CISF Constable Bharti 2024: नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या Jobschemewala मध्ये आपण बघणार आहोत CISF ने प्रसिद्ध केलेली CISF Constable Bharti 2024 चा धावता आढावा.
केंद्र सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने तब्बल ११३० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून सदर भरती ही कॉन्स्टेबल पदासाठी असून सरकारी नोकरी मध्ये करियर करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक नामी संधी असणार आहे.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जरी तुमचे शिक्षण हे फक्त बारावी पर्यंत झालेले असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकतात.
मग वाट कसली पाहताय ? अर्ज कसा अन् कोठे करायचा ?, कोणते उमेदवार अर्ज करू शकतात ? परीक्षा पद्धत , निवड प्रक्रिया कशी असेल या संपूर्ण बाबीचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत यासाठी माहिती शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचून आपला अर्ज आजच भरा.
CISF Constable Bharti 2024 Overview
यानुसार ,
जाहिरात प्रसिद्ध : | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ( Central Industrial Security Forces ) |
पदाचे नाव : | कॉन्स्टेबल ( Constable ) |
रिक्त जागा : | ११३० पदे |
अर्ज पद्धत : | ऑनलाईन अर्ज प्रणाली |
नोकरीचे ठिकाण : | भारतात कुठेही |
अधिकृत संकेतस्थळ : | अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा |
CISF Constable Bharti 2024 Important Dates
अर्ज सादर करण्यासाठी आयोगाने काही ठराविक कालावधी निहित केला आहे आणि यानुसार ,
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख : | जाहिरात प्रसिद्ध पासून |
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : | ३० सप्टेंबर २०२४ |
Supreme Court Bharti 2024: सुप्रीम कोर्टात दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी, आत्ताच अर्ज करा
CISF Constable Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव : | कॉन्स्टेबल |
पद संख्या : | ११३० जागा |
Indian Overseas Bank Apprentice Bharti 2024: इंडियन ओवेरसिज बँकेमध्ये मोठी भरती ! अर्ज करा
CISF Constable Bharti 2024 Eligibility Criteria
ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. यामध्ये साधारणपणे पात्रतेचे तीन निकष दिले असून यामध्ये प्रामुख्याने वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता आणि शारीरिक पात्रता हे घटक आहेत.
१) वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २३ वर्ष असणे आवश्यक आहे.
२) शैक्षणिक पात्रता :
शैक्षणिक पात्रता लक्षात घेता उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थांमधून कमीत कमी बारावी उत्तीर्ण झालेला असावा.
३) शारीरिक पात्रता :
सदर कॉन्स्टेबल भरती पुरुष गटासाठी असून यात उमेदवाराचे किमान उंची १७० सेमी आणि छाती ८०-८५ सेमी असावी.
CISF Constable Bharti 2024 How to Apply
आयोगाने उमेदवारांसाठी अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रणाली पद्धत वापरल्याने उमेदवारांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे. जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हाला वन टाईम नोंदणी करायची आहे. नोंदणी झाल्यावर आपल्याला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल ते वापरून लॉगिन करायचे आहे. CISF Constable Recruitment वर Apply क्लिक करून पुढील अर्ज भरायचा आहे. अर्जात विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती संपर्क माहिती इत्यादी बाबी अचूक नोंद करून खात्री झाल्यावर अर्ज सबमिट करा आहे.
अर्ज भरून झाल्यावर उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती आणि अपंग घटक यांना सूट देण्यात आली आहे. यानुसार
खुला प्रवर्ग / इतर प्रवर्ग : | ₹१०० |
अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती आणि अपंग घटक : | शुल्क माफ असेल |
CISF Constable Bharti 2024 Selection Process
कॉन्स्टेबल म्हणून निवड होण्यासाठी कोणते टप्पे पार पाडायचे आहेत हे बघूया. साधारणपणे तीन टप्प्यात निवड प्रक्रिया होणार आहेत यानुसार
१) शारीरिक चाचणी ( Physical Test )
२) कागदपत्रे पडताळणी ( Document Verification )
३) लेखी परीक्षा ( Written Exam )
उमेदवारांची सर्वात आधी शारीरिक चाचणी ( यामध्ये उमेदवाराची उंची १७० सेमी / छाती ८०-८५ सेमी ) द्यायची होणार आहेत त्यात पात्रता गुण मिळालेले उमेदवारांना कागदपत्रे तपासणी पडताळणी साठी बोलवले जाईल. जे उमेदवार पात्र ठरतील अशा उमेदवारांना शेवटच्या म्हणजेच लेखी परीक्षेसाठी बोलवले जाईल. या लेखी परीक्षेत कट ऑफ पेक्षा जास्त गुण मिळालेले उमेदवारांची निवड अंतिम मेरिट लिस्टमध्ये प्रसिद्ध केली जाईल.
CISF Constable Bharti 2024 FAQ
१) Who is eligible for CISF Bharti 2024?
उत्तर : सदर भरतीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थांमधून विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेला उमेदवार अर्ज करू शकतो.
२) How to apply for CISF Bharti 2024?
उत्तर : आयोगाने ऑनलाईन अर्ज प्रणाली पद्धत वापरल्याने उमेदवारांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे.
३) What is the last date of CISF Bharti 2024 ?
उत्तर : सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३० सप्टेंबर २०२४ असणार आहे.