Central Railway Zone कडून दहावी उत्तीर्ण झालेल्या त्यासोबतच आपले आयटीआय कोर्स पूर्ण केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सर्व मिळून एकूण १११३ रिक्त पदे ही ह्या भरती प्रक्रिया द्वारे भरली जाणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरवात दिनांक २ एप्रिल २०२४ पासून सुरू झाली आहे. आयटीआय झालेल्या उमेदवारांना मध्य रेल्वे मध्ये काम करण्याची ही सुवर्ण संधी असणार आहे.
Central Railway Zone Recruitment Overview
मध्य रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणजेच Apprentice साठी ही १११३ जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. Engagement for act Apprenticeship under Apprenticeship Act 1961 and Apprenticeship Rule 1962 नुसार दक्षिण पूर्व मध्य रायपूर विभाग आणि वॅगन दुरुस्तीचे दुकान ( Wagon Repair Shop) रायपूर विभाग मध्ये वर्ष २०२४-२०२५ साठी विविध क्षेत्रातील उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येणार आहे.
जाहिरात प्रसिद्ध : | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ( South East Central Railway ) |
पदाचे नाव : | प्रशिक्षणार्थी ( Apprenticeship ) |
पदाची संख्या : | १११३ पदे |
अर्ज पद्धत : | ऑनलाईन ( Online Mode ) |
अधिकृत संकेतस्थळ : | https://www.apprenticeshipindia.gov.in/ |
Table of Contents
Central Railway Zone Recruitment Vacancies
दक्षिण पूर्व मध्य रायपूर विभाग आणि वॅगन दुरुस्तीचे दुकान ( Wagon Repair Shop) रायपूर विभाग या दोन्ही मध्ये असलेल्या एकूण १११३ जागा भरल्या जाणार आहेत. दोन्ही विभागाचा प्रत्येकी विचार केल्यास दक्षिण पूर्व मध्य रायपूर विभाग मध्ये एकूण ८४४ जागा आणि वॅगन दुरुस्तीचे दुकान ( Wagon Repair Shop) रायपूर विभागमध्ये एकूण २६९ जागा आहेत.
आयटीआय उत्तीर्ण उमेदवार हे या भरती साठी पात्र असतील पण आयोगाने दोन्ही विभागासाठी आवश्यक असलेले आयटीआय कोर्स कोणते आणि कोणत्या कोर्सला किती जागा असणार आहे याचा आढावा आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या जाहिराती मध्ये नमूद केले आहे.
Welder ( Gas and Electric ) | २७१ | Stenographer English | १६ | Machinist | ३० |
Turner | ६८ | Stenographer Hindi | ९ | Mechanic Diesel | ८१ |
Fitter | ३१७ | Computer Operator and Program Assistant | १४ | Mechanic Refrigerator and Air Conditioner | २१ |
Electrician | २२६ | Health and Sanitary Inspector | २५ | Mechanic Auto Electrical and Electronics | ३५ |
Central Railway Zone Recruitment Important Dates
उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून दिलेल्या कालावधी मध्येच अर्ज आणि अर्ज शुल्क भरणे आवश्यक असणारं आहे.
अर्ज स्विकारण्याची सुरवात तारीख : | २ एप्रिल २०२४ |
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : | १ मे २०२४ |
अर्ज अपूर्ण राहील्यास किंवा अर्ज शुल्क न भरल्यास उमेदवाराचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरला जाणे नाही. तसेच ऑफलाईन पद्धतीनें केलेला कोणताही अन् कोणत्याही उमेदवाराचा अर्ज अपात्र धरला जाईल.
Central Railway Zone Recruitment Qualification
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून निवड होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी आवश्यक असलेले शैक्षणिक , वयाबाबतचे निकष याची पूर्तता करणे गरजेचे आहे. रेल्वेने आपल्या अधिकृत जाहिराती मध्ये पात्रतेचे निकष नमूद केले आहे. बघुया काय आहे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा.
१) शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification) :
उमेदवार हा मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूट / संस्था / शाळा मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्याचे सरासरी टक्केवारी ही कमीत कमी ५०% असावी आणि उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/ इन्स्टिट्यूट मधून आपले आयटीआय ( Industrial Training Institute) चा कोर्स उत्तीर्ण असावा.
रेल्वेने जाहिरातीमध्ये ज्या जागांसाठी प्रशिक्षणार्थी निवडले जाणार आहेत त्यासाठी पात्र असलेले आयटीआय ट्रेड नमूद केले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना आपली ट्रेड लक्षात घेणं आवश्यक आहे. एकूण १२ ट्रेडचा समावेश जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे.
चला तर पाहूया की नेमके कोणता ट्रेड उत्तीर्ण असलेला उमेदवार प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज करू शकतो.
Welder ( Gas and Electric ) | Stenographer English | Machinist | |||
Turner | Stenographer Hindi | Mechanic Diesel | |||
Fitter | Computer Operator and Program Assistant | Mechanic Refrigerator and Air Conditioner | |||
Electrician | Health and Sanitary Inspector | Mechanic Auto Electrical and Electronics |
२) वयोमर्यादा ( Age Limit) :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान १५ वर्ष पूर्ण असावे आणि उमेदवाराचे कमाल वय हे २४ वर्ष पेक्षा जास्त नसावे. खुला प्रवर्ग ( Unreserved ) , अनुसुचित जाती ( Schedule Caste ) , अनुसूचित जमाती ( Schedule Tribes ) , इतर मागासवर्गीय ( Other Backward Class ) आणि अपंग घटक ( Person with Disability ) यांच्यासाठी वयाबाबत शासन नियमानुसार वय शिथिलता देण्यात आली आहे.
