उच्च न्यायालयात Translator पदाची भरती, आजच अर्ज करा,High Court Recruitment

High Court Recruitment 2024 नुसार मुंबई उच्च नायायलयाच्या औरंगाबाद खंडपीठ मध्ये Junior translator And Interpreter पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून उच्च न्यायालयात काम करण्यासाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना ही नामी संधी असणार आहे.

चला तर बघुया कोणते उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात ,अर्ज कसा भरायचा आहे ,उमेदवाराची निवड प्रक्रिया कशी असेल यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपल्या High Court Recruitment 2024 या ब्लॉग मध्ये मिळणार आहे , चला तर मग क्षणाचा ही विलंब न करता सदर जाहिरात बघुया.

High Court Recruitment 2024 Overview

औरंगाबाद खंडपीठ, मुंबई उच्च न्यायालयाच्या तीन खंडपीठापैकी एक असलेले खंडपीठ. नुकतीच Junior Translator and Interpreter या पदाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

जाहिरात क्रमांक :Adm/Advt/Jr.Trans/900/2024 नुसार एकूण सात जागांसाठी ही जाहिरात काढण्यात आली असून , खंडपीठाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

चला तर थोडक्यात बघुया High Court Recruitment 2024

जाहिरात प्रसिद्ध : मुंबई उच्च न्यायालय – औरंगाबाद खंडपीठ.
पदाचे नाव :कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी
Junior Translator and Interpreter
पदाची संख्या : ७ जागा
अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने ( Online Mode )
अधिकृत संकेतस्थळ : https://bombayhighcourt.nic.in

High Court Recruitment 2024 Vacancies

High Court Recruitment नुसार ज्या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्यात किती जागा आणि कोणते पदे भरली जाणार आहेत हे आपण बघणार आहोत.

तर मंडळी , या भरती प्रक्रिया मध्ये Junior Translator and Interpreter हे एकमेव पद भरले जाणार आहे. या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागांचा विचार केल्यास या पदासाठी एकूण सात जागा असणार आहेत.

मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे ही पदे भरली जाणार आहेत.खंडपीठाने आपल्या जाहिराती मध्ये सदर भरती ही कायमस्वरूपी नसून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचे सांगितले आहे.

TCIL Recruitment 2024 टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये ३५० पदांची भरती

निवड झालेल्या उमेदवारांना करार पद्धती वर दोन वर्ष कार्यरत रहायचे आहे. हा दोन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर त्या पुढील वाढीव कालावधीदरम्यान खंडपीठाच्या आवश्यकतेनुसार हे पद असेल. म्हणजेच खंडपीठाला गरज असेल तो पर्यंत सदर उमेदवार पदावर असेल आणि नसल्यास कोणतेही पूर्व सूचना न देता हे पद रद्द केले जाईल. या संबंधीचे सर्व बाबी अधिकार हे खंडपीठाने आपल्याकडे राखून ठेवले आहेत.

High Court Recruitment

High Court Recruitment 2024 Important Dates

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ज्या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत त्यासोबतच आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये काही महत्वाच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. ऑनलाईन अर्ज प्रणालीचा अवलंब केल्याने या द्वारे उपलब्ध असणाऱ्या लिंक ही दिलेल्या वेळेत ओपन असल्याने उमेदवारांनी याच कालावधी मध्ये अर्ज सादर करायचा आहे.

चला तर पाहूया अर्ज करण्याची सुरवात केव्हा होणार आहे आणि खंडपीठाने जर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाचा कालावधी दिला आहे तो नेमका काय आहे हे बघुया.

अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख : १५ मे २०२४
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : २९ मे २०२४
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख :२९ मे २०२४

High Court Recruitment 2024 Eligibility Criteria

कोणतेही अर्ज भरताना उमेदवाराने आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती मध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्ती वाचणे आवश्यक आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी आपण सर्व निकष पूर्ण करीत आहोत की नाही याची खात्री करून घ्यावी आणि मगच अर्ज भरावा.

चला तर बघुया खंडपीठाने पात्रतेचे कोण कोणते निकष घालवून दिले आहेत आणि कोणते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या मध्ये प्रामुख्याने राष्ट्रीयत्व , वयोमर्यादा , शैक्षणिक पात्रता, आरक्षण ह्या बाबी असतील.

१) राष्ट्रीयत्व Nationality :

Junior Translator and Interpreter पदासाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. असे नसल्यास उमेदवार सदर भरतीसाठी पात्र नसेल.

