Mazagon Dock Recruitment 2024 मुंबईमधील माझगाव डॉकमध्ये नॉन एक्झक्युटिव्ह पदासाठी भरती, आयटीआय उमेदवारांना प्राधान्य.

Mazagon Dock Recruitment 2024 : नमस्कार मंडळी , तर Jobschemewala मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत मुंबई मध्ये असणाऱ्या माझगाव डॉक शिप बिल्डर्स ने प्रसिद्ध केलेल्या १७६ नॉन एक्झक्युटिव्ह जागांसाठी असणाऱ्या भरती प्रक्रियेचा आढावा.

Mazagon Dock Recruitment 2024 Overview

माझगाव डॉक शिप बिल्डर्स ने नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली असून आयटीआय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नामांकित कंपनीत काम करण्याची संधी मिळणार आहे. जे उमेदवार इच्छुक असतील अशांना १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. ३ वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने पदे भरली जाणार असून यात वाढ होऊ शकते.

SSC GD Constable Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल ४० हजार जागांसाठी भरती

Mazagon Dock Recruitment 2024 Important Dates

अर्ज भरताना महत्वाचं असते की अर्ज केव्हा सुरू होणार आहे अन् आपल्याला अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख कोणती आहे हे बघणे यानुसार सदर भरती प्रक्रियेसाठी ,

अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख :जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख :०१ ऑक्टोबर २०२४
परीक्षा जाहीर होणार :३१ ऑक्टोबर २०२४

Mazagon Dock Recruitment 2024 Vacancies

नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी ज्या विविध जागा सदर भरती दरम्यान भरल्या जाणार आहेत त्या नेमक्या कोणत्या आहेत, कोणत्या पदासाठी किती जागा आहे हे बघुया. यानुसार पदाचे नाव , पद संख्या

Mazagon Dock Recruitment 2024

Mazagon Dock Recruitment 2024 Eligibility Criteria

आयोगाने नॉन एक्झक्युटिव्ह पदासाठी पात्रतेचे काही निकष दिले असून इच्छुक उमेदवारांनी आणि अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी हे सर्व निकष काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. यानुसार ,

१) वयोमर्यादा :

सदर भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान वय १८ आणि अधिकतम वय ३८ वर्ष पूर्ण या दरम्यान असावा.

२) शैक्षणिक पात्रता :

नॉन एक्झक्युटिव्ह पदासाठी जी शैक्षणिक पात्रता लागणार आहे त्यात , उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून सोबतच उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट/ संस्थे मधून आयटीआय परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.

Mazagon Dock Recruitment 2024 How to Apply

आयोगाने सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रणालीचा अवलंब केल्याने उमेदवारांनी आयोगाच्या संकेत स्थळावर जावून आपला अर्ज भरायचा आहे. यासाठी स्टेप्स :

१) सर्वात आधी जायचे आहे MDL वेबसाइटवर https://mazagondock.in वर

२) संकेत स्थळावर पुढील क्रमानुसार क्लिक करून Careers >> Online Recruitment >> Non-Executive येथे जा.

३) येथे आल्यावर तुम्हाला Non-Executive टॅब दिसेल तो निवडा आणि नोंदणीसाठी आवश्यक तो तपशील भरा आणि “Submit” क्लिक करा.

४) यानंतर तुम्हाला मेल येईल. मेलवर आलेल्या लिंकवर क्लिक करून खात्री करा.

५) मेलवर मिळालेल्या Username आणि Password वापरून लॉगिन करा.

६) अर्ज करताना फोटो आणि सही स्कॅन करून ठेवा.

७) अर्जात विचारलेली आवश्यक माहिती नमूद करा.

८) अर्ज भरून झाल्यावर अर्ज तपासून बघा आणि खात्री झाल्यास Submit करा.

अर्ज भरून झाल्यावर उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग प्रवर्ग : रूपये ३५४
अर्ज सूट : अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अपंग घटक आणि माजी सैनिक

Mazagon Dock Recruitment 2024 Selection Process

उमेदवाराची निवड ही दोन टप्प्यात केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने लेखी परीक्षा आणि ट्रेड स्किल टेस्ट हे दोन भाग असतील. उमेदवारांना हे दोन्ही टप्पे मेरिट लिस्ट नुसार उत्तीर्ण व्हायचे आहे. अंतिम मेरिट लिस्ट मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणी पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी करिता बोलावले जाईल.

लाडकी बहिण योजनेचे पैसे ‘या’ चार दिवसात जमा होणार !! Mukhyamantri ladki bahin yojana 2024

Mazagon Dock Recruitment 2024 Exam Pattern

सदर भरतीसाठी परीक्षा पद्धत कशी असणार आहे आणि परीक्षेसाठी कोणत्या पदासाठी काय सिलॅबस असेल यासाठी आयोगाने जाहीर केलेली जाहिरात बघावी.

Kotak Kanya Scholarship 2024: कोटक कन्या शिष्यवृत्ती, मुलींना शिक्षणासाठी ₹ १,५०,००० रुपयांची स्कॉलरशिप

Mazagon Dock Recruitment 2024 Documents

लेखी परीक्षा आणि ट्रेड टेस्ट उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणी पडताळणी साठी बोलवले जाईल. यासाठी उमेदवाराने पुढील कागदपत्रे अर्जासहित सादर करावे लागतील.

१) अर्जाची प्रत

२) अर्ज शुल्क पावती

३) दहावी अथवा बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र

४) आयटीआय ट्रेड उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रक

५) अनुभव प्रमाणपत्र

६) जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला

Mazagon Dock Recruitment 2024 Frequently Asked Questions

१) Who can Apply for Mazagon Dock Recruitment 2024 ?

उत्तर : अर्ज करणारा उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा सोबतच आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

२) Which is the Last date to Apply for Mazagon Dock Recruitment 2024 ?

उत्तर : सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ०१ ऑक्टोबर २०२४ आहे.