत :ऑनलाईन पद्धत ( Online Mode )
अधिकृत संकेतस्थळ :www.joinindianarmy.nic.in
Indian Army recruit

Indian Army TGC Recruitment Important Dates

Indian Army ने अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन ( Online Mode ) ठेवल्याने उमेदवारांनी अर्ज भरण्याची शेवटची आणि सुरवातीची तारीख काय आहे हे लक्षात ठेवून अर्ज भरायचा आहे. अर्ज अपूर्ण असल्यास सदर उमेदवाराला पुढील टप्प्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही.

चला तर बघुया काय आहेत महत्वाच्या तारखा :

अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख : ७ एप्रिल २०२४
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : ९ मे २०२४

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची लिंक ही केवळ याच कालावधीमध्ये चालू असेल.

SSC CHSL 2024 स्टाफ सिलेक्शन मार्फत ३७१२ जागांची भरती जाहीर,मासिक वेतन ₹८१,०००

Indian Army TGC Recruitment Vacancies

इंजिनियर साठी राबविण्यात येणाऱ्या ह्या भरती प्रक्रियेत ज्या ७२ जागा भरल्या जाणार आहेत त्या सर्व जागांचा तपशील जाहिराती मध्ये सविस्तरपणे दिला आहे. यामध्ये ७२ रिक्त पदांचे वितरण हे कोअर इंजिनीअरिंग ब्रांच नुसार केले आहे. सोबतच ज्या कोअर इंजिनीअरिंग ब्रांच आहेत त्यासोबतच असणाऱ्या उप ब्रांच देखील तपशील मध्ये देण्यात आल्या आहेत. एक नजर टाकुया की कोणत्या इंजिनिअरिंग ब्रांचसाठी किती जागा भरल्या जाणार आहेत.

इंजिनीअरिंग ब्रांचपदांची संख्या
सिव्हिल इंजिनिअरिंग :
मेकॅनिकल इंजिनिअरिंग :
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग :
इलेक्ट्रॉनिक्स इंजिीअरिंग :
कॉम्प्युटर सायन्स :
इतर इंजिनिअरिंग ब्रांच :

TGC-140 व्या अभ्यासक्रमाचे (जानेवारी 2025) शिफारस केलेले उमेदवार ज्यांचे मेरिट लिस्ट नुसार अभियांत्रिकी शाखेच्या जाहीर झालेल्या रिक्त पदांच्य समावेश झालं नाही, अशा उमेदवारांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) मध्ये सामील होण्यासाठीची संधी दिली जाऊ शकते मात्र त्यांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) साठी लागणारे सर्व निकष ,अटी आणि शर्ती पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.

Indian Army TGC Recruitment Eligibility Criteria

भारतीय आर्मी ने आपल्या जाहिराती मध्ये उमेदवारासाठी पात्रतेच्या काही अटी घालून दिल्या आहेतं त्या अटी आणि निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. बघुया काय आहेत पात्रतेचे निकष.

१) राष्ट्रीयत्व :

भारतीय सैन्य मध्ये TGC मध्ये भरती होण्यासाठी अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

२) वयोमर्यादा :

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे किमान २० वर्ष आणि कमाल वय २७ वर्ष असावे. यासाठी उमेदवाराचा जन्म हा २ जानेवारी १९९८ ते १ जानेवारी २००५ या दरम्यान झालेला असावा.

३) शैक्षणिक पात्रता :

ज्या उमेदवार इंजिनीअरिंगचे पदवी परीक्षा उत्तीर्ण असतील किंवा जे उमेदवार इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असेल तर तसे उमेदवार अर्ज करू शकतात.

जे उमेदवार पदवीच्या शेवटच्या वर्षाला असतील त्यांनी १ जानेवारी २०२५ पर्यंत सर्व सेमीस्टरचे गुणपत्रक सादर करावे आणि पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र १२ आठवड्याच्या आत सादर करायचे आहे.

Indian Army TGC Recruitment How to Apply

उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी आयोगाने दिलेल्या संकेतस्थळावर http://www.joinindianarmy.nic.in वर जावून Officer Entry Level वर क्लिक करून नोंदणी करायची आहे.

Apply आणि लॉगिन वापरून उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे. अर्ज भरताना उमेदवाराने भरलेली वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती जात माहिती इत्यादी भरणे गरजेचं आहे.अर्ज भरून झाल्यावर अर्जाची फाईल आपल्याजवळ सेव करून ठेवावी. तसेच कागदपत्रे तपासणी वेळेस सदर अर्जाची प्रत सादर करावी.

Indian Army recruitment

Indian Army TGC Recruitment Selection Procedure

उमेदवारांची निवड ही पुर्णतः उमेदवारांना इंजिनिअरिंग पदवीच्या शेवटच्या सेमीस्टर/ वर्ष यामध्ये मिळवलेल्या गुण अथवा टक्केवारी यानुसार होईल. आयोगाने नमूद केलेल्या इंजिनिअरिंग ब्रांचचे सर्व मेरिट देखील याच धर्तीवर लावले जातील.

