CISF Bharti 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली असून एकूण ११३० कॉन्स्टेबल फायरमन पदासाठी बारावी उत्तीर्ण असेलल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
CISF Bharti 2024 Overview
सी आय एस एफ मध्ये रिक्त असणाऱ्या ११३० जागांची पूर्तता करण्यासाठी तेवढ्याच जगाचं भरती पत्रक आयोगाने जाहीर केले असून ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी करायची इच्छा असेल अश्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या अधीन काम करण्याची संधी असणार आहे. कॉन्स्टेबल फायरमन पदासाठी ही भरती असून नेमके कोणते उमेदवार अर्ज कसा करू शकतात , अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख काय असेल , निवड प्रक्रिया , अर्ज शुल्क या सर्व बाबीचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत.
जाहिरात प्रसिद्ध : | ( CISF ) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल |
पदाचे नाव : | कॉन्स्टेबल फायरमन ( Constable Fireman ) |
पदांची संख्या : | ११३० पदे |
अर्ज प्रणाली : | ऑनलाईन अर्ज पद्धत |
अधिकृत संकेतस्थळ : | अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा |
CISF Bharti 2024 Important Dates
आयोगाने पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे सांगितले असून अर्ज केव्हा सुरू होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल हे बघूया यानुसार,
अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख : | २८ ऑगस्ट २०२४ |
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : | ३० सप्टेंबर २०२४ |
CISF Bharti 2024 Vacancies
कॉन्स्टेबल फायरमन पदासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये रिक्त असणाऱ्या तब्बल ११३० जागा या भरती प्रक्रिया द्वारे भरली जाणार आहेत.
HDFC Bank Parivartan Scholarship 2024 आता बँकेकडून मिळणार तब्बल ₹ ७५००० ची स्कॉलरशिप !
CISF Bharti 2024 Eligibility Criteria
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी सी एस आय एफ ने प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. यात कोणते उमेदवार अर्ज करू शकतात हे नमूद केले आहे. यानुसार आयोगाने वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता हे निकष पूर्ण आहेत.
१) वयोमर्यादा ( Age Limit ) :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ आणि कमाल वय २३ वर्ष असावे. सोबतच आयोगाने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय तसेच अपंग घटक यांना नियमानुसार वय शिथिलता देखील दिली आहे.
२) शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) :
शैक्षणिक पात्रतेचा विचार करता अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थांमधून कमीत कमी बारावी उत्तीर्ण झालेला असावा.
CISF Bharti 2024 How to Apply
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी आयोगाने जाहीर केलेल्या कालावधी मध्येच आयोगाच्या संकतस्थळावर जावून अर्ज भरायचा आहे. अर्ज भरताना विचारलेली आवश्यक माहिती जसे की वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती संपर्क माहिती इत्यादी अचूक भरायचे आहे. सदर भरतीसाठी उमेदवारांना एकच अर्ज करता येणार आहे.
CISF Bharti 2024 Application Fee
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून झाल्यावर अर्जाची पूर्तता करण्यासाठी अर्ज शुल्क/ परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
अर्ज शुल्क ( Application Fee ) : ₹ १००
तसेच अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि माजी सैनिक यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचे नाही आहे. वरील घटकांना अर्ज शुल्क सूट देण्यात आली आहे.
CISF Bharti 2024 Salary
निवड झालेल्या उमेदवारांना जोईनिंग नंतर मासिक वेतन म्हणून काही रक्कम दिली जाईल यानुसार रूपये २१७०० ते ६९१०० रूपये पगार म्हणुन दिला जाईल.अर्जात भरलेल्या माहितीची/कागदपत्रांची तपासणी पडताळणी ही पी ई टी/ पी एस टी च्या वेळी केली जाईल. यासाठी उमेदवाराने आपले सर्व कागदपत्रे छायांकित प्रती सहित तयार ठेवावेत.
Conclusion
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये एकूण ११३० जागा रिक्त असून कॉन्स्टेबल फायरमन या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. वय वर्ष १८ ते २३ आणि बारावी उमेदवार आयोगाच्या संकेस्थळावर जावून ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात.
Frequently Asked Questions
१) Who can Apply for the CISF Bharti 2024 ?
उत्तर : CISF Bharti 2024 साठी वय वर्ष १८ ते २३ दरम्यान असलेले सोबतच बारावी उत्तीर्ण झालेला उमेदवार अर्ज करू शकतात.
२) Which is the Last date of CISF Bharti 2024 ?
उत्तर : CISF Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे.