SSC CPO म्हणजेच Staff Selection Commission Central Police Organization ने नुकतेच विविध पदांच्या एकूण ४१८७ जागांची जाहिरात काढली आहे. तर या जागा आहेत दिल्ली पोलीस, केंद्रिय सशस्त्र पोलीस दलातील उपनिरीक्षक पदाची. SSC मार्फत ४१८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतिने अर्ज मागविण्यात येणार आहेत.
चला तर बघुया संपूर्ण जाहिरात अगदी थोडक्यात ,
SSC CPO Notification
स्टाफ सिलिक्शन कमिशनने विविध उप- पदांसाठी खुली स्पर्धा म्हणजेच Open Competition नुसार परिक्षा घेऊन दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल CAPF मधील निरीक्षक , कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल आणि असिस्टंट पदांकरीता विभागीय उमेदवाराकडून अर्ज मागवले आहेत. या जागांचे विवरण कसे असणारे , कोणत्या पदासाठी किती जागा आहेत , परिक्षा पध्दत कशी असेल , परीक्षेचे टप्पे कोणते , फॉर्म कसा भरायचा , अभ्यासक्रम काय आहे , आणि परिक्षा पास झाल्यास या पदांसाठी किती पगार असेल या सर्व गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत.
Table of Contents
SSC CPO Important Dates
अर्ज भरायला सुरवात तारीख | ०४.०३.२०२४ |
अर्ज भरण्याची शेवटची तारीख | २८.०३.२०२४ (२२.०० ) |
फी भरण्याची शेवटची तारीख | २९.०३.२०२४ ( २३.०० ) |
अर्ज आणि फी मध्ये बदल करायचं असल्यास तारीख | ३०.३.२०२४ ते ३१.०३.२०२४ |
CBT परीक्षा तारीख | ०९-१०-१३. ०५.२०२४ |
SSC CPO Tentative Vacancies
SSC ने जाहीर केलेल्या पदानुसार असलेल्या जागा किती आहेत ते बघुया.
१) Sub-inspector (Exe.) in Delhi Police Male : 125
२) Sub Inspector ( Exe.) in Delhi Police Female : 61
३) Sub Inspector (GD) in CAPF : 4001
अशा एकूण जागांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. Sub Inspector in CAPF यामध्ये आसलेल्या CAPF कॅटेगरीनुसार असणाऱ्या 4001 जागा आहेत. CAPF नुसार जागाचे आकडे पाहूया
१) BSF ( Border Security Force ) : ८९२
२) CISF ( Central Industrial Security Force ) : १५९७
३) CRPF ( Central Reserve Police Force ) : ११७२
४) ITBP ( Indi Tibet Border Police ) : २७८
५) SSB ( Sashstra Seema Bal ) : ६२
SSC CPO Eligibility
सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणारा उमेदवार भारतीय असणे आवश्यक आहे.
Age Limit
वयाच्या मर्यादेबाबत हिशोबाची तारीख ०१.०८.२०२३ नुसार निश्चित केले आहे. DoPT OM Number 14017/70/87-Est दिनांक १४-०७-१९८८ च्या तरतुदीनुसार वय मर्यादा २०-२५ वर्ष आहे. म्हणजेच जन्म हा ०२.०८.१९९९ ते ०१.०८.२००४ या दरम्यान झालेला असावा.
Age Relaxation बघितले तर SC ST साठी ५ वर्ष आणि OBC साठी ३ वर्ष देण्यात आले आहे.
Education
०१.०८.२०२४ तारखे पर्यंत , सर्व पदासाठी आवश्यक आणि सामाईक असणारी म्हणजेच पदवी असणे आवश्यक आहे. तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षी असणारे उमेदवार देखील या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
दिल्ली पोलिस उपनिरीक्षक पुरुष उमेदवाराकडे LMV साठी वैध ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे. तसेच ज्या उमेवारांकडे परवाना नाही असे उमेदवार CAPF पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अर्ज करू शकतात.
SSC CPO Syllabus
Computer Based Test मध्ये 2 पेपर होतील.
Paper 1 Subject :
General Intelligence And Reasoning
General knowledge and General Awareness
Quantitative Aptitude
English Comprehension
Paper 2 Subject :
English Language and Comprehension
दोन्ही पेपर साठी असणारा सविस्तर Syllabus हा जाहिराती मध्ये प्रसिद्ध कऱण्यात आले आहे
SSC CPO Exam Pattern
Staff Selection Commission ने जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे ही परिक्षा खालीलप्रमाणे असेल.
१) CBT म्हणजेच Computer Based Test
CBT मध्ये Paper 1 आणि Paper 2 असे दोन पेपर होतील.
Paper 1 – 200 प्रश्न आणि गुण आहेत 200 आणि वेळ आहे 2 तास
यामध्ये Subject असतील ते प्रत्येकी 50 प्रश्न 50 मार्क असे चार विषय. General Intelligence and Reasoning , General knowledge and General Awareness , Quantitative Apptitude , English Comprehension
Paper 2- 200 प्रश्न आणि 200 गुण वेळ असेल 2 तास
यामध्ये English Language आणि Comprehension हा विषय आहे.
दोन्ही पेपर हे Objective Multiple Choice Type Questions असतील. पेपर English आणि हिंदी भाषेत असेल. उमेदवारांनी पेपर सोडवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे दोन्ही पेपर मध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 0.25 मार्क्स हे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी कापले जाणार आहे.
२) PET म्हणजेच Physical Endurance Test
३) Medical Examination
दोन्ही पेपर आणि PET पास होणारें उमेदवारी हे Medical Examination साठी पात्र असतील.
४) Document Verification
DV साठी उमेदवारानी आपले सर्व Original Documents आणि Photocopies घेऊन आयोग बोलावेल त्यावेळी उपस्थित रहावे लागणार आहे.
SSC CPO Mode of Selection
Paper 1 आणि Paper 2 साठी Minimum Qualifying marks असणे आवश्यक आहे. Paper 1 मध्ये पास होणारे उमेदवार हे PET साठी बोलावले जातील. PET ही फक्त Qualifying पण आवश्यक आहे. PET पास होणारे उमेदवार Paper 2 देतील.
उमेदवारांना अर्ज भरताना आपल्या आवडीप्रमाणे पोस्ट क्रम देणे आवश्यक आहे.
SSC CPO Application Fee
Application Fee – Rs 100 आहे
महिला तसेच SC ST उमेदवार , Ex Serviceman यांना कोणत्याही प्रकारची फी भरायची नाही आहे.
ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख ही २९ मार्च २०२४ आहे. या विहित केलेल्या कालावधी मध्येच फी भरायची आहे.
Fee can be paid Only through Online Payment Modes, namely BHIM UPI , Net Banking, Or by using Visa , MasterCard or Rupay Credit or Debit Card Only.
उमेदवारांनी अर्ज योग्य रीतीने भरल्यावर फी भरायची आहे. तसेच भरलेली फी ही SSC कडे Payment Successful आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.
SSC CPO How to Apply
SSC CPO ऑनलाईन अर्ज कसा करायचं आहे ते बघुया
१) उमेदवारांना पुढील लिंक वर जावून Registration करायचे आहे : https://ssc.gov.in/login
२) One Time Registration करताना Personal Details मध्ये नाव, ओळख , संपर्क , Password Creation , Additional Details मध्ये नागरिकत्व, पत्ता आणि शिक्षण , Declaration भरायचे आहे.
३) login वर क्लिक करून Username ( Registration number ) आणि Password टाकून लॉगिन करायचे आहे.
४) लॉगिन केल्यावर Personal Details, Educational Details , Exam Requirement, Document Upload , Live Photo Capture, Form Preview करून Decalcification Yes करायचे आणि Application Fee भरायची आहे.
SSC CPO Salary
CAPF मध्ये उपनिरीक्षक : Level 6 वेतनश्रेणी मध्ये असते. यानुसार गट ब राजपत्रित आणि रूपये ३५,४००० ते १,१२,४०० ची वेतनश्रेणी आहे.
उपनिरिक्षक दिल्ली पोलिस : पुरुष आणि महिला दोघांसाठी Level 6 वेतनश्रेणी मध्ये असते. यानुसार गट ब राजपत्रित आणि रूपये ३५,४००० ते १,१२,४०० ची वेतनश्रेणी आहे.
Conclusion
Staff Selection Commission ने ४१८७ जागांची जाहिरात काढली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ०४.०३.२०२४ ते २८.०३. २०२४ या कालावधी मध्येच फी भरून अर्ज पुर्ण करायचा आहे. अर्जात काही फेरबदल करायचे झाल्यास योग्य रक्कम भरून ३०.०३.२०२४ ते ३१.०३.२०२४ मध्ये करून घ्यायचे आहे.
Frequently Asked Questions
१) अर्जाची शेवटची तारीख काय आहे ?
उत्तर : अर्जाची शेवटची तारीख २८.०३.२०२४ आहे.
२) Staff Selection Commission CPO Eligibility काय आहे ?
उत्तर : शैक्षणिक पात्रता पदवी असून वय मर्यादा २५-३० वर्ष अशी आहे.
३) SSC Central Police Organization Exam Pattern काय आहे ?
उत्तर : Staff Selection Commission ने जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे ही परिक्षा खालीलप्रमाणे असेल.
१) CBT म्हणजेच Computer Based Test : Paper 1 आणि Paper 2
२) PET म्हणजेच Physical Endurance Test
४) 2024 Vacancies किती आहे ?
उत्तर : SSC साठी ४१८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतिने अर्ज मागविण्यात येणार आहेत.
५) SSC Central Police Organization Salary किती आहे ?
उत्तर : CAPF मध्ये उपनिरीक्षक : Level 6 वेतनश्रेणी मध्ये असते. यानुसार गट ब राजपत्रित आणि रूपये ३५,४००० ते १,१२,४०० ची वेतनश्रेणी आहे.
उपनिरिक्षक दिल्ली पोलिस : पुरुष आणि महिला दोघांसाठी Level 6 वेतनश्रेणी मध्ये असते. यानुसार गट ब राजपत्रित आणि रूपये ३५,४००० ते १,१२,४०० ची वेतनश्रेणी आहे.
६) SSC CPO Full Form काय आहे ?
उत्तर : SSC CPO म्हणजेच Staff Selection Commission Central Police Organization.
७) CPO परीक्षा केव्हा होणार आहे ?
उत्तर : Staff Selection Commission Central Police Organization. SSC परीक्षा ही ०९, १० आणि १३ मे २०२४ मध्ये होणार आहे.
८) SSC CPO मध्ये negative Marking आहे का ?
उत्तर : दोन्ही पेपर मध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 0.25 मार्क्स हे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी कापले जाणार आहे.
Our Recent Post