Air India Recruitment एअर इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,परीक्षा न होता होणार निवड

Air India Recruitment एअर इंडिया ने नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली असून एअर इंडिया मध्ये काम करण्यासाठी इच्छूक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ही एक मोठी संधी असणार आहे.

Air India Recruitment Overview

एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस ही भारतातील निवडक एअरपोर्ट साठी ग्राउंड हॅण्डलिंग सर्विस देणारी संस्था आहे. भारताच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या खाली एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस काम करते. आणि याच एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस द्वारा जाहीर केलेल्या जाहिराती मध्ये एकूण सहा पदनाम ( Designation ) आणि १४५ पदे भरली जाणार असून यामध्ये असणाऱ्या या जागांची संख्या आहे.

चला तर बघुया नेमकी कोणती पदे भरली जाणार आहेत. पदांची संख्या काय असणारे आणि निवड प्रक्रिया कशी असणारे आहे ते थोडक्यात.

जाहिरात प्रसिद्ध :एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिस
( Air India Airport Service )
पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी तांत्रिक ( Junior officer technical )
ग्राहक सेवा कार्यकारी ( Customer Service Executive )
कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी ( Junior Customer Service Executive )
रॅम्प सेवा कार्यकारी ( Ramp Service Executive )
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर ( Utility Agent Cum Ramp Driver )
हस्तक ( Handyman )
पदाची संख्या : १४५ पदे
अर्जाची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने ( Offline Mode )
अधिकृत संकेतस्थळ : www.aiasl.in

Air India Recruitment Important Dates

पदेमुलाखत तारीखवेळ
कनिष्ठ अधिकारी तांत्रिक ( Junior officer technical )८ मे २०२४सकाळी ९.३०
ते दुपारी १२.३०
ग्राहक सेवा कार्यकारी ( Customer Service Executive )९ मे २०२४सकाळी ९.३०
ते दुपारी १२.३०
कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी ( Junior Customer Service Executive )९ मे २०२४सकाळी ९.३०
ते दुपारी १२.३०
रॅम्प सेवा कार्यकारी ( Ramp Service Executive )१० मे २०२४सकाळी ९.३०
ते दुपारी १२.३०
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर ( Utility Agent Cum Ramp Driver )१० मे २०२४सकाळी ९.३०
ते दुपारी १२.३०
हस्तक ( Handyman )११ मे २२४सकाळी ९.३०
ते दुपारी १२.३०
air india recruitment

Air India Recruitment Vacancies

एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस द्वारे ज्या सहा पदांसाठी भरती होते आहेत ती पदे आणि पदाची संख्या आपण बघणार आहोत.

पदेपदाची संख्या
कनिष्ठ अधिकारी तांत्रिक ( Junior officer technical )
ग्राहक सेवा कार्यकारी ( Customer Service Executive )२१
कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी ( Junior Customer Service Executive )२१
रॅम्प सेवा कार्यकारी ( Ramp Service Executive )१८
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर ( Utility Agent Cum Ramp Driver )१७
हस्तक ( Handyman )६६

Air India Recruitment How to Apply

इच्छूक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस ने आपल्या जाहिराती सोबत अर्ज दिला आहे. त्या अर्जाची प्रिंट काढून उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे. अर्ज जरी ऑफलाईन पद्धतीने भरायचा असला तरी उमेदवारांना अर्ज शुल्क किंवा परीक्षा शुल्क भरणे आवश्यक असून अर्जा सोबत फी भरल्याची पावती जोडावी. सोबतच आवश्यक असलेली कागदपत्रे देखील जोडणे आवश्यक आहे.

Air India Recruitment Application Fee

ऑफलाईन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी आवश्यक टी अर्ज शुल्क भरावी. यासाठी एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस ने डिमांड ड्राफ्ट ची सुविधा ठेवण्यात आली आहे.

अर्ज शुल्क म्हणून एकूण रुपये ५०० ठेवण्यात आले आहे.

उमेदवारांनी डिमांड ड्राफ्ट हा “AI Airport Services Limited” payable at Mumbai अशा नावे भरायचा आहे. तसेच डिमांड ड्राफ्ट च्या मागे आपले नाव आणि मोबाईल क्रमांक लिहावा उमेदवारांनी अर्ज पाठवताना सोबत अर्ज फी भरल्याची पावती जोडावी.

