Bank of India Recruitment अंतर्गत नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये अधिकारी पदाच्या एकूण १४३ जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. Project No. 2023-24/1 Notice Dated 01.02.2024 नुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे.
Bank of India Recruitment 2024 Overview
Bank of India ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. बँक ऑफ इंडिया चे मुख्यालय हे मुंबई मध्ये असून पाच हजार पेक्षा जास्त शाखा या कार्यान्वित आहेत. सरकारी बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांना बँक ऑफ इंडिया ने जाहीर केलेली ही १४३ जागांची भरती सुवर्णसंधी असणार आहे. यामध्ये क्रेडिट ऑफिसर पासून विविध मॅनेजर पदाच्या ,लॉ ऑफिसर , इकॉनॉमिस्ट यासारखी पदे ही भरली जाणार आहे. या पदांची विभागणी मॅनेजमेंट ग्रेड स्केल मध्ये करण्यात आली आहे.
चला तर बघुया अधिकारी , मॅनेजर पदाची जाहिरात थोडक्यात
जाहिरात प्रसिद्ध : | बँक ऑफ इंडिया |
पदाचे नाव : | अधिकारी , मॅनेजर |
पदाची संख्या : | विविध १४३ पदे |
अधिकृत संकेतस्थळ : | https://bankofindia.co.in/ |
जाहिरात प्रसिद्ध : | २७ मार्च २०२४ |
Bank of India Recruitment 2024 Important Dates
अधिकारी आणि मॅनेजर पदासाठी अर्ज करण्यासाठी बँक ऑफ इंडिया ने जाहीर केलेल्या जाहिरातीमध्ये अर्ज भरण्याची सुरुवातीची तारीख आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख, परीक्षा तारीख तसेच वया बाबत ग्राह्य तारीख याबद्दल माहिती देण्यात आली आहे .
बघुया उमेदवार केव्हा अर्ज करू शकतात.
अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख : | २७ मार्च २०२४ |
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : | १० एप्रिल २०२४ |
वया बाबत ग्राह्य तारीख : | ०१ फेब्रुवारी २०२४ |
परीक्षेची तारीख : | लवकर जाहीर. |
Table of Contents
Bank of India Recruitment 2024 Vacancies
Bank of India ने आपल्या जाहिराती मध्ये एकूण विविध ३३ पदांच्या , १४३ रिक्त जागा भरण्यासाठी जागांचा तपशील जाहीर केला आहे. यामध्ये पदाची विभागणी ही दोन भागात केली गेली आहे.
१) GBO : General Banking Officer
२) SPL : Specialist Officers
आणि यानुसार ३३ पदाची विभागणी केली आहे. पदाची विविध प्रवर्ग नुसार कोणत्या पदासाठी किती जागा आहेत यासाठी बँकेचे अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. साधारणपणे कोणत्या पदासाठी किती जागा , प्रवर्गानुसार किती जागा आहे या सर्व जागांचा संपूर्ण तपशील जाहिराती मध्ये नमूद केलेला आहे.
एक उमेदवार केवळ एकाच पदासाठी अर्ज करू शकतो.
Bank of India Recruitment 2024 Eligibility Criteria
जे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार आहेत त्यांनी अधिकारी पदाच्या आणि मॅनेजर पदाच्या पात्रता ज्या बँक ऑफ इंडिया ने जाहीर केलेल्या आहेत त्या प्रमाणे असणे आवश्यक आहे.अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
१) शैक्षणीक पात्रता : Educational Qualification : विविध पदांनुसार आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी मूळ जाहिरात बघावी पदवी शिक्षण तसेच इंजिनियरिंग मध्ये पदवी BE , B.Tech , M.Tech , B.Sc IT , कायदा विषयक पदवी असलेले उमेदवार अधिकारी / मॅनेजर पदासाठी अर्ज करू शकतात .
२) वयोमर्यादा : Age Limit : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे विविध पदानुसार वेगवेगळे आहे. कमीत कमी २१ वर्ष ते जास्तीत जास्त ३७ वर्ष वय असलेले उमेदवार पदानुसार वयोमर्यादा पालन करून पात्र असतील त्या पदासाठी निवडीसाठी पात्र ठरतील.प्रवर्गानुसार वया बाबत शिथिलता देण्यात आली आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती : | ५ वर्ष |
इतर मागासवर्गीय : | ३ वर्ष |
अपंग घटकासाठी : | १० वर्ष |
एक्स सर्विसमन : | ५ वर्ष |
३) अनुभव : Experience : Bank of India तर्फे जी १४३ पदे भरली जाणार आहेत त्यासाठी अनुभव किती हवा हे पदानुसार जाहिरातीमध्ये नमूद केले आहे. काही पदांसाठी कमीत कमी २ वर्ष तर काही पदासाठी कमीत कमी ५ वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
Bank of India Recruitment 2024 How to Apply
पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना खालील टप्पे लक्षात घेऊन अर्ज करायचा आहे.
१) अर्ज नोंदणी ( Application Registration)
२) अर्ज शुल्क ( Payment Of Fees )
३) कागदपत्रे पुरावे.यामध्ये फोटो , सही , डाव्या अंगठ्याचा ठसा , स्वतः च्या हाताने लिहलेले घोषणा हे सर्व अर्ज भरताना उमेदवाराने अपलोड करणे आवश्यक आहे.
