Central Railway Recruitment Cell अंतर्गत मध्य रेल्वेने नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली असून आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना या साठी अर्ज करता येणार आहे. रेल्वे भरती सेल द्वारा ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे यानुसार तब्बल २४०० पेक्षा जास्त रिक्त पदे ही भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून अशाप्रकारे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १५ ऑगस्ट २०२४ असणार आहे.
चला तर बघुया नेमक्या कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत , शैक्षणिक पात्रता काय आहे , पात्रतेचे निकष काय असणार आहे , निवड प्रक्रिया कशी असेल , ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरवात केव्हा होणार आहे , अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे यासारख्या विविध प्रकारच्या गोष्टींचा आढाव आपण मध्य रेल्वे मध्ये तब्बल २४०० पेक्षा जास्त जागांसाठी भरती या लेखातून घेणार आहोत. चला तर बघुया मध्य रेल्वे मध्ये तब्बल २४०० पेक्षा जास्त जागांसाठी भरती Central Railway Recruitment
Central Railway Recruitment 2024 Overview
रेल्वे भरती मंडळाने आपल्या जाहिरात क्रमांक RRC/CR/AA/2024 नुसार मध्य रेल्वेच्या अंतर्गत असणाऱ्या विविध रेल्वे वर्कशॉपमध्ये एकूण २४२४ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. Apprenticeship act 1961 नुसार प्रशिक्षणार्थी या पदासाठी म्हणून सदर रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निवड प्रक्रिया विविध टप्प्यात राबविली जाणार असून यामधून निवड होणाऱ्या उमेदवारांना मध्य रेल्वेच्या अंतर्गत असणाऱ्या वर्कशॉपमध्ये काम करता येणार आहे. मुंबई , पुणे , नागपूर , भुसावळ , सोलापूर या क्लस्टर भागात असणाऱ्या विविध युनिट्स मध्ये असलेल्या रिक्त पदे भरली जाणार आहेत.
जाहिरात प्रसिद्ध : | रेल्वे भरती मंडळ ( Railway Recruitment Cell ) |
पदाचे नाव : | प्रशिक्षणार्थी ( Apprenticeship ) |
पद संख्या : | २४२४ पदे |
अर्ज पद्धत : | ऑनलाईन पद्धतीने ( Online Mode ) |
अधिकृत संकेतस्थळ : | www.rrccr.com |
Table of Contents
Central Railway Recruitment 2024 Important Dates
मध्य रेल्वेच्या भरती मंडळाने प्रशिक्षणार्थी या पदासाठी होणाऱ्या भरती प्रक्रिया करीता उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले असून पात्र उमेदवारांनी अर्ज भरताना अर्ज भरण्याची शेवटची तारीख लक्षात घेऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. सदर भरती प्रक्रिया खुल्या स्पर्धेत येत असल्याने संपूर्ण भारतातून उमेदवार अर्ज करणार आहे ही बाब लक्षात घेता उमेदवारांनी विहित कालावधी मध्ये अर्ज भरणे आवश्यक असणार आहे.
चला तर नजर टाकुया पुढील तक्त्यावर आणि जाणून घेऊया अर्ज करण्याची सूरवात केव्हा होणार आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख अन् वेळ काय असणार आहे.
अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख : | १६ जुलै २०२४ |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : | १५ ऑगस्ट २०२४ , सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत |
Central Railway Recruitment 2024 Vacancies
उमेदवारांना अर्ज भरताना खालीलपैकी कोणत्याही एका क्लस्टरची निवड करायची असून या क्लस्टर अंतर्गत येणाऱ्या वर्कशॉपसाठी उमेदवारांना प्राधान्य क्रम देता येणार आहे.
चला तर बघुया कोणत्या क्लस्टर साठी किती जागा रिक्त आहेत ते एका टेबलच्या माध्यमातून.