एक्स सर्विसमन ( Ex Servicemen) , अनुसुचित जाती ( Schedule Caste) ,अनुसूचित जमाती (Schedule Tribes) यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क हे आकारले जाणार नाही.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची मोठी जाहिरात , ५००+ जागांची भरती,अर्ज सुरू UPSC CAPF Recruitment 2024

Air India Airport Service Recruitment Selection Process

एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस ने जाहीर केलेल्या पदासाठी वेगवेगळी निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या सर्व पदासाठी मुलखात हा एक कॉमन पर्याय असून काही पदासाठी स्किल टेस्ट देखील होणार आहे. चला तर बघुयात नमेकी कशी असणार आहे निवड प्रक्रिया , उमेदवारांनी नोंद घ्यावी की ही खालील पदासाठी होणारी निवड प्रक्रिया ही ठरवून दिलेल्या दिवशी किंवा त्याच्या पुढील दिवशी होईल. आयोगाकडून या बाबत कोणताही खर्च केला जाणार नाही आहे.

१) Junior Officer Technical / Customer Service Executive / Junior Customer Service Executive :

या पदासाठी प्रामुख्याने मुलाखत हा महत्वाचा टप्पा असणार आहे. आयोगाला वाटल्यास किंवा तितके उमेदवार मिळाल्यास ग्रुप डिस्कशन घेतले जाईल. अन्यथा उमेदवाराची निवड ही मुलाखत या एकाच टप्प्यात होईल.

२) Ramp Service Executive/ Utility Agent Cum Ramp Driver :

यामध्ये प्रामुख्याने ट्रेड संबंधित चाचणी आणि ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाईल. सदर चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखती साठी बोलावले जाईल.

३) Handyman :

यामध्ये सुरवातीला शारीरिक चाचणी घेतली जाईल जसे की वजन उचलणे , धावणे इत्यादी. जे उमेदवार ही चाचणी उत्तीर्ण होतील त्यांना पुढील टप्पा म्हणजेच मुलाखती साठी बोलावले जाईल.

Contract :

उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे ही सर्व पदे ही करार पद्धती नुसार भरली जाणार आहेत याची नोंद घ्यावी. हा करार एकूण तीन वर्षा करिता असेल. आणि निवड झालेल्या उमेदवारांना एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस च्या जयपूर या ठिकाणी तीन वर्ष काम करायचे आहे.

air india recruitment

Air India Airport Service Recruitment Eligibility Criteria

ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाने प्रसिद्ध केलेली जाहिरात वाचणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने काही पात्रतेचे निकष दिलेले असून , हे पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज आणि अर्ज शुल्क सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून पाठवायचा आहे.

चला तर बघुया नेमके कोणते पात्रतेचे निकष असणार आहेत.

१) शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) :

आयोगाने जाहीर केलेल्या पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे. बघुया पदानुसार किती शिक्षण किंवा स्किल लागणार आहे ते एका तक्त्याच्या स्वरूपातपद शैक्षणिक पात्रता

१) कनिष्ठ अधिकारी तांत्रिक
( Junior Officer Technical ) :
मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट अथवा बोर्ड कडून पदवी परीक्षा उत्तीर्ण असून पदवी प्रमाणपत्र आवश्यक. यात प्रामुख्याने मेकॅनिकल ,इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स ,प्रोडक्शन, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग यापैकी एक पदवी उत्तीर्ण असावी.
सोबतच जड मोटार वाहन चालविण्याचा परवाना ( HMV Driving license).
विमान क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य.
२) ग्राहक सेवा कार्यकारी
( Customer Service Executive ) :
बारावी उत्तीर्ण.कॉम्प्युटर हाताळता येणे आवश्यक.
हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान, दोन्ही भाषा बोलणे आणि समजणे आवश्यक.
स्थानिक भाषा येत असल्यास प्राधान्य.
३) कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी
( Junior Customer Service Executive ) :
बारावी उत्तीर्ण
कॉम्प्युटर हाताळता येणे आवश्यक
हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान, दोन्ही भाषा बोलणे आणि समजणे आवश्यक स्थानिक भाषा येत असल्यास प्राधान्य.
४) रॅम्प सेवा कार्यकारी
( Ramp Service Executive ) :

३ वर्षाचा डिप्लोमा ; मेकॅनिकल ,इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट मधून उत्तीर्ण
किंवा
३ वर्षाचा आयटीआय कोर्स उत्तीर्ण आवश्यक
सोबतच जड मोटार वाहन चालविण्याचा परवाना ( HMV Driving license)
५) युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
( Utility Agent Cum Ramp Driver ) :
दहावी उत्तीर्ण
जड मोटार वाहन चालविण्याचा परवाना ( HMV Driving license)
६) हस्तक
( Handyman ) :
दहावी उत्तीर्ण.
इंग्लिश भाषा वाचणे आणि समजणे आवश्यक.
बोली भाषा आणि हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

