NDA 2 2024 Recruitment नुसार राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्ये रिक्त असणाऱ्या एकूण ४०४ पदासाठी लोकसेवा आयोगाने जाहीरात प्रसिद्ध केले असून जे उमेदवार आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व पात्रतेचे निकष पूर्ण करतील अशाच उमेदवारांना सदर पदासाठी अर्ज करता येणार आहे.
NDA 2 2024 Recruitment Overview
आर्मी नेव्ही आणि नेव्हल फोर्स मध्ये असणाऱ्या रिक्त जागा या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नेव्हाल अकॅडमी मार्फत भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे.
नुकतेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपल्या जाहिरात क्रमांक 10/2024/NDA -II नुसार एकूण ४०४ जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आर्मी नेव्ही आणि नेव्हाल फोर्स मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना ही एक मोठी संधी असणार आहे.
चला तर बघुया कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील, निवड प्रक्रिया कशी असेल आणि अर्ज कसा भरायचा पासून अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे याची विस्तृत माहिती आपण UPSC NDA Recruitment 2024 यामध्ये घेणार आहोत.
जाहिरात प्रसिद्ध : | केंद्रीय लोकसेवा आयोग ( Union Public Service Commission ) |
पदाचे नाव : | राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी कॅडेट प्रवेश योजना |
पदाची संख्या : | एकूण ४०४ जागा |
अर्ज पद्धत : | ऑनलाईन पद्धतीने अर्ज ( Online Mode ) |
अधिकृत संकेतस्थळ : | upsconline.nic.in |
NDA 2 2024 Recruitment Important Dates
केंद्रीय लोकसेवा आयोगाने सदर भरतीसाठी ऑनलाईन प्रणालीचा अवलंब केल्याने उमेदवारांना आयोगाने नमूद केलेल्या कालावधी मध्येच अर्ज सादर करायचा आहे. आयोगामार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची लिंक ही केवळ अर्ज दाखल करायच्या शेवटच्या तारखेच्या आत मध्ये भरणे आवश्यक असणार आहे.
आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये अर्ज भरण्याची सूरवात केव्हा होणार आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय असणार हा कालावधी दिलेला आहे. चला तर बघुया अर्ज भरण्याची महत्वाच्या तारखा.
अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख : | १५ मे २०२४ |
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : | ४ जून २०२४ |
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख : | ४ जून २०२४ |
परीक्षा घेतली जाणार ती तारीख : | राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी : १ सप्टेंबर २०२४ आणि नौदल अकादमी कॅडेट प्रवेश योजना साठी परीक्षा : २ जुलै २०२५ |
NDA 2 2024 Recruitment Vacancies
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी कॅडेट प्रवेश योजना साठी आपल्या तीनही दलातील म्हणजेच आर्मी नेव्ही आणि नेव्हल फोर्स मध्ये असलेल्या रिक्त जागांची पूर्तता UPSC NDA Recruitment 2024 भरती प्रक्रिया दरम्यान केली जाणार आहे. यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये सर्व जागांचा आराखडा दिलेला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ह्या भरतीसाठी परीक्षा घेतली जाणार असून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १५४ व्यां कोर्स करिता आणि नौदल अकादमी कॅडेट प्रवेश योजना च्या ११६व्या कोर्स करिता ही भरती होणार आहे.
UPSC NDA Recruitment 2024 मार्फत तब्बल ४०० पेक्षा जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
चला तर बघुया एकूण ४०४ जागा या कोणत्या अकॅडमी आणि दला साठी असणार आहे एका टेबलच्या माध्यमातून.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( आर्मी दल ) | २०८ जागा |
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( नेव्ही दल ) | ४२ |
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( एअर फोर्स ) | १२० जागा |
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी कॅडेट प्रवेश योजना | ३४ |
एकुण जागा | ४०४ जागा |
NDA 2 2024 Eligibility Criteria
आयोगाने आपल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेले आहेत की पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे यासाठी आयोगाने आपल्या जाहिरातीमध्ये पात्रतेचे निकष दिले असून अर्ज करणाऱ्या उमेदवाराने हे पात्रतेचे निकष व अटी पूर्ण वाचून घ्याव्यात.
चला तर बघूया आयोगाने कोणते पात्रतेचे निकष घालून दिले आहे यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीयत्व वयोमर्यादा लिंग वैवाहिक स्थिती शैक्षणिक पात्रता आणि शारीरक मानके नमूद केली आहे आता या सर्व आपण थोडक्यात बघणार आहोत
१) राष्ट्रीयत्व ( Nationality )
अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे
२) वयोमर्यादा ( Age Limit )
जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी आयोगाने काही किमान व कमाल वयाची मर्यादा घालून दिली आहे. केवळ याच वयोगटातील उमेदवारांना सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज भरणाऱ्या उमेदवाराचा जन्म हा २ जानेवारी २००६ या अगोदर आणि १ जानेवारी २००९ याच्यानंतर झालेला नसावा. केवळ याच जन्म कालावधीत असलेले उमेदवार अर्जासाठी पात्र असतील.