क्लस्टर | रिक्त जागा |
मुंबई | १५९४ |
पुणे | १९२ |
नागपूर | १४४ |
भुसावळ | ४१८ |
सोलापूर | ७६ |
एकूण जागा | २४२४ |
केंद्र सरकारच्या रिक्त जागांची जाहिरात पाहण्यासाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
Central Railway Recruitment 2024 Eligibility Criteria
प्रशिक्षणार्थी या पदासाठी जी जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्या मध्ये उमेदवारांसाठी काही पात्रतेचे निकष घालून दिले आहेत. उमेदारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी रेल्वे भरती मंडळाने प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने उमेदवारांसाठी वयोमर्यादा निकष ( Age Limit ) , वय शिथिलता ( Age Relaxation ) , आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) इत्यादी बाबीचा समावेश आहे.
१) वयोमर्यादा ( Age Limit ) :
रेल्वे मंडळाने वयोमर्यादा बाबत किमान आणि कमाल वयाचे बंधन घालून दिले आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमीत कमी वय म्हणजेच किमान वय वर्ष १५ पूर्ण आवश्यक आहे.तसेच कमाल वय लक्षात घेता वय वर्ष २४ पूर्ण करणारे उमेदवार सदर भरती प्रक्रिया साठी अर्ज करू शकतात. उमेदवारांच्या वयाबाबतचा घोळ टाळण्यासाठी आयोगाने खुला प्रवर्ग , अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय प्रवर्ग यानुसार जन्म तारखा कालावधी नमूद केल्या आहेत. यासाठी नजर टाकुया पुढील टेबलवर
प्रवर्ग | जन्म तारखा कालावधी |
खुला प्रवर्ग | १५ जुलै १९९७ ते १५ जुलै २००९ |
अनुसुचित जाती | १५ जुलै १९९५ ते १५ जुलै २००९ |
अनुसुचित जमाती | १५ जुलै १९९५ ते १५ जुलै २००९ |
इतर मागासवर्गीय घटक | १५ जुलै १९९७ ते १५ जुलै २००९ |
२) वय शिथिलता ( Age Relaxation ) :
आयोगाने वयोमर्यादाबाबत राखीव प्रवर्गानुसार पुढील शिथिलता दिली आहे. सदर शिथिलता ही कमाल वयोमर्यादा बाबत आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
प्रवर्ग | शिथिल वर्ष |
खुला प्रवर्ग : | कोणतीही सुट नाही. |
अनुसूचित जाती : | ५ वर्ष |
अनुसूचित जमाती : | ५ वर्ष |
इतर मागासवर्गीय प्रवर्ग : | ३ वर्ष |
शारीरिक विकलांग घटक : | १० वर्ष |
३) शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) :
वयोमर्यादा निकष सोबतच आयोगाने अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान शिक्षण किती पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे हे देखील नमूद केले आहे. आयोगाने जाहीर केलेल्या मागणी पत्रानुसार प्रशिक्षणार्थी या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता ही इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे सोबतच उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त सरकारी इन्स्टिट्यूट अथवा आयटीआय मधून एक आयटीआय ट्रेड उत्तीर्ण असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवारांने दोन्ही शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेले असावी या मध्ये दहावी किंवा आयटीआय उत्तीर्ण असा कोणताही पर्याय आयोगाने उमेदवारास दिला नाही आहे.
किमान शैक्षणिक पात्रता : | १) मान्यता प्राप्त संस्थेमधून दहावी उत्तीर्ण. |
आणि | २) मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूट मधून आयटीआय ट्रेड उत्तीर्ण |
नेमक्या कोणता आयटीआय ट्रेड उत्तीर्ण झालेला उमेदवार अर्ज करू शकतो. ते पाहूया थोडक्यात.
आयोगाने क्लस्टर मधील वर्कशॉपमध्ये असलेल्या प्रशिक्षणार्थी या पदासाठी आवश्यकतेनुसार काही ट्रेडचा समावेश केला आहे यामध्ये प्रामुख्याने फिटर, कारपैंटर , मशिनिस्ट, डिझेल मेकॅनिक , वेल्डर , इलेक्ट्रिशियन , मेकॅनिक , टर्नर, कॉम्प्युटर ऑपरेटर, पेंटर , शीट मेटल वर्कर, लब्रोटाओरी असिस्टंट, टलेर , इत्यादी ट्रेडचा समावेश असेल.
Central Railway Recruitment 2024 How to Apply
सेंट्रल रेल्वे भरती मंडळाने अर्ज प्रक्रिये करीता ऑनलाईन अर्ज प्रणालीचा अवलंब केला असून पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळवर जावून अर्ज करायचा आहे.