२) वयोमर्यादा Age Limit :

अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी आयोगाने किमान आणि कमाल वयाची अट किंवा मर्यादा घालून दिलेली आहे. केवळ याच वयोगटातील उमेदवार सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

किमान वयाचा विचार केल्यास वय वर्ष १८ ते कमाल वय ३८ वर्ष असणारा उमेदवार हा अर्ज भरू शकतात.या पदासाठी अर्ज करताना काही प्रवर्गासाठी वया बाबत शिथिलता देण्यात आली आहे.

चला तर बघुया कोणत्या वर्गासाठी किती वर्ष शिथिल करण्यात आली आहे.

अनुसुचित जाती अनुसूचित जमाती :५ वर्ष
इतर मागासवर्गीय घटक : ३ वर्ष
अपंग घटक : १० वर्ष

वय शिथिलता बाबत उमेदवारांना लाभ घेतला असेल तर तशा पात्रतेचे पुरावे सादर करणे उमेदवारांना आवश्यक असणार आहे.

३) शैक्षणिक पात्रता Educational Qualification :

शैक्षणिक पात्रता बाबत खंडपीठाने आपल्या जाहिराती मध्ये सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने पात्रता ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. सोबतच इतर काही शैक्षणिक अर्हता दिली आहे ती बघुया.

१) अर्ज करणारा उमेदवार हा कोणताही भाषा विषयात पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ही पदवी मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट अथवा बोर्ड कडून प्राप्त झालेली असावी. यामध्ये हिंदी , मराठी , कोंकणी ,गुजराथी या भाषा विषयातील पदवी असावी.

२) कायद्यामध्ये पदवी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी प्राधान्य दिले जाईल.

३) सोबतच उमेदवार हा English भाषेत निपुण असावा आणि उमेदवारांना हिंदी , मराठी , कोंकणी ,गुजराथी या पैकी किमान दोन भाषा अवगत असाव्या.

४) उमेदवारांकडे संगणकिय प्रमाणपत्र असावे यात प्रामुख्याने एमएस वर्ड एक्सेल, एमएस ऑफिस , ओपन ऑफिस ऑर्ग इत्यादी माहिती असावे.

High Court Recruitment

High Court Recruitment 2024 How to Apply

तर या भरती साठी उमेदवारांनी अर्ज कसे करायचे आहे. High Court Recruitment नुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून या साठी खंडपीठाने ऑनलाईन अर्ज प्रणालीचा अवलंब केला आहे.अर्जाची छाननी संगणकीय पद्धतीने केली जाणार असल्याने उमेदवारांनी जाहिरात काळजी पूर्वक वाचावी आणि ऑनलाईन अर्ज भरताना देखील माहिती अचूक भरावी.

अर्ज स्विकारण्यासाठी खंडपीठाने दिलेल्या अर्ज प्रणालीचा वापर करायचा असून इतर कोणत्याही मार्गाने केलेले अर्ज मान्य धरले जाणार नाही. उमेदवारांना https://bombayhighcourt.nic.in लिंक वर जावून अर्ज भरायचा आहे.

सदर लिंक ही आयोगाने दिलेल्या कालावधी मध्येच चालू असेल.

आपल्या जाहिराती मध्ये खंडपीठाने हा कालावधी नमूद केला आहे. त्या प्रमाणे अर्ज सुरू झाल्यापासून १५ दिवसाच्या आत अर्ज करावा. याचा अर्थ उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ही २९ मे २०२४ संध्याकाळी ५.०० वाजे पर्यंत असेल.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी आवश्यक असलेली अर्ज शुल्क/ परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक असणार आहे. अर्ज शुल्क न भरल्यास अर्जाची पूर्तता होणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.

अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची प्रत काढून आपल्या जवळ ठेवावी.

High Court Recruitment 2024 Application Fee

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी आवश्यक असलेली अर्ज करण्याची भरून अर्ज पूर्ण करावा. यासाठी खंडपीठाने अर्ज शुल्क म्हणून रुपये २०० ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. यासाठी पेमेंट गेटवे वापरताना State Bank Collect या पर्यायाचा वापर करायचा आहे.

अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख देखील २९ जून २०२४ , संध्याकाळी ४ वाजे पर्यंत असेल.

पेमेंट यशस्वी रित्या झालेले अर्जच ग्राह्य धरण्यात येईल.

High Court Recruitment 2024 Selection Process

Junior Translator and Interpreter पदासाठी नेमकी निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते बघुया. उमेदवाराच्या अंतिम निवडी साठी खंडपीठाने दोन टप्पे ठेवले आहेत.