प्रवर्ग | उमेदवाराचा जन्म कालावधी |
खुला प्रवर्ग ( Unreserved ) | २ एप्रिल २००० |
अनुसुचित जाती ( Schedule Caste ) | २ एप्रिल १९९५ |
अनुसूचित जमाती ( Schedule Tribes ) | २ एप्रिल १९९५ |
इतर मागासवर्गीय ( Other Backward Class ) | २ एप्रिल १९९७ |
अपंग घटक ( Person with Disability ) | २ एप्रिल १९९० |
नोट : वय शिथिलताचा ( Age Relaxation) लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे संबधित प्रवर्गाचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे म्हणजेच
१) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील उमेदवारांना वय शिथिलताचा लाभ घ्यायचा असल्यास उमेदवारांकडे जातीचे प्रमाणपत्र मान्यताप्राप्त प्राधिकरणकडून प्राप्त झालेले असावे.
२) इतर मागासवर्गीय उमेदवारांना वय शिथिलताचा लाभ घ्यायचा असल्यास उमेदवारांकडे इतर मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र सोबतच नॉन क्रिमी लियर प्रमाणपत्र मान्यता प्राप्त प्राधिकरणकडून प्राप्त झालेले असावे.इतर मागासवर्गीय प्रमाणपत्र हे एक वर्ष पेक्षा जुने असता कामा नये.
Central Railway Zone Recruitment Mode of Selection
उमेदवाराची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल. मेरिट लिस्ट ही उमेदवाराच्या शैक्षणिक गुण प्रगती यावर आधारित असेल. Railway Establishments Rule २०१/२०१७ नुसार दहावी उत्तीर्ण टक्केवारी ( कमीत कमी ५० टक्के ) आणि मान्यता प्राप्त इन्स्टिट्यूट मधून आयटीआय उत्तीर्ण या दोघांसाठी समान गुण असून दोन्ही परीक्षांची टक्केवारी ही मेरिट लिस्ट लावताना ग्राह्य धरली जाणार आहे.
RRB Technician Recruitment 2024 रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा (आरआरबी) रेल्वेकडून ९१४४ जागांची बंपर भरती
Central Railway Zone Recruitment Period
निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून १ वर्ष काम करावे लागेल. यामध्ये उमेदवारांना त्यांच्या सबंधित ट्रेड नुसार प्रशिक्षण ( Training ) देण्यात येईल. एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारांना रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार वेतन म्हणून ठराविक रक्कम ही Stipend ( स्टायपेंड ) म्हणून दिली जाईल.प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ॲप्रेंटाइस कायदा १९६१ नुसार पूर्ण वेळ कामगार म्हणून रुजू केले जाणार नाही.याबाबतचे सर्व अधिकार हे रेल्वे बोर्डाकडे राखीव असतील.
Contract
निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वे बोर्डाबरोबर प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी एक करार केला जाईल. उमेदवार जर कमी वयाचा असेल तर सबंधित उमेदवारचे पालक यांचा या करार मध्ये समावेश असेल.
Central Railway Zone Recruitment General Instructions
१) उमेदवाराच्या पात्रतेचे निकष, अर्जाची मान्यता – रद्द करणे , निवड पद्धत यासाठीचे सर्व अधिकार हे रेल्वे बोर्डाकडे राखीव असतील.
२) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांनी फोटो आणि आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
३) कागदपत्रे तपासणी पडताळणी वेळेस आवश्यक सर्व प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
४) खोटे प्रमाणपत्र , खोटी माहिती अशा कोणत्याही प्रकारचे गैर व्यवहार आढळल्यास सदर उमेदवाराचा अर्ज बाद केला जाईल.
Helpline Contact :
मोबाईल क्रमांक : | ७०२४१४९२४२ वेळ : सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत संपर्क साधावा |
ऑफिस पत्ता : | Sr Divisional Personnel Office, DRM Office Complex, Near Waltiar Gate , Raipur CG , 492008 |
Frequently Asked Questions
१) Central Railway Zone Recruitment मध्ये किती जागांची भरती निघाली आहे ?
उत्तर : एकूण १११३ जागांसाठी Central Railway Zone Recruitment मध्ये भरती निघाली आहे.
२) Central Railway Zone Recruitment मध्ये प्रशिक्षण साठी पात्रता काय आहे ?
उत्तर : दहावी उत्तीर्ण टक्केवारी ( कमीत कमी ५० टक्के ) आणि मान्यता प्राप्त इन्स्टिट्यूट मधून आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
३) Apprenticeship साठी वयोमर्यादा काय आहे ?
उत्तर: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान १५ वर्ष पूर्ण असावे आणि उमेदवाराचे कमाल वय हे २४ वर्ष पेक्षा जास्त नसावे.
४) Central Railway Zone Recruitment मध्ये कोण अर्ज करू शकतो ?
उत्तर : दहावी उत्तीर्ण टक्केवारी ( कमीत कमी ५० टक्के ) आणि मान्यता प्राप्त इन्स्टिट्यूट मधून आयटीआय उत्तीर्ण तसेच किमान १५ वर्ष आणि कमाल वय हे २४ वर्ष असलेला उमेदवार अर्ज करू शकतो.
५) Apprentice मध्ये कोणते ट्रेड Apprenticeship साठी आहेत ?
उत्तर : Central Railway Zone Recruitment मध्ये असणाऱ्या ट्रेडचा तपशील वर पुढील प्रमाणे : Welder ( Gas and Electric ) ,Turner , Fitter , Electrician, Stenographer English, Stenographer Hindi , Computer Operator and Program Assistant, Health and Sanitary Inspector, Machinist , Mechanic Diesel, Mechanic Refrigerator and Air Conditioner , Mechanic Auto Electrical and Electronics.