सोलापूर पोलीस भरती , ३७३ जागा |पोलीस भरती २०२४ | Maharashtra Police Bharti |१७,४७१ जागा |

पोलीस भरती २०२४ , पोलीस आणि वर्दी म्हंटले की ग्रामीण भागात सऱ्हास आपल्याला आठवते ते म्हणजे फटफटी आणि आताच्या भाषेत म्हणायचे झाले तर रॉयल एनफिल्ड वर वर्दी घालून स्वार झालेला पोलीस. आणि वर्दी म्हंटले की जी आग असते ना ती म्हणजे एक दिवस आपण ही याच वर्दित याच स्टाईल ने आपल्या गावात मिरवायची.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी म्हणजेच २०२४ साली सुद्धा स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी साठी मेगा भरती महाराष्ट्र सरकार द्वारे करण्यात येणार आहे.

Maharashtra-Police-Bharti

नुकतेच महाराष्ट्र सरकार द्वारे १७,४७१ रिक्त जागांची जाहिरात काढण्याचे जाहीर केले आहे. जिल्हा नुसार असणाऱ्या रिक्त जागांची यादी नुकतीच महाराष्ट्र पोलीस ( महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग ) भरती मंडळ द्वारे जाहीर करण्यात आली आहे. या सर्व जिल्हा नुसार पोलीस मेगाभरतीचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत. पोलीस भरती , व अन्य अशाच सरकारी नोकरी आणि सरकारी योजना साठी आपल्या www.Jobschemewala.com ला भेट द्या.

पोलीस मेगाभरती २०२४ अंतर्गत पोलीस शिपाई , पोलीस शिपाई चालक , या पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त असणाऱ्या विद्यार्थी आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहे.

सर्व पदासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज भरण्याची सुरवात दिनांक ५ मार्च २०२४ आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख दिनांक ३१ मार्च २०२४ असणार आहे.

चला तर पाहूया सविस्तर भरती प्रक्रिया कशी असणार आहे ते थोडक्यात.

पोलीस मेगाभरती २०२४ या लेखात आपण बघणार आहोत की भरतीचे पदाचे नाव , एकूण रिक्त असणारी आणि भरवायची असणारी पद संख्या , भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , नोकरीसाठी असणारे ठिकाण , कोणत्या वयातील उमेदवार या भरती मध्ये अर्ज करू शकतात अशी वयमर्यादा , ऑनलाईन अर्ज करताना भरावयाचे अर्ज शुल्क , अर्ज सुरू होण्याची तारीख, अर्ज करण्याची शेवटची तारीख , पोलीस भरती प्रक्रिया अंतर्गत असणारी निवड पद्धत , आवश्यक असणारी उंची , पोलीस भरतीचा अभ्यास क्रम , अभ्यास क्रमाचे विषयानुसार प्रारूप , महिला आणि पुरुष यांच्यासाठी असणारी शारीरिक चाचण्या कोणत्या या सर्व बाबीचा आढावा आपण आता घेणार आहोत.

पोलीस मेगाभरती जिल्हा आणि पद संख्या याची देखील संपूर्ण माहिती आपण या लेख मालेतून बघनार आहोत.

पोलीस मेगाभरती २०२४ अंतर्गत आपण आज बघणार आहोत जिल्हा : सोलापूर

Table of Contents

Solapur Police Bharti

सोलापूर जिल्हा पोलीस भरती | ३७३ जागा

सोलापूर या जिल्हा साठी रिक्त आणि भरायची असणारी पद संख्या

तर यात भरायची पदे आहेत.

१) पोलीस शिपाई : ११७

२) पोलीस शिपाई चालक : १६

३) SRPF पोलीस शिपाई : ८५

उमेदवार ज्या जिल्ह्यातून अर्ज करणार आहे त्याच जिल्ह्यात निवड झाल्यानंतर रुजू होणार आहे. म्हणजेच सोलापूर जिल्ह्यात अर्ज केल्यास निवडी नंतर उमेदवारला सोलापूर जिल्ह्यातच आपल्या नोकरीचे ठिकाण म्हणून कार्य आणि जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

पोलीस भरती २०२४ साठी शैक्षणिक पात्रता

पोलीस मेगाभरतीसाठी असलेल्या पदांसाठी असलेली शैक्षणिक अर्हता बघुया.

