India Post Payment Bank Recruitment ( इंडिया पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड ) ने नुकतेच एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे , या जाहिरातीनुसार एकूण ४७ पदे ही भरली जाणार आहेत , त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.तर सदर भरती असणार आहे “Executive” या पदाची म्हणजेच “कार्यकारी अधिकारी” या पदाची.
चला तर बघूया काय आहे सविस्तर जाहिरात. यामध्ये आपण थोडक्यात बघणार आहोत ; महत्त्वाच्या तारखा , पात्रतेचे निकष निवड पद्धत , प्रवर्गांसाठी असणारे आरक्षण, उमेदवारांना निवडीनंतर मिळणारे मानधन.
सरकार यांनी निवास सरकारी नोकऱ्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
http://www.jobschemewala.com
India Post Payment Bank Recruitment Overview
भारत सरकारचे जे दळणवळण मंत्रालय ( Ministry of Communication ) आहे त्या अंतर्गत असणाऱ्या पोस्ट डिपार्टमेंट ( Department of Post ) अखित्यारीत इंडिया पोस्ट पेमेंट बँक लिमिटेडची ( India Post Payment Bank ) स्थापना करण्यात आली आहे. ही भारत सरकारची शंभर टक्के संपूर्णतः मालकी असणारे बँक आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकचा कारभार भारतात संपूर्ण ग्रामीण तसेच शहरी भागात असून त्यांची संपूर्ण भारतामध्ये १ लाख ५५ हजार १५ पोस्ट ऑफिस आणि तीन लाखापेक्षा जास्त पोस्टमन ( Postman ) आणि ग्रामीण डाक सेवक ( Garmin Dak Sevak ) आहेत. ग्रामीण डाक सेवक आणि पोस्टमन यांच्या मदतीने इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची बँक सर्विस लोकांच्या दारापर्यंत पोहोचवली जाते.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही ‘बँकिंग आणि आर्थिक साक्षरता’ तसेच भारताचे जे विकसित बँकिंग क्षेत्र आहे , त्याच्या प्रगतीमध्ये हे एक पुढचे पाऊल असणार आहे.बँकिंग क्षेत्राचा विचार करता खाजगी तसेच सरकारी बँका या संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर आहे. यालाच एक हातभार म्हणून इंडिया पोस्ट पेमेंट बँक ( IPPB : India Post Payment Bank ) स्थापन करण्यात आली आहे , त्यामुळे भविष्यातील प्रगती आणि जे डिजिटल बदल होणार आहेत. त्यासाठी एक कार्यकारी अधिकारीची फळी उभे राहावी म्हणून इंडिया पोस्ट पेमेंट बँकने ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रतेनुसार जे उमेदवार पात्र ठरतील त्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्जाची सुरुवात ही १५ मार्च २०२४ पासून सुरू होत आहे.
जाहिरात प्रसिद्ध : | इंडिया पोस्ट पेमेंट बँक ( IPPB : India Post Payment Bank ) |
पदाचे नाव : | Executive / कार्यकारी अधिकारी |
पदसंख्या : | ४७ पदे |
अर्जाची पद्धत : | ऑनलाइन ( Online ) |
अधिकृत संकेतस्थळ : | https://www.ippbonline.com/ |
Table of Contents
India Post Payment Bank Recruitment Important Dates.
जे पात्र उमेदवार इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार आहेत त्यांनी अर्ज भरण्याची सुरुवातीची तारीख व अर्ज भरण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवणे गरजेचे आहे आणि उमेदवारांनी याच कालावधीमध्ये अर्ज करणे आणि अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. जर दिलेल्या कालावधीमध्ये अर्ज आणि अर्ज शुल्क भरला नसल्यास तो अर्ज पुढील निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही.
