IBPS Recruitment 2024 : बँकिंग कार्मिक निवड संस्थेद्वारे विविध पदांच्या एकूण ८९६जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदानुसार पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने बँक ऑफ बडोदा , बँक ऑफ इंडिया , बँक ऑफ महाराष्ट्र , कॅनरा बँक , सेंट्रल बँक ऑफ इंडिया , इंडियन बँक , इंडियन ओवरसिज बँक यासारख्या बँकांचा समावेश असेल.
IBPS Recruitment 2024 Overview
आयबीपीएस द्वारा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये रिक्त असलेल्या ८९६ जागा सदर भरतीद्वारे भरली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने आयटी अधिकारी , कृषी क्षेत्र अधिकारी , राजभाषा अधिकारी , कायदा अधिकारी , एच आर अधिकारी , विपणन अधिकारी यासारखा पदांचा समावेश असेल.सदर वरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२४ आहे.
जाहिरात प्रसिद्ध : | आयबीपीएस (IBPS ) |
पदाचे नाव : | आयटी अधिकारी , कृषी क्षेत्र अधिकारी , राजभाषा अधिकारी , कायदा अधिकारी , एच आर अधिकारी , विपणन अधिकारी |
पद संख्या : | ८९६ जागा |
अर्ज पद्धत : | ऑनलाइन प्रणाली |
अधिकृत संकेतस्थळ : | https://www.ibps.in/ |
IBPS Recruitment 2024 Important Dates
सदर भरतीसाठी आयबीपीएस ने ऑनलाईन अर्ज प्रणालीचा अवलंब केल्याने आयोगाने आपल्या जाहिरातीमध्ये काही महत्त्वाच्या तारखा नमूद केला आहेत. बघूया एका तक्त्याच्या माध्यमातून ,
अर्ज नोंदणी करण्याची तारीख : | १ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२४ |
अर्ज शुल्क भरण्याची तारीख : | १ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२४ |
प्रवेश पत्र डाउनलोड : | ऑक्टोबर २०२४ |
ऑनलाइन पूर्वपरीक्षा : | नोव्हेंबर २०२४ |
ऑनलाइन पूर्व परीक्षेचा निकाल : | डिसेंबर २०२४ |
ऑनलाइन मेन्स परीक्षा : | डिसेंबर २०२४ |
मेन्स परीक्षेचा निकाल : | जानेवारी २०२४ |
मुलाखत : | फेब्रुवारी २०२४ |
अंतिम निकाल : | मार्च २०२५ |
IBPS Recruitment 2024 Vacancies
ज्या ८९६ पदांची जाहिरात आयबीपीएस कडून प्रसिद्ध करण्यात आली , यामध्ये कोणत्या सार्वजनिक बँकांमधील कोणत्या पदांचा समावेश करण्यात आला आहे आपण बघणार आहोत.
यामध्ये पुढील सार्वजनिक बँकांचा समावेश करण्यात आला आहे.
बँक ऑफ इंडिया | बँक ऑफ बडोदा | बँक ऑफ महाराष्ट्र |
कॅनरा बँक | सेंट्रल बँक ऑफ इंडिया | इंडियन बँक |
पंजाब अँड सिंध बँक | पंजाब नॅशनल बँक | इंडियन ओव्हरसीज बँक |
युनियन बँक ऑफ इंडिया | युको बँक. |
यामध्ये वरील सार्वजनिक बँकांमधील पुढील रिक्त पदे भरली जातील.
आयटी अधिकारी | कृषी क्षेत्र अधिकारी | कायदा अधिकारी |
राजभाषा अधिकारी | विपणन अधिकारी | एच आर अधिकारी |
Railway Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत आयटीआय उमेदवारांना संधी,तब्बल ३३१७ जागांची भरती
सार्वजनिक बँकांमधील पद आणि रिकाम्या जागा याचा विचार करता वर नमूद केलेल्या पदांसाठी खालील पदसंख्या आयोगाने जाहीर केली आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
आयटी अधिकारी : | १७० |
कृषी क्षेत्र अधिकारी : | ३४६ |
राजभाषा अधिकारी : | २५ |
कायदा अधिकारी : | १२५ |
एच आर अधिकारी : | २५ |
विपणन अधिकारी : | २०५ |
IBPS Recruitment 2024 Eligibility Criteria
स्पेशल अधिकारी म्हणून आयोगाने काही पात्रतेचे निकष आणून दिले आहेत यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीयत्व व वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता या बाबी समावेश केल्या आहेत
१) राष्ट्रीयत्व :
अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
२) वयोमर्यादा :
अर्ज करणारा उमेदवाराचे कमीत कमी वय २० वर्ष तर अधिकतम वय ३० वर्षे असणे आवश्यक आहे. आयोगाने अनुसूचित जाती – जमाती , इतर मागासवर्गीय तसेच अपंग घटक , माजी सैनिक यांच्यासाठी वय शिथिल करण्यात आली आहेत. त्यानुसार अनुक्रमे ५ वर्ष , ३ वर्ष , १० वर्ष आणि ५ वर्ष अधिकतम वयामध्ये शिथिल करण्यात आली आहेत.
३) शैक्षणिक पात्रता :
आयोगाने आयटी अधिकारी ,कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी , एच आर अधिकारी , विपणन अधिकारी यासाठी पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा दिली आहे. नजर टाकूया पुढील तक्त्यावर,
IBPS Recruitment 2024 How to Apply
पात्रतेच्या सर्व निकष पूर्ण करण्याने उमेदवारांसाठी आयोगाने ऑनलाइन प्रणालीचा अर्ज केल्या असून या व्यतिरिक्त कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आयोगाने आयबीपीएस च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन Click here to Apply Online for CRP Specialist Officer वर क्लिक करून अर्ज ओपन करायचा आहे. उमेदवारांना नवीन नाव नोंदणी करायची असून आयोगाने विचारलेली सर्व माहिती अचूक भरून पुढील अर्ज पूर्ण करायचा आहे.
अर्ज भरून झाल्यानंतर उमेदवारांना अर्ज शुल्क किंवा परीक्षा शुल्क म्हणून काही रक्कम भरणे आवश्यक आहे यानुसार
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अपंग घटक : | ₹१७५ |
वरील वर्ग सोडून उरलेले घटक : | ₹७८० |
ऑनलाइन अर्ज शुल्क झाल्यानंतर उमेदवारांना अंतिम अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जाची एक प्रत काढून स्वतः जवळ बाळगावी.
IBPS Recruitment 2024 Exam Pattern
स्पेशल ऑफिसर म्हणून होणाऱ्या परीक्षा पद्धतीचा विचार करता सदर परीक्षा ही तीन टप्प्यांमध्ये घेतली जाईल यामध्ये प्रामुख्याने ,
१) पूर्व परीक्षा | २) मेन्स परीक्षा | ३) मुलाखत |
यांचा समावेश असेल
Frequently Asked Questions
१) What is the Qualification for IBPS ?
उत्तर : आयबीपीएस परीक्षेसाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतली पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
२) What is the Last date to Apply IBPS recruitment 2024 ?
उत्तर : आयबीपीएस भरती २०२४ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२४ आहे.
३) What is the Full form of IBPS ?
उत्तर: आयबीपीएस चा फुल फॉर्म Institute of Banking Personal Selection ही भारतीय सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अधीन असणारी एक स्वायत्त संस्था आहे