BEST Mumbai Recruitment 2024: नमस्कार मंडळी ! ! Jobschemewala मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत मुंबईची दुसरी लाइफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या BEST बेस्ट मार्फत होणाऱ्या भरतीबद्दल.
BEST Mumbai Recruitment 2024 Overview बेस्ट भरती आढावा
बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टच्या अंतर्गत असणाऱ्या विविध आस्थापनांमध्ये रिक्त असणाऱ्या एकूण १३० जागांची जाहिरात नुकतीच बेस्ट ने जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांना मुंबई मध्ये नोकरी करायची इच्छा आहे अशा उमेदवारांना ही भरती एक मोठी संधी असणार आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २५ ऑक्टोबर असणार आहे.
BEST Mumbai Recruitment 2024 Important Dates बेस्ट भरती महत्वाच्या तारखा
बेस्ट ने उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रणाली अवलंबली असल्याने उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या कालावधी मध्ये आवश्यक पत्त्यावर पोचतील हे लक्षात घेऊन आपले अर्ज पाठवावेत. यानुसार ,
अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख : | ७ ऑक्टोबर २०२४ |
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : | २५ ऑक्टोबर २०२४ |
BEST Mumbai Recruitment 2024 Vacancies बेस्ट भरती जागा
बेस्टच्या अंतर्गत असणाऱ्या विविध आस्थापनाच्या खात्यात असलेल्या रिक्त जागा या सदर भरती- नियुक्ती करून भरल्या जाणार आहेत. या मध्ये असणाऱ्या १३० जागा असून आणि पदाचा विचार करता प्रोबेशन इंजिनियर आणि सिनियर स्टायपेंडरी ॲप्रेंटिस पदे आहेत.
पदाचे नाव | पदसंख्या |
प्रोबेशन इंजिनियर : | ५५ |
सिनियर स्टायपेंडरी ॲप्रेंटिस : | ७५ |
BEST Mumbai Recruitment 2024 Eligibility Criteria बेस्ट भरती पात्रतेचे निकष
सदर भरतीसाठी नेमके कोणते उमेदवार अर्ज करू शकतात हे बघूया यानुसार ,
१) वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३८ वर्षापेक्षा अधिक नसावे.अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर राखीव वर्गासाठी वय शिथिलता देखील लागू असेल.
२) शैक्षणिक पात्रता :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान शिक्षण दहावी उत्तीर्ण असून सोबतच प्रोबेशन इंजिनियर पदासाठी इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण तर सिनियर स्टायपेंडरी ॲप्रेंटिस पदासाठी इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
३) अर्ज करणारा उमेदवारांकडे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा असावा.
BEST Mumbai Recruitment 2024 How to Apply बेस्ट भरती अर्ज कसा करायचा
बेस्टने आपल्या जाहिराती सोबत अर्ज जोडला असून अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सदर अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे आपल्या स्व: साक्षांकित प्रती सह नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Divisional Engineer, Training and Industrial Engineering Department 3rd floor Club Road Building BEST Mumbai Central Depot , Maratha Mandir Marg Mumbai Central Mumbai 400008
BEST Mumbai Recruitment 2024 Important Points बेस्ट भरती महत्वाचे मुद्दे
१) Stipend :
प्रशिक्षण कालावधी मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रोबेशन इंजिनियर आणि सिनियर स्टायपेंडरी ॲप्रेंटिस पदासाठी अनुक्रमे ₹ १६००० महिना आणि ₹ १३००० महिना स्टायपेंड म्हणून दिला जाईल. प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर सदर पदासाठी वेतन हे ₹३०००० पेक्षा अधिक असेल.
२) Security Deposits:
ज्या उमेदवारांची निवड होईल अशा उमेदवारांना काही रक्कम ही ५ वर्षाच्या सेवेसाठी security Deposits म्हणून जमा करावी लागणार आहे .
३) Contract :
निवड झालेल्या उमेदवारांना एका वर्षाचे प्रशिक्षण कालावधी देण्यात आले आहे. हा कालावधीमध्ये असेलल्या कामगिरीवर उमेदवाराची निवड पुढील पदासाठी पाच वर्षासाठी केली जाणार आहे.
Frequently Asked Questions
१) Who can Apply for the BEST Mumbai Recruitment 2024 ?
उत्तर : अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच उमेदवाराकडे इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग मध्ये पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२) Last Date of BEST Mumbai Recruitment 2024 ?
उत्तर : पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही २५ ऑक्टोबर २०२४ असणार आहे
३) BEST Mumbai Recruitment 2024 Post Details ?
उत्तर : बेस्टने जाहीर केल्या प्रमाणे प्रोबेशन इंजिनियर आणि सिनियर स्टायपेंडरी ॲप्रेंटिस पदासाठी एकूण १३० जागा रिक्त आहेत.