अर्ज भरण्यासाठी उमेदवाराने बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे. करीयर या सेक्शन वर क्लिक करून तेथे जाहिरातीचे नाव दिलेले असेल त्यावर क्लिक करावे व अर्ज भरण्यास सुरवात करावी.New Registration वर क्लिक करून आपले नाव , संपर्क माहिती आणि ईमेल आईडी द्यायचा आहे. सर्व माहिती भरल्यानंतर उमेदवाराच्या ईमेल आयडी वर Provisional Registration Number आणि Password पाठवला जाईल.Registration Number आणि Password टाकून लॉगिन करायचे आहे व अर्ज भरताना जी माहिती विचारली आहे ती संपूर्णपणें भरून अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी आपल्या प्रवर्ग नुसार अर्ज शुक्ल / परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.
Bank of India Recruitment 2024 Application Fee
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी अर्ज शुल्क देखील भरायचे आहे. अर्ज भरण्यासाठी बँक ऑफ इंडिया ने कालावधी जाहीर केला आहे. या नमूद केलेल्या कालावधी मध्येच अर्ज फी भरायची आहे.
प्रवर्ग | अर्ज फी |
अनुसुचित जाती अनुसूचित जमाती अपंग घटक : | रुपये १७५ |
इतर साधारण प्रवर्ग : | रुपये ८५० |
अपूर्ण अर्ज हा पुढील निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही.
Bank of India Recruitment 2024 Selection Process
ज्या उमेदवारांनी अर्ज सहित अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट केला असेल असेच उमेदवार पुढील टप्प्यासाठी बोलवले जातील.निवडप्रक्रिया ही ऑनलाईन परीक्षा किंवा मुलाखत अथवा दोन्ही अशी असेल. अर्ज केलेल्या उमेदवाराच्या संख्येनुसार हे जाहीर केले जाईल.ऑनलाईन परीक्षामध्ये किमान मेरिट पास होणे आवश्यक आहे. तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अपंग घटक यांच्यासाठी मेरिट मध्ये ५% शिथिलता देण्यात आली आहे.
ऑनलाईन परीक्षे मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी ही बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. उमेदवारांनी निवडी संबंधी सूचना साठी या संकेत स्थळावर भेट देणे आवश्यक आहे.
Interview : मुलाखत ही १०० गुणाची असेल. यामध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना किमान ४० % मिळवणे आवश्यक आहे. ऑनलाईन परीक्षे मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून १:३ उमेदवार मुलाखती करिता बोलावले जाईल.
बँक उमेदवाराची निवड ऑनलाईन परीक्षा न घेता केवळ मुलाखत घेऊन करू शकते.
Bank of India Recruitment 2024 Exam Pattern
परीक्षा पद्धतिचा आढावा घेतल्यास बँक ऑफ इंडिया ने आपल्या जाहिराती मध्ये आलेल्या माहितीनुसार परीक्षा ही १५० गुणाची असून यासाठी २ तासाचा कालावधी देण्यात आला आहे. बघुया ऑनलाईन परीक्षे साठी कोणते विषय असणार आहेत आणि विषयानुसार गुण आणि कालावधी काय असणार आहे.
विषय | गुण | कालावधी |
English Language | २५ गुण | ३० मिनिटे |
Professional Knowledge relevant to the Post | १०० गुण | ६० मिनिटे |
General Knowledge with Special reference to Banking Industry | २५ गुण | ३० मिनिटे |
एकूण | १५० गुण | २ तास |
English Language मध्ये मिळालेले गुण ही पुढील निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.ऑनलाईन परीक्षे मध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत असणार आहे. यानुसार चुकीच्या चार उत्तरासाठी एक उत्तराचे गुण वजा केले जाणार आहे. म्हणजेच 1/4th Negative Marking पध्दत असेल.
Bank of India Recruitment 2024 Documents
जे उमेदवार मुलाखती साठी पात्र असतील अशा उमेदवारांनी आपले कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी सादर करणे बंधनकारक असणार आहे. बघुया कोणते कागदपत्र तपासणी पडाळणीसाठी आवश्यक आहे .
१) मुलाखत पात्र प्रेवश पत्र.
२) ऑनलाईन अर्जाची प्रिंट.
३) जन्म तारीख पुरावा ( शाळा सोडल्याचा दाखला किंवा प्रमाणपत्र ).
४) ओळख प्रमाणपत्र.
५) जातीचे प्रमाणपत्र.
६) अपंग असल्यास विकलांग प्रमाणपत्र.
७) अनुभव प्रमाणपत्र.
८) नॉन क्रिमी लियर प्रमाणपत्र.
९) आर्थिक उत्पन्न प्रमाणपत्र.
१०) शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेले गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.
Frequently Asked Questions
१) Bank of India Recruitment किती जागा भरल्या जाणार आहे ?
उत्तर : बँक ऑफ इंडिया तर्फे १४३ जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
२) बँक ऑफ इंडिया साठी निवडीचे निकष काय आहे ?
उत्तर : बँक ऑफ इंडिया ने आपल्या जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे ऑनलाईन परीक्षा किंवा मुलाखत अथवा दोन्ही अशी निवड केली जाईल.
३) Bank of India Nationalized Bank आहे का ?
उत्तर : हो बँक ऑफ इंडिया ही राष्ट्रीयकृत बँक आहे.
४) Bank of India चे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर : बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
आजच भेट द्या : https://jobschemewala.com/