HAL Recruitment 2024 नुसार आयटीआय ( ITI ) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ( HAL ) मध्ये “प्रशिक्षणार्थी” म्हणून काम करायची संधी मिळणार आहे. यानुसार विविध आयटीआय ट्रेड च्या एकूण २०० रिक्त जागा या भरल्या जाणार आहेत.
HAL Recruitment 2024 Overview
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली असून यामध्ये Apprentice Act 1961 नुसार ज्या उमेदवारांचे फिटर , इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक , इलेक्ट्रिशन , टर्नर , वेल्डर यासारख्या विविध आयटीआय ट्रेड परीक्षा उत्तीर्ण झाले असतील , त्यांच्यासाठी भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ( DoT&D) अंतर्गत असणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये काम करायला मिळणार आहे.
HAL ने जाहिरात क्रमांक HAL / HD / TRG / 2024-25 / NAPS/ 01 नुसार ही २०० जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सदर भरती प्रक्रिया ही बालनगर , हैदराबाद या ठिकाणी असणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये केली जाणार आहे.
चला तर बघूया कोण कोणते आयटीआय ट्रेड उत्तीर्ण असलेल्या उमेदवार सदर भरतीसाठी पात्र असतील तसेच कोणत्या ट्रेड साठी किती जागा राखीव असतील , भरतीची निवड प्रक्रिया कशी असेल यासंबंधी सर्व आवश्यक बाबींचा आढावा आपण HAL Recruitment 2024 या लेखातून घेणार आहोत.
जाहिरात प्रसिद्ध : | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited : HAL) |
पदाचे नाव : | “प्रशिक्षणार्थी” |
पदाची संख्या : | २०० जागा |
अर्ज नोंदणी संकेतस्थळ : | www.apprenticeshipindia.gov.in |
अधिकृत संकेतस्थळ : | https://www.hal-india.co.in/ |
HAL Recruitment 2024 Important Dates
HAL Recruitment ने आपल्या जाहिरातीमध्ये काही महत्त्वाच्या तारखा नमूद केलेले आहेत. आयोगाने अर्ज भरण्याची किंवा अर्ज भरण्याची शेवटची तारीख देण्यात आली नसून सदर भरती प्रक्रिया ही सरळ मुलाखती द्वारा केली जाणार असून पात्र असणाऱ्या उमेदवारांची मुलाखत ही आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वेळ आणि तारखेनुसार घेतली जाईल. २० मे , २१ मे , २२ मे २०२४ या वेळी मुलाखत कार्यक्रम पार पडला जाईल.
Table of Contents
HAL Recruitment 2024 Vacancies
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ने जाहीर केलेल्या जाहिरातनुसार तब्बल १४ आयटीआय ट्रेड च्या एकूण २०० जागा रिक्त आहेत. आयोगाने आपल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या ट्रेड उत्तीर्ण असलेला उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे.
चला तर बघूया नेमके कोणते ट्रेड या भरतीसाठी पात्र असतील आणि कोणत्या आयटीआय ट्रेड साठी किती जागा राखीव आहे. यावर एक नजर टाकूया
आयटीआय ट्रेड | आयटीआय ट्रेड साठी जागा |
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electronic Mechanic) | ५५ |
फिटर (Fitter) | ३५ |
इलेक्ट्रिशियन (Electrician) | २५ |
मशिनिस्ट (Machinist) | ८ |
टर्नर (Turner) | ६ |
वेल्डर (Welder) | ३ |
रिफ्रजेरेशन आणि एसी (Refrigeration And AC ) | २ |
COPA | ५५ |
पेंटर (Painter) | ५ |
डिझेल मेकॅनिक (Diesel Mechanic) | १ |
मोटर वेहिकल मेकॅनिक (Motor Vehicle Mechanic) | १ |
ड्राफ्ट्समन सिविल (Draftsman Civil ) | १ |
ड्राफ्ट्समन मेकॅनिकल (Draftsman Mechanical) | १ |
प्लंबर (Plumber) | २ |
TCIL Recruitment 2024 टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये ३५० पदांची भरती
या १४ ट्रेड चा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. जे उमेदवार आयोगाने दिलेले वरील आयटीआय ट्रेड उत्तीर्ण असतील ते उमेदवार सदर भरतीसाठी पात्र असतील.