१) पोलीस शिपाई : महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम १९६५ अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच १२ वी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. किंवा शासनाने जाहीर केलेली समकक्ष परीक्षा पास झाली असावी.

२) पोलीस शिपाई चालक : महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम १९६५ अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच १२ वी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.तसेच सोबत उमेदवाराजवळ अर्ज करतेवेळी हलके वाहन चालविण्याचा वैद्य परवाना असणे आवश्यक आहे.

पोलीस भरती फॉर्म प्रक्रिया

अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख आहे : ५ मार्च २०२४आणि अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे दिनांक ३१ मार्च २०२४. या दिलेल्या मुदतीमध्येच आपल्याला आपल्या आवडीच्या विभाग – जिल्ह्यासाठी अर्ज भरावयाचा आहे.

अर्ज भरण्याचे टप्पे :

१) भरती प्रक्रिया मध्ये अर्ज करण्यासाठी आपल्याला भेट द्यायची आहे https://policerecruitment2024.mahait.org या पोर्टलला भेट देऊन Registration करायचे आहे

२) ऑनलाईन अर्ज करताना आवश्यक असणारी सर्व माहिती आपल्याला भरायची आहे. अर्ज भरताना आवश्यक ती काळजी घ्यावी. अर्ज भरताना कोणतीही चूक करू नका.

३) अर्ज भरताना ज्या कागदपत्रांची आपण माहिती भरणार आहोत. ते कागदपत्रे आपल्याला साईट वर अपलोड करायचे आहे. अपलोड करताना आवश्यक असलेली Document Size आणि Format योग्य रितीने निवडा.

४) अर्ज भरून झाल्यावर अर्ज शुल्क भरा आणि Form Submit करा.

५) भरलेला अर्ज आणि शुल्काची पावती याची Pdf काढून पुढील प्रक्रियाकरीता Save करून ठेवा.

Police-Bharti.

पोलीस भरती वयोमर्यादा

पोलीस होण्याकरीता वयाची मर्यादा :

१) पोलीस शिपाई : सामन्य श्रेणी – १८ ते २८ वर्ष आणि राखीव श्रेणी – १८ ते ३२ वर्ष आहे.

२) पोलीस शिपाई चालक : सामन्य श्रेणी – १९ ते २८ वर्ष आणि राखीव श्रेणी – १९ ते ३३ वर्ष.

वयोमर्यादा बाबत काही वय विश्रांती म्हणजे Age Relaxation देखील आहे. आपल्या जातीनुसार असणारे Relaxation Year तुम्ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सविस्तर जाहिरातीत बघावा.

पोलीस भरती अभ्यासक्रम.

पोलीस मेगाभरती प्रक्रिया ही लेखी परीक्षा , शारिरीक चाचणी ( ग्राउंड ) , कागदपत्रे तपासणे , मेडिकल या टप्प्यामध्ये होणार आहे. परीक्षा पास होण्यासाठी परीक्षेस असणारे विषय आणि विषयानुसार गुण किती आहे हे माहिती असणे आवश्यक आहे. परीक्षा ही १०० गुणाची असून ९० मिनिटामध्ये पेपर सोडवायचा आहे.

चला तर एक नजर टाकुया अभ्यासक्रम आणि गुण सिस्टीम खालीलप्रकारे.

विषयगुण
१) अंकगणित२०
२) सामान्य ज्ञान आणि चालु घडामोडी२०
३) बुद्धिमत्ता चाचणी२०
४) मराठी व्याकरण२०
५) मोटर वाहन/ वाहतुकीचे नियम२०

पोलीस भरती अर्ज शुल्क

अर्ज भरून झाल्या नंतर आपल्याला अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण ऑनलाइन पेमेंटचा वापर करून अर्ज शुल्क भरू शकता. मेगा भरतीसाठी अर्ज शुल्क रुपये १०० आहे. उमेदवाराने सदर फी ही नमूद केलेल्या तारखेच्या आत भरणे आवश्यक आहे. तसेच पेमेंट केल्यानंतर ते Payment Successful आहे की नाही हे एकदा चेक करून घ्या.

