BMC Recruitment 2024 मुंबई महानगरपालिकेत भरती, नायर रुग्णालयातील विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध !

BMC Recruitment 2024 : नमस्कार मंडळी Jobschemewala मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत मुंबई महानगरपालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या नायर रुग्णालयातील असणाऱ्या रिक्त जागांचा थोडक्यात आढावा.

BMC Recruitment 2024 Overview

नुकतीच मुंबई महानगरपालिकेने एक जाहिरात प्रसिद्ध केली असून मुंबई येथील बा. य. ल नायर धर्मा रुग्णालय टो रा वैद्यकीय महाविद्यालयात अत्यावश्यक लॅब मध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून रिक्त असणाऱ्या जागा भरल्या जाणार आहेत. महानगरपालिकेत काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ही मोठी संधी असणार आहे.

SSC GD Constable Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल ४० हजार जागांसाठी भरती

BMC Recruitment 2024 Important Dates

आयोगाने अर्ज करण्यासाठी ऑफलाईन अर्ज पद्धतीचा वापर केल्याने उमेदवारांनी आपले अर्ज जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे तारखेच्या आत पोहोचतील अशा प्रकारे पाठवायचे आहे. यानुसार ,

अर्ज सुरू होण्याची तारीख :११ सप्टेंबर २०२४
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख :२० सप्टेंबर २०२४

BMC Recruitment 2024 Vacancy

बा. य. ल नायर धर्मा रुग्णालय टो रा वैद्यकीय महाविद्यालयात अत्यावश्यक लॅब मध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. एकूण १८ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

Mukhyamantri ladki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४ लाभ, पात्रता, अर्ज प्रक्रिया

BMC Recruitment 2024 Eligibility Criteria

प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी आयोगाने काही पात्रतेचे निकष दिले असून अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. यानुसार वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता या निकषांचा समावेश जाहिराती मध्ये करण्यात आला आहे.

१) वयोमर्यादा :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय हे १८ वर्ष तर जास्तीत जास्त वय वर्ष ३३ पर्यंत असावे.

२) शैक्षणिक पात्रता :

ॲकडमिक लक्षात घेता अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी उत्तीर्ण असावा सोबतच मान्यता प्राप्त विद्यापीठाची DMLT पदविका परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

किंवा उमेदवार १२ वी उत्तीर्ण आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कडून निम्न वैद्यकीय शाखेतील लब्रोटरी मेडिसीन शाखेत पदवीधर असावा.

BMC Recruitment 2024 How to Apply

आयोगाने ऑफलाईन अर्ज प्रणाली अवलंबली असून उमेदवाराने ठराविक कालावधी आणि ठराविक पत्त्यावर आपले अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे पाठवयची आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बा. य. ल नायर धर्मा रुग्णालय डॉ.ए.एल नायर रोड , मुंबई सेंट्रल ४००००८

वेतनश्रेणी : दरमहा रूपये २०,०००

BMC Recruitment 2024 Documents

ऑफलाईन अर्ज पाठवताना उमेदवारांना अर्ज सोबत काही आवश्यक कागदपत्रे सोबत जोडायचे आहे. यानुसार ,

१) आधार कार्ड५) उच्च माध्यमिक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र
२) Pan Card६) DMLT उत्तीर्ण प्रमाणपत्र
३) ओळख पुरावा७) पदवी परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
४) वास्तव्याचा पुरावा८) दोन पासपोर्ट आकाराचा फोटो

BMC Recruitment Frequently Asked Questions

१) Which Documents are required for BMC Recruitment 2024 ?

उत्तर : अर्जासोबत उमेदवारांना जी आवश्यक कागदपत्रे जोडायची आहे त्याचा तपशील वर दिला आहे.

२) What is the Last date of BMC Recruitment 2024 ?

उत्तर : सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०२४ असणार आहे.

३) Who can Apply for BMC Recruitment 2024 ?

उत्तर : विज्ञान शाखेत पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार सदर भरतीसाठी अर्ज करू शकतो.