अधिकृत संकेतस्थळ : www.rrccr.com
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना आपली वैयक्तिक माहिती , शैक्षणिक माहिती काळजपूर्वक भरणे आवश्यक आहे.अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे , ज्या उमेदवारांकडे आधार कार्ड नाही असे उमेदवार नावनोंदणी आधार नंबर टाकु शकतात. तसेच काही राज्यातील उमेदवारांना आधार कार्ड नसल्यास वाहन परवाना, पासपोर्ट नंबर , मतदान क्रमांक किंवा इतर सरकारी पुरावा इत्यादी माहिती अर्ज भरताना वापरू शकतात. कागदपत्रे तपासणी पडताळणी वेळेस सदर कागदपत्रे सादर करणे उमेदवारांना बंधनकारक असणार आहे.
उमेदवारांनी अर्ज भरताना आपले नाव , वडिलांचे नाव , जन्म तारखा काळजीपूर्वक टाकावी. तसेच अर्ज प्रक्रिया , निवड प्रक्रिया या संबधित पुढील व्यवहार उमेदवारांना कळवण्यासाठी योग्य आधार कार्ड आणि मोबाईल नंबर , ईमेल आयडी असावा.तसेच उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची एका प्रत आपल्या सोबत बाळगणे आणि तपासणी वेळेस सादर करावे.
आयोगाने दिलेल्या पाच क्लस्टर पैकी कोणत्याही एकाच क्लस्टर मध्ये आणि केवळ एकच अर्ज उमेदवाराला करता येणार आहे. एका पेक्षा जास्त अर्ज केल्यास सदर अर्ज रद्द केले जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Central Railway Recruitment 2024 Selection Mode
उमेदवारांची निवड प्रकियेचा विचार करता आयोगाद्वारे ज्या २४२४ प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्याची निवड प्रक्रिया सोपी ठेवली आहे. यामध्ये प्रामुख्याने निवड करताना दोन गोष्टींचा आधार घेतला जाणार असून दोन्ही मार्कांच्या सरासरीचा वापर करण्यात येणार आहे. म्हणजेच दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण मध्ये मिळालेले गुण या दोन्हींचा सरासरी काढून मिळालेले गुण निवड प्रक्रिये करीता ग्राह्य धरले जाणार आहेत.
निवड प्रक्रियेची टप्पे पुढीलप्रमाणे :
१) ऑनलाईन अर्ज भरणे.
२) अर्जाची छाननी करून क्लस्टर नुसार निवड यादी.
३) कागदपत्रे तपासणी पडताळणी
४) मेडिकल फिट तपासणी पडताळणी
सदर निवड प्रक्रिया संदर्भात आयोगाने काही सूचना देखील नमूद केल्या आहेत.
१) दहावीच्या गुणाचा विचार करता यामध्ये ग्राह्य धरले जाणारे गुण हे सर्व विषय मिळून आलेले गुण असतील. बेस्ट ऑफ फाईव लागू होणार नाही.
२) निवड प्रक्रिया दरम्यान दोन उमेदवाराचे सरासरी गुण समान आल्यास अशावेळी ज्या उमेदवारांचे वय जास्त असेल त्याची निवड केली जाईल तसेच वय समान आल्यास ज्या उमेदवारांने प्रथम दहावी उत्तीर्ण केली असेल तो उमेदवार निवडी साठी ग्राह्य धरला जाईल.
३) अंतिम निवड यादी ही प्रत्येक क्लस्टर साठी वेगवेगळी लावण्यात येईल.मध्य रेल्वेच्या भरती मंडळाने ग्राह्य धरलेले अर्जच फक्त पुढील निवड प्रक्रिया साठी निवडले जातील.
Central Railway Recruitment 2024 Application Fee
ऑनलाईन अर्ज भरून झाल्यानंतर उमेदवारांना परीक्षा शुल्क अथवा अर्ज शुल्क म्हणून एक ठराविक रक्कम भरावी लागणार आहे.
अर्ज शुल्क / परीक्षा शुल्क : रुपये १००.