एक टप्पा यशस्वी रित्या पास झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी बोलवले जाईल.

या दोन टप्प्याचा विचार केल्यास , पहिला टप्पा हा स्क्रिनिंग टेस्ट असेल , ही टेस्ट १०० गुणाची असेल व परीक्षा कालावधी ३ तास असेल. यात पास होणारे उमेदवार पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होतील. मात्र आयोगाने उमेदवारांसाठी कमीत कमी टक्के मर्यादा ठेवली असून कमीत कमी ५० % गुण तरी मिळणे गरजेचे आहे.

पुढील टप्प्यात उमेदवारांची तोंडी परीक्षा घेतली जाईल आणि या साठी २० गुण राखीव आहे.

चला तर एका टेबलच्या माध्यमातून पाहूया परीक्षा पॅटर्न कसा असेल ते.

टप्पापरीक्षा गुण कालावधी
पहिला टप्पास्क्रिनिंग टेस्ट १०० गुण३ तास
दुसरा टप्पातोंडी परीक्षा२० गुणनमूद नाही

High Court Recruitment 2024 Important Documents

स्क्रिनिंग टेस्ट पास झालेल्या उमेदवारांना तोंडी परीक्षा करिता बोलावले जाईल. त्यासाठी उमेदवारांनी काही आवश्यक कागदपत्रे प्रत आणि सोबत मूळ कागदपत्रे तपासणी पडताळणी साठी आपल्या सोबत बाळगायचे आहेत.

चला तर बघुया आवश्यक कागदपत्राची यादी :

१) ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत.

२) जन्म तारीख पुरावा प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला.

३) जात प्रमाणपत्र.

४) पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व गुणपत्रक.

५) संगणक ज्ञान प्रमाणपत्र.

६) अधिवास प्रमाणपत्र Domicile Certificate.

७) कॅरॅक्टर प्रमाणपत्र.

८) स्वयं: घोषित प्रतिज्ञा पत्र

High Court Recruitment 2024 Exam Pattern

उमेदवाराची निवड ही दोन टप्प्यात होणार आहे. यात पहिला टप्पा स्क्रिनिंग टेस्ट असणार आहे. यासाठी १०० गुणाची परीक्षा होणार असून यासाठी उमेदवारांना ३ तासाचा कालावधी देण्यात आला आहे. याच स्क्रिनिंग टेस्ट साठी नेमका कोणता अभ्यासक्रम , कोणते विषय असणार आहे आणि कोणत्या विषयासाठी किती गुण आहेत हे आपण बघणार आहोत.

विषयगुण
इंग्रजी व्याकरण
English Grammar
३०
निबंध लेखन
Eassy Writting
२०
पत्र लेखन
Letter Writing
१०
भाषांतर
Translation
४०

या स्क्रिनिंग टेस्ट साठी कमीत कमी ५० % गुणाची आवश्यकता असणार आहे.

Conclusion

Junior Translator and Interpreter पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३८ वर्ष असावे. अर्ज करणारा उमेदवार भाषा विषयात पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. कायदा पदवी असल्यास प्राधान्य दिले जाईल. उमेदवारांना २९ मे २०२४ अगोदर ऑनलाईन अर्ज आणि अर्ज शुल्क भरायची आहे. आधी स्क्रिनिंग मग यातून पात्र उमेदवारांना तोंडी परीक्षा करिता बोलावले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी ही अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

Frequently Asked Questions

१) High Court Recruitment 2024 मध्ये कोणते पदे भरली जाणार आहेत ?

उत्तर : उच्च न्यायालय भरती मध्ये Junior Translator and Interpreter या पदासाठी एकूण सात जागा भरल्या जाणार आहेत.

२) औरंगाबाद खंडपीठाने High Court Recruitment अंतर्गत कोण अर्ज करू शकतात ?

उत्तर : भाषा विषयात पदवी किंवा कायदा मध्ये पदवी असलेले उमेदवार थेट अर्ज दाखल करू शकतात.

३) High Court Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

उत्तर : उच्च न्यायालय भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२४ असणार आहे.

४) High Court Recruitment 2024 साठी अर्ज शुल्क किती आहे ?

उत्तर : उच्च न्यायालय भरतीसाठी अर्ज शुक्ल रुपये २०० आहे.

५) High Court Recruitment 2024 कोणत्या खंडपीठात भरती होणार आहे ?

उत्तर : उच्च न्यायालयाच्या तीन खंडपीठ पैकी औरंगाबाद या खंडपीठात Junior Translator and Interpreter पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.