२) वयोमर्यादा ( Age Limit) :

सर्व पदासाठी वयोमर्यादा ही खालील प्रमाणे असेल.आयोगाने वयोमर्यादा बाबत कोणत्याही प्रकारचे किमान वयाची अट ठेवण्यात आली नसून कमाल वयाचे मात्र बंधन ठेवण्यात आले आहे. यात कमाल वय हे साधारपणे २८ वर्ष असे ठेवण्यात आले आहे. तसेच सरकारी नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वया बाबत शिथिलता देखील दिली आहे.

बघुया कोणत्या वर्गासाठी किती वर्ष शिथिल करण्यात आली आहेत.

अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती ( Scheduled Caste and Scheduled Tribe ) :५ वर्ष
इतर मागासवर्गीय घटक ( Other Backward Classes) :३ वर्ष

Indian Army मध्ये इंजिनीअर्ससाठी मोठी भरती,लेफ्टनंट पदावर होणार निवड

Air India Airport Service Recruitment Salary

आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये सर्व पदांसाठी मिळणारे मूळ वेतन सोबत जाहीर केले आहेत. आयोगाने हे वेतन मासिक वेतन असे दिले आहेत. बघुया कोणत्या पदासाठी किती वेतन मिळणार आहे.

पद मासिक वेतन
कनिष्ठ अधिकारी तांत्रिक ( Junior officer technical ) : २९,७६० रुपये प्रति महिना
ग्राहक सेवा कार्यकारी ( Customer Service Executive ) :२४,९६० रुपये प्रति महिना
कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी ( Junior Customer Service Executive ) :२१,२७० रुपये प्रति महिना
रॅम्प सेवा कार्यकारी ( Ramp Service Executive ) :२४,९६० रुपये प्रति महिना
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर ( Utility Agent Cum Ramp Driver ) :२१,२७० रुपये प्रति महिना
हस्तक ( Handyman ) : १८,८४० रुपये प्रति महिना

Air India Airport Service Recruitment Documents

उमेदवारांनी अर्ज भरताना जे कागदपत्रे जोडावी लागणार आहेत तीच कागदपत्रे निवड झाल्यानंतर कागदपत्रे तपासणी पडताळणी वेळेस सादर करणे आवश्यक असणार आहे.

बघुया की आयोगाने उमेदवाराकडून कोणते कागदपत्र तपासणी साठी पात्रतेनुसार मागवले आहेत. अर्ज सोबत जोडलेल्या कागदपत्रांची प्रत ही स्वा साक्षांकित असावी. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे मूळ कागदपत्र सोबत जोडू नये.

१) सद्याचा पासपोर्ट साइज फोटो. उमेदवारांनी जो फोटो अर्ज करताना सोबत जोडला आहे तोच सोबत बाळगावा. तसेच फोटो हा 3 महिने जुना नसावा.

२) अर्ज आणि अर्ज शुल्क भरल्याची पावती.

३) शाळा सोडल्याचा दाखला.

४) दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र

५) बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र.

६) पदवी सर्व वर्षाचे गुणपत्रक.

७) पदवी प्रमाणपत्र ; डिप्लोमा अथवा एम बी ए अथवा आयटीआय कोर्स प्रमाणपत्र.

८) जात प्रमाणपत्र.

९) अनुभव प्रमाणपत्र.

१०) आधार कार्ड आणि पॅनकार्ड.

११) उत्पन्नाचा दाखला.

१२) नॉन क्रिमी लियर.

१३) ड्रायव्हिंग लायसन्स.

१४) पासपोर्ट कॉपी.

Frequently Asked Questions

१) Air India साठी काय पात्रता लागते ?

उत्तर : आयोगाने जाहीर केलेल्या पदासाठी पदानुसार दहावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण, पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

२) Air India Post साठी किती वेतन मिळते ?

उत्तर : आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पदानुसार मिळणारे वेतन हे वेग वेगळे आहेत यात रुपये २९,७६० ते १८,८४० रुपये प्रति महिना वेतन मिळते.

३) Air India Recruitment मध्ये निवड प्रक्रिया कशी असणार आहे ?

उत्तर : Air India Recruitment साठी होणाऱ्या विविध पदाची निवड ही मुलाखत या माध्यमातून होणार आहे.

४) Air India Recruitment साठी किती जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ?

उत्तर : Air India Recruitment साठी एकूण १४५ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.