निवड झालेल्या उमेदवारांना आपण नोंदणी वेळी दिलेल्या ईमेल वर मुलाखती केंद्र बद्दल विचारणा केली जाईल. उमेदवारांनी आपल्या सोयीनुसार सदर मुलाखत केंद्र निवडायचे आहे.

मुलाखतीचे दोन टप्पे असतील . या दोन्ही टप्प्यात उमेदवारांनी पास होणे आवश्यक आहे. जे उमेदवार पहिल्या टप्प्यात नापास होतील त्यांना त्याच दिवशी परत पाठवले जाईल. तर पास उमेदवार पुढील टप्प्यासाठी बोलवले जातील. मुलाखत ही पाच दिवस चालणार आहे.

मुलाखती मधून पास झालेल्या उमेदवारांची मेरिट लिस्ट लावली जाईल. प्रत्येक ब्रांचची स्वातंत्र्य मेरिट लिस्ट लावली जाईल. मेरिट नुसार निवड करण्यात आलेला उमेदवारांना वैद्यकीय चाचणी साठी बोलावले जाईल.

वैद्यकीय चाचणी संबधित सर्व प्रक्रिया आणि मानके हे आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://www.joinindianarmy.nic.in वर जाहीर केलेले आहे.

Indian Army TGC Recruitment Commission Type

ज्या उमेदवार शेवटची फेरी पास होऊन मेरिट लिस्ट नुसार निवडले जातील त्यांना त्यांच्या पदानुसार Indian Military Academy Dehradun येथे प्रशिक्षनासाठी बोलावले जाईल. हा प्रशिक्षण कालावधी १२ महिने असा असेल. या दरम्यान उमेदवारांना प्रशिक्षण कालावधी पूर्ण होईपर्यंत लग्न करता येणार नाही आणि पालक नातेवाईक यांच्या सोबत राहता येणार नाही.

Type of Commission

१) Grant of Commission :

निवडलेल्या उमेदवारांना भारतीय लष्कर अकॅडमी मध्ये अभ्यासक्रम सुरू झाल्याच्या तारखेपासून किंवा इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) येथे अहवाल देण्याच्या तारखेपासून “लेफ्टनंट पदावरील प्रोबेशनवर अल्प सेवा” म्हणून काम करावे लागेल.

२) Permanent Commission :

१२ महिन्याचा प्रशिक्षण कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना लष्करात “लेफ्टनंट” या पदावर कायमस्वरूपी कमिशन केले जाईल.

३) Ante Date Seniority :

‘लेफ्टनंट पदा’वरील TGC प्रवेशाच्या अभियांत्रिकी पदवीधरांना कमिशनच्या तारखेपासून उमेदवारांना सेवेमध्ये एक वर्ष पूर्वीची ज्येष्ठता ही प्रदान केली जाईल.

Indian Army TGC Recruitment Conclusion

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणारा उमेदवार हा वयाची किमान २० आणि कमाल २७ वर्ष पूर्ण केलेला असून इंजिनियरिग उत्तीर्ण अथवा शेवटच्या वर्षाला असणे आवश्यक असून या वर्षाच्या सेमीस्टर मध्ये मिळालेल्या गुण टक्केवारी वर मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

मुलाखत ही दोन टप्प्यात होईल व पाच दिवस चालेल. शेवटच्या निवड यादीत निवडून येण्यासाठी दोन्ही टप्पे योग्य रित्या पास होणे आवश्यक आहे. सर्व निवड प्रक्रियेमधून पास झालेले उमेदवारांना एक वर्ष लेफ्टनंट या पदावर प्रोबेशन वर काम करायचे असून हा कालावधी पूर्ण केल्यानंतर कायमस्वरूपी पदावर घेतले जाईल.

Frequently Asked Questions

१) Indian Army TGC Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

उत्तर : Indian Army TGC Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मे २०२४ आहे.

२) Indian Army TGC Recruitment साठी कोण अर्ज करू शकते ?

उत्तर : वयाची किमान २० आणि कमाल २७ वर्ष पूर्ण केलेला असून इंजिनियरिग उत्तीर्ण अथवा शेवटच्या वर्षाला असलेला उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.

३) Indian Army TGC Recruitment निवडी साठी लेखी परीक्षा होणार आहे का ?

उत्तर : यासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नसून उमेदवारांची निवड ही मुलाखती मधून होईल.

४) Indian Army TGC Recruitment मधून मिळणार पद कोणते ?

उत्तर : मुलाखती मधून निवड झालेल्या उमेदवारांना लेफ्टनंट पदावर घेतले जाईल.


५) Indian Army TGC Recruitment साठी कोणत्या कोअर इंजिनीअरिंग शाखेचा समावेश आहे ?

उत्तर : भरती प्रक्रियेत सिव्हिल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स या कोअर इंजिनीअरिंग शाखेचा समावेश आहे