चला तर बघूया महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत :
अर्ज भरण्याची सुरुवातीची तारीख : | १५ मार्च २०२४ |
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : | ५ एप्रिल २०२४ |
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख : | ५ एप्रिल २०२४ |
India Post Payment Bank Recruitment Vacancies
इंडिया पोस्ट पेमेंट बँक मे जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार कार्यकारी अधिकारी ( Executive ) या पदाची भरती होणार आहे. एकूण ४७ पदेही या भरतीमध्ये भरली जाणार आहेत. ही पदे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची राज्यांमध्ये जी सर्कल ( Circle ) आहेत त्यामध्ये असणाऱ्या रिक्त जागांसाठी भरली जाणार आहेत.जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे जी ४७ पदे भरली जाणार आहेत ते विविध १३ राज्यातील सर्कल ( Circle ) मधली पदे भरली जाणार आहेत.
चला तर बघूया ही सर्कल ( Circle ) कोण कोणती आहेत :
सर्कल ( Circle ) | पदे |
बिहार | ५ |
दिल्ली | १ |
गुजरात | ८ |
हरियाणा | ४ |
झारखंड | १ |
कर्नाटक | १ |
मध्य प्रदेश | ३ |
महाराष्ट्र | २ |
ओडिशा | १ |
पंजाब | ४ |
राजस्थान | ४ |
तमिळनाडू | २ |
उत्तर प्रदेश | ११ |
जे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार आहेत त्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे की ,
१) उमेदवारांना ज्या सर्कलमधील पदासाठी अर्ज करायचा आहे त्याच सर्कल ( Circle ) मधील जागा या निवडीसाठी धरल्या जातील.
२) एका उमेदवाराला एकाच ( Circle ) सर्कल मधून अर्ज करता येईल.
३) निवडीनंतर उमेदवाराने ज्या सर्कलमध्ये अर्ज केला आहे त्याच सर्कल ( Circle ) मध्ये उमेदवाराची पदासाठी निवड केली जाईल.
४) जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे ४७ जागा या एक्झिटिव्ह ( Executive) म्हणजेच कार्यकारी अधिकारी पदासाठी भरल्या जाणार आहेत या पदाची संख्या ही तात्पुरती असून आवश्यकतेनुसार या जागेत वाढ किंवा घट केली जाऊ शकते.
India Post Payment Bank Recruitment Reservation
इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये कार्यकारी अधिकारी ( Executive ) पदाची जी पदे भरली जाणार आहेत त्यासाठी असलेल्या प्रवर्गांसाठी आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये खुला प्रवर्ग , आर्थिक दुर्बल घटक , इतर मागासवर्गीय , अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचा समावेश आहे तसेच अपंग उमेदवार यांच्यासाठी देखील काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे.
चला तर बघूया कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा राखीव आहेत.
प्रवर्ग | राखीव जागा |
खुला प्रवर्ग | २१ |
आर्थिक दुर्बल घटक | ४ |
इतर मागासवर्गीय | १२ |
अनुसूचित जाती | ७ |
अनुसूचित जमाती | ३ |
Age Relaxation
अनुसूचित जाती ( Schedule Caste) व अनुसूचित जमाती ( Schedule Tribe ) तसेच इतर मागासवर्गीय ( Other Backward classes) आणि अपंग ( Person with Disability) यांच्यासाठी वयाच्या शिथिलतेची अट देखील जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आली आहे.
प्रवर्ग | वयाच्या शिथिलतेची वर्ष |
अनुसूचित जाती ( Schedule Caste) व अनुसूचित जमाती ( Schedule Tribe ) | ५ वर्ष |
इतर मागासवर्गीय ( Other Backward classes) | ३ वर्ष |
अपंग ( Person with Disability) | १० वर्ष. |
अपंग घटकासाठी देखील प्रवर्गानुसार वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील अपंग ( PWD Open ) यांच्यासाठी १० वर्ष , आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील अपंग घटक ( PWD OBC ) यांच्यासाठी १३ वर्ष आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (PWD SC/ ST ) यांच्यातील अपंग घटक यांच्यासाठी १५ वर्षे.
