Pune Mahanagar Palika Bharti 2024 : महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजक व नाविन्यता विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेमध्ये ६८२ पदांसाठी युवकांना अर्ज सादर करता येतील.
Pune Mahanagar Palika Bharti 2024 Overview
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेने आपल्या मोटर वाहन विभाग , विधी विभाग , अतिक्रमण आणि अधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग , मुख्य लेखा वित्त , विभाग झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग,उद्यान विभाग , मुख्य अभियंता कार्यालय , समाज विकास विभाग यासारख्या विविध विभागांमध्ये रिक्त असणाऱ्या जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
जाहिरात प्रसिद्ध : | पुणे महानगरपालिका |
पदाचे नाव : | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना |
पदांची संख्या : | ६८२ पदे |
अर्ज पद्धत : | ऑनलाईन अर्ज प्रणाली |
अधिकृत संकेतस्थळ : | https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index |
Pune Mahanagar Palika Bharti 2024 Important Dates
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने अर्ज सुरू होण्याची व अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरातीमध्ये नमूद केली आहे त्यानुसार ,
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : | १४ ऑगस्ट २०२४ |
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : | १९ ऑगस्ट २०२४ |
Pune Mahanagar Palika Bharti 2024 Vacancies
पुणे महानगरपालिकेच्या मोटर वाहन विभाग यामध्ये वेल्डिंग , पेंटिंग, सुतार, टर्नर, ब्लॅकस्मिथ, संगणक प्रशिक्षण, वर्क पंप ऑपरेटर , ऑटो इलेक्ट्रिशियन यासारख्या पदांचा समावेश असेल त्यानुसार कामाचे स्वरूप असेल.
विभागानुसार असणाऱ्या रिक्त जागा पुढील प्रमाणे ,
विभाग | रिक्त जागा |
मोटर वाहन विभाग : | ८५ |
विधी विभाग : | ५ |
अतिक्रमण आणि विकृत बांधकाम निर्मूलन विभाग : | २४ |
मुख्य लेखा वित्त विभाग : | १० |
झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग : | ५ |
मालमत्ता व व्यवस्थापन विभाग : | ५ |
उद्यान विभाग : | ११० |
मुख्य अभियंता कार्यालय : | १५५ |
समाज कल्याण कार्यालय : | ४ |
समाज विकास विभाग : | ३४ |
मल: निसारण देखभाल व दुरुस्ती विभाग : | ४० |
बिबवेवाडी सहाय्यक आयुक्त कार्यालय : | ३ |
विद्युत कार्यालय : | २०० |
Pune Mahanagar Palika Bharti 2024 Eligibility Criteria
पुणे महानगरपालिकेने आपल्या जाहिरातीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रतेचे निकष दिले आहे.यामध्ये प्रामुख्याने वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता या बाबींचा समावेश आहे.
१) वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल वय ३५ वर्ष असावे.
२) शैक्षणिक पात्रता :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास / आयटीआय / पदविका / पदवीधर परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
IBPS Recruitment 2024 आयबीपीएस याच्या मार्फत स्पेशल ऑफिसर पदाच्या तब्बल ८९६ जागा
अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी असावा.
उमेदवाराची आधार नोंदणी असावी.
उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
Pune Mahanagar Palika Bharti 2024 How to Apply
अर्ज करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने आपल्या जाहिरात मध्ये अर्जाची लिंक नमूद केली आहे.
अर्ज कुठे करावा : Click Here
उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे बंधनकारक आहे.तसेच त्या पोर्टलवरील पदांसाठी Online Apply करणे आवश्यक आहे.
Pune Mahanagar Palika Bharti 2024 Training
युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेतील युवा प्रशिक्षण पदासाठी ज्या पदांकरिता उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्या सर्व पदासाठी काही प्रशिक्षण कालावधी व प्रशिक्षण कालावधीत मिळणारे विद्यावेतन पुणे महानगरपालिकेने आपल्या प्रसिद्ध पत्रिकेत जाहीर केली आहे यानुसार ,
प्रशिक्षण कालावधी : ६ महीने |
प्रशिक्षण कालावधीत मिळणारे विद्या वेतन :
बारावी उत्तीर्ण : | रूपये ६००० |
आयटीआय किंवा पदविका उत्तीर्ण : | रुपये ८००० |
पदवी उत्तीर्ण : | रूपये १०००० |
याप्रमाणे सदरच्या सहा महिन्यापेक्षा कालावधीसाठी उमेदवारांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासनातर्फे डायरेक्ट बँक ट्रान्सफर द्वारे ( DBT ) प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येतील.
Conclusion
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेने सहा महिन्याच्या कालावधीसाठी युवा प्रशिक्षण पदांसाठी अर्ज मागवले असून , वय वर्ष १८ ते ३५ या वर्षात मोडणाऱ्या बारावी उत्तीर्ण /आयटीआय उत्तीर्ण / पदविका उत्तीर्ण पदवी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या प्रशिक्षण कालावधी मध्ये उमेदवारांना विद्यावेतन देण्यात येईल
Frequently Asked Questions
१) Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojanaनुसार किती जागा पुणे महानगरपालिकेने जाहीर केल्या आहेत ?
उत्तर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेनुसार पुणे महानगरपालिकेने ६८२ जागा जाहीर केल्या आहेत.
२) Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana साठी पात्रतेचे निकष कोणते ?
उत्तर : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण/ आयटीआय /पदवी/ पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.