HAL Recruitment 2024 Eligibility Criteria
HAL Recruitment नुसार जी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे , त्यानुसार भारतीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय द्वारा राबविण्यात येणाऱ्या विविध ट्रेड चा समावेश या भरती प्रक्रियेत करण्यात आला आहे. सदर भरती प्रक्रिया प्रशिक्षणार्थी म्हणून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी आयोगाने आपल्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये काही पात्रतेचे निकष घालून दिलेले आहेत.
चला तर बघूया नेमके कोणते उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात पात्रतेच्या निकषाचा विचार केलास यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीयत्व , वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता यासारख्या निकषांचा समावेश आहे
१) वयोमर्यादा ( Age Limit ) :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान १५ वर्ष पूर्ण असावे आणि उमेदवाराचे कमाल वय हे २४ वर्ष पेक्षा जास्त नसावे. खुला प्रवर्ग अनुसुचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आणि अपंग घटक यांच्यासाठी वायाबाबत शासन नियमानुसार वय शिथिलता देण्यात आली आहे.
सोबतच आयोगाने सरकार नियमानुसार अनुसूचित जाती ( Scheduled Caste ), अनुसूचित जमाती ( Scheduled Tribes ) , इतर मागासवर्गीय ( Other Backward Classes ) आणि अपंग घटक ( Physically Handicapped) यांच्या साठी वय शिथिलता Age Relaxation देण्यात आली आहे.
बघुया कोणत्या प्रवर्गासाठी किती वय शिथिलता ( Age Relaxation ) आहे.
अनुसुचित जाती अनुसूचित जमाती ( Scheduled Caste and Scheduled Tribe ) : | ५ वर्ष |
इतर मागासवर्गीय ( Other Backward Classes ) : | ३ वर्ष |
अपंग घटक ( Physically Handicapped ) : | १० वर्ष |
२) शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) :
शैक्षणिक पात्रता लक्षात घेता आयोगाने रिक्त जागांसाठी आवश्यक असलेल्या विविध आयटीआय ट्रेड चा सामावेश केला आहे. एकुण १४ ट्रेड यामध्ये असतील. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणारा उमेदवार हा दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय ट्रेड उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
बघुया कोणत्या ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electronic Mechanic) | फिटर (Fitter) |
इलेक्ट्रिशियन (Electrician) | मशिनिस्ट (Machinist) |
टर्नर (Turner) | रिफ्रजेरेशन आणि एसी (Refrigeration And AC) |
COPA | पेंटर (Painter) |
डिझेल मेकॅनिक (Diesel Mechanic) | मोटर वेहिकल मेकॅनिक (Motor Vehicle Mechanic) |
ड्राफ्ट्समन सिविल (Draftsman Civil) | ड्राफ्ट्समन मेकॅनिकल (Draftsman Mechanical) |
वेल्डर (Welder) | प्लंबर (Plumber) |
HAL Recruitment 2024 How to Apply
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ने जाहीर केलेल्या प्रशिक्षणार्थी या पदासाठी पात्रता असणाऱ्या उमेदवारांना पुढील वेबसाईट पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी करायची आहे.
नाव नोंदणीसाठी उपलब्ध वेब पोर्टल : www.apprenticeshipindia.gov.in
नाव नोंदणी झाल्यानंतर उमेदवारांना योग्य ई-मेल आयडी मोबाईल क्रमांक तसेच आयटीआय प्रमाणपत्र प्रमाणपत्र आधार कार्ड नंबर जन्मतारीख जात आणि आयटीआय ट्रेड यासंबंधीची सर्व माहिती भरायची आहे. उमेदवारांना सोबत काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे तर यामध्ये दहावीचे प्रमाणपत्र , आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र ,आधार कार्ड नंबर , फोटोग्राफ , सही असतील.
