BECIL Recruitment नुसार ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदाच्या एकूण ३९३ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जून २०२४ आहे.
BECIL Recruitment 2024 Overview
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड ही भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजे भारत सरकारच्या उपक्रमांमध्ये असणारी एक मिनी रत्न कंपनी आहे. कंपनीने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली असून यामध्ये विविध पदांच्या ३९३ जागा या भरल्या जाणार आहेत.
सदर भरती प्रक्रिया ही दिल्ली आणि एनसीआर भागातील केंद्रीय सरकारी रुग्णालयांमध्ये असणाऱ्या रिक्त जागांच्या पूर्ततेसाठी केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कनिष्ठ फिजोथेरपीस्ट , रेडिओग्राफर , लॅब अटेंडंट , संशोधन सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक , ड्रायव्हर , सहाय्यक आहार तज्ञ यासारख्या विविध पदांचा समावेश असेल.
चला तर बघूया नेमकी कोणती पदे असणार आहे , कोणत्या पदासाठी किती शैक्षणिक पात्रता , कामाचा अनुभव आवश्यक असणार आहे , अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख , शेवटची तारीख , निवड प्रक्रिया सर्व बाबींचा आढावा आपण या लेखातून घेणार आहोत.
BECIL Recruitment 2024 Important Dates
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेडद्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा अवलंब केला आहे त्यासाठी उमेदवारांनी कंपनीने जाहीर केलेल्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. यासाठी कंपनीने अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख म्हणजेच जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ते अर्ज करण्याची शेवटची तारीख नमूद केलेली आहे.
चला तर बघूया नेमक्या कोणत्या तारखेपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : | २९ मे २०२४ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख : | १२ जून २०२४ |
Table of Contents
BECIL Recruitment 2024 Vacancies
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड द्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये दिल्ली आणि एनसीआर यामध्ये असणाऱ्या सरकारी रुग्णालयांमध्ये असणाऱ्या रिक्त जागा या भरती प्रक्रिया द्वारा भरले जाणार आहेत. यामध्ये एकूण वीस पदांचा समावेश असून प्रत्येक पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा या वेगवेगळ्या आहेत.
एक नजर टाकूया पुढील टेबलवर ज्यामध्ये आपण बघणार आहोत कोणती पदे या भरतीद्वारे भरले जाणार आहेत आणि कोणत्या पदासाठी किती जागा या राखीव असणार आहेत.
पदाचे नाव | पद संख्या |
१) टेक्निकल असिस्टंट | २ |
२) ज्युनिअर फिजिओथेरपिस्ट | ३ |
३) मल्टी टस्किंग ( MTS ) | १४५ |
४) डेटा एन्ट्री आऊटसोर्स ( DEO ) | १०० |
५) पेशंट केअर मॅनेजर ( PCM ) | १० |
६) ड्रायव्हर | २ |
७) पेशंट केअर कॉर्डिनेटर ( PCC ) | ७ |
८) रेडिओग्राफर | ३२ |
९) लॅब अटेंडंट | ३ |
१०) टेक्नॉलॉजिस्ट | ३७ |
११) रिसर्च असिस्टंट | २ |
१२) डेव्हलपर | १ |
१३) ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर | १ |
१४) फार्मासिस्ट | १५ |
१५) नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर किंवा नेटवर्क सपोर्ट इंजिनिअर | १ |
१६) फेलबोटोमिस्ट | ८ |
१७) इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन ( EMT ) | ३ |
१८) मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन ( MLT ) | ८ |
१९) ऑफथालमिक टेक्निशियन | ५ |
२०) असिस्टंट डायटीशियन | ८ |
एकुण जागा | ३९३ |
BECIL Recruitment 2024 Eligibility Criteria
सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड ने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये जे पात्रतेचे निकष घालून दिले आहेत. त्या निकषांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना
अर्ज करता येणार आहे. चला तर बघूया कोणत्या पदासाठी कोणते पात्रतेचे निकष असणार आहेत.
यामध्ये प्रामुख्याने वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक कामाचा अनुभव इत्यादी बाबींचा समावेश असेल.
१) टेक्निकल असिस्टंट : मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा यूनिवर्सिटी मधून स्पीच आणि हेअरिंग मध्ये बी.एससी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. क्लीनिकल कामाचा अनुभव असावा.
वयोमर्यादा ४० वर्ष
२) ज्युनिअर फिजिओथेरपिस्ट : उमेदवारा हा इंटरसायन्स किंवा फिजिओथेरपीमध्ये पदवी पूर्ण केलेला असावा
३) मल्टी टस्किंग : या पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डा मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
४) डेटा एन्ट्री आऊटसोर्स ( DEO ) : कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणे. इंग्लिश टायपिंग स्पीड 35 शब्द पर मिनिट.
उमेदवाराला वर्ड , एक्सेल , इंटरनेट , ईमेल , विंडोज यासंबंधी संगणक ज्ञान अवगत असावे
५) पेशंट केअर मॅनेजर ( PCM ) : लाइफ सायन्स मध्ये पदवी उत्तीर्ण असणे. किंवा पदवीत्तर शिक्षणामध्ये हेल्थकेअर मॅनेजमेंट पूर्ण केलेला असावा.
६) ड्रायव्हर : दहावी उत्तीर्ण असणे , अवजड वाहन चालवण्याचा परवाना , तीन वर्ष कामाचा अनुभव.
७) पेशंट केअर कॉर्डिनेटर ( PCC ): लाइफ सायन्स मध्ये पदवी उत्तीर्ण किंवा कोणत्याही क्षेत्रातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक. वयोमर्यादा 35 वर्ष. एक वर्ष कामाचा अनुभव असावा.
८) रेडिओग्राफर : रेडिओग्राफीमध्ये बीएससी चे तीन वर्ष कोर्स मान्यता प्राप्त विद्यापीठ इन्स्टिट्यूट मधून पूर्ण केलेला असावा.
९) लॅब अटेंडंट : बारावी उत्तीर्ण आणि दोन वर्ष लॅब अटेंड म्हणून लॅबचा अनुभव.
१०) टेक्नॉलॉजिस्ट : अनेस्थिया किंवा ऑपरेशन थेटर टेक्नॉलॉजीस्ट ( OT ) मध्ये बी.एससी उत्तीर्ण असावा
११) रिसर्च असिस्टंट : लाईफ सायन्स किंवा बायोलॉजिकल सायन्स मध्ये मास्टर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
१२) डेव्हलपर : एमसीए बी टेक एम टेक एम एस सी कम्प्युटर सायन्स उत्तीर्ण असणे आवश्यक. २ वर्ष कामाचा अनुभव.
१३) ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर : हिंदी किंवा इंग्रजी विषयांमध्ये मास्टर डिग्री मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून प्राप्त असावी. तसेच हिंदी मधून इंग्लिश भाषांतर डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केलेला असावा. किंवा दोन वर्ष कामाचा अनुभव.
१४) फार्मासिस्ट : डिप्लोमा इन फार्मसी उत्तीर्ण असणे आवश्यक. फार्मासिस्ट म्हणून नोंदणी आवश्यक.
फार्मसी मध्ये पदवी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
१५) नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर किंवा नेटवर्क सपोर्ट इंजिनिअर : एम एस सी , एम टेक कम्प्युटर सायन्स मध्ये तसेच प्रोग्रामिंग लैंग्वेज पायथन किंवा सेल स्क्रिप्ट अवगत असावे. दोन वर्षे कामाचा अनुभव. वयोमर्यादा २२ ते ५५ वर्ष.
१६) फेलबोटोमिस्ट : मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी , मेडिकल लॅबरोटरी सायन्स यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक
१७) इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन ( EMT) : इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन किंवा ॲडव्हान्स सर्टिफिकेशन कोर्स मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूट मधून पूर्ण केलेला असावा.
१८) मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन ( MLT) : मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा मेडिकल लॅबोरेटरी सायन्स यामध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. दोन वर्ष कामाचा अनुभव
१९) ऑफथालमिक टेक्निशियन : मान्यताप्राप्त विद्यापीठ केव्हा इन्स्टिट्यूट मधून ऑफथालमिक टेक्निशियन मध्ये बीएससी पदवी उत्तीर्ण.
२०) असिस्टंट डायटीशियन : फूड आणि न्यूट्रिशन मध्ये मास्टर ऑफ सायन्स पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक. दोन वर्षे कामाचा अनुभव.
BECIL Recruitment 2024 Selection Procedure
पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर स्किल टेस्ट किंवा मुलाखत किंवा ऑन साईड परफॉर्मन्स यासाठी बोलाविले जाईल.
सदर चाचणीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेल आयडी / टेलिफोन क्रमांक सदर चाचणीची पूर्व सूचना दिली जाईल. त्यामुळे उमेदवारांनी आपली संपूर्ण शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव काळजीपूर्वक नमूद करणे आवश्यक आहे.
BECIL Recruitment 2024 How to Apply
कंपनीने ऑनलाइन अर्ज प्रणालीचा अवलंब केल्याने उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी कंपनीने जाहीर केलेली जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमेदवार पात्र असतील त्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड च्या वेबसाईटला भेट द्यायची आहे. वेबसाईटवरच असणाऱ्या करिअर सेक्शन मध्ये गेल्यानंतर तिथे ररजिस्ट्रेशन फॉर्म किंवा नोंदणी फॉर्म असा एक पर्याय असेल त्यावर क्लिक करून नोंदणी करायची आहे तसेच अर्ज भरण्यापूर्वी आयोगाने दिलेल्या अटी व शर्ती या काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
कंपनीने दिलेल्या लिंक वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना अर्ज शुल्क किंवा परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. उमेदवारांनी भरलेले नोंदणी शुल्क हे कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही यासाठी उमेदवारांनी आपली पात्रता म्हणजेच वय , शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यासाठी असणाऱ्या सर्व पात्रतेचे निकष आपण पूर्ण करत आहोत हे सुनिश्चित करणे आवश्यक असणार आहे.
चुकीचा अर्ज किंवा अपूर्ण अर्ज हा पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.
रेल्वे मध्ये दहावी,बारावी,आयटीआय उमेदवारांना नोकरीची संधी Integral Coach factory Recruitment 2024
उमेदवारांची ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे म्हणजेच शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या संबंधित असणारे कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
अर्ज भरून झाल्यानंतर अर्ज ऑनलाईन सबमिट केल्यानंतर अर्जाची शेवटची तारीख भरण्याच्या अर्जाची प्रत आपल्याजवळ डाऊनलोड करून ठेवावी.
BECIL Recruitment 2024 Salary
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट ऑफ इंडिया लिमिटेड नुसार २० पदांसाठी ३९३ जागाच्या पूर्ततेसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्या सर्व पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा काही रक्कम ही मानधन म्हणून दिली जाणार आहे.
प्रत्येक पद आणि असणारा अनुभव यांनुसार मिळणारे मानधन हे वेगवेगळे आहेत.
चला तर बघूया कोणत्या पदासाठी किती मानधन मिळणार आहे.
पदाचे नाव | दरमहा मानधन |
१) टेक्निकल असिस्टंट | रुपये ४०,७१० |
२) ज्युनिअर फिजिओथेरपिस्ट | रुपये २५,००० |
३) मल्टी टस्किंग ( MTS ) | रुपये १८,४८६ |
४) डेटा एन्ट्री आऊटसोर्स ( DEO ) | रुपये २२,५१६ |
५) पेशंट केअर मॅनेजर ( PCM ) | रुपये ३०,००० |
६) ड्रायव्हर | रुपये २२,५१६ |
७) पेशंट केअर कॉर्डिनेटर ( PCC ) | रूपये २४,४४० |
८) रेडिओग्राफर | रुपये ४०,७१० |
९) लॅब अटेंडंट | रुपये २२,५१६ |
१०) टेक्नॉलॉजिस्ट | रुपये २२,५१६ |
११) रिसर्च असिस्टंट | रुपये २९,५६५ |
१२) डेव्हलपर | रुपये ३८,००० |
१३) ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर | रुपये २४,४४० |
१४) फार्मासिस्ट | रुपये २४,४४० |
१५) नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर किंवा नेटवर्क सपोर्ट इंजिनिअर | रुपये २४,४४० |
१६) फेलबोटोमिस्ट | रुपये २१,९७० |
१७) इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन ( EMT ) | रुपये २२,५१६ |
१८) मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन ( MLT ) | रुपये २४,४४० |
१९) ऑफथालमिक टेक्निशियन | रुपये ३१,००० |
२०) असिस्टंट डायटीशियन | रुपये २६,००० |
Conclusion
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टेड इंडिया लिमिटेड प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार २० पदासाठी एकुण ३९३ रिक्त पदे / जागा या भरल्या जाणार आहे सदर भरती ही दिल्ली आणि एनसीआर भागातील केंद्रीय सरकारी रुग्णालयामध्ये असणाऱ्या रिक्त जागांसाठी करण्यात येणार आहे.यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट ऑफ इंडिया लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावर वर जाऊन नोंदणी व अर्ज भरायचा असून सोबत अर्ज शुल्क देखील भरून अर्ज सबमिट करायचा आहे. उमेदवारांची निवड ही मुलाखत स्किल टेस्ट किंवा ऑन साईट परफॉर्मन्स या चाचणीं मधून केली जाईल.
Frequently Asked Questions
१) BECIL Recruitment 2024 साठी किती पदे भरण्यात येणार आहे ?
उत्तर : सदर भरतीसाठी २० पदासाठी एकुण ३९३ रिक्त पदे भरली जाणार आह
२) BECIL Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे ?
उत्तर : सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार असून अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ही १२ जून २०२४ आहे.
३) BECIL चा फुल्ल फॉर्म काय आहे ?
उत्तर : BECIL म्हणजेच ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट ऑफ इंडिया लिमिटेड.
४) BECIL Recruitment 2024 नुसार उमेदवाराची निवड कायमस्वरूपी निवड असणार आहे का ?
उत्तर : उमेदवाराची निवड ही दिल्ली आणि एन सी आर भागातील केंद्रीय सरकारी रुग्णालयांमध्ये असणाऱ्या रिक्त जागा भरण्यासाठी करार पद्धतीने होणार आहे. उमेदवाराची निवड ही कायमस्वरूपी निवड नसेल.
५) BECIL Recruitment 2024 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना किती मानधन मिळणार आहे ?
उत्तर : सदर भरतीसाठी आवश्यक असलेली निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना काही रक्कम ही दरमहा मासिक वेतन / मुळवेतन म्हणून दिले जाणार आहे. कोणत्या पदासाठी किती वेतन मिळणार आहे यासाठी BECIL Recruitment 2024 Salary या लिंक वर वाचा.