माजी सैनिक ( Ex Servicemen ) यांच्यासाठी देखील भारत सरकारच्या निर्देशनानुसार व याबाबत शिथिलता देण्यात आली आहे.
India Post Payment Bank Recruitment Eligibility
इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये जे एक्झिक्यूटिव्ह ( Executive ) पदे भरली जाणार आहेत त्यासाठी काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे चला तर बघूया कोणते आहे पात्रतेचे निकष
१) शैक्षणिक पात्रता : Educational Qualification
जो उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार आहे तो उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट मधून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण झालेला असावा.मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन इन सेल्स अँड मार्केटिंग म्हणजेच सेल्स आणि मार्केटिंग मध्ये एमबीए ( MBA in Sale’s and Marketing ) झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.या पदासाठी नवखे ( Fresher )उमेदवार तसेच अनुभवी उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
२) Age Limit : वयोमर्यादा.
कार्यकारी अधिकारी ( Executive ) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमीत कमी वय 21 वर्षे तर जास्तीत जास्त व हे 35 वर्ष असावे.
वयोमर्यादा : २१ ते ३५ वर्ष.
वरील दिलेली वयाची मर्यादा ही दिनांक १ मार्च २०४ पर्यंतची आहे. म्हणजेच या तारखेपर्यंत उमेदवाराचे वय वर्ष २१ – वय वर्ष ३५ बसणे आवश्यक आहे. प्रवर्गानुसार वय शिथिलता जाहिराती मध्ये नमूद केलेली आहे.
India Post Payment Bank Recruitment Selection Process
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर उमेदवारांची निवड ही पदवी परीक्षेत मिळालेले मार्क किंवा ग्रुप डिस्कशन ( Group Discussion ) किंवा वैयक्तिक मुलाखत ( Interview ) यावर आधारित असतील. याबाबतचे निवडीचे सर्व निकष हे इंडियन पोस्ट पेमेंट बँक कडे ( IPPB ) राखीव असतील. म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक उमेदवारांची निवड ही पदवी परीक्षेतील मार्क किंवा मार्केटिंग आणि सेल्स मध्ये एमबीए ( MBA ) करताना मिळालेले मार्क यावर करू शकते किंवा बँक एक ऑनलाईन परीक्षा किंवा ग्रुप डिस्कशन यावरून उमेदवाराची निवड करू शकते.
जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणे म्हणजेच उमेदवाराला निवडीसाठी , मुलाखत , ग्रुप डिस्कशन किंवा ऑनलाईन परीक्षा यासाठी बोलावणे नाही.जर दोन उमेदवारांना समान गुण मिळत असतील तर उमेदवारांची निवड ही त्यांच्या जन्मतारखेनुसार ( Date of Birth) होईल.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक कडे राखीव असलेल्या अधिकारानुसार ते उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा , वैयक्तिक मुलाखत , ग्रुप डिस्कशन यासाठी बोलवू शकते त्यासाठी उमेदवाराने पूर्व पात्रता परीक्षा ( Preliminary Screening Test ) किंवा शॉर्टलिस्टिंग पद्धतीने म्हणजेच उमेदवारांचे शिक्षण , अनुभव त्याचे प्रोफाइल आणि जॉबची आवश्यकता नुसार उमेदवारांना बोलावले जाईल.