पोलीस भरती शारीरिक चाचणी

नवीन नियमानुसार लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांनाच शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे. ही चाचणी परीक्षा ५० गुणाची असेल. तसेच ५० गुणाची वाहन चालविण्याचा कौशल्य चाचणी घेतली जाईल.

यमहीला आणि पुरुष यांच्यासाठी शारीरिक चाचणी नियम वेगवेगळी असणार आहेत. यात सर्वात आधी येते ती उंची. पुरुष उमेदवारासाठी १६५ सेमी आणि छाती न फुगवता ७९ सेमी आवश्यक आहे. तर स्त्री उमेदवारासाठी ऊंची १५८ सेमी आवश्यक आहे

ग्राउंड या भागासाठी पुरुष गट : १५०० मी धावणे ,१०० मीटर धावणे आणि गोळाफेक

महिला गट : ८०० मी धावणे , १०० मी चालणे आणि गोळाफेक असेल

पोलीस भरती कागदपत्रे

लेखी आणि ग्राउंड झाल्यावर होते ते कागदपत्रे तपासणी. त्यासाठी कोण कोणते कागदपत्र लागणार आहे त्याची यादी बघुया.

१) १० वी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.

२) १२ वी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र

३) शाळा सोडल्याचा दाखला

४) अधिवास प्रमाणपत्र

५) जात प्रमाणपत्र सहित जात पडतळणी प्रमाणपत्र

६) संगणक अहर्ता पूर्ण करणे आवश्यक.

अशाप्रकारे सर्व कागदपत्रे पूर्ण करून कागदपत्र पडताळणी करणे आवश्यक आहे. चुकीची अथवा खोटी माहिती दिल्यास भरतीच्या कोणत्याही टप्प्यात आढळल्यास त्या उमेदवाराला भरती प्रक्रिया मधुन बाद करण्यात येईल.

Summary / थोडक्यात

महाराष्ट्र पोलीस भरती मंडळ द्वारे १७,४७१ जागांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध कऱण्यात येणार आहे. पोलीस मेगाभरती २०२४ साठी अर्ज सुरू होणार आहेत ५ मार्च ; शेवटची तारीख आहे ३१ मार्च. या कालावधी मध्येच अर्ज भरून शुल्क रुपये १००₹ भरावे. आधी लेखी परीक्षा आणि नंतर ग्राउंड असा परिक्षेचां पॅटर्न असणार आहे.

Frequently Asked Questions.

१.पोलीस मेगाभरती किती पदांसाठी जाहीर करण्याय आली आहे ?

उत्तर : २०२४ पोलीस भरती मध्ये १७,४७१ जागा भरण्यात येणार आहे.

२. पोलीस मेगाभरती अर्जची सुरवात केव्हा होणार आहे ?

उत्तर : ५ मार्च २०२४ पासून या भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

३. पोलीस मेगा भरती अर्जाची शेवटची तारीख काय आहे ?

उत्तर : ३१ मार्च पर्यंत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहे.

४. पोलीस मेगाभरती मध्ये आधी ग्राउंड की लेखी परीक्षा होणार आहे ?

उत्तर : नवीन नियमानुसार आधी लेखी परीक्षा आणि त्यात उत्तीर्ण झाल्यास ग्राउंड होणार आहे.

५. पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?

उत्तर : पोलीस शिपाई : सामन्य श्रेणी – १८ ते २८ वर्ष आणि राखीव श्रेणी – १८ ते ३२ वर्ष आहे.
पोलीस शिपाई चालक : सामन्य श्रेणी – १९ ते २८ वर्ष आणि राखीव श्रेणी – १९ ते ३३ वर्ष.

६. पोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे कोणती ?

उत्तर : पोलीस भरती साठी शाळा सोडल्याचा दाखला ,आधार कार्ड , १२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र , अधिवास प्रमाणपत्र पडताळणी करता आवश्यक आहे.