जन्मतारखेचा पुरावा म्हणून उमेदवाराने जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला कागदपत्रे तपासणी व पडताळणी वेळेस सादर करणे आवश्यक आहे.
३) शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification )
आयोगाने शैक्षणिक पात्रता संबंधित काही आवश्यक आर्थ दिली आहे ते आपण बघणार आहोत
१) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या आर्मी विंगसाठी :
राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाकडून १० + २ या पॅटर्ननुसार बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे.
२) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनमधील हवाई दल आणि नौदल विंगसाठी सोबतच भारतीय नौदल अकादमीमधील १० + 2 कॅडेट प्रवेश योजनेसाठी : यासाठी राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापिठाकडून १०+२ पॅटर्ननुसार बारावी परीक्षा ही भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित या विषयासहित उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
जे उमेदवार १०+२ या पॅटर्ननुसार बारावी परीक्षेसाठी पात्र असतील ते उमेदवार देखील सदर भरतीसाठी अर्ज करू शकतात.
जे उमेदवार अकरावी मध्ये शिकत असतील अशा उमेदवारांना सदर भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.
४) शारीरिक मानके ( Physical Standards )
शारीरिक मालकांचा विचार करता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकॅडमी प्रवेश परीक्षा यांच्या मार्फत घालून दिलेल्या नियमानुसार असतील यासाठी उमेदवारांनी आयोगाने प्रसिद्ध केलेल्या केलेल्या जाहिरातीमधून अपेंडिक्स क्रमांकचार वाचणे आवश्यक आहे
NDA 2 2024 A Recruitment How to Apply
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराने आयोगाच्या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे.
आयोगाचे संकेतस्थळ : upsconline.nic.in.
आयोगाच्या वेब पोर्टल वर जावून उमेदवारांना सर्वात प्रथम एक वेळ नोंदणी म्हणजेच वन टाईम रेजिस्ट्रेशन करायचे आहे. यामध्ये उमेदवाराने आपले प्रोफाइल तयार करून यामध्ये सर्व आवश्यक माहिती भरायची आहे. या प्रोफाइल मध्ये भरलेली माहिती योग्य असावी.
अर्ज भरताना उमेदवारांनी परीक्षा केंद्र काळजी पूर्वक निवडावे. तसेच या अर्जात कोणताही बदल करायचा असल्यास अर्ज करण्याची शेवटची तारीख संपल्या नंतर ७ दिवसाच्या आत करता येईल.
सर्व माहिती अचूक भरल्यानंतर उमेदवारांनी या भरती साठी अर्ज दाखल करायचा आहे. ऑनलाइन अर्ज भरताना अर्जाचे भाग एक आणि भाग दोन असे दोन्ही भाग असल्याने उमेदवारांना दोन्ही भाग भरणे आवश्यक आहे. यापैकी कोणताही एक भाग अपूर्ण असल्यास सदर अर्ज पुढील बकरीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही
आयोगाने उमेदवारांसाठी अर्जात कोणतेही बदल करायचा असल्यास अर्ज मुदत संपल्यानंतर सात दिवसाच्या आत आवश्यक ते बदल करता येतील. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ४ जून २०२४ असणार आहे.
NDA 2 2024 Recruitment Application Fee
आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या लिंक वरून अर्ज केल्यानंतर उमेदवारांना परीक्षा शुल्क अथवा अर्ज शुल्क भरणे आवश्यक असणार आहे. यासाठी आयोगाने उमेदवारांसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पेमेंट प्रणालीचा पर्याय दिलेला आहे.
सदर भरतीसाठी अर्ज शुल्क असणार आहे ; ₹१००.
ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणा करण्यासाठी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग यूपीआय इत्यादी सारख्या अनेक गेटवे चा वापर करता येणार आहे.
तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरण्यासाठी Pay by Cash पर्याय वापरून एक स्लीप तयार होईल. सदर पावती आणि अर्ज शुल्क रुपये १००₹ जवळच्या स्टेट बँकेच्या शाखेत जाऊन जमा करायचे आहे.
ऑफलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरताना उमेदवाराने एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की अशी शुल्क केवळ अर्ज मुदतीच्या शेवटच्या तारखेच्या एक दिवस आधी पर्यंत म्हणजेच ३ जून पर्यंत असेल.