चुकीची माहिती किंवा पूर्ण अर्ज हे पुढील निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य दिले जाणार नाहीतसदर भरती प्रक्रिया ही सरळ मुलाखतीद्वारे भरली जाणार असल्याने उमेदवारांना आपला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे.
जर उमेदवार सेंटर ऑफ एक्सेलेन्स योजनेनुसार प्रशिक्षणार्थी म्हणून उत्तीर्ण असतील अशा उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.
HAL Recruitment 2024 Selection Procedure
निवड प्रक्रियेचा विचार करता हिंदुस्तानी एरोनॉटिक्स लिमिटेड आपल्या जाहिरातीमध्ये निवड प्रक्रिया नमूद केलेली आहे. यानुसार जे उमेदवार पात्र असतील अशा उमेदवारांची निवड ही सरळ मुलाखती द्वारे करण्यात येईल.
सदर निवड प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जाणार नसून आयोगाने नमूद केलेला तारीख आणि वेळेनुसार ज्या ट्रेड ची मुलाखत आयोजित केली आहे. नमूद ट्रेड मधील उमेदवारांना मुलाखत ज्या स्थळी होणार आहे त्या मुलाखत स्थळी उपस्थित राहायचे आहे.
आयोगाने मुलाखतीचा कार्यक्रम राबविताना ज्या १४ आयटीआय ट्रेड साठी प्रशिक्षण पदासाठी ही भरती राबविण्यात येत आहे , त्या १४ ट्रेडसाठी असणाऱ्या मुलाखती या तीन वेगवेगळ्या तारखेला आयोजित केल्या आहेत आणि या तीन तारखे मध्येच या चैदा आयटीआय ट्रेड ची विभागणी केली असून त्यामध्ये पुन्हा सदर दिवशी आयोगाने दिलेल्या रिपोर्टिंग टाईम स्लॉट नुसार आयटीआय ट्रेड उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया पार पाडली जाईल.
चला तर बघूया नेमक्या कोणत्या तारखेला मुलाखती घेतल्या जाणार आहेत आणि कोणत्या आयटीआय ट्रेड साठी कोणती तारीख आणि वेळ आयोगाकडून जाहीर केली आहे. नजर टाकूया पुढील एका तक्त्यावर.
आयटीआय ट्रेड | मुलाखतीची तारीख | मुलाखतीची वेळ |
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electronic Mechanic) , डिझेल मेकॅनिक (Diesel Mechanic) | २० मे २०२४ | ९.०० वाजता |
फिटर (Fitter), प्लंबर (Plumber) ,पेंटर (Painter) | २० मे २०२४ | १.०० वाजता |
COPA , मोटर वेहिकल मेकॅनिक (Motor Vehicle Mechanic) | २१ मे २०२४ | ९.०० वाजता |
इलेक्ट्रिशियन (Electrician), ड्राफ्ट्समन मेकॅनिकल (Draftsman Mechanical) | २१ मे २०२४ | १.०० वाजता |
मशिनिस्ट (Machinist), टर्नर (Turner) रिफ्रजेरेशन आणि एसी (Refrigeration And AC) | २२ मे २०२४ | ९.०० वाजता |
वेल्डर (Welder) , ड्राफ्ट्समन सिविल (Draftsman Civil) | २२ मे २०२४ | १.०० वाजता |
मुलाखतीचा स्थळ : Auditorium, Behind Department of Training & Development, Hindustan Aeronautics Limited, Avionics Division, Balanagar, Hyderabad- 500042.
निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी ही हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. तसेच निवड झालेल्या उमेदवारांच्या ईमेल आयडी वर देखील पाठविले जाईल.
