Indian Air Force Group C Recruitment 2024 : भारतीय हवाई दलाने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली असून यानुसार ऐकून १८२ जागा या भरती प्रक्रियेद्वारा भरले जाणार आहेत यामध्ये प्रामुख्याने निम्न श्रेणी क्लर्क, हिंदी टायपिस्ट , सिविलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर यासारख्या गट क वर्गातील पदांचा समावेश आहे.
Indian Air Force Group C Recruitment 2024 Overview
भारतीय हवाई दलाने दहावी व बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी जाहीर केलेल्या भरतीचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत.
जाहिरात प्रसिद्ध : | भारतीय हवाई दल ( Indian Air Force ) |
पदाचे नाव : | १) निम्न श्रेणी क्लर्क २) हिंदी टायपिस्ट ३) सिविलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर |
पद संख्या : | १८२ जागा |
अर्ज पद्धत : | ऑफलाईन अर्ज ( Offline Mode ) |
अधिकृत संकेतस्थळ : | https://indianairforce.nic.in/#top |
Indian Air Force Group C Recruitment 2024 Important Dates
ऑफलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाने जाहीर केलेल्या कालावधी मध्ये अर्ज भरणे आवश्यक आहे.
अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख : | ३ ऑगस्ट २०२४ |
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : | १ सप्टेंबर २०२४ |
IOCL Apprentice Bharti 2024 इंडियन ऑईल मध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांना संधी आजच अर्ज करा
Indian Air Force Group C Recruitment 2024 Vacancies
दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या १८२ जागांचा आढावा आपण घेऊया.
पदाचे नाव | पद संख्या |
१) निम्न श्रेणी क्लर्क : | १५७ |
२) हिंदी टायपिस्ट : | १८ |
३) सिविलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर : | ७ |
एकूण जागा | १८२ |
Indian Air Force Group C Recruitment 2024 Eligibility Criteria
ऑफलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाने जाहीर केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. आयोगाने उमेदवारांसाठी पात्रतेचे काही निकष घालून दिले आहे त्या पात्रतेचे पूर्तता उमेदवारांनी करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता इत्यादी बाबींचा समावेश आहे.
१) वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय हे १८ वर्षे व कमाल वय २५ वर्ष असणं आवश्यक आहे.
२) शैक्षणिक पात्रता : आयोगाने किमान शैक्षणिक पात्रता दहावी बारावी उत्तीर्ण अशी दिली असली तरी कोणत्या पदासाठी किती शैक्षणिक पात्रता लागणार आहे हे आपण बघणार आहोत.
१) निम्न श्रेणी क्लर्क : | सदर पदासाठी उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असावा तसेच संगणकावर टायपिंग येणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषेसाठी ३५ शब्द पर मिनिट किंवा हिंदी भाषेसाठी ३० शब्द पर मिनिट वेग असणे आवश्यक. |
२) हिंदी टायपिस्ट : | सदर पदासाठी उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असावा तसेच संगणकावर टायपिंग येणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषेसाठी ३५ शब्द पर मिनिट किंवा हिंदी भाषेसाठी ३० शब्द पर मिनिट वेग असणे आवश्यक. |
३) सिविलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर : | सदर पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवाराकडे जड व हलके वाहन चालक परवाना सहित दोन वर्षाचा अनुभव असावा. |
Indian Air Force Group C Recruitment 2024 How to Apply
आयोगाने वरील तिन्ही पदांसाठी ऑफलाईन अर्ज पद्धतीचा अवलंब केला आहे. यासाठी उमेदवाराने आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिद्ध पत्रकार सोबत असलेला अर्ज डाऊनलोड करायचा आहे. अर्जाची प्रिंट काढून घेतल्यानंतर अर्जात आवश्यक ती माहिती भरून त्यासोबत आयोगाने मागितलेले कागदपत्रे जोडावे आणि सदर अर्ज व कागदपत्रे पुढील पत्त्यावर अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आयोगाने जाहीर केलेली जाहिरात बघावी. |
Conclusion
भारतीय हवाई दलाने गट क वर्गातील निम्न श्रेणी क्लर्क , हिंदी टायपिस्ट , सिविलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर या पदासाठी १८२ जागांची भरती प्रक्रिया सुरू केली असून दहावी बारावी उत्तीर्ण उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. वय वर्ष १८ ते २५ वयोगटात पात्र असणाऱ्या उमेदवारांनी १ सप्टेंबर २०१४ पर्यंत आपले अर्ज आयगाने नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
Frequently Asked Questions
१) Who can Apply for the Indian Air Force Group C Recruitment 2024 ?
उत्तर : दहावी , बारावी उत्तीर्ण उमेदवार सोबतच संगणक टायपिंग कौशल्य असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
२) How to Apply for IAF Group C recruitment ?
उत्तर : आयोगाने जाहिरातीमध्ये दिलेल्या अर्जाची प्रिंट काढून अर्ज आवश्यक महिती आणि कागदपत्र सहित नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
३) What is the Last date to Apply for IAF Group C Recruitment ?
उत्तर : सदर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १ सप्टेंबर २०२४ असणार असून उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.