BMC Recruitment 2024 : नमस्कार मंडळी !! Jobschemewala मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत मुंबई महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या निरीक्षक या पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया.
BMC Recruitment 2024 Overview
मान. महागरपलिकेच्या आयुक्तांच्या आदेशानुसार एमजीसी/एफ/३५३२ दिनांक : ११-०६-२०२४ नुसार, मुंबई महानगरपालिकेतील ‘करनिर्धारण व संकलन’ खात्यातील आस्थापनेत गट-क मधील “निरीक्षक” या पदासाठी रिक्त असणाऱ्या १७८ जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. मुंबई महानगरपालिकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ही मोठी संधी असणार आहे.
BMC Recruitment 2024 Important Dates
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी आयोगाने दिलेल्या महत्वाच्या तारखा ;
अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख : | २० सप्टेंबर २०२४ |
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : | १९ ऑक्टोबर २०२४ |
अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख : | १९ ऑक्टोबर २०२४ |
BMC Recruitment 2024 Vacancies
मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन या खात्यात असणारी गट क संवर्गतील निरीक्षक पदाची जाहिरात नुकतीच जाहिर केली असून एकूण १७८ पदे ही सरळसेवा पद्धतीने भरली जाणार आहे.
MC Recruitment 2024 Eligibility Criteria
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाने दिलेले पात्रतेचे निकष वाचून घेणे आवश्यक आहे. यानुसार
१) वयोमर्यादा :
अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारचे किमान वय १८ वर्ष ते कमाल वय ३८ वर्ष असणे आवश्यक आहे. सोबतच आयोगाने राखीव प्रवर्गासाठी वय शिथिलता देखील लागू केली आहे.
२) शैक्षणिक पात्रता :
अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा. उमेदवारांकडे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र असावे आणि उच्चतम परीक्षेमध्ये १०० गुणाचा मराठी विषय उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे MSCIT संगणक ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र असावे. तसेच उमेदवाराजवळ टायपिंग कौशल्य प्राप्त प्रमाणपत्र असावे.
BMC Recruitment 2024 How to Apply
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे.
अधिकृत संकेतस्थळ : अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
BMC Recruitment 2024 Application Fee
ऑनलाईन अर्ज भरून झाल्यावर उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे अनिवार्य असणार आहे. अपूर्ण अर्ज पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. यानुसार ,
खुला प्रवर्ग : | ₹१००० |
मागास प्रवर्ग आणि इतर घटक : | ₹९०० |
Railway Recruitment 2024: उ मध्य रेल्वे मध्ये १६७९ जागांसाठी भरती सुरू , परीक्षा न होता होणार निवड
BMC Recruitment 2024 Selection Mode
उमेदवाराची निवड ही सरळसेवा भरती प्रमाणे केली जाईल यानुसार संगणक आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा घेतली जाईल यातून निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणी पडताळणी साठी बोलवले जाईल. या दोन्ही प्रक्रिया पार पडल्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल.
BMC Recruitment 2024 Exam Pattern
उमेदवाराची निवड संगणक आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून होणार असून नेमका परीक्षेचा अभ्यासक्रम पॅटर्न कसा असेल बघूया. यानुसार ,
BMC Recruitment 2024 Frequently Asked Questions
१) What is the Last date to Apply for BMC Recruitment ?
उत्तर : मुंबई महानरपालिका भरती २०२४ साठी अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२४ आहे.
२) Who can Apply for BMC Recruitment 2024 ?
उत्तर : सदर भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार किमान पदवी उत्तीर्ण असावा. उमेदवारांकडे संगणक ज्ञान आणि टायपिंग कौशल्य प्रमाणपत्र असावे.
३) Number of Vacancies in BMC Recruitment 2024 ?
उत्तर : निरीक्षक या पदासाठी एकूण १७८ जागा या भरती प्रक्रिया दरम्यान भरल्या जाणार आहेत.