HAL Recruitment 2024 Application Fee
HAL Recruitment 2024 साठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आयोगाकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. आयोगाने अशा प्रकारचे कोणतेही परीक्षा शुल्क किंवा अर्ज शुल्क आपल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेले नाही.
Stipend : प्रशिक्षणार्थी कायदा 1961 नुसार उमेदवारांना प्रशिक्षणार्थी काळामध्ये वेतन म्हणून Stipend म्हणून काही रक्कम दिली जाईल.
HAL Recruitment 2024 Documents
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड चा प्रशिक्षणार्थी या पदासाठी ज्या मुलाखती पार पाडल्या जाणार आहेत. त्यासाठी उमेदवारांना काही आवश्यक कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. चला तर बघूया कोणते आवश्यक कागदपत्रे आयोगाने पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून मागविले आहेत. यामध्ये आयोगाने काही कागदपत्रे हे तपासणी पडताळणी साठी मागविले असून काही कागदपत्रे हे जमा करावे लागणार आहे.
तपासणी पडताळणी साठी आवश्यक असलेली कागदपत्रे :
१) आधार कार्ड.
२) दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र.
३) दहावी उत्तीर्ण गुणपत्रक.
४) आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.
५) जन्माचा दाखला.
६) जात प्रमाणपत्र.
आयोगाकडे जमा करायचे कागदपत्रे :
१) वर नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांची प्रत.
२) www.apprenticeshipindia.gov.in वर नाव नोंदणी करून जमा केलेला अर्ज.
३) दोन पासपोर्ट साईज फोटो.
सदर भरतीचे जाहिरातीचे आणि निवड प्रक्रियेचे सर्व अधिकार हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असतील.हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या ( HAL ) मॅनेजमेंटने घेतलेले सर्व निर्णय हे अंतिम असतील.
MRVC Recruitment मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये सिव्हिल इंजिनिअरसाठी मॅनेजर पदाची भरती
Conclusion
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट च्या अधीन असणाऱ्या उपक्रम मध्ये एकूण २०० जागांसाठी प्रशिक्षणार्थी या पदासाठी ही भरती राबवण्यात येणार आहे. आयोगाने आपल्या जाहिरातीमध्ये दिलेल्या आयटीआय ट्रेड उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवाराची निवड ही आयोगाने दिलेल्या तारीख आणि वेळेनुसार मुलाखती घेऊन पार पाडली जाईल.
Frequently Asked Questions
१) HAL Recruitment 2024 भरतीसाठी किती जागा ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ?
उत्तर : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ने २०० जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली आहे.
२) HAL Recruitment 2024 साठी कोणते उमेदवार अर्ज करू शकतात ?
उत्तर : सदर भरतीसाठी दहावी उत्तीर्ण तसेच आयटीआय ट्रेड उत्तीर्ण असणारा उमेदवार प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करू शकतो.
३) HAL Recruitment 2024 साठीची निवड प्रक्रिया कशी आहे ?
उत्तर : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी या पदासाठी होणाऱ्या उमेदवारांची निवड ही मुलाखत या एकाच टप्प्यात होणार आहे.
४) HAL Recruitment 2024 मध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी कोणकोणत्या आयटीआय ट्रेड चा समावेश केला आहे ?
उत्तर : इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक , फिटर , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट, टर्नर , वेल्डर , अंड एसी , कोपा, पेंटर , डिझेल मेकॅनिक , मोटर वेहिकल मेकॅनिक , ड्राफ्ट्समन सिविल , ड्राफ्ट्समन मेकॅनिकल यासारख्या एकुण १४ आयटीआय ट्रेडसचा समावेश हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आयोजित भरती प्रक्रियेमध्ये करण्यात आला आहे.
५) HAL Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे ?
उत्तर : सदर भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज करायचे नसून उमेदवारांना आयोगाने दिलेल्या या वेबसाईट पोर्टलवर फक्त नोंदणी करायची आहे.