BMC Recruitment | बृहन्मुंबई महानगरपालिका License Inspector च्या ११८ जागांसाठी भरती

BMC Recruitment अंतर्गत नुकतेच एक सूचना परिपत्रक जाहीर केले आहे. क्र. अअ/ २६८३/ आस्था-१, दिंनाक : १५ मार्च २०२४ द्वारे बृहमुंबई महानगरपालिका ने ११८ जागांसाठी जाहिरात काढली आहे. महानगरपालिका आयुक्त यांनी क्रं एम जी सी/एफ/२५९९ दिनांक २९-०२-२०२४ आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर यांनी क्रं अति.आ./शहर/डी/३२७६ दिनांक १५-०३-२०२४ अन्वये दिलेल्या मंजुरी अनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महानगरपालिका आयुक्तांच्या सोबत काम करणाऱ्या सर्व खात्यातील इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे.

BMC Recruitment License Inspector Overview

बृहन्मुंबई महानगरपालिका सोप्या भाषेत BMC , मुंबई महानगरपालिका ही भारतातील अती श्रीमंत असणाऱ्या काही महानगरपालिकेपैकी एक महानगरपालिका आहे. अशा श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेत वरच्या पदावर काम करायची संधी उमेदवारांना आली आहे. महानगरपालिका द्वारे जाहीर केलेल्या परिपत्रिका मधील लायसेन्स इन्स्पे्टर या पदासाठी जी पात्रता लागते ते निकष पूर्ण करीत असलेला लिपिक किंवा तत्सम संवर्गातील तसेच कनिष्ठ लेखा परीक्षक व लेखा सहाय्यक या पदावरील कर्मचाऱ्यांकडून लायसेन्स इन्स्पेक्टर पदाच्या निवडीसाठी जी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील ही भरती संपूर्णतः अंतर विभागीय भरती प्रक्रिया आहे.

जाहिरात : बृहन्मुंबई महानगरपालिका

पदाचे नाव : License Inspector ( अनुज्ञापन निरीक्षक )

पद संख्या : ११८

अधिकृत संकेतस्थळ : https://portal.mcgm.gov.in/

BMC Recruitment License Inspector Vacancies

बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे लिपिक किंवा तत्सम संवर्गातील तसेच कनिष्ठ लेखा परीक्षक व लेखा सहाय्यक या पदावरील कर्मचाऱ्यांकडून लायसेन्स इन्स्पेक्टर पदाच्या निवडीसाठी अर्ज मागविण्यात येणार आहे त्या पदाचा तपशील खालील प्रमाणे आहे.

पदाचे नाव : अनुज्ञापन निरीक्षक

पद संख्या : ११८

वेतनश्रेणी : ७ व्या वेतन आयोगानुसार , स्तर M17 रू.२९,२०० – ९२,३००.

( असुधारित वेतनश्रेणी नुसार : ५२००-२०२००+२८०० )

अनुज्ञापन निरीक्षक पदाच्या एकूण रिक्त ११८ जागांचा प्रवार्गा नुसार तपशील बघुया अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती अ ब क ड , इतर मागासर्गीय , विशेष मागास प्रवर्ग, साशैमाप्र , आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, खुला वर्ग , एकूण पदेप्रवर्गा निहाय सामाजिक आणि समांतर आरक्षण देण्यात आले असून अधिक माहिती साठी महानगर पालिका संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

प्रवर्ग पद संख्या
अनुसूचित जाती१४
अनुसूचित जमाती१४
विमुक्त जमाती अ
विमुक्त जमाती ब
विमुक्त जमाती क
विमुक्त जमाती ड
इतर मागासर्गीय१८
साशैमाप्र१२
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक१२
खुला वर्ग२९
विशेष मागास प्रवर्ग
एकूण११८

दिव्यांग करिता ४ टक्के आरक्षण असून त्यांना या भरती प्रक्रियेत ५ पदे आरक्षित आहे.

रिक्त पद संख्या , आरक्षण / अनुशेष यात बदल होण्याची शक्यता आहे तसे झाल्यास केलेलं बदल हे उमेदवारांना मुंबई महानगर पालिका संकेत स्थळावर बघता येतील.

bmc recruitment 2024

BMC Recruitment License Inspector Eligibility

अनुज्ञापन निरीक्षक पदाची भरती जरी अंतर्गत विभागीय असली तरी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी यांना बंधनकारक असणारं आहे. परिपत्रिकेत दिल्याप्रमाणे :

१) शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवार हा कोणत्याही मान्यतप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

२) मराठी भाषा : उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षेत १०० गुणाची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.

