BMC JE Recruitment 2024 इंजिनीअर्सना मोठी संधी,मुंबई महानगरपालिकेत 690 अभियंता पदाची भरती;अर्ज कसा करायचा?

BMC JE Recruitment 2024 : नमस्कार मंडळी ! ! Jobschemewala मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत मुंबई महानगरपालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता पदाच्या भरती बद्दल , तब्बल ६०० पेक्षा जास्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

BMC JE Recruitment 2024 Overview

मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता पदाची भरती मोठी संधी असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने यांत्रिकी , विद्युत आणि स्थापत्य यामध्ये आपली इंजिनीअरिंग पदवी पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.

सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०२४ असणार आहे.

BMC JE Recruitment 2024 Important Dates

मुंबई महानगरपालिकेने अर्ज करण्यासाठी खालील कालावधी नमूद केला असून उमेदवारांना केवळ याच कालावधी मध्ये अर्ज सादर करता येणार आहे. यानुसार ,

अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख :११ नोव्हेंबर २०२४
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख :०२ डिसेंबर २०२४

BEST Mumbai Recruitment 2024 मुंबईमधील बेस्ट मध्ये डिग्री,डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी,आजच अर्ज करा

BMC JE Recruitment 2024 Vacancies

कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण ६९० जागांचा विचार करता कोणत्या पदासाठी नेमक्या किती जागा रिक्त आहेत हे बघूया.

कनिष्ठ अभियंता स्थापत्य
(Junior Engineer Civil) :
२५०
कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत (Junior Engineer Mechanical and Electrical) :१३०
दुय्यम अभियंता स्थापत्य
(Sub Engineer Civil) :
२३३
दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत
(Sub Engineer Mechanical and Electrical)
७७
एकूण जागा :६९०

BMC JE Recruitment 2024 Eligibility Criteria

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मुंबई महानगरपालिकेने आपल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. यानुसार

१) वयोमर्यादा (Age Limit) :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय हे खुल्या वर्गासाठी ३८ वर्ष तर राखीव वर्गासाठी कमाल वय ४५ वर्ष देण्यात आले आहे.

२) शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान शिक्षण हे स्थापत्य (Civil) , यांत्रिकी (Mechanical) , विद्युत ( Electrical) यापैकी कोणत्याही शाखेत पदवी अथवा पदविका परीक्षा उत्तीर्ण झालेले असावे.

BMC JE Recruitment 2024 How to Apply

अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे. अर्जात विचारलेली वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती संपर्क माहिती भरून अर्ज शुक्ल भरायची आहे यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे व अर्जाची प्रत आपल्याकडे जतन करून ठेवायची आहे.

अर्ज शुक्ल (Application Fee) :

अर्ज भरून झाल्यावर उमेदवारांना पुढील रक्कम अर्ज शुल्क किंवा परीक्षा शुल्क म्हणून भरायची आहे.

राखीव वर्गासाठी ( SC/ST/PWD) :रूपये ४००
खुल्या वर्गासाठी ( Open / OBC ) :रूपये ६००

BMC JE Recruitment 2024 Selection Process

कनिष्ठ अभियंता किंवा दुय्यम अभियंता पदावर निवड प्रक्रिया ही तीन टप्प्यात असेल यामध्ये प्रामुख्याने ,

पहिला टप्पा : लेखी परीक्षा

दुसरा टप्पा : मुलाखत

तिसरा टप्पा : कागदपत्रे तपासणी-पडताळणी

यानंतर उमेदवाराची अंतिम निवड यादी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.

Frequently Asked Questions

१) Who can Apply for BMC JE Recruitment 2024 ?

उत्तर : स्थापत्य (Civil) , यांत्रिकी (Mechanical) , विद्युत ( Electrical) यापैकी कोणत्याही शाखेत पदवी किंवा पदविका उत्तीर्ण उमेदवार ज्याचे वय ३८ वर्षापेक्षा जास्त नाही असे उमेदवार अर्ज करू शकतात.

२) Last Date to Apply for BMC JE Recruitment 2024 ?

उत्तर : BMC JE साठी अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ०२ डिसेंबर २०२४ आहे.

३) What is the qualification for BMC JE Recruitment 2024 ?

उत्तर: अभियंता पदाच्या भरती साठी शैक्षणिक पात्रता ही स्थापत्य (Civil) , यांत्रिकी (Mechanical) , विद्युत ( Electrical) यापैकी कोणत्याही शाखेत पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असावे.