जे उमेदवार निवडीच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरतील त्यांची यादी तसेच जे उमेदवार शेवटची निवड फेरी पूर्ण करतील व मिरीट लिस्ट मध्ये येतील त्यांची यादी ही पोस्ट पेमेंट बँक च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
Period Of Contract :
इंडिया पोस्ट पेमेंट बँक ने आपल्या जाहिराती मध्ये नमूद केले आहे की एक्झिक्युटीव्ह पदाची भरती ही कायमस्वरूपी भरती नसून ही तात्पुरत्या स्वरूपातली भरती असेल. उमेदवारांची निवड ही करार पद्धती वर होईल म्हणजेच जे उमेदवार निवडले जातील ते एक वर्ष या करारावर म्हणजेच कॉन्टॅक्ट वर घेतले जातील तसेच हा करार किंवा कॉन्ट्रॅक्ट वर्षानुवर्ष वाढवला जाईल समाधानकारकरीत्या कामगिरी केलेल्या उमेदवारांचे करार हे तीन वर्षापर्यंत वाढवले जाईल. करार वाढवण्याची मर्यादा ही ३ वर्ष आहे. हा करार निवड झालेले उमेदवार व इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्यामध्ये होईल.
India Post Payment Bank Recruitment Application Fee
उमेदवारांनी दिलेल्या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क किंवा अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. उमेदवारांनी फक्त अर्ज भरल्यास व अर्ज शुल्क न भरल्यास असे अर्ज पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्ज शुल्क ही दोन प्रवर्गांसाठी वेगवेगळी आहे.
चला तर बघूया कोणत्या वर्गासाठी किती परीक्षा शुल्क किंवा अर्ज शुल्क ठेवण्यात आली आहे.
प्रवर्ग | अर्ज शुल्क |
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अपंग घटक | रुपये १५० |
उर्वरित प्रवर्ग म्हणजेच खुला प्रवर्ग ,आर्थिक दुर्बल घटक, विशेष मागासवर्ग, इतर मागासवर्ग | रुपये ७५० |
उमेदवाराने एकदा भरलेले शुल्क ही कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
India Post Payment Bank Recruitment Salary
जे उमेदवार इंडिया पोस्ट पेमेंट बँक कडून होणाऱ्या निवड प्रक्रियेनंतर मेरिट लिस्ट मध्ये निवडून येतील त्यांना एज्युकेटिव्ह या पदावर कार्य करत असताना काही रक्कम ही मानधन म्हणून दिली जाईल.
मानधन म्हणून दिली जाणारी रक्कम आहे : प्रति महिना रुपये ३०००० /-
India Post Payment Bank Recruitment General Instructions
१) अर्ज भरताना उमेदवारांनी जे पात्रतेचे निकष आहेत ते पूर्ण करणे आवश्यक आहेत. या पात्रतेचे निकष मध्ये कोणत्याही प्रकारची तफावत किंवा चुकीची माहिती आढळल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द किंवा राखीव ठेवण्याचे संपूर्ण अधिकार हे इंडिया पोस्ट पेमेंट बँक कडे असतील.
२) अपूर्ण अर्ज हा पुढील निवडीसाठी पात्र धरला जाणार नाही.
३) इंडिया पोस्ट पेमेंट बँक कडे जाहीर केलेल्या भरती मधील पदांची वाढ किंवा कमी करण्याचे अधिकार तसेच भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यात रद्द करण्याची अधिकार हे इंडिया पोस्ट पेमेंट बँक कडे राखीव ठेवण्यात आले आहेत.
४) जाहीर जाहिरातीमध्ये होणारे बदल तसेच जाहिरातीमध्ये असणाऱ्या निवडीचे सर्व सूचना या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील.
Frequently Asked Question
१) India Post Payment Bank Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
उत्तर: India Post Payment Bank Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ एप्रिल २०२४ आहे.
२) IPPB म्हणजे काय ?
उत्तर : IPPB म्हणजेच India Post Payment Bank.
३) India Post Payment Bank Recruitment मध्ये कोणती पदे भरली जाणार आहे ?
उत्तर : India Post Payment Bank Recruitment मध्ये Executive म्हणजेच कार्यकारी अधिकारी पदाची भरती होणार आहे.
४) India Post Payment Bank Recruitment apply link कोणती आहे
उत्तर : https://www.ippbonline.com/ या लिंक वर जावून Apply करू शकता.