मात्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख ही ४ जून २०२४ सायंकाळी ६.०० वाजे पर्यंत असेल.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने सदर भरतीसाठी काही प्रवर्गासाठी अर्ज शुल्क माफ केले आहे.
अनुसुचित जाती ,अनुसूचित जमाती , महिला वर्ग यांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही आहे.
NDA 2 2024 Recruitment Selection Process
UPSC NDA Recruitment 2024 साठीची निवड पद्धत आयोगाने आपल्या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केली आहे यानुसार उमेदवाराची निवड ही दोन टप्प्यांमध्ये केली जाईल.
पहिला टप्प्यांमध्ये उमेदवाराची लेखी परीक्षा घेतली जाईल या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी म्हणजेच मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यातून निवड होणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी पडताळणी केली जाईल तसेच उमेदवाराला वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागेल. या सर्व प्रक्रियेमधून निवड होणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड यादी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
NDA 2 2024 Recruitment Exam Pattern
केंद्रीय लोकसेवा आयोगाने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकॅडमी कॅडेट प्रवेश योजना यासाठी होणाऱ्या परीक्षा पद्धती लक्षात घेता यामध्ये उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे यामध्ये प्रामुख्याने गणित आणि साधारण क्षमता चाचणी या विषयावर लेखी परीक्षा घेतली जाईल या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना स्टाफ सिलेक्शन बोर्डातर्फे मुलाखतीसाठी बोलाविले जाईल.
चला तर बघूया कोणत्या विषयासाठी किती गुण आणि किती परीक्षा कालावधी हा देण्यात आला आहे
विषय | गुण | परीक्षा कालावधी |
गणित ( Mathematics ) | ३०० | २ तास ३० मिनिटे |
साधारण क्षमता चाचणी ( General Ability Test ) | ६०० | २ तास ३० मिनिटे |
मुलाखती ( Interview ) | ९०० | मुलाखती नुसार |
लेखी परीक्षेसाठी असणाऱ्या दोन्ही विषयाला बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न असणार आहेत गणित या विषयाचा प्रश्न पेपर आणि साधारण क्षमता चाचणी पेपर हे हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असेल. आयोगातर्फे लेखी परीक्षेसाठी किमान गुणांची मर्यादा घालून देण्यात आली आहे.
लेखी परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत असणार आहे यानुसार चुकलेल्या उत्तरासाठी काही गुण वजा केले जातील
लेखी परीक्षेसाठी असणारा सर्व अभ्यासक्रम उमेदवाराला केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेला जाहिरातीमध्ये सविस्तर वाचता येईल.
Conclusion
१०+२ पॅटर्ननुसार मान्यताप्राप्त राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठ यातून बारावी उत्तीर्ण असणाऱ्या तसेच भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित या विषयासहित बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना ४ जून २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज भरणाऱ्या उमेदवाराचा जन्म हा २ जानेवारी २००६ या अगोदर आणि १ जानेवारी २००९ याच्यानंतर झालेला नसावा. उमेदवाराच्या निवडीसाठी आधी लेखी परीक्षा व नंतर मुलाखत घेतली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल
Frequently Asked Questions
१) NDA 2 2024 साठी कोण अर्ज करू शकते ?
उत्तर : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी कॅडेट प्रवेश योजना साठी किमान शैक्षणिक पात्रता ही मान्यता प्राप्त राज्य शिक्षण बोर्ड अथवा विद्यापीठ १०+ २ या पॅटर्न नुसार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२) NDA 2 2024 Recruitment साठी किती जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे ?
उत्तर : UPSC NDA Recruitment 2024 अंतर्गत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी कॅडेट प्रवेश योजना साठी एकूण ४०४ जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
३) NDA 2 2024 Recruitment साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
उत्तर : UPSC NDA 2 2024 Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ४ जून २०२४ असणार आहे. तसेच अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख देखील ४ जून २०२४ आहे.
४) UPSC NDA 2 2024 साठी अर्ज शुक्ल किती आहे ?
उत्तर :NDA 2 2024 सदर भरतीसाठी आयोगाने रुपये १०० अर्ज शुल्क ठेवले असून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि महिला घटक यांना यातून वगळण्यात आले असून त्यांना कुठलेही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचे नाहीये.
५) NDA 2 2024 Recruitment 2024 साठी परीक्षा केव्हा घेतली जाईल ?
उत्तर : केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी कॅडेट प्रवेश योजना साठी परीक्षा अनुक्रमे १ सप्टेंबर २०२४ आणि २ जुलै २०२५ पासून होईल.