३) संगणक ज्ञान : उमेदवार हा एम एस सी आय टी ( MSCIT ) किंवा जि ई सी ई टी ( GECET ) चे प्रमाणपत्र प्राप्त असावा. किंवा सदर सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्याकरिता शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणी किंवा वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

४) वयाची अट : उमेदवाराचे वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्ष.

५) अनुभव : लायसेस इन्स्पेक्टर पदासाठी घेण्यात येणाऱ्या खात्यांतर्गत परीक्षेसाठी उमेदवाराने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लिपिक व तत्सम तसेच कनिष्ठ लेखा परीक्षक व लेखा सहाय्यक व तत्सम इतर पदावर किमान पाच वर्ष नियमित तत्वावरील सेवा कालावधी अपूर्ण केलेला असावा.

६) उमेदवार निवड : लायसन्स खात्याकडून लायसन्स इन्स्पेक्टर या पदासाठी घेण्यात येणाऱ्या खात्यांतर्गत परीक्षेत उमेदवाराने एकूण १०० गुणांपैकी किमान ४५ गुणांसह ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

BMC Recruitment License Inspector Selection Process

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांमधून अंतर्गत निवड पद्धतीने आणि त्या गुणवत्तेनुसार लायसन्स इन्स्पेक्टर या पदासाठी घेण्यात येणारी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा ही कशाप्रकारे असणार आहे त्याचा गुणनिहाय आराखडा आपण बघणार आहोत.

क्रविषय प्रश्न संख्यागुणपात्र होण्यासाठी प्राप्त करावयाचे गुण
1 महानगरपालिका अधिनियम अंतर्गत लायसेन्स आणि ज्ञानपात्र देण्याची तरतूद प्रकरण कलम :

अ) जाहिरात कलम
ब) फेरीवाला कलम
क) व्यापार व उद्दीमे कलम
ड) अवकाने कलम


३५
२०
१०
७०एकूण गुणांपैकी किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
2नागरी दैनंदिनी१०१०
3सामान्य ज्ञान१५१५
4कायदा विषयक ज्ञान
एकूण१००१००एकूण गुणांपैकी किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने लायसन्स इन्स्पेक्टर या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी जाहीर केलेला परिपत्रकामधील काही टीप उमेदवारांनी लक्षातच ठेवायच्या आहेत.

१) लायसन्स इन्स्पेक्टर या पदाकरता घेण्यात येणारी परीक्षा ही भारतातील कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.

२) या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत अथवा मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही.

३) लायसन्स इन्स्पेक्टर या पदाची अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराने या परीक्षेसाठी घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

४) लायसन्स इन्स्पेक्टर या पदावरील निवड ही जेष्ठता यादीप्रमाणे , गुणा प्रमाणे राहील तथापि लायसन्स इन्स्पेक्टर पदाचे नियुक्तीचे आदेश हे निघाल्यानंतर उमेदवाराने विहित कालावधीत म्हणजेच दोन महिन्याच्या आत मध्ये रुजू होणे आवश्यक आहे.

वरील दिलेल्या निवडी निकषानुसार जर पुरेसे आणि योग्य उमेदवार उपलब्ध झाल्यास लायसन्स इन्स्पेक्टर निवडीचे जे निकष असतील ते शिथिल करण्याचे सर्व अधिकार हे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे राहतील.

BMC Recruitment License Inspector Departmental Post

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे अंतर्गत विभागीय कर्मचाऱ्यांमधून बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे त्यासाठी लिपिक व त्याच्या तत्सम संवर्गातील पदांचा समावेश होणार आहे ही पदे नेमकी कोणती आहेत ती बघूया.

लिपिक लिपिक नि टंकलेखकटंकलेखककनिष्ठ लघुलेखकशोधक लिपिक
सूचनालिपिकजलमापक निरीक्षककनिष्ठ वाहतूक पर्यवेक्षकभाडे संकलकअधिपत्र लिपिक
रोख प्रापक लिपिकरोखपालभांडार समय लेखक पर्यवेक्षकभांडार लिपिकसर्वसाधारण लिपिक
भंडारपालकनिष्ठ लेखापरीक्षान्यायालयीन लिपिककनिष्ठ वेतनप्रदाताविधी खात्यातील व्यवस्थापन लिपिक
कनिष्ठ विधी सहाय्यकलेखा सहाय्यकवरिष्ठ न्यायालय लिपिक

BMC Recruitment License Inspector Apply Online

परिपत्रके मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत त्या खालील प्रमाणे :

१) अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाईल , ऑफलाइन पद्धतीने कोणताही प्रकारचा केलेला अर्ज हा स्वीकारण्यात येणार नाही.

२) ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे https://portal.mcgm.gov.in/ या पोर्टलवर सर्व नोकरीच्या संधी या टॅब मध्ये हा ऑनलाइन पद्धतीने करायचा अर्ज उपलब्ध असेल. उमेदवाराने दिलेल्या लिंक वर क्लिक करून परिपत्रके सोबत जोडलेल्या How to Apply मधील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून अर्ज भरायचा आहे.

३) ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवाराने जी आवश्यक माहिती अर्जामध्ये दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे पुढील परीक्षा घेतली जाईल निवडीनंतर कागदपत्रे तपासणी पडताळणी वेळेस या माहितीत कोणत्याही प्रकारची तफावत असता कामा नये.

५) ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी : परिपत्रक प्रसारित झाल्याच्या दिनांक पासून पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : ३०-०३-२०२४.

bmc recruitment 2024

BMC Recruitment License Inspector Application Fee

ऑनलाइन अर्ज भरून झाल्यानंतर अर्ज शुल्क भरण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी भरलेली परीक्षा शुल्क किंवा अर्ज शुल्क हे ना परतावा राहील व ते कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. खात्याअंतर्गत होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेसाठी खालील प्रमाणे ऑनलाइन परीक्षा शुल्क भरायचे आहे.

प्रवर्गपरीक्षा शुल्क
१ ) खुला प्रवर्गांसाठीरुपये १०००/-
२) मागास प्रवर्गाकरिता रुपये ९००/-

ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क सबमिट केल्यानंतर उमेदवाराने अर्जाची प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवावी.

BMC Recruitment License Inspector Documents

निवड झालेल्या उमेदवाराने त्याची शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे यांच्या मूळ प्रति तसेच छायांकित प्रति या संबंधित कार्यालयाच्या अधिकारांकडून साक्षांकित करून घेऊन तपासणीसाठी नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे.

१) उमेदवाराचा शाळा सोडल्याचा दाखला ,

२) जन्म दाखला.

३) शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र.

४) एम एस सी आय टी ( MSCIT ) प्रमाणपत्र.

५) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील , विमुक्त जाती व जमाती तसेच इतर मागासवर्गीय उमेदवारांचे जात प्रमाणपत्र.

६) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमर उमेदवाराने नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

७) जात वैधता प्रमाणपत्र..

BMC Recruitment License Inspector Terms and Conditions

बृहन्मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या परिपत्रिका मध्ये लायसन इन्स्पेक्टर साठी काही सर्वसाधारण अटी परिपत्रके मध्ये नमूद केलेल्या आहेत त्या खालील प्रमाणे.

१) सदर खात्यांतर्गत भरती प्रक्रियेमध्ये अंतिम निर्णय घेण्याचा प्रशासकीय किंवा अन्य कारणांकरिता सदर खात्यातील भरती प्रक्रिया ही कोणत्याही वेळेस, कोणत्याही टप्प्यावर थांबवण्याचे अधिकार हे महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांना राहतील.

२) सदर खात्यांतर्गत भरती प्रक्रियेमध्ये दिलेली रिक्त पदे ही उपलब्धतेनुसार आणि आवश्यकतेनुसार भरण्यात येतील तथापि तयार केलेली निवड ही कोणत्याही वेळेस पूर्व सूचना न देतात रद्द करण्याचे किंवा निवड यादीचा कालावधी वाढवण्याचे अधिकार हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना असतील तसेच उमेदवारांचे नाव निवड यादीत समाविष्ट असले तरी या पदावर त्यांची नियुक्ती करिता कोणताही अधिकार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

३) लायसिस इन्स्पेक्टर पदाच्या नियुक्तीसाठी कर्मचारीने विहित पात्रता किंवा अटी / शर्ती पूर्ण करत नसल्याचे कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल त्याला त्याच्या आधीच्या पदावर काम करण्यात येईल व याबाबत कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही.

४) इतर राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतरित झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांचा आरक्षित पदाकरता विचार होणार नाही

Frequently Asked Questions

१) BMC license Inspector साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर : BMC license Inspector साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०२४ आहे.

२) BMC license Inspector ही departmental examination आहे का ?

उत्तर : BMC license Inspector ही विभागीय अंतर्गत निवड परीक्षा आहे.

३) BMC license Inspector साठी मुलाखत / Interview होणार आहे का ?

उत्तर : BMC license Inspecto परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत अथवा मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही.

४) BMC license Inspector साठी किती जागांचे परिपत्रक जारी केले आहे?

उत्तर : BMC license Inspector साठी एकूण ११८ जागांचे परिपत्रक मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले आहे.