HDFC Bank Parivartan Scholarship 2024 : HDFC म्हणजेच हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी द्वारे नुकतेच एक प्रसिद्ध पत्रक जाहीर करण्यात आले असून या नुसार पहिलीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेत असेलल्या विद्यार्थ्यांना बँकेकडून स्कॉलरशिप मिळणार आहे. चला तर बघूया नमेके कोण अर्ज करू शकतात अन् किती रक्कम स्कॉलरशिप म्हणून मिळणार आहे.
HDFC Bank Parivartan Scholarship 2024 Overview
एच डी एफ सी बँकेने पहिली पासून पदवी पर्यंत अन् पुढे उच्च शिक्षण घेऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊ केली आहे. सदर योजना सरसकट सगळ्याच विद्यार्थांना लागू नसेल यात कोणते विद्यार्थी असतील हे आपण बघणार आहोत.
स्कॉलरशिपचा विचार करता रूपये १५००० पासून रूपये ७५००० पर्यंत रक्कम विद्यार्थ्याना मिळणार आहे.यासाठी अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ४ सप्टेंबर २०२४ आहे.
HDFC Bank Parivartan Scholarship 2024 Important Dates
स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी बँकेने ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. यासाठी आयोगाने अर्ज आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले असून सदर अर्जासाठी ठराविक कालावधी दिला आहे. विद्यार्थ्यांना याच कालावधी मध्ये अर्ज करायचा आहे. यानुसार,
अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख : | जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : | ४ सप्टेंबर २०२४ |
HDFC Bank Parivartan Scholarship 2024 Eligibility
सामाजिक दायित्व लक्षात घेऊन एच डी एफ सी ने जाहीर केलेली शिष्यवृत्तीसाठी काही पात्रतेचे निकष दिले आहेत. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी हे सर्व निकष वाचणे आवश्यक आहे. यानुसार
१) शालेय विद्यार्थी : |
अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असावा.मागील शैक्षणिक वर्षात किमान ५५% गुण मिळालेले असावे व विद्यार्थी पुढील शिक्षण घेत असावा. कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा जास्त नसावे.या गटात १ ली ते १२ वी मधील तसेच पदविका अभ्यास करणारे विद्यार्थी असतील.
२) पदवी पर्यंतचे विद्यार्थी : |
सदर गटात बॅचलर पर्यंतचे पदवी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी असतील. यासाठी देखील विद्यार्थी भारतीय नागरिक असावा कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न २.५ लाखाच्या घरात असावे. सद्या शिक्षण घेत असावा आणि महत्वाचे म्हणजे मागील शैक्षणिक वर्षात किमान ५५% प्राप्त झालेले असावे.
३) पदवी नंतरचे विद्यार्थी : |
सदर गटात उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील यात मास्टर पदवी जसे की MA, M.Tech, M.Com, M.Sc.यासाठी देखील विद्यार्थी भारतीय नागरिक असावा कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न २.५ लाखाच्या घरात असावे. सद्या शिक्षण घेत असावा आणि महत्वाचे म्हणजे मागील शैक्षणिक वर्षात किमान ५५% प्राप्त झालेले असावे.
HDFC Bank Parivartan Scholarship 2024 Scholership
आता बघुया की नेमकी किती रक्कम स्कॉलरशिप म्हणून मिळणार आहे. ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर कागदपत्रे अर्ज छाननी करण्यात आल्यावर पात्र असणाऱ्या विद्यार्थांना ही रक्कम मिळणार आहे. यानुसार,
शालेय विद्यार्थी गट : | ₹ १५००० ते ₹ १८००० |
पदवी पर्यंतचे विद्यार्थी गट : | ₹ ३०००० ते ₹ ५०००० |
पदवी नंतरचे विद्यार्थी गट : | ₹ ३५००० ते ₹ ७५००० |
HDFC Bank Parivartan Scholarship How to Apply
तर आता प्रश्न पडतो की अर्ज कुठे करायचा आहे. Buddy4Study या पोर्टलवर जावून तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. HDFC Bank Parivartan Scholarship पेज वर गेल्यावर आपल्या गटानुसार विद्यार्थांना Apply वर क्लिक करायचे आहे. पुढे नोंदणी करून अर्ज भरायचा आहे. अर्ज भरताना आवश्यक ते कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करायचे आहे. सर्व माहिती अचूक असल्याचे पडताळून अर्ज सबमिट करायचा आहे.
HDFC Bank Parivartan Scholarship 2024 Documents
ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थांना जे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहे त्याची यादी आपण बघूया.
१) विद्यार्थ्याचे ओळखपत्र. | ४) चालू शैक्षणिक वर्षाचे प्रवेश पावती. |
२) पासपोर्ट साइज फोटो. | ५) बँक खाते स्टेटमेंट |
३) मागील शैक्षणिक वर्षाचे गुणपत्रक. | ६) प्रतिज्ञापत्र |
Frequently Asked Questions
१) Who is Eligible for HDFC Bank Parivartan Scholarship 2024 ?
उत्तर : १ली ते पदवी – उच्च शिक्षण घेणारे आणि पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.यानुसार २.५ लाखाच्या आत कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न , ५५% गुण इत्यादी बाबी असतील.
२) What is the Last date to Apply for HDFC Bank Parivartan Scholarship 2024 ?
उत्तर : शिष्यवृत्ती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ सप्टेंबर २०२४ आहे.
३) Which Documents are required to Apply for HDFC Bank Parivartan Scholarship 2024 ?
उत्तर : सदर स्कॉलरशिप साठी लागणारे कागदपत्रात पासपोर्ट सायझ फोटो , ओळखपत्र , मागील वर्षाचे मार्कशीट, बँक खाते, प्रवेश पावती इत्यादी.