अर्ज शुक्ल भरणा करीता काही प्रवर्गांना वगळण्यात आले आहेत. या नुसार महिला घटक ( Women ) , अनुसूचित जाती ( Schedule Caste and Scheduled Tribes ) अनुसूचित जमाती आणि अपंग घटक यांना कोणतेही शुक्ल भरावे लागणार नाहीये.
अधिकृत संकेतस्थळ वर अर्ज भरून झाल्यानंतर परीक्षा शुल्क ची विंडो ओपन होईल त्यावर ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरून झाल्यानंतर अर्ज शुल्क प्राप्ती नंतर अर्जाचे पेज पुन्हा मूळ अर्ज वर येईल त्यानंतर उमेदवार सदर अर्जाची प्रिंट अथवा प्रत काढू / जतन करू शकतात.ऑनलाईन शुक्ल भरणा साठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग सेवा या पर्यायाचा वापर उमेदवार करू शकतात.
Central Railway Recruitment 2024 Documents
उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना जी वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती वयोमर्यादा यासबंधित असलेले सर्व कागदपत्रे अर्जा सहित कागदपत्रे तपासणी पडताळणी वेळेस सादर करणे आवश्यक असणार आहे.
चला तर बघुया नेमके कोणते कागदपत्रे पडताळणी साठी लागणार आहेत.
१) दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र ( 10th Marksheet )
२) आयटीआय ट्रेड उत्तीर्ण प्रमाणपत्र ( ITI Certificate)
३) आयटीआय मधील सर्व सेमीस्टर गुणपत्रक ( All Semester Marksheet )
४) आधार कार्ड ( Aadhar Card )
५) अर्जाची प्रत ( Application )
६) जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला ( School Leaving Certificate )
७) जात प्रमाणपत्र ( Caste Certificate )
८) अपंग असल्यास तसे असल्याचे प्रमाणपत्र ( Disability Certificate )
Central Railway Recruitment 2024 Tranning Period
ज्या उमेदवारांची निवड अंतिम यादीत केली जाईल अशा उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होण्याअगोदर करार करावा लागणार आहे.तसेच प्रशिक्षणार्थी म्हणून काम करताना काही ठराविक रक्कम दरमहा ही स्टायपेंड च्या स्वरूपात दिली जाणार आहे.
प्रशिक्षण कालावधी : ३ वर्ष
Conclusion
रेल्वे भरती मंडळाने महाराष्ट्रतील पाच क्लस्टर मध्ये असणाऱ्या रेल्वे वर्कशॉपमध्ये रिक्त असलेल्या प्रशिक्षणार्थी या पदासाठी तब्बल २४२४ जागांची जाहिरात प्रसिद्ध केली. यानुसार अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण आवश्यक असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जदाराचे किमान वय १५ वर्ष तर कमाल वय २४ वर्ष असावे. तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२४ असणार आहे.
Frequently Asked Questions
१) Central Railway Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
उत्तर : मध्य रेल्वेच्या भरती मंडळाने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२४ आहे.
२) Central Railway Recruitment अंतर्गत किती जागा भरल्या जाणार आहेत ?
उत्तर : पाच क्लस्टर साठी एकूण २४२४ पदासाठी सदर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
३) Central Railway Recruitment निवड प्रक्रिया कशी आहे ?
उत्तर : जाहिराती नुसार उमेदवाराची निवड ही दहावी आणि आयटीआय मध्उत्तर : पाच क्लस्टर साठी एकूण २४२४ पदासाठी सदर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.ये प्राप्त गुणाची सरासरी या आधारावर क्लस्टर नुसार अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे.
४) प्रशिक्षणार्थी म्हणून किती वर्षाचा प्रशिक्षण कालावधी Central Railway Recruitment नुसार असणार आहे ?
उत्तर : प्रशिक्षणार्थी म्हणून तीन वर्षाचा प्रशिक्षण कालावधी मध्य रेल्वे भरती मंडळाने जाहिराती मध्ये नमूद केला आहे.
५) Central Railway Recruitment साठी अर्ज कसा सादर करायचा आहे ?
उत्तर : मध्य रेल्वे भरती मंडळाने अर्ज प्रक्रिये करीता ऑनलाईन अर्ज प्रणालीचा अवलंब केला असून पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळवर www.rrccr.com जावून